Shivram: शिवराम
By:
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- वकीलांचा सेहेचाळीस-सत्तेचाळीस वर्षांचा मुलगा अपघातात मरण पावला होता. सूनबाई नोकरी करीत होती. घरात जोगळेकरांची पत्नी, सोळा वर्षांचा नातू आणि अठरा वर्षांची नात होती. चोवीस तास घरात राहून घरातलं सर्व काम करणारी बाई त्याना हवी होती. स्वत:चा बंगला होता. कामवालीला रहायला अंगणात खोली होती. पहिल्या भेटीतच वकीलाना ताराचा नीटनेटकेपणा, आटोपशीरपणा, चुणचुणीतपणा पसंत पडला. तिची आईही बरोबर आहे हे समजताच तर त्यानी पहिल्या भेटीतच त्या दोघींचं काम पक्कं केलं, आणि तारा-चंद्राबाई अंगणातल्या मागच्या खोलीत रहायला आल्या. एक वरचं पाऊल, ताराला वाटलं. या मायलेकी वकीलाना एकदम पसंत पडल्या होत्या. नाहीतर आजकाल कामवालीचा नवरा, मुलगा, भाऊ, व्यसनी, दारूडे असले तर त्यांच्यापासून मालकाना किती त्रास होतो याची अनेक उदाहरणं त्यानी प्रत्यक्षच पाहिली होती. खेडेगावातनं आल्याचं ताराने पहिल्याच भेटीत सांगितलं होतं. साधा कुकर, प्रेशर कुकर, वॉशिंग मशिन, रेफ्रीजरेटर, पंखे, रुम कुलर, मिक्सर ग्राइंडर या वस्तू आजकाल बहुतेक सर्वत्र असतातच-फक्त ताराने त्या कधी पाहिल्याही नव्हत्या-पण त्या कशा वापरायच्या हे शिकायची तिची तयारी होती. थोरली अनिता तर जवळ जवळ तिच्याच वयाची होती. मुख्य म्हणजे ताराच्या मनात या लोकांसंबंधी कोणतीही असूया नव्हती. ती काही कायमची यांच्या घरची नोकर राहाणार नव्हती ही तिने मनाशी अगदी पक्की खूणगाठ बांधली होती. आधुनिक आयुष्यातल्या या नव्या नव्या सोयी सुविधांचं शिक्षण आपल्याला अनायासेच मिळतं आहे-ते का न घ्यावं ? नाहीतर अशा पाच-सात-दहा-पंधरा हजार रुपये किंमतीच्या वस्तूना तिला कोणी हात तरी लावू दिला असता का?
- Copyright:
- 2020
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 249 Pages
- Publisher:
- Saket Prakashan
- Date of Addition:
- 02/28/23
- Copyrighted By:
- Saket Prakashan
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Literature and Fiction
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.