इतिहासात अनेक शुर-वीर जन्माला आले व आपल्या पराक्रमाची ओळख ठेवून गेले. शिवकाळातही अशा अनेक विरांनी आपला पराक्रम गाजविला. अनेक पडद्यासमोर आले, तर काही पडद्यामागेच राहिले. त्यामुळे त्यांचा पराक्रम काही कमी होत नाही. अशाच एका विराची ओळख श्री दत्तात्रय नाथा भापकर यांनी आपल्या या ऐतिहासिक कादंबरीतून देण्याचा प्रयत्न केला आहे. कादंबरी काल्पनिक कथेवर अवलंबून असली तरी, शिवकालात निर्माण झालेल्या परिस्थितीला अनुसरून “भिकाजी" या विराचे कार्य आहे.