महात्मा गांधींच्या आत्मकथेच्या मराठी अनुवादाची ही तिसरी आवृत्ती नवजीवन ट्रस्टतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. हा ग्रंथ हिंदी, गुजराथी आणि इंग्रजी भाषांतून नवजीवन ट्रस्टने वाचकांना उपलब्ध करून दिलाच आहे. आज तो मराठी भाषेत देखील उपलब्ध आहे. श्री. आप्पासाहेब पटवर्धन यांनी आपला मराठी अनुवाद प्रसिद्ध करण्याची आम्हाला परवानगी दिली, याबद्दल त्यांचे आभारी आहोत. ग्रंथाचे शेवटी छोटीशी विषयसूची जोडण्यात आली आहे. त्यामुळे वाचकवर्गाची चांगली सोय होईल, अशी आशा आहे. महाराष्ट्रीय वाचकवर्ग पूर्वीप्रमाणे या आवृत्तीचाही यथायोग्य परामर्श घेईल, असा भरवसा वाटतो. ही चौथी आवृत्ती वाचकांपुढे ठेवताना आम्हास आनंद वाटतो. गांधीशताब्दी निमित्त मराठी जनता ह्या ग्रंथाचे प्रकर्षाने स्वागत करील, अशी आम्हास आशा आहे. ह्यातील शुद्धलेखन मराठी साहित्य महामंडळाने तयार केलेल्या आणि महाराष्ट्र राज्य सरकारने मान्य केलेल्या नियमावलीस धरून आहे.