Sandeh: संदेह
By:
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- ‘मी श्रीनाथ आहे असं मला वाटतं... अजूनही वाटतं... आतून आम्ही एकच आहोत. कधी मी त्याच्या नावाचा मुखवटा वापरला- कधी त्यानं माझा मुखवटा घालून लोकांना चकवलं! शेजारून एक जीप झपकन गेली. अगदी घासून जाईल इतक्या अंतरावरून! ``दे आर आऊट टु किल अस. श्रीनाथच्या स्वरात घबराट होती. दे आर आऊट टु किल अस! नियतीचा हा शेवटचा डाव आहे का- आम्ही दोघांनी एकत्र मरावं असा? ओरिजिनल आणि डुप्लिकेट या दोघांनाही, त्यांच्या प्रियतमेसकट नष्ट करावं, असा? जीप पुन्हा एकदा झपकन जवळून गेली... घार जशी झडप घालते आणि नेम चुकला की पुन्हा तयारी करण्यासाठी दूर जाते, तशी पुढं गेली... काय होणारेय आता? आम्ही तिघं- नियतीच्या हातची खेळणी... कुठल्या प्रवासाला निघालोय? कुठवर श्वास रोखून वाचाल अशा या दहा कथा. प्रत्येक कथा जबरदस्त संदेह निर्माण करणारी. ताण शेवटपर्यंत वाढवीत नेणारी. मराठीतल्या, अगदी मोजक्या स्वतंत्र संदेहकथांपैकी या दहा. संदेहनिर्मितीबरोबरच मानवी मनाचे झोक्यावरचे खेळही दाखवणाऱ्या. कधी मनाची उंची मोजणाऱ्या... कधी त्याचा तळ गाठणाऱ्या. हेच रत्नाकर मतकरी यांच्या कथालेखनाचं वैशिष्ट्य. त्यांची कथा केवळ चित्तथरारक असत नाही- ती मेंदूलाही झिणझिण्या आणते. इथं प्रथमच संग्रहित झालेल्या त्यांच्या या दहा कथा, रत्नाकर मतकरींची या वेगळ्या विषयावरची हुकमत पुन्हा एकदा सिद्ध करतात. स्वतंत्र संदेहकथाकार म्हणून त्यांचं अद्वितीय स्थान निश्चित करतात.
- Copyright:
- 1993
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 149 Pages
- ISBN-13:
- 9788184988840
- Publisher:
- Mehta Publishing House
- Date of Addition:
- 06/26/24
- Copyrighted By:
- Pratibha Matkari
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Horror, Literature and Fiction
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.