Satyashodhak Samajacha Itihas: सत्यशोधक समाजाचा इतिहास
By:
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- साहित्य संस्कृती मंडळाने “सत्यशोधक समाजाचा इतिहास” लिहिण्याचे काम श्री. महेश जोशी यांच्याकडे सोपवले होते व ते त्यांनी आनंदाने स्वीकारले. त्या इतिहासाचा हा पहिला भाग “आमूलाग्र परिवर्तनाचा काळ [इ.स. १७६० ते १८६०]” या शीर्षकाने प्रसिद्ध होत आहे. या भागात १७६० ते १८६० या शंभर वर्षातील महाराष्ट्रातील व त्याच अनुषंगाने भारतातील व इग्लंडमधील काही घटनांचा परामर्श घेतला आहे. महात्मा फुले यांचा जन्म १८२७ साली झाला व निधन २८ नोव्हेंबर, १८९० साली झाले. १८४८ साली त्यांनी शूद्रातिशूद्रांच्या मुलींसाठी शाळा सुरू केली. या वर्षापासून त्यांच्या सामाजिक क्रांतीच्या कार्याला सुरुवातझाली. श्री. महेश जोशी यांच्या विवेचनात ज्योतिबांच्या कार्याची पार्श्वभूमी विशद केलेली आहे. या अवधीत ज्या विविध ऐतिहासिक व सामाजिक घडामोडी झाल्या त्यांचे परिणाम ज्योतिबांच्या कार्यावर कसे झाले हे स्पष्ट करण्याचा हेतू श्री. जोशी यांचा आहे. विशेषतः, पानिपतच्या तिसऱ्या युद्धानंतर ज्या घडामोडी झाल्या व जे राजकीय प्रवाह निर्माण झाले त्यामुळे निर्माण झालेली पार्श्वभूमी ही ज्योतिबांच्या कार्याला कशी पोषक झाली, याचे विवेचन या पुस्तकात आहे. त्याचबरोबर, इंग्रजी राजवट आल्याने जी आर्थिक परिस्थिती निर्माण झाली, त्या परिस्थितीचे पण विवेचन या पुस्तकात आहे. कारण, या आर्थिक परिस्थितीचा मराठी समाजावर दूरगामी परिणाम झालेला आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यामागे ज्योतिरावांची विश्वव्यापी दृष्टी ज्याप्रमाणे कारणीभूत होती, त्याचप्रमाणे जे राजकीय, सामाजिक व आर्थिक बदल १८४० पूर्वी आले तेही कारणीभूत होते. श्री. महेश जोशी यांनी याच हेतूने या इतिहासाचा पहिला भाग लिहिला आहे.
- Copyright:
- 2002
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 122 Pages
- Publisher:
- Maharashtra Rajya Sahitya ani Sanskruti mandal Mumbai
- Date of Addition:
- 08/27/22
- Copyrighted By:
- Maharashtra Rajya Sahitya ani Sanskruti mandal Mumbai
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- History
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.