Browse Results

Showing 1,126 through 1,150 of 1,444 results

Arvachin Jagacha History Third Year Fifth Semester - RTMNU: अर्वाचीन जगाचा इतिहास १७८९ ते १९२० बी.ए. तृतीय वर्ष पंचम सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी - महाराज नागपूर विद्यापीठ

by Prof. N. C. Dixit

विद्यापीठ अनुदान आयोगाने ठरवून दिलेल्या ध्येय-धोरणानुसार अर्वाचीन जगाचा इतिहास १७८९ ते १९२० (Modern World 1789-1920) हे बी. ए. तृतीय वर्षः पाचव्या सेमिस्टर करिता या वर्गासाठी मराठी भाषा अभ्यासमंडळाने संपादित केले आहे. पदवी आणि पदव्युत्तर पातळीवर दर्जेदार, उच्चप्रतीचे, व्यवसायाभिमुख आणि सर्वव्यापी शिक्षण दिले जावे याकरिता केंद्र सरकारच्या मानव संसाधन आणि विकास मंत्रालयाने तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाने जी मार्गदर्शक तत्त्वे आणि धोरण निश्चित केले आहे त्याची मातृभाषेशी आणि वाङ्मयाशी योग्य सांगड घालण्याचे धोरण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अत्यंत विचारपूर्वक आणि दूरगामी स्वरूपात स्वीकारलेले आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनाचे यथार्थ मूल्यमापन करण्याच्या व त्यांच्या ज्ञानकक्षा विस्तारित करण्याच्या उद्देशाने आवश्यक ते बदल करण्याचा योग्य निर्णयही घेतलेला आहे. त्याच दृष्टिकोनातून मराठी भाषा अभ्यासमंडळाच्या मार्गदर्शनाखाली 'अर्वाचीन जगाचा इतिहास १७८९ ते १९२० (Modern World 1789-1920)' या पाठ्यपुस्तकाची निर्मिती पाठ्यपुस्तक समितीने केली आहे. पाठ्यपुस्तकामध्ये फ्रेंच क्रांती (French Revolution), युरोपचा आशियातील वसाहतवाद (European Colonialism of Asia), युरोपचा आफ्रिकेतील वसाहतवाद (European Colonialism of Africa), चीन-जपान युद्ध (१८९४-१८९५) (Sino-Japanese War of 1894-1895), रशिया-जपान युद्ध (१९०४-१९०५) (Russo - Japanese War of 1904-1905), चीनमधील क्रांती, १९११ (Chinese Revolution of 1911), पूर्वेकडील प्रश्न (१८७८-१९१३) (Eastern Question, 1878-1913), पहिल्या महायुद्धाची कारणे (Causes of the First World War), व्हर्सायचा तह (Treaty of Versailles), राष्ट्रसंघाची रचना (League of Nations - Structure), राष्ट्रसंघाची कामगिरी व अपयश (Legue of Nations - Achievements and Failures) आणि रशियन क्रांती, १९१७ (Russian Revolution of 1917) इत्यादींचा अभ्यासक्रम दिला आहे.

Arvachin Jagacha Itihas 1789 te 1920 TYBA Fifth Semester - RTMNU: अर्वाचीन जगाचा इतिहास १७८९ ते १९२० बी.ए. तृतीय वर्ष पंचम सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Prof. N. C. Dixit

विद्यापीठ अनुदान आयोगाने ठरवून दिलेल्या ध्येय-धोरणानुसार अर्वाचीन जगाचा इतिहास १७८९ ते १९२० (Modern World 1789-1920) हे बी. ए. तृतीय वर्षः पाचव्या सेमिस्टर करिता या वर्गासाठी मराठी भाषा अभ्यासमंडळाने संपादित केले आहे. पदवी आणि पदव्युत्तर पातळीवर दर्जेदार, उच्चप्रतीचे, व्यवसायाभिमुख आणि सर्वव्यापी शिक्षण दिले जावे याकरिता केंद्र सरकारच्या मानव संसाधन आणि विकास मंत्रालयाने तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाने जी मार्गदर्शक तत्त्वे आणि धोरण निश्चित केले आहे त्याची मातृभाषेशी आणि वाङ्मयाशी योग्य सांगड घालण्याचे धोरण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अत्यंत विचारपूर्वक आणि दूरगामी स्वरूपात स्वीकारलेले आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनाचे यथार्थ मूल्यमापन करण्याच्या व त्यांच्या ज्ञानकक्षा विस्तारित करण्याच्या उद्देशाने आवश्यक ते बदल करण्याचा योग्य निर्णयही घेतलेला आहे. त्याच दृष्टिकोनातून मराठी भाषा अभ्यासमंडळाच्या मार्गदर्शनाखाली 'अर्वाचीन जगाचा इतिहास १७८९ ते १९२० (Modern World 1789-1920)' या पाठ्यपुस्तकाची निर्मिती पाठ्यपुस्तक समितीने केली आहे. पाठ्यपुस्तकामध्ये फ्रेंच क्रांती (French Revolution), युरोपचा आशियातील वसाहतवाद (European Colonialism of Asia), युरोपचा आफ्रिकेतील वसाहतवाद (European Colonialism of Africa), चीन-जपान युद्ध (१८९४-१८९५) (Sino-Japanese War of 1894-1895), रशिया-जपान युद्ध (१९०४-१९०५) (Russo - Japanese War of 1904-1905), चीनमधील क्रांती, १९११ (Chinese Revolution of 1911), पूर्वेकडील प्रश्न (१८७८-१९१३) (Eastern Question, 1878-1913), पहिल्या महायुद्धाची कारणे (Causes of the First World War), व्हर्सायचा तह (Treaty of Versailles), राष्ट्रसंघाची रचना (League of Nations - Structure), राष्ट्रसंघाची कामगिरी व अपयश (Legue of Nations - Achievements and Failures) आणि रशियन क्रांती, १९१७ (Russian Revolution of 1917) इत्यादींचा अभ्यासक्रम दिला आहे.

Balvikas 1 TYBA Fifth Semester - RTMNU: बालविकास १ बी.ए. तृतीय वर्ष पंचम सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Prof. Dr. Nalini Varadpande

बी.ए. अन्त्य वर्षाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी विद्यापीठाने नेमून दिलेल्या अभ्यासानुसार मराठीतून परिचय करून देणारे बालविकास' हे पुस्तक १९८१ मध्ये प्रथम प्रकाशित झाले. त्यानंतर त्या पुस्तकाच्या ४ आवृत्त्या निघाल्यात. त्याचे सर्व श्रेय श्री. मनोहर पिंपळापुरे ह्यांना आहे. ही आवृत्ती नवीन अभ्यासक्रमानुसार काढली आहे. ह्या वर्षापासून सेमिस्टर पद्धतीला सुरुवात झाली आणि त्यानुसार पाचव्या सेमिस्टरनुसार हे पुस्तक लिहिले आहे. प्रस्तुत आवृत्तीमध्ये बालकांच्या जन्मपूर्व विकासापासून पूर्वबाल्यावस्थेपर्यंतच्या विकासाच्या कक्षा विचारात घेतल्या आहेत. बालकाच्या विकासावर आनुवंशिकता आणि वातावरण ह्यांचा कसा परिणाम होतो आणि परिस्थिती मुलांच्या विकासाकरिता किती प्रभावी आहे हे त्याच्या विद्यार्थी दर्शविले आहे. ह्याशिवाय इतर घटकांचाही अभ्यास केला आहे, जे विकासावर परिणाम करतात. बी.ए. विद्यार्थिनींसाठी हे लिहिले असल्यामुळे अभ्यासक्रमात नमूद केलेल्या सर्व विषयांवर प्रकाश टाकला आहे.

Balvikas 2 TYBA Sixth Semester - RTMNU: बालविकास २ बी.ए. तृतीय वर्ष षष्टम सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Prof. Dr. Nalini Varadpande

प्रस्तुत बालविकास २ आवृत्तीमध्ये बालकांच्या जन्मपूर्व विकासापासून पूर्वबाल्यावस्थेपर्यंतच्या विकासाच्या कक्षा विचारात घेतल्या आहेत. बालकाच्या विकासावर आनुवंशिकता आणि वातावरण ह्यांचा कसा परिणाम होतो आणि परिस्थिती मुलांच्या विकासाकरिता किती प्रभावी आहे हे दर्शविले आहे. ह्याशिवाय इतर घटकांचाही अभ्यास केला आहे, जे विकासावर परिणाम करतात. 'बालविकास' हे पुस्तक केवळ आजच्या हे पुस्तक विद्यार्थिनींसाठी म्हणून नव्हे, तर उद्याच्या 'पालकांच्या दृष्टिकोनातून लिहिले आहे. आजचे विद्यार्थी-विद्यार्थिनी जेव्हा उद्या पालकांची भूमिका पार पाडतील तेव्हा या पुस्तकाचे महत्त्व त्यांना अधिक पटेल. पाल्यांचे विविध स्थितीमध्ये निरीक्षण कसे करायचे, त्यांचा विकासाचा टप्पा कसा लक्षात घ्यावयाचा, पालकांनी योग्य वेळी कसे सावध व्हायचे ह्याची पार्श्वभूमी ह्या पुस्तकांद्वारे तयार होईल. बालकांशी संबंधित असलेले व त्यांच्या विकासात प्रत्यक्ष सहभाग घेणारे शिक्षक केवळ शारीरिकच नव्हे तर बालकांचा सर्वांगीण विकास व्हावा असे दृष्टिकोन ठेवणारे डॉक्टर्स, बालकांसाठी झटणाऱ्या संस्था, पालक-बालक संघ, बाल मार्गदर्शन केंद्र, सर्टिफाईड स्कूल्स या संस्थेतील तज्ज्ञांसाठी व कार्यकर्त्यांसाठी देखील या पुस्तकांची उपयुक्तता जाणवेल, अशी अपेक्षा आहे.

Bharat Bhaugolik Parichay TYBA Sixth Semester - RTMNU: भारत भौगोलिक परिचय बी.ए. तृतीय वर्ष षष्टम सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Prof. Dr. Vitthal Gharpure

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बी.ए. सहाव्या सेमिस्टरचे भूगोल विषयाचे 'भारत : भौगोलिक परिचय' पाठ्यपुस्तक सादर करण्यात आले आहे. 'भारत : भौगोलिक परिचय' या पाठ्यपुस्तकांमध्ये आग्नेय आणि दक्षिण आशियातील भारताचे स्थान, भारताचे प्रमुख प्राकृतिक विभाग, भारताची जलप्रणाली, हवामान, जमिनीचे प्रकार, वनस्पती व जंगले यांचे प्रकार आणि वितरण खनिजे व ऊर्जा साधने, लोकसंख्येचे वितरण व घनता, हरित क्रांती व शेतीचे प्रादेशिकीकरण, उद्योगधंदे, औद्योगिक विभाग, व्यापाराचे स्वरूप, प्रात्यक्षिकांमध्ये आधुनिक तंत्राची ओळख यामध्ये हवाई छायाचित्रे, उपकरणे, प्रकार, प्रमाण विश्लेषण, फायदे/तोटे, भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) आणि दूरसंवेदन, सहसंबंध अर्थ आणि गुणांक कालं पिअरसन आणि स्पिअरमनची पद्धती क्षेत्र अभ्यास व क्षेत्र अहवाल तसेच लहान खेड्याचे सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण इत्यादी महत्त्वाच्या विषयांचा समावेश नवीन अभ्यासक्रमानुसार समाविष्ट केलेला आहे. सदर पाठ्यपुस्तकात प्रत्येक विषयाचे मुद्देसूद विवेचन केले आहे. त्याचबरोबर सरावासाठी दीर्घोत्तरी, टिपा लिहा, फरक स्पष्ट करा, एका वाक्यात उत्तरे (संक्षिप्त), चूक की बरोबर, एका वाक्यात उत्तरे लिहा इत्यादी प्रश्न दिले आहेत.

Bharatatil Sadyakalin Samajik Samasya TYBA Sixth Semester - RTMNU: भारतातील सद्यकालीन सामाजिक समस्या बी.ए. तृतीय वर्ष षष्टम सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Prof. R. J. Lote

विद्यापीठ अनुदान आयोगाने ठरवून दिलेल्या ध्येय-धोरणानुसार भारतातील सद्यकालीन सामाजिक समस्या (Current Social Problems in India) हे बी.ए. तृतीय वर्ष षष्टम सेमिस्टर करिता या वर्गासाठी मराठी भाषा अभ्यासमंडळाने संपादित केले आहे. पदवी आणि पदव्युत्तर पातळीवर दर्जेदार, उच्चप्रतीचे, व्यवसायाभिमुख आणि सर्वव्यापी शिक्षण दिले जावे याकरिता केंद्र सरकारच्या मानव संसाधन आणि विकास मंत्रालयाने तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाने जी मार्गदर्शक तत्त्वे आणि धोरण निश्चित केले आहे त्याची मातृभाषेशी आणि वाङ्मयाशी योग्य सांगड घालण्याचे धोरण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अत्यंत विचारपूर्वक आणि दूरगामी स्वरूपात स्वीकारलेले आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनाचे यथार्थ मूल्यमापन करण्याच्या व त्यांच्या ज्ञानकक्षा विस्तारित करण्याच्या उद्देशाने आवश्यक ते बदल करण्याचा योग्य निर्णयही घेतलेला आहे. त्याच दृष्टिकोनातून मराठी भाषा अभ्यासमंडळाच्या मार्गदर्शनाखाली ' भारतातील सद्यकालीन सामाजिक समस्या (Current Social Problems in India)' या पाठ्यपुस्तकाची निर्मिती पाठ्यपुस्तक समितीने केली आहे. पाठ्यपुस्तकामध्ये एकूण चार युनिट दिलेले आहेत. युनिट १ समकालीन भारतातील शिक्षण (Education in Contemporary India), युनिट २ विस्थापन आणि पुनर्वसन (Displacement and Rehabilitation), युनिट असहिष्णुता, दंगली आणि गुन्हे (Intolerance, Riot and Crime) आणि युनिट ४ भ्रष्टाचार (Curruption) इत्यादींचा अभ्यासक्रम दिला आहे.

Bharatiy Arthavyavastha 2 TYBA Sixth Semester - RTMNU: भारतीय अर्थव्यवस्था २ बी.ए. तृतीय वर्ष षष्टम सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Prof. B. L. Jibkate Dr Sudhakar Shastri

"भारतीय अर्थव्यवस्था-२" हे पुस्तक बी. ए. तृतीय वर्ष: सेमिस्टर-VI च्या अर्थशास्त्र ह्या पुस्तकाची प्रथम आवृत्ती आहे. नागपूर विद्यापीठाने जून २०१६ पासून संपूर्ण अभ्यासक्रमाची पुर्नरचना करून परीक्षेकरिता सेमिस्टर पद्धती सुरू केली आहे. त्यानुसार हे पुस्तक बी. ए. तृतीय वर्ष: सेमिस्टर-VI च्या अर्थशास्त्र ह्या विषयाच्या अभ्यासक्रमानुसार लिहिण्यात आले आहे. हे पुस्तक नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार लिहिले असले तरी इतर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना देखील ह्या पुस्तकाचा संदर्भ-ग्रंथ म्हणून उपयोग करता येईल. भारतीय अर्थव्यवस्था - II च्या अभ्यासक्रमात अनेक नवीन प्रकरणांचा समावेश करण्यात आला आहे. जसे - शाश्वत विकास, मानव विकास निर्देशांक, सर्वसमावेशक वाढ, नीती आयोग, चालू आर्थिक पाहणीची वैशिष्ट्ये, वस्तू व सेवा कर, चालू वर्षाच्या अंदाजपत्रकाची वैशिष्ट्ये, चौदावा वित्त आयोग, बहुपक्षीय व द्विपक्षीय व्यापार, ब्रिक्स बँक इत्यादी. ही सर्व प्रकरणे नवीन व अद्ययावत स्वरूपाची आहेत.

Bhartiya Samaj Sanrachanatmak Samasya TYBA Fifth Semester - RTMNU: भारतीय समाज संरचनात्मक समस्या बी.ए. तृतीय वर्ष पंचम सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Dr Daya Pandey

प्रस्तुत पुस्तक रा.तु.म. नागपूर विद्यापीठाच्या बी.ए. भाग-३ च्या पाचव्या सत्राच्या विद्यार्थ्यांना भारतीय समाज व त्यांच्या समस्यांची ओळख व्हावी तसेच स्पर्धा परीक्षेसाठी उपयोग व्हावा या उद्देशाने लिहिले आहे. वर्तमानकाळात स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून विद्यापीठीय अभ्यासक्रमात मोठे बदल होत आहेत. या बदलांच्या अनुषंगाने विद्यापीठातील बी.ए. च्या अभ्यासक्रमांची पुनर्रचना झालेली आहे. बी.ए. च्या पदवीसाठी तसेच स्पर्धात्मक परीक्षेसाठी समाजशास्त्र विषयाची निवड करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप जास्त आहे. त्या सर्व विद्यार्थ्यांना प्रस्तुत पुस्तकाची अभ्यासासाठी मोलाची मदत होईल अशी आशा आहे. जागतिकीकरणाच्या युगात भारतीय समाजांमध्ये परस्पर संबंध, प्रक्रिया, संस्था यांच्या रचनेत, कार्यपद्धतीत बदल घडून येत आहेत. भारतीय समाजातील व्यक्ती आणि समाज जीवनावर या बदलांचा प्रभाव पडला आहे. मानवी जीवन तंत्रज्ञान, साहित्य, कला याद्वारे सुसंपन्न झाले आहे. यासोबतच या समाजास विविध समस्यांनीही ग्रासले आहे. समाजात होणाऱ्या परिवर्तनाच्या गतीशी अनुकूलन साधताना अनेक सामाजिक घडामोडींचे, समस्यांचे आकलन महत्त्वाचे ठरते. या दृष्टीने भारतीय समाजाच्या होणाऱ्या अभ्यासाबद्दल आणि त्यातील सामाजिक घडामोडींबद्दल माहिती मिळविण्यासाठी प्रस्तुत पुस्तक उपयोगाचे आहे.

Dvait: द्वैत

by Narayan Dharap

खर सूर्यप्रकाशात दिसणार्या पावसाळ्यात धूक्याने आच्छादलेले शिखर आपल्याला खुणावतात. कारण धूक्याच्या आवरणामुळे त्यांना रहस्यमय बनवलेले असते. मानवी जडणघडण अशी असते की, त्याला नेहमीच अर्धवट दिसणार्या गोष्टींवरील पडदा उघडून त्यांचे गूढ जाणून घेण्याचा थरार अनुभवायचा असतो. हा नियम केवळ भौतिक जगतालाच लागू पडतो. असे नाही तर अगोदर, अपार्थिव जगातील गोष्टींबाबतही तितकाच लागू पडतो. मानवी मनाचे हे वैशिष्ट्य गेल्या शतकातील ख्यातमान लेखक श्री नारायण धारप यांनी अचूकपणे हेरले आणि उत्कंठावर्धक आणि अकल्पित, रहस्यमय कथांचा मनोवेधक नजराणा वाचकाला भेट दिला. आपल्याला माहीत नसलेल्या अनुभवापलीकडच्या जगात काय असेल हे जाणून घेण्याच्या आपल्या उत्कट इच्छेला ते हळूवारपणे फुंकर घालून फुलवतात. त्यांच्या कथांमधून आपल्याला अपेक्षित नसलेल्या, आपल्याला कल्पनाही करता येणार नाही अशा घटना एकापाठोपाठ वेगाने घडू लागतात आणि आपला या जगाशी असलेला संबंध तात्पुरता तुटतो. आपण त्या काल्पनिक जगात इतके गुरफटले जातो की, पुस्तक पूर्ण वाचून बाजूला ठेवेपर्यंत एका अनोख्या विश्वाचा भाग बनून जातो. धारपांच्या द्वैत या कादंबरीतील ठेंगू खलनायक अशीच वाचकांची उत्कंठा वाढवत जातो. कादंबरीतील विविध पात्रांच्या दृष्टिकोनातून आपल्याला एकूण घटनाक्रमांचे विविध पैलू दिसत जातात. पाप आणि पुण्य या कल्पना अमूर्त आहेत, ॲजबस्ट्रॅक्ट आहेत; पण पापी स्वभाव ही गोष्ट खरी आहे, कारण ती एक घटना आहे. त्यामागे माणसाचा स्वभाव आहे आणि किंवा नसेलही; पण निसर्ग मात्र माणसाचा स्वभाव अवश्य कोरून ठेवतो आणि तोही कपाळासारख्या अशा एखाददुसर्या ठिकाणी नाही, तर शरीरातल्या प्रत्येक पेशीवर हा साचा उठवलेला असतो. क्रोमोसोमच्या रंगसूत्राची शृंखला आणि त्यातले जीन्सचे दुवे - त्यांच्यातच हे रहस्य दडलेले असते.

ECO 219 Samagralakshyi Arthashastra S.Y.B.A - Y.C.M.O.U

by Shri. C. P. Kher Prof. Sau. Anita Gogate Prof. Dr. Sau. Vidya Sohoni Umesh Rajaderkar

Samagralakshyi Arthashastra ECO 219 textbook for S.Y.B.A. from Yashwantrao Chavan Maharashtra Mukta Vidyapith, Nashik in Marathi.

Frankenstein: फ्रँकेन्स्टाइन

by Narayan Dharap

जनित्राचं चाक पिसाटासारखं गरगरत होतं. त्याच्या ठिणग्यांचा प्रकाश पडत होता. त्या प्रकाशात मला त्या प्राण्याचा चेहरा दिसला. ओठ मागे गेले होते. आणि दात एका क्रूर हास्यात विचकले होते. तो चेहरा एका बेभान, हिंस्र पिसाट पशूचा होता! फाटक्या बँडेजमध्ये गुंडाळलेल्या त्या जाडजूड हाताचा माझ्या मानेभोवती विळखा पडला आणि एका हिसक्यासरशी मी प्रयोगशाळेत खेचला गेलो. केवढा दैवदुर्विलास! इतकी प्रगती झाल्यावर जे मी निर्माण केलं होतं त्याच्याच हातून माझा नाश व्हावा... निसर्गाच्या पंचमहाभूतांनी काहीतरी खेळ करावा, एखादी विकृती अपघाताने जन्माला यावी आणि त्या हाती मला मरण यावे...! कोण आहे हा बॅरेन फ्रँकेन्स्टाइन? प्रयोगशाळेत तो कसले प्रयोग करत होता? हिंस्र, पिसाट, राक्षसी मानवाचा त्याला कशामुळे सामना करावा लागला? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आणि नारायण धारपांच्या रहस्यात्मक लेखनाचा थरार अनुभवण्यासाठी प्रस्तुत कादंबरी जरूर वाचा.

Ikmai: इक्माई

by Narayan Dharap

नारायण धारप हे नाव आताच्या वाचन करणाऱ्या पिढीला नवीन असलं, तरीही आपल्या रहस्यमय लेखनाने त्यांनी एक काळ गाजवला होता. नारायण धारपांच्या कथा 'भय' या विकाराची अनेक रूपे घेऊन येतात. कथानकात पुढे काय घडणार याची उत्सुकता कायम ठेवत वाचकाला आपल्या लेखनात गुंतवून ठेवणे, रहस्यमय व गूढ पद्धतीने भयाच्या तावडीत माणसे कशी सापडतात, शारीरिक व मानसिक वेदना कशी भोगतात, भूत-पिशाच्च, कूर पीडा देणाऱ्या जीवसृष्टीच्या काल्पनिक जगाचे अस्तित्व कसे जाणवते आणि दैवी शक्तीने, चमत्काराच्या कृपेने त्यातून ती कशी सुटतात याचे वर्णन अतिशय चित्तवेधक आहे. माणसाला नेहमीच कोणतेही रहस्य जाणून घेण्याची मुळातच उत्कंठा असते. जितके समाधान वाचनातून मिळते तितके दुसऱ्या कोणत्याही माध्यमातून मिळत नसल्यामुळे वाचनाकडे आकर्षित झालेली नवी पिढी रहस्यमय व गूढ कथेच्या शोधात असते. वाचकांची ही भूक भागविण्याचे काम नारायण धारपांचे साहित्य करते. एकूणच मराठी साहित्यात रहस्य व गूढतेचे दालन समृद्ध करणाऱ्या लेखकात नारायण धारपांचे स्थान वरचे आहे. धारपांच्या अद्भुत घटनांचे तर्कातीत मनोव्यापारांचे खेळ वर्णन करणाऱ्या या कथा वाचकांना एका जागेवर खिळवून ठेवतात, हे वेगळे सांगायला नको. नारायण धारप या रहस्यमय कादंबरीकाराचं `इक्माई' हे पुस्तकातील निसर्गात असणारं एक चमत्कारिक, गूढगुंजन व्यक्तीला विचार करायला भाग पाडतं. रहस्यमय व गूढ कथेच्या शोधात असणाऱ्या वाचकाची भूक वाढविणारी कथा म्हणजेच `इक्माई' कथासंग्रह होय.

Kadachit Hech Ahe Prem: कदाचित हेच आहे प्रेम

by Abhishek Dalavi

ही कादंबरी लेखकाकडून लिहली गेलेली पहिली प्रेमकथा आहे. आपल्या देशाच्या इतिहासात कित्येक प्रेमकथा होऊन गेल्या आहेत. काहींनी इतिहास बनवला तर काही इतिहासात हरवून गेल्या. आजही प्रेम करण्याचा हक्क प्रत्येकाला आहे पण आपल्या मर्जीने लग्न करायचा अजिबात नाही. आजही कित्येक प्रेमकथा पूर्ण होतात पण काही कायमच्या अपूर्ण राहतात. जास्तीच जास्त प्रेमकथा अपूर्ण राहतात त्या मुला आणि मुलीकडील घरच्यांच्या नकारामुळे. या घरच्या मंडळींची नकार देण्याची कारणसुद्धा अगदी अफलातून असतात बरं. काही कुटुंबाना मुलगा देखणा हवा तर काहींना मुलगी कमावणारी हवी, काहींना मुलगी आपल्या जातीतली हवी तर काहींना मुलगा दुसऱ्या कुळातला हवा, काही सुनेकडे हुंडा मागतात तर काही जावयाला घरजावई बनवण्याचा हट्ट करतात. काहीवेळा मूलाकडच्यांचा होकार असतो तर मुलींकडच्यांचा नकार असतो. काही वेळा मुलीकडच्यांचा होकार असतो तर मूलाकडच्यांचा नकार असतो आणि जर दोघांकडूनही होकार असेल तर तो नकारात बदलायला कुंडलीचा दोष पुरेसा असतो. लेखकाच्या मते कोणावर जीवापाड प्रेम केल्यानंतर फक्त घरच्यांच्या हट्टापोटी त्यासोबत नात तोडून टाकणं, त्या पासून कायमच दूर निघून जाण, त्याला विसरून जाण या पेक्षा मोठं दुःख या जगात असूच शकत नाही. लेखकाची ही कथाही अशाच दोन पात्रांशी निगडित आहे. ज्यांची कुटुंब, शहर, रस्ते एकमेकांपासून फार दूर आहेत. पण त्याचं प्रेम, आकांशा आणि नशीब त्यांना त्यांचं आयुष्य एकत्र जगण्यासाठी मदत करत. आता त्यांचं आयुष्य म्हणजे नियतीचा मेळ आहे, नशिबाचा खेळ आहे मी प्रेमाचे फळ हे ही कादंबरी वाचून तुम्हीच ठरवा.

Klesh Rahit Jeevan - Novel: क्लेश रहित जीवन - कादंबरी

by Dada Bhagwan

तुम्ही जीवनात होणाऱ्या क्लेशांपासून थकून गेला आहात का? आणि चकित आहात की हे नवीन क्लेश कुठून बरे उत्पन्न होतात? क्लेश रहित जीवनासाठी तुम्हाला फक्त पक्का निश्चय करायचा आहे की लोकांसोबत असलेला व्यवहार तुम्ही समताभावे पूर्ण कराल आणि तेही त्यात यश मिळेल की नाही याची चिंता केल्याशिवाय. मग एक दिवस तुम्हाला तुमच्या जीवनात नक्कीच शांती लाभेल. जर बायको-मुलांसोबत अधिक गुंतागुंतीचे कर्म असतील तर त्यांचा निकाल करण्यात जरा जास्त वेळ लागतो. जवळच्या माणसांसोबत असलेला गुंता हळूहळू संपुष्टात येतो. चिकट कर्मांचा निकाल करतेवेळी तुम्हाला अतिशय जागृत राहावे लागेल. जर तुम्ही निष्काळजीपणा आणि आळस दाखवलात तर हा सर्व गुंता सोडवण्यात तुम्हाला अपयश मिळेल. जर कोणी तुम्हाला कटू शब्द बोलला आणि त्यावर तुमचीही जर कटू वाणी निघाली तरीही तुमच्या बाहेरील व्यवहार इतका महत्वपूर्ण नाही कारण तुमची घृणा समाप्त झाली आहे आणि तुम्ही समभावे निकाल करण्याचा दृढ निश्चय केलेला आहे. बदला घेण्याच्या सर्व भावनांपासून मुक्त होण्यासाठी तुम्हाला परम पूज्य दादाश्रींकडे येऊन ज्ञान घेतले पाहिजे. मी तुम्हाला मुक्त होण्याचा रस्ता दाखवेल. जीवनात थकलेली माणसे मृत्यूला का कवटाळतात? याचे कारण ते जीवनातील ताण-तनावाचा सामना करु शकत नाही. इतक्या अधिक ताण-तनावात तुम्ही किती दिवस जगू शकाल? किड्या-मुंग्याप्रमाणे आजचा मनुष्य निरंतर त्रासलेला आहे. मनुष्य जीवन मिळाल्यानंतरही कोणी दु:खी का असावे? संपूर्ण जग दु:खातच आहे आणि जो दु:खात नाही तो काल्पनिक सुखात हरवलेला आहे. या दोन टोकांमध्ये जीवत झुलत आहे. आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर तुम्ही सर्व कल्पना आणि दु:खांपासून मुक्त व्हाल. दादाश्रींच्या या पुस्तकात क्लेश रहित जीवन जगण्याच्या चाव्या आणि योग्य समज देण्यात आली आहे.

Mahabharatache Rahasya: महाभारताचे रहस्य

by Christopher C. Doyle

महान सम्राट अशोकाला जगाचा विनाश करणाऱ्या एका प्राचीन आणि भयावह रहस्याचा शोध लागला होता. महाभारतात खोलवर ते रहस्य गाडून, 2300 वर्षांपूर्वी ते रहस्य जगापासून लपवून ठेवण्यात आलं होतं. काही हजार वर्षांनी त्या रहस्यामुळेच एका निवृत्त अणुशास्त्रज्ञाचा खून होतो. आपल्या पुतण्यासाठी तो केवळ ई-मेलच्या माध्यमातून काही संकेत ठेवतो. गुप्त प्राचीन सांकेतिक लिपीतील संकेतांमधून आणि 2,000 वर्षांपूर्वीच्या अवशेषांमधून त्याचा पुतण्या आणि त्याचे मित्र त्याच्या ई-मेलची उकल करतात. यांच्या या शोधमोहिमेत ते शक्तिशाली दुष्ट शक्तींच्या पाठलागामुळे भूतकाळातील रहस्ये आणि वर्तमानातील कारस्थाने यांच्या कचाट्यात सापडतात. शब्दांत मांडता न येण्याजोग्या भयानक दहशतीचा पगडा जगावर बसण्याआधी 'ते' गूढ ते उकलू शकतात का?

Maharashtracha Bhugol TYBA Fifth Semester - RTMNU: महाराष्ट्राचा भूगोल बी.ए. तृतीय वर्ष पंचम सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Dr Vitthal Gharpure

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूरच्या भूगोल विषयावरील बी.ए. सेमिस्टर ५ चे सर्वात प्रथम पाठ्यपुस्तक आहे. स्पर्धा परीक्षांचे महत्त्व लक्षात घेऊन भूगोल अभ्यास मंडळाने बी.ए. सेमिस्टर ५ साठीच्या अभ्यासक्रमात या विषयाचा समावेश करून तसा अभ्यासक्रम तयार केला आहे. त्यानुषंगाने विद्यार्थ्यांना महाराष्ट्राची संपूर्ण माहिती होईल. महाराष्ट्राचे स्थान, महाराष्ट्राची प्राकृतिक रचना, महाराष्ट्राची जलप्रणाली, हवामान, जंगल संपत्ती, मृदा संपत्ती, शेती, उद्योगधंदे, खनिज संपत्ती व ऊर्जा संपत्ती, पर्यटन, लोकसंख्या, तसेच प्रात्यक्षिकांतील आलेख पद्धतीने विशालीकरण व लघुकरण, लोलकीय होकायंत्र सर्वेक्षण, दिगअंश दुरुस्त करणे, दिगअंश नकाशा काढणे आणि बंदिस्तमधील चूक दुरुस्ती करणे, सांख्यिकी माहितीचे सादरीकरण, आकृत्या, विभाजित वर्तुळ, विभाजित आयत, मनोरे (साधाव संयुक्त), नकाशे, टिंब पद्धत, प्रमाणबद्ध वर्तुळे पद्धत व छाया पद्धत इत्याद सदर पाठ्यपुस्तकात प्रत्येक विषयाचे मुद्देसूद विवेचन केले आहे.

Manusaki - Novel: माणुसकी - कादंबरी

by Shri. Shripad Nagnath Rautwad

सामाजिक जीवनात हा मानव आईवडील सारख्या आपल्या मुख्य घटकांना देखील आज वृद्धाश्रमात सोडू लागला आहे, नातलग, गणगोत, आपुलकी, प्रेम, भावना, परोपकार, हे माणुसकीच्या घटकांना ठोकर देत हा मानव प्राणी आज या समाजात जीवन जगत आहे. त्यातच मानवांच्या निर्मितीचा गूढ असलेल्या निसर्गापासूनही हा मानव दूर झाला आहे. निसर्गाची कत्तल करू लागला. डिसीटल च्या दुनीयेत स्वतः डिजीटल झालाच, मात्र समाजालाही डिजीटल करत सुटला आहे. अश्या असंख्य मानवतेच्या पैलूंना माझ्या लेखणीतून स्पर्शून गेललेला हा 'माणुसकी' आपल्या हाती सोपवत आहे.

Marathi Vyakaran Va Bhashabhyas class 10 - Maharashtra Board: मराठी व्याकरण व भाषाभ्यास इयत्ता दहावी - महाराष्ट्र बोर्ड

by Prof. Ashok Bagave

इयत्ता दहावी - मराठी (द्वितीय भाषा) या विषयाचे पाठ्यपुस्तक आणि कृतिपत्रिकेचा आराखडा यांवर आधारित 'नवनीत मराठी (LL) व्याकरण व भाषाभ्यास: इयत्ता दहावी' हे पुस्तक प्रकाशित करताना आम्हांला अत्यंत आनंद होत आहे. भाषा विषयाच्या प्रश्नपत्रिकेत व्याकरणाच्या प्रश्नांना महत्त्वाचे स्थान असते आणि व्याकरणाच्या प्रश्नांमध्ये गणितासारखे पैकीच्या पैकी गुणही मिळू शकतात. मराठी (LL) हा विषये अभ्यासणाऱ्या अमराठी माध्यमांच्या शाळांतील विद्यार्थ्यांना मराठी व्याकरण काहीसे कठीण जाते, असे अनुभवास येते. अशा विद्यार्थ्यांना व्याकरण व भाषाभ्यासातील अभ्यासघटक नीटपणे समजून घेण्यासाठी आणि ते पक्के करण्यासाठी प्रस्तुत पुस्तक खूपच उपयुक्त ठरेल. इयत्ता दहावी - मराठी (LL) साठी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाने नेमलेल्या 'व्याकरण व भाषाभ्यासा'च्या नवीन अभ्यासक्रमाचा आणि कृतिपत्रिकेच्या नवीन आराखड्यानुसार सर्व घटकांचा संपूर्णत: समावेश या पुस्तकात केला आहे. कृतिपत्रिकेच्या नवीन आराखड्यात या वर्षापासून [अ] व्याकरण घटकांवर आधारित कृती आणि [आ] भाषिक घटकांवर आधारित कृती अशा दोन भागांत 'व्याकरण व भाषाभ्यास' विभागलेला आहे.

Mi Abhimanyu - Novel: मी अभिमन्यू - कादंबरी

by Satishkumar Patil

डॉ. सतिशकुमार पाटील लिखित मी अभिमन्यू या पुस्तकात मृत्यू समोर उभा असताना मनाची होणारी अवस्था, भावनिक कल्लोळ मांडण्याचा प्रयत्न अगदी समर्पक वाटतो. मृत्यू दारात उभा आहे तेव्हा त्या अभिमन्यूच्या मनात आलेले विचार, त्या विचारातून मृत्यू आणि अर्धवट जगलेल्या जीवनातील चांगल्या वाईट घटनांचा लावलेला व्यापक अर्थ याचे सुंदर मंथन हे सविस्तर कांदबरीमध्ये दाखवले आहे.

Mrutyunjayee - Novel: मृत्युंज़यी - कादंबरी

by Ratnakar Matkari

मरणाला जिंकता यायला हवं. हे मरण भयंकर असतं. या मरणानं मला दोनदा निराधार केलं. मी- मी त्याचा सूड घेईन! मी जिंकेन मरणाला! मला कैवल्यवाणी येते.... निरामयीनं पोथी समोर धरली आणि हात जोडले. तत्क्षणी काळ्याभोर आकाशात वीज कडाडली. कोसळली ती नेमकी पंडितांच्या वाड्यावर! वाडा गदगदा हलला. क्षणमात्र! आणि दुसर्‍याच क्षणी त्याचं छप्पर ढासळलं. बाजूच्या भिंतींना मोठमोठे तडे गेले. निरामयीच्या डोक्यावरची तुळई एका बाजूनं सुटली आणि खाली येऊ लागली. भयचकित होऊन निरामयी त्या तुळईकडे पाहतच राहिली. त्या भयानक क्षणी तिला बाजूला व्हायचंही भान राहिलं नाही. वरून खाली येणार्‍या मृत्यूकडे ती डोळे विस्फारून बघत राहिली. तिनं मृत्यूला डिवचलं होतं. ती पोथी वाचायची असा निश्र्चय करून! म्हणून मृत्यू तिच्या रोखानं चाल करून येत होता. मतकरींच्या गूढकथा हा त्यांच्या कलानिर्मितीचा एक अत्यंत वेधक, लोभसवाणा आविष्कार आहे. मतकरींच्या गूढकथांना उदंड यश लाभले आहे. त्यांच्या गूढकथांतून जीवनाचे आणि मानवी मनाचे असेच खोल, अर्थपूर्ण आणि समृध्द दर्शन घडत राहावे.

Nagasaki: नागासाकी

by Craig Collie

‘नागासाकी’ ही कादंबरी म्हणजे १९४५ मध्ये अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकला, त्याच्या पार्श्वभूमीची, परिणामांची आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या अनेक बाबींची विस्तृत कहाणी आहे. १६ ते २९ जुलै आणि ५ ऑगस्ट १९४५ ते १० ऑगस्ट १९४५ या दिवसांतील राजकीय घडामोडींचं आणि हिरोशिमा, नागासाकीतील लोकांच्या दैनंदिन जीवनाचं चित्रण, असं सर्वसाधारणपणे या कादंबरीचं स्वरूप आहे. क्रेग कोली यांनी संशोधन करून, खूप संदर्भ अभ्यासून, प्रत्यक्षदर्शींच्या मुलाखती घेऊन ही कादंबरी सिद्ध केली आहे. जपानने पर्ल हार्बरवर केलेल्या हल्ल्याचा सूड म्हणून अमेरिकेने हा बॉम्बहल्ला केला. त्या हल्ल्यानंतर या शहरांमध्ये झालेल्या मृत्यूच्या तांडवाचं आणि जखमी लोकांच्या वेदनांचं प्राधान्याने चित्रण करणारी ही कादंबरी जरूर वाचली पाहिजे.

Off Line: ऑफ लाइन

by Dr Bal Phondke

डॉ. बाळ फोंडके हे नाव मराठी वाचकांनाप चांगलेच परिचित आहे. मानवाची बदलती जीवनशैली, विज्ञानाने केलेली प्रगती अन् तंत्रज्ञानाच्या आहारी गेल्याने मानवाला होणारे फायदे-तोटे हा या पुस्तकातील कथांचा गाभा आहे. प्रस्तुत पुस्तकात लेखकाने आधुनिक जगात झपाट्याने बदलत जाणार्या जीवनशैलीचे अनेक पैलू उलगडवून दाखवले आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे प्रभावित झालेल्या या व्यक्तिरेखांना भेटून आपण अचंबित आणि अंतर्मुखही होतो. तंत्रज्ञानाला आपला सेवक बनवायचे की आपणच त्याचे गुलाम बनायचे याचे भान देणार्या या कथा वाचकांना खिळवून ठेवतात. तंत्रज्ञानाचा योग्य प्रकारे अवलंब केला तर ते आपल्याला वरदान ठरू शकते; अन्यथा तंत्रज्ञानाचा शाप अखिल मानवजातीसाठी विध्वंसक ठरू शकतो. दुसर्या महायुद्धात जपानवर टाकलेल्या अणुबाँबने झालेल्या नरसंहार हे तंत्रज्ञानाच्या प्रकोपाचेच उदाहरण! तंत्रज्ञानाचा अवलंब हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. आणि भविष्यात मानवाला तंत्रज्ञानाचा पदोपदी वापर करावा लागेल, हेही त्रिकालबाधित सत्य आहे. तथापि, अनेक छोट्या-मोठ्या, चांगल्या-वाईट घटनांतून धडा घेऊन भविष्यातील संभाव्य धोके आपण सहजगत्या टाळू शकतो; अशीच काहीशी शिकवण देणार्या कथांचा संग्रह म्हणजे ‘ऑफ लाइन’!

Palati Zade: पळती झाडे

by Narayan Dharap

मानवाला नेहमी रहस्य जाणून घेण्याची उत्कंठा असते याच जिज्ञासा या भावनेत कथा कथा नायकांच गूढ, रहस्यमय अनुभव प्रस्तुत पळती झाडे कथासंग्रहात नारायण धारपांनी आपल्या खास शैलीत अगदी धारप स्टाईलने मांडला आहे. या कथानकातील कथा या भयकथाच आहेत. धारपांची चित्रमय भाषा कथेतील घटना वाचकांच्या डोळ्यासमोर उभी करते. प्रस्तुत कथासंग्रहात एकूण सात कथा आहेत, त्यापैकी पळती झाडे पाहूया ही कथा भय विज्ञान कथा आहे. "श्रीरंग नावाचा कथा नायकाची सोलापूरला बदली होते व तो आपल्या मामा-मामी कडे राहायला जातो तेथे त्याला चंदी भेटती व एक दिवस ती अचानक गायब होते.” ही कथा वाचताना धारपांच्या सिद्धहस्त लेखणीचे जाणीव आपल्याला होते. कथानकात पुढे काय होणार याची उत्सुकता कायम ठेवत वाचकाला आपल्या लेखनात गुंतवून ठेवतात. धारपांची भाषा चित्रमय आहे वाचकांच्या डोळ्यासमोर घटना प्रत्यक्ष उभे करण्याचे सामर्थ्य त्यांच्या भाषेत आहे. अज्ञात अकल्पनीय आणि अतर्क्सचा मागोवा घेणाऱ्या या कथा निश्चितपणे मराठीतील श्रेष्ठ भयकथा ठरतात. शेवटी पळती झाडे हा कथासंग्रह भयकथा प्रेमींसाठी नक्कीच मेजवानी ठरतो.

Prarthana Upchar - Novel: प्रार्थना उपचार - कादंबरी

by Joseph Murphy

डॉ. मर्फी यांनी हे पुस्तक लिहिले आहे वाचकांना समजावून सांगण्यासाठी की ते त्यांच्या चांगल्या स्त्रोताचा स्रोत कसा प्राप्त करू शकतील आणि योग्य प्रार्थनेद्वारे इच्छित परिणाम मिळवू शकतील. प्रार्थना कशी करावी, रोजच्या कामाचा भाग म्हणून प्रार्थना कशी ठेवावी, आपत्कालीन परिस्थिती किंवा धोका इत्यादी प्रार्थना कशी वापरायच्या हे नियतकालिक आहे. मर्फीच्या म्हणण्यानुसार, प्रार्थनेत अडचणीच्या वेळी नेहमीच मदत असते, परंतु प्रार्थनेला आपल्या जीवनातील अविभाज्य आणि रचनात्मक भाग बनविण्यास त्रास मिळण्याची गरज नाही.

Purna Mayechi Lekar TYBA - RTMNU: पूर्णा मायचीं लेंकरं बी.ए. तृतीय वर्ष - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Gopal Nilkanth Dandekar

गो. नी. दाण्डेकरांच्या विपुल आणि वैविध्यपूर्ण साहित्यनिर्मितीतील वेगळेपणाने उठून दिसणारी कादंबरी-पूर्णामायची लेकरं. वर्‍हाडातील ग्रामीण लोकजीवनाचे वास्तव प्रत्ययकारी चित्र या कादंबरीत उमटले आहे. वर्‍हादातील परतवाडा ही दाण्डेकरांची जन्मभूमी. त्यांचं संस्कारक्षम बालपण वर्‍हाडात गेलं. तरुण वयात त्यांनी अवघं वर्‍हाड पायांखाली घातलं. तिथल्या ग्रामीण जीवनाची, निसर्गाची अमिट प्रतिमा त्यांच्या अंतर्मनावर उमटली. १९५६ मध्ये त्या प्रतिमेला कादंबरीरूप मिळालं. बयिराम ढोमने हा सांसारिक चिंतांनी ग्रासलेला, भोळाभाबडा शेतकरी. त्याचं कुटुंब आणि त्याचा भवताल या कादंबरीत केंद्रस्थानी आहेत. वर्‍हाडी ग्रामजीवनातील जनसामान्यांचे चित्रण करणारी ही कादंबरी आहे. रेखीव व्यक्तिचित्रे, चित्रदर्शी प्रसंगवर्णने, मार्मिक समूहचित्रे, जिवंत, प्रवाही लयबध्द मधुर वर्‍हाडी बोलीभाषा, दृश्यप्रधान शैली अशा लेखणीच्या गुणधर्मामुळे ही कादंबरी त्यांच्या साहित्यसमारंभात वेधक ठरते. कारुण्यगर्भ नर्म विनोद हे ‘पूर्णमायची लेकरं’ या कादंबरीचे आणखी एक वैशिष्ट्य.

Refine Search

Showing 1,126 through 1,150 of 1,444 results