Browse Results

Showing 1,076 through 1,100 of 1,444 results

Bhurtya: भुरट्या

by Amit Shinde

या कथांतून, एक होऊन गेलेला काळ पुन्हा एकटा जिवंत बनतो. चाळीस पन्नास वर्षांपूर्वीचे जग या कथांतून जाणवते. चाळीतील जगणे, वस्तराच हत्यार असलेली दुनिया आता कुठे गेली असा प्रश्न पडत असला तरी ती एकेकाळी मुख्य प्रवाहातील जगण्याची पार्श्वभूमी होती. त्या जगाची सफर अमित शिंदे यांच्या कथेतून घडते. या कथेतील स्त्रीया आतापासून काही दशकापूर्वीच्या कालखंडात जगत असल्या तरी त्या दुसऱ्याच्या हातचे खेळणे वाटत नाहीत. उलट परिस्थिती आपल्या हातात घेणाऱ्या वाटतात. हे त्यांच्या कथेचे वैशिष्टय आहे. अमित शिंदे यांच्या लेखनात एक प्रवाही गुण आहे. तणेच चित्रमय वर्णनाची वेधक शैली आहे. त्याच्या जोडीला त्या त्या कथा जगातले नेमके चपखल शब्द वापरून ते जग आहे तसे मांडण्याचा आग्रह आहे. त्यातील शिव्या आणि दुःख त्यामुळे तितकीच खरी वाटतात.

Bhurupvidnyan SYBA Third Semester - RTMNU: भूरूपविज्ञान बी.ए. द्वितीय वर्ष तृतीय सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Dr Vitthal Gharpure

'भूरूपविज्ञान' हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूरच्या नवीन अभ्यासक्रमानुसार भूगोल विषयाच्या बी.ए. सेमिस्टर ३ साठी लिहिलेले पाठ्यपुस्तक आहे. भूरूपविज्ञान या पाठ्यपुस्तकामध्ये विविध विषय आहेत, ज्यामध्ये प्राकृतिक भूगोलची व्याप्ती आणि स्वरूप, वेगनरचा खंडवहन सिद्धांत, भूकंप, ज्वालामुखी, विदारण आणि खननचक्राची संकल्पना, विदारणामुळे होणारे भूआकार, वाहते पाणी (नदी), हिमनदी, शुष्क प्रदेशातील (वाऱ्याने) भूआकार, भूमिगत पाणी (कास्र्ट) भूआकार, सागरी लाटांचे भूआकार, प्रात्यक्षिकांमध्ये समोच्च रेषांच्या सहाय्याने विविध भूआकार तयार करणे, समोच्च रेषांच्या अभ्यासाने उठावाचे नकाशे प्रोफाईलच्या सहाय्याने दाखविणे, पाश्वरषा किंवा छेद तयार करून त्यांचे भूआकारांच्या विश्लेषणातील महत्त्व विशद करणे, भारतीय स्थलनिर्देशक नकाशांचे वाचन इत्यादींचा समावेश आहे. सदर पाठ्यपुस्तकात प्रत्येक विषयांचे मुद्देसूद विवेचन केले आहे. त्याचबरोबर सरावासाठी विद्यार्थ्यांना त्यावर दीर्घोत्तरी, फरक स्पष्ट करा, टिपा लिहा, योग्य पर्याय निवडा, रिकाम्या जागा भरा इत्यादी प्रश्न दिले आहेत, तरी वाचकांनी त्यावर उपयुक्त सूचना कराव्यात.

Brahmand Ani Eshwar - Novel: ब्रह्मांड आणि ईश्वर - कादंबरी

by Shri. Dr. A. P. Dhande

ब्रह्मांड आणि ईश्वर या पुस्तकात समजलेले ब्रह्मांड आणि ईश्वर या संबंधी विज्ञान व तत्वज्ञान यांची सांगड घालून लेखकाने काही विचार प्रस्तुत केले आहे. या पुस्तकामध्ये विश्वाची माहिती दिलेली आहे. हिंदू संस्कृतीनुसार ब्रम्हदेवाने शुन्यातून विश्वनिर्मिती कशी केली, ब्रम्हदेव विश्वाच्या पूर्वी होते का नही, विश्वाची निर्मिती कशी झाली याची माहिती चित्राद्वारे दाखवली आहे.

Britishkalin Bharat 1764 Te 1885 SYBA Third Semester - RTMNU: ब्रिटीशकालीन भारत १७६४ ते १८८५ बी.ए. द्वितीय वर्ष तृतीय सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Prof. N. C. Dikshit

विद्यापीठ अनुदान आयोगाने ठरवून दिलेल्या ध्येय-धोरणानुसार ब्रिटीशकालीन भारत : १७६४ ते १८८५ (History of India : 1764 to 1885) हे बी. ए. द्वितीय वर्षः तृतीय सेमिस्टर करिता या वर्गासाठी मराठी भाषा अभ्यासमंडळाने संपादित केले आहे. पदवी आणि पदव्युत्तर पातळीवर दर्जेदार, उच्चप्रतीचे, व्यवसायाभिमुख आणि सर्वव्यापी शिक्षण दिले जावे याकरिता केंद्र सरकारच्या मानव संसाधन आणि विकास मंत्रालयाने तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाने जी मार्गदर्शक तत्त्वे आणि धोरण निश्चित केले आहे त्याची मातृभाषेशी आणि वाङ्मयाशी योग्य सांगड घालण्याचे धोरण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अत्यंत विचारपूर्वक आणि दूरगामी स्वरूपात स्वीकारलेले आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनाचे यथार्थ मूल्यमापन करण्याच्या व त्यांच्या ज्ञानकक्षा विस्तारित करण्याच्या उद्देशाने आवश्यक ते बदल करण्याचा योग्य निर्णयही घेतलेला आहे. त्याच दृष्टिकोनातून मराठी भाषा अभ्यासमंडळाच्या मार्गदर्शनाखाली ब्रिटीशकालीन भारत : १७६४ ते १८८५ (History of India : 1764 to 1885) या पाठ्यपुस्तकाची निर्मिती पाठ्यपुस्तक समितीने केली आहे. पाठ्यपुस्तकामध्ये बक्सारची लढाई व अलाहाबादचा तह (Battle of Buxar - Treaty of Allahabad), लॉर्ड क्लाईव्हची दुहेरी राज्यव्यवस्था (Dual Government of Lord Clive), लॉर्ड कॉर्नवालिसची कायमधारा व्यवस्था (Permanent Settlement of Lord Cornwallis), लॉर्ड वेलस्लीची तैनाती फौज पद्धती (Subsidiary Alliance of Lord Wellesley), लॉर्ड विलियम बेंटिंकच्या अंतर्गत सुधारणा (Internal Reforms of Lord William Bentinck), लॉर्ड डलहौसीचे विलिनीकरण (खालसा) तत्त्व (Doctrine of Lapse of Lord Dalhousie), १८५७ चा उठाव - कारणे, परिणाम (Revolt of 1857 - Causes, Effects), ब्राम्हो समाज, प्रार्थना समाज, आर्य समाज (Brahmo Samaj, Prarthana Samaj, Arya Samaj), सत्यशोधक समाज, दलित वर्गाच्या चळवळी (Satya Shodhak Samaj, Depressed Class Movement), लॉर्ड लिटनची शासनव्यवस्था (Lord Lytton's Administration), लॉर्ड रिपनच्या अंतर्गत सुधारणा (Lord Ripon's Internal Reforms) आणि भारतीय राष्ट्रवादाचा उदय, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना (Rise of Indian Nationalism, Establishment of Indian National Congress) इत्यादींचा अभ्यासक्रम दिला आहे.

Chetkin - Novel: चेटकीण - कादंबरी

by Narayan Dharap

गजबजलेल्या वस्तीपासून दूर असणारी वास्तू. या वास्तूत एक एक व्यक्ती अनाकलनीय शक्तीला सामोरी जाते आणि गडप होते; पण काही व्यक्ती सहीसलामत सुटतात आणि वास्तू पवित्र, पिशाचमुक्त होते. कशी हे जाणून घेण्यासाठी वाचा नारायण धारपलिखित "चेटकीण' ही कादंबरी. अज्ञात, अनाकलनीय आणि अतर्क्याचा गेली सहा दशके मागोवा घेणारी नारायण धारपांची कथा ही मराठीतील नि:संशय श्रेष्ठ भयकथा ठरते. धारपांच्या शब्दांना ओलसर, शेवाळी भयाचा बुळबुळीत स्पर्श आहे. प्रसंगवर्णनांना विंचवाच्या नांगीचा डंख आहे. सातत्याने भयकथेचा लोकप्रिय म्हणवला जाणारा कथाविष्कार हाताळणाऱ्या धारपांची शब्दकळा तरीही सालंकृत आणि श्रीमंत आहे. हेच त्यांच्या कथांच्या चिरंतन लोकप्रियतेचे गमक मानायला हरकत नाही. कमीत कमी संवादांच्या वापरातून निव्वळ स्थलकाल वर्णनांद्वारे वाचकाचे काळीज गोठवणाऱ्या, भरदिवसा वाचकाच्या मनामेंदूला भयाचा जहरी दंश करणाऱ्या धारपांच्या अ-गोचर कथांनी मराठी वाचकाच्या मनात भयकथेचा अनभिषिक्त सम्राट हे अढळस्थान धारपांना निर्विवादपणे बहाल केले आहे.

Gadhavach-Khel-Ani-Nikal

by Baba Bhand

One day a donkey saw that a monkey was dancing on the roof and the owner was enjoying it. So the donkey also did the same thing. But the roof collapsed and the owner beat the donkey.

Gharkombada Sinha Ani Badaikhor Gadav

by Baba Bhand

There were a donkey and a rooster in a house. One day a lion sees the donkey and decides to kill him. Suddenly the rooster crowed and the lion got scared and retrieved its position. The donkey mocks the lion and runs after him to make him more scared. He gets the opportunity and kills him. The effort of the rooster to save the donkey is wasted because of the donkeys over smartness.

Grass: ग्रास

by Narayan Dharap

नारायण धारप हे नाव आताच्या वाचन करणाऱ्या पिढीला नवीन असलं तरीही त्यांच्या `ग्रास' या पुस्तकातील तारणगावातील उत्तमचंदाचं पिशाचरूप कसं भंडावून सोडतं, कथानकात पुढे काय घडणार याची उत्सुकता कायम ठेवत वाचकाला कसं गुंतवून ठेवायचं याची प्रचीती त्यांच्या रहस्यमय लेखनातून येते.

Havarat Kutra Ani Tyach Pratibimb

by Baba Bhand

One day a dog was looking for food and he sees some vultures feeding on the remains of an animal carcass. The dog manages to take little meat from there. He comes near a river and sees a bigger dog and a more big size of meat in his jaws. He desires to get that bigger piece of meat. He opens his mouth to bark and his piece of meat goes in the water. In an attempt to get what was not there he loses his own piece of meat.

His Day: हिज डे

by Swati Chandorkar

समाजातील उपेक्षित घटक असणारे तृतीय पंथीय अर्थात हिजडे यांची ही कहाणी. त्यांचेही निरनिराळे प्रकार असतात. कोणी जन्मत:च स्त्री किंवा पुरुषाऐवजी तृतीय पंथी किंवा हिजडा असतो. देहाची जाण/समज आल्यावर कोणी स्त्री आपण पुरुष व्हावे म्हणून तर कोणी पुरुष आपण स्त्री व्हावे म्हणून निसर्गाविरुद्ध जाऊन वाटेल तो त्रास, वेदना सोसायला तयार होतात. एखाद्या स्त्रीला स्त्रीदेहाचे तर एखाद्या पुरुषाला पुरुषदेहाचेच आकर्षण वाटते; अशांना लेस्बियन म्हणतात. दैनंदिन जीवनासाठी त्यांना भीक मागणे, शुभ प्रसंगी बधाईला जाणे किंवा शरीरविक्रय असे मार्ग पत्करावे लागतात. वेगळे जीवन वाट्याला आल्याने आणि समाजाकडून बहुधा तुच्छता तसेच हेटाळणीची वागणूक मिळाल्यामुळे हे सगळे एका छताखाली म्हणजेच एक वस्ती करून राहतात. यांनाही गुरू असतो/असते. सर्वांना आपली कमाई गुरुकडे जमा करावी लागते; त्या बदल्यात गुरू त्यांचे जेवण-खाण, कपडालत्ता, आजारपण यासाठी खर्च करतो/करते. अर्थात गुरू म्हणेल ती पूर्व दिशा! याच चाकोरीतून चेला पुढे गुरू होतो. यांचीही घराणी असतात आणि प्रत्येक घराण्याचा नायक असतो. हिजडा तरुण असताना जगण्यासाठी त्याला करावी लागणारी धडपड, तडजोड, वेदना यांना अंत नाही. आजार आणि म्हातारपण यांचा सामना करण्यासाठी मानसिक बळ मिळवणं हे मोठं आव्हान त्यांच्यासमोर आहे आणि तरीही हा तृतीय पंथ ताठ आहे. एकूण हे त्यांचं आयुष्य आहे, जे त्यांनी ‘असं आयुष्य हवं’ म्हणून न मागितलेलं आणि तरीही नशिबी आलेलं. त्यांनाही चांगलं आयुष्य हवं आहे आणि या चांगल्या आयुष्यासाठी त्यांचं एकच मागणं आहे – ‘आम्हाला माणूस म्हणून जगू द्या...’

I Do What I Do: आय डू व्हॉट आय डू

by Raghuram G. Rajan

'माय नेम इज रघुराम राजन, आय डू व्हॅाट आय डू' (म्हणून मला जे करायचे ते मी करतो), असे एकदा भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले होते. या त्यांच्या वाक्याची प्रचिती वेळोवेळी आली. २०१३ मध्ये रघुराम राजन यांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नरपदाची सूत्रे हाती घेतली तेव्हा भारतापुढे विदेशी चलनाचे संकट होते. त्यातून देशाला बाहेर काढत अर्थव्यवस्थेला स्थैर्य आणण्याचे काम त्यांनी प्रथम केले. २०१३ ते २०१६ अशा तीन वर्षाच्या कारकिर्दीत रिझर्व्ह बँक व देशाच्या विकासासाठी घेतलेल्या निर्णयांची, मध्यवर्ती बँकेच्या मुख्य पदावर बसणे म्हणजे काय असते, त्याचे अनुभव कथन रघुराम राजन यांनी 'आय डू व्हॅाट आय डू' मधून केले आहे. डोसानॉमिक्स ते कर्जमुक्ती अशा अनेक अर्थशास्त्रीय संकल्पना, विकासासाठी आवश्यक मुद्दे मांडले आहेत. अगदी नोटाबंदीवरील त्यांचे मतही यात जाणून घेता येते. पुस्तकाचा मराठी अनुवाद अजित ठाकूर यांनी केला आहे.

Icha Pucha

by Kala Shashikumar

Icha and Pucha were two friends. They decided to have a party. They prepared nice dessert, called kanhi in Kerala. It is eaten with the help of jackfruit leaf. Icha goes to bring jackfruit leaf. But Pucha in the meantime eats the entire desert and her stomach bulges out. She cannot even walk. She goes around asking for help.

Jaduchi Bhandi

by Vayu Nayadu

In this story, Muthu and his family were lived under a tree. Muthu decided to went outside the village and earn money. On the way of a jungle, Muthu and ghost became friends and Ghosts helped the family. Muthu luck began, One man from the village he jealous. he did the same thing like Muthu but results were different. read story what happens next.

Jaduchi Bhandi

by Vayu Nayadu

This is a story of Mutthu and Chellum. They were very poor and had taken shelter under a banyan tree. One day Mutthu goes in search of work and arrives to a place where there were some ghosts. There he finds one small vessel which was magical and served whatever you wanted. Mutthu came home with this vessel and all problem was solved.

Jyotishyache Bhavishya Ani Vastavache Bhan

by Baba Bhand

This is a story of an astrologer. He was famous for predicting the future of people. One day while he was passing by a marketplace a man informs him of a burglary at his residence. He hurries back to home. A man questions him about his astrology. He thinks to himself, he fools everybody but when it is his turn he becomes helpless.

Kalavit Ani Ghoda Jhala Manasacha Gulam

by Baba Bhand

An antelope comes near a horse while he is grazing. The horse was selfish and he tells her to go away. He says the field belongs to him only. He takes help of a hunter passing by to get rid of the antelope. But in the process, the hunter makes the horse his slave. Because of the selfishness of the horse both the antelope and the horse becomes the slave of the man.

Kastan Gadi Odhanare Bail Ani Kurkurnari Gadi Va Drayavhar

by Baba Bhand

There is a lot of a load of logs on the bullock cart. The driver of the bullock cart is complaining about the condition of the road. The path is filled with stones and potholes, so it becomes very difficult for the bullocks to pull the cart. Here the driver is complaining but the bullocks are doing their work quietly. The bullocks are thinking what kind of man he is.

Labad Ani Khodakar Mendhapal

by Baba Bhand

This is a story of a mischievous shepherd boy. One day he alerted everybody about a tiger coming. The people there came running a saw there was none. He did the same thing again and again. Now the people came to know about his trick. One day a tiger really appears and the boy shouts for help but nobody comes. The tiger takes away the lambs and the boy suffers for his mistake.

Makade Ani Pakshi

by Damodar Viththal Phaphe

This is a story Monkey and birds. In winter on a conversation of monkey and birds. how monkey teaches a lesson to birds. read story what happens next.

Manavi Bhugol SYBA Fourth Semester - RTMNU: मानवी भूगोल बी.ए. द्वितीय वर्ष चतुर्थ सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Dr Vitthal Gharpure

'मानवी भूगोल' हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूरच्या नवीन अभ्यासक्रमानुसार भूगोल विषयाच्या बी.ए. द्वितीय वर्ष चतुर्थ सेमिस्टरसाठी लिहिलेले दर्जेदार पाठ्यपुस्तक आहे. 'मानवी भूगोल' या पाठ्यपुस्तकामध्ये विविध विषय आहेत. त्यामध्ये मानवी भूगोलाचे स्वरूप व व्याप्ती, मानवी वंश - अर्थ, लक्षणे व मानवी वंशाचे प्रकार, मानवाचे प्रारंभकालीन आर्थिक व्यवसाय, लोकसंख्येचे जागतिक वितरण, भारताच्या लोकसंख्येचे विभाग, प्रात्यक्षिकांमध्ये प्रक्षेपणाची कृती, गुण, दोष, वैशिष्ट्ये व उपयोग, संख्याशास्त्रीय पद्धतींचा उपयोग, रेषा व स्तंभालेखाचे उपयोग आणि स्थलनिर्देशक नकाशांचा क्षेत्रीय अभ्यास इत्यादी विषयांचा समावेश होतो. सदर पाठ्यपुस्तकात प्रत्येक विषयाचे मुद्देसूद विवेचन केले आहे. त्याचबरोबर सरावासाठी विद्यार्थ्यांना त्यावर दीर्घोत्तरी, लघुत्तरी, टिपा लिहा, फरक स्पष्ट करा, योग्य पर्याय निवडा आणि रिकाम्या जागा भरा इत्यादी प्रश्न दिले आहेत. तरी वाचकांनी त्यावर उपयुक्त सूचना कराव्यात.

Marathyancha Itihas (1600-1818) FYBA First Semester - SPPU: मराठ्यांचा इतिहास (१६०० ते १८१८) एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर १ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr S. G. Kolarkar

मराठ्यांचा इतिहास - शिवकाळापासून ते मराठ्यांच्या पाडावापर्यंत म्हणजे इ.स. १६०० पासून ते १८१८ पर्यंत हे पाठ्यपुस्तक आहे. पदवीपूर्व अभ्यासक्रम, पदव्युत्तर अभ्यासक्रम, निरनिराळ्या केन्द्रिय आणि प्रांतीय स्पर्धा परिक्षा ह्यांकरिता वर निर्देशित केलेल्या अभ्यासक्रमातील कोणता ना कोणता कालखंड नेहमीच नेमलेला असतो. मराठ्यांचा इतिहास युद्धाने सुरू झाला आणि युद्धातच संपला. या मराठ्यांचा युध्येतिहास १६००-१८१८ या पुस्तकामध्ये १६०० ते १८१८ पर्यंतच्या मराठ्यांच्या लढायांच्या इतिहासाचा समावेश आहे ज्यात संरक्षण दले, नौदल सेना, रणनीती यांचे वर्णन आहे. अशा विद्यार्थ्यांना हा ग्रंथ निश्चितपणे उपयोगी पडणार आहे.

Mauritius Mathematics Grade 7 (Part-I) - MIE

by Mauritius Institute of Education

Mauritius Mathematics Grade 7 (Part-I) Textbook Mauritius Institute of Education.

Mipanach Ojha Gheun Phirnara Machchar Ani Bail

by Baba Bhand

Because of too heavy rains there was an increase in breed of mosquitoes. One mosquito sat on the horn of an ox and apologized for not taking permission to sit on it. But the ox said to him in pride, whether you sit or don’t sit on my horn it does not make any difference to me. Your presence is like nothing. The mosquito did not like the attitude of the ox towards him.

Paropakar Chichundri Ani Shalindar

by Baba Bhand

One day an old porcupine who had no strength goes to the house of mice and asks for shelter. The mice allow it to stay inside but the house was very small and not enough space for all of them to fit in. After few days the mice request the porcupine to leave. The porcupine denies to leave but instead asks the mice to vacate the house and go.

Poshan Ani Aaharshastra SYBA Fourth Semester - RTMNU: पोषण आणि आहारशास्त्र बी.ए. द्वितीय वर्ष चतुर्थ सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Prof. Dr. Meena Kalele

विद्यापीठ अनुदान आयोगाने ठरवून दिलेल्या ध्येय-धोरणानुसार पोषण आणि आहारशास्त्र (Nutrition and Dietetics) हे बी. ए. द्वितीय वर्षः चतुर्थ सेमिस्टर करिता या वर्गासाठी मराठी भाषा अभ्यासमंडळाने संपादित केले आहे. पदवी आणि पदव्युत्तर पातळीवर दर्जेदार, उच्चप्रतीचे, व्यवसायाभिमुख आणि सर्वव्यापी शिक्षण दिले जावे याकरिता केंद्र सरकारच्या मानव संसाधन आणि विकास मंत्रालयाने तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाने जी मार्गदर्शक तत्त्वे आणि धोरण निश्चित केले आहे त्याची मातृभाषेशी आणि वाङ्मयाशी योग्य सांगड घालण्याचे धोरण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अत्यंत विचारपूर्वक आणि दूरगामी स्वरूपात स्वीकारलेले आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनाचे यथार्थ मूल्यमापन करण्याच्या व त्यांच्या ज्ञानकक्षा विस्तारित करण्याच्या उद्देशाने आवश्यक ते बदल करण्याचा योग्य निर्णयही घेतलेला आहे. त्याच दृष्टिकोनातून मराठी भाषा अभ्यासमंडळाच्या मार्गदर्शनाखाली पोषण आणि आहारशास्त्र (Nutrition and Dietetics)' या पाठ्यपुस्तकाची निर्मिती पाठ्यपुस्तक समितीने केली आहे. पाठ्यपुस्तकामध्ये समतोल आहार (Balanced Diet), जीवनचक्रातील पोषण (Nutrition through Life Cycle), आहारोपचाराची तत्त्वे (Principles of Diet Therapy), पोषण शिक्षण (Nutrition Education), अन्नदूषितीकरण, अन्नविषबाधा (Food Spoilage - Food Poisoning), अन्नसंरक्षण (Food Preservation), अन्नभेसळ (Food Adulteration), अन्नाचा पोषणदर्जा सुधारणे (Improving Nutritional Quality of Foods) आणि भारतातील कुपोषण (Malnutrition in India) इत्यादींचा अभ्यासक्रम दिला आहे.

Refine Search

Showing 1,076 through 1,100 of 1,444 results