अन्न वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत त्यामध्ये 'आरोग्य' ही आणखी एक महत्त्वपूर्ण गरज निर्माण झाली आहे. आरोग्याशी संदर्भात सेवांमध्ये औषधनिर्मिती आणि औषधपुरवठा या खूप महत्वपूर्ण असतात आणि या सेवा पुरवण्याचे काम फार्मासिस्ट करतो. आत्तापर्यंत तुमचा कधी न कधीतरी फार्मासिस्टशी संबंध आला असेलच अगदी डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे खरेदी करण्यापासून ते शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या गरजांपर्यंत__
डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधयोजनेनुसार (प्रिस्क्रिप्शननुसार) औषध वितरित (डिस्पेन्स) करणं एवढीच काय ती लोकांना फार्मासिस्टची ओळख असते. दुसऱ्या शब्दात 'एक औषधवाला' अशीच प्रतिमा लोकांच्या मनात निर्माण होते. त्याच्या पलीकडेही फार्मासिस्टची अनेक कर्तव्ये, पैलू आहेत. फार्मासिस्टच्या अशा अनेक पैलूंबाबत आपल्या समाजामध्ये जागरूकता नाही ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे.
चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे फार्मासिस्ट आणि काय आहे त्याची भूमिका तुमच्या आरोग्यसंदर्भात__