Marathi Sulabhbharti class 7 - Maharashtra Board: मराठी सुलभभारती इयत्ता सातवी - महाराष्ट्र बोर्ड
By:
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- मराठी सुलभभारती इयत्ता सातवी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकातील कथा, संवाद, पाठ, कविता, गीते वाचून नवनवीन शब्द शिकायला मिळणार आहेत. या पाठ्यपुस्तकात आवडतील अशी शब्दकोडी आणि 'वाचा', 'चर्चा करा, सांगा', 'खेळ खेळूया' अशा अनेक कृती दिल्या आहेत. तसेच व्याकरण घटकांची सोप्या रीतीने ओळख करून दिली आहे. शिवाय तुमच्या नवनिर्मितीबद्दल बोलण्याची, लिहिण्याची संधीही मिळणार आहे. संगणक, मोबाइल सहजपणे हाताळता येतो. या तंत्रज्ञानाचा अभ्यासासाठी उपयोग व्हावा यादृष्टीनेही काही कृती करण्यासाठी दिल्या आहेत. मराठी भाषा शिकत असताना त्यातून काही मूल्ये शिकणे, सामाजिक समस्या जाणून घेणे, त्या सोडवण्यासाठी तत्पर राहायला शिकणे हेही महत्त्वाचे आहे. या दृष्टीनेही या पाठ्यपुस्तकातील पाठ, कृती, स्वाध्याय यांचा विचार केला आहे. पाठ्यपुस्तकामध्ये विद्यार्थ्यांच्या भावविश्वातील पाठ, कविता, गीते, कृती, संवाद, स्वाध्याय, उपक्रम व प्रकल्प यांसारख्या अनेक घटकांचा समावेश केलेला आहे. तसेच व्याकरण घटकांची मनोरंजक, सोप्या व कार्यात्मक पद्धतीने मांडणी केली आहे. वैविध्यपूर्ण शीर्षकांखाली काही कृती दिलेल्या आहेत या कृतींतून विद्यार्थ्यांमधील निरीक्षणक्षमता, विचारक्षमता व कृतिशीलता यास वाव मिळणार आहे.
- Copyright:
- 2020
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 116 Pages
- Publisher:
- Shri. Vivek Uttam Gosavi
- Date of Addition:
- 05/16/21
- Copyrighted By:
- Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Nonfiction
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.