Zool: झूल
By:
Sign Up Now!
Already a Member? Log In
You must be logged into Bookshare to access this title.
Learn about membership options,
or view our freely available titles.
- Synopsis
- ज्ञानपीठ पारितोषकाने सन्मानित प्रख्यात लेखक भालचंद्र नेमाडे यांची वास्तववादी कादंबरी. 'कोसला'पासून सुरु झालेल्या त्यांच्या प्रतिभेचा अविष्कार 'झूल' मध्ये आणखी प्रखर होतो. हे चौथे चांगदेव चतुष्टय. विद्यार्थी-प्राध्यापकांच्या, महाविद्यालयाच्या जगातील चांगदेव हा शुद्ध जीवन जगण्याची इच्छा बाळगून असेलला संवेदनशील तरुण. तो योगी नाही, की सन्यासी नाही. मात्र, नैतिकता ढळू नये यासाठी प्राणपणाने झगडतो. एके ठिकाणी तो म्हणतो, 'हे घनघोर उग्र सृष्टीतत्वा, मला शुद्ध जीव कर की जेणेकरून मी निखळ जीवसत्व होईल' त्याला स्वतःला निखळ जीवन जगण्याची इच्छा असली तरी आसपासचा समाज सगळीकडूनच किडलेला आहे. त्याला ते दिसत असते. त्यातून वाचण्याची त्याची धडपड नेमाडेंच्या सिद्धहस्त लेखणीतून वाचायला मिळते. झूलचा आरंभ नामदेव भोळे आणि चांगदेव पाटील यांच्या आकस्मिक भेटीने होतो. भोळे ज्या कॉलेजात एक वर्षापूर्वी दाखल झालेला आहे, त्या कॉलेजात नव्याने रुजू होण्यासाठी चांगदेव निघालेला आहे. योगायोगाने दोघेही एकाच डब्यातून प्रवास करीत आहेत. दोघांचे जीवनविषयक दृष्टीकोण काहीसे भिन्न असले तरी वृत्तीत बरेच साम्य आहे. त्यामुळे त्यांची मैत्री जुळावयास वेळ लागत नाही. उभायतांतील मैत्रीचा हा धागा झूल कादंबरीच्या आरंभापासून अखेरपर्यंत सलगपणे प्रकट झाला आहे. बौद्धिक चर्चेसाठी प्रश्नांची उलटसुलट बाजू मांडण्यासाठी या उभयतांतील या मैत्रीचा लेखकाने भरपूर उपयोग करून घेतला आहे.
- Copyright:
- 1979
Book Details
- Book Quality:
- Excellent
- Book Size:
- 163 Pages
- ISBN-13:
- 9788171852338
- Publisher:
- Popular Publication
- Date of Addition:
- 10/29/24
- Copyrighted By:
- Bhalchandra Nemade
- Adult content:
- No
- Language:
- Marathi
- Has Image Descriptions:
- Yes
- Categories:
- Literature and Fiction
- Submitted By:
- Bookshare Staff
- Usage Restrictions:
- This is a copyrighted book.