Britishkalin Bharat 1764 Te 1885 SYBA Third Semester - RTMNU: ब्रिटीशकालीन भारत १७६४ ते १८८५ बी.ए. द्वितीय वर्ष तृतीय सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ (2017)
By:
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- विद्यापीठ अनुदान आयोगाने ठरवून दिलेल्या ध्येय-धोरणानुसार ब्रिटीशकालीन भारत : १७६४ ते १८८५ (History of India : 1764 to 1885) हे बी. ए. द्वितीय वर्षः तृतीय सेमिस्टर करिता या वर्गासाठी मराठी भाषा अभ्यासमंडळाने संपादित केले आहे. पदवी आणि पदव्युत्तर पातळीवर दर्जेदार, उच्चप्रतीचे, व्यवसायाभिमुख आणि सर्वव्यापी शिक्षण दिले जावे याकरिता केंद्र सरकारच्या मानव संसाधन आणि विकास मंत्रालयाने तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाने जी मार्गदर्शक तत्त्वे आणि धोरण निश्चित केले आहे त्याची मातृभाषेशी आणि वाङ्मयाशी योग्य सांगड घालण्याचे धोरण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अत्यंत विचारपूर्वक आणि दूरगामी स्वरूपात स्वीकारलेले आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनाचे यथार्थ मूल्यमापन करण्याच्या व त्यांच्या ज्ञानकक्षा विस्तारित करण्याच्या उद्देशाने आवश्यक ते बदल करण्याचा योग्य निर्णयही घेतलेला आहे. त्याच दृष्टिकोनातून मराठी भाषा अभ्यासमंडळाच्या मार्गदर्शनाखाली ब्रिटीशकालीन भारत : १७६४ ते १८८५ (History of India : 1764 to 1885) या पाठ्यपुस्तकाची निर्मिती पाठ्यपुस्तक समितीने केली आहे. पाठ्यपुस्तकामध्ये बक्सारची लढाई व अलाहाबादचा तह (Battle of Buxar - Treaty of Allahabad), लॉर्ड क्लाईव्हची दुहेरी राज्यव्यवस्था (Dual Government of Lord Clive), लॉर्ड कॉर्नवालिसची कायमधारा व्यवस्था (Permanent Settlement of Lord Cornwallis), लॉर्ड वेलस्लीची तैनाती फौज पद्धती (Subsidiary Alliance of Lord Wellesley), लॉर्ड विलियम बेंटिंकच्या अंतर्गत सुधारणा (Internal Reforms of Lord William Bentinck), लॉर्ड डलहौसीचे विलिनीकरण (खालसा) तत्त्व (Doctrine of Lapse of Lord Dalhousie), १८५७ चा उठाव - कारणे, परिणाम (Revolt of 1857 - Causes, Effects), ब्राम्हो समाज, प्रार्थना समाज, आर्य समाज (Brahmo Samaj, Prarthana Samaj, Arya Samaj), सत्यशोधक समाज, दलित वर्गाच्या चळवळी (Satya Shodhak Samaj, Depressed Class Movement), लॉर्ड लिटनची शासनव्यवस्था (Lord Lytton's Administration), लॉर्ड रिपनच्या अंतर्गत सुधारणा (Lord Ripon's Internal Reforms) आणि भारतीय राष्ट्रवादाचा उदय, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना (Rise of Indian Nationalism, Establishment of Indian National Congress) इत्यादींचा अभ्यासक्रम दिला आहे.
- Copyright:
- 2017
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 181 Pages
- ISBN-13:
- 9788193422816
- Publisher:
- Manohar Pimpalapure, Pimpalapure & Co. Publishers
- Date of Addition:
- 02/25/21
- Copyrighted By:
- Prof. N. C. Dikshit
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Nonfiction
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.