Pashchimatya Rajakiy Vichar FYBA Second Semester- RTMNU: पाश्चिमात्य राजकीय विचार बी.ए. द्वितीय सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
By:
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जून २०१६ पासूनच्या सेमिस्टर पॅटर्नच्या नव्या अभ्यासक्रमानुसार बी.ए. प्रथम वर्षाच्या दुसऱ्या सेमिस्टरकरिता पाश्चिमात्य राजकीय विचार हे पुस्तक आहे. ह्या पुस्तकाचे लेखन प्राध्यापक प्रा. रा.ज. लोटे तसेच मनोहर पिंपळापुरे अॅण्ड कं. पब्लिशर्स यांनी प्रकाशित केले आहे. राजकीय विचारांच्या विकासात इसवी सन पूर्व काळातील ग्रीक नगरराज्यांना महत्त्वाचे स्थान आहे. राज्य, राज्यसंस्थेचे स्वरूप, न्यायाची कल्पना, आदर्श राज्य, नागरिकत्वाची व्याख्या, शासनाचे प्रकार, प्रत्यक्ष लोकशाही इत्यादी राज्यशास्त्रीय दृष्टीने महत्त्वाच्या घटकांसंबंधीच्या विचारांचा प्रारंभ इसवी सन पूर्व काळातील ग्रीक नगरराज्यांपासून होतो. ऐतिहासिक दृष्टीने इसवी सन पूर्व कालखंडातील चौथे व पाचवे शतक अत्यंत महत्त्वाचे. कारण हाच ग्रीक नगरराज्यांच्या गौरवशाली युगाचा कालखंड होय. या कालखंडात सिकंदरसारखा महान शासक आणि जगज्जेत्ता राजा झाला. प्लेटो, ॲरिस्टॉटलसारखे महान तत्त्वज्ञ वा राजकीय विचारवंत देखील याच कालखंडातले होय. राज्यकारभार कसा चालवावा याबाबतचे विभिन्न नमुने वा प्रकार तत्कालीन ग्रीक नगरराज्यांमध्ये होते. ग्रीक नगरराज्ये ही त्या कालखंडातील राजकीय विचारविनिमयाची आणि चिंतनाची केंद्रे होती असे म्हणणे संयुक्तिक होईल. हॉब्ज, लॉक, रूसो, बेथेम, मिल, मार्क्स, लेनिन हे सर्व पाश्चिमात्य राजकीय विचारवंत. पाश्चिमात्य राजकीय विचारांची सुरुवात ग्रीकांपासून होते. ग्रीक राजकीय विचारांच्या अभ्यासाचा प्रारंभ प्लेटो व अॅरिस्टॉटलच्या राजकीय विचारांपासून पुस्तकांमध्ये करण्यात आला आहे.
- Copyright:
- 2019
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 139 Pages
- ISBN-13:
- 9788193310816
- Publisher:
- Manohar Pimpalapure, Pimpalapure & Co. Publishers
- Date of Addition:
- 02/19/21
- Copyrighted By:
- Prof. R. J. Lote
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Nonfiction
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.