Browse Results

Showing 1,151 through 1,175 of 1,445 results

Purna Mayechi Lekar TYBA - RTMNU: पूर्णा मायचीं लेंकरं बी.ए. तृतीय वर्ष - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Gopal Nilkanth Dandekar

गो. नी. दाण्डेकरांच्या विपुल आणि वैविध्यपूर्ण साहित्यनिर्मितीतील वेगळेपणाने उठून दिसणारी कादंबरी-पूर्णामायची लेकरं. वर्‍हाडातील ग्रामीण लोकजीवनाचे वास्तव प्रत्ययकारी चित्र या कादंबरीत उमटले आहे. वर्‍हादातील परतवाडा ही दाण्डेकरांची जन्मभूमी. त्यांचं संस्कारक्षम बालपण वर्‍हाडात गेलं. तरुण वयात त्यांनी अवघं वर्‍हाड पायांखाली घातलं. तिथल्या ग्रामीण जीवनाची, निसर्गाची अमिट प्रतिमा त्यांच्या अंतर्मनावर उमटली. १९५६ मध्ये त्या प्रतिमेला कादंबरीरूप मिळालं. बयिराम ढोमने हा सांसारिक चिंतांनी ग्रासलेला, भोळाभाबडा शेतकरी. त्याचं कुटुंब आणि त्याचा भवताल या कादंबरीत केंद्रस्थानी आहेत. वर्‍हाडी ग्रामजीवनातील जनसामान्यांचे चित्रण करणारी ही कादंबरी आहे. रेखीव व्यक्तिचित्रे, चित्रदर्शी प्रसंगवर्णने, मार्मिक समूहचित्रे, जिवंत, प्रवाही लयबध्द मधुर वर्‍हाडी बोलीभाषा, दृश्यप्रधान शैली अशा लेखणीच्या गुणधर्मामुळे ही कादंबरी त्यांच्या साहित्यसमारंभात वेधक ठरते. कारुण्यगर्भ नर्म विनोद हे ‘पूर्णमायची लेकरं’ या कादंबरीचे आणखी एक वैशिष्ट्य.

RAW Bhartiya Guptacharsansthechi Goodhgatha - Novel: रॉ भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढगाथा - कादंबरी

by Ravi Amale

‘रॉ’___ रिसर्च अँड अनालिसिस विंग, रॉ’ची अशी कहाणी. बांग्लादेश मुक्तियुद्धाची आणि पाकीस्तानच्या फाळणीची. सिक्किमच्या सामिलीकरणाची, तशीच सियाचेन विजयाची. काश्मीर आणि पंजाबातील, मॉरिशस आणि श्रीलंकेतील दहशतवादविरोधी लढ्याची... शत्रूच्या कारवयांना पुरुन उरण्याची. ‘रॉ’ गुप्तचरांच्या थरारक, रोमांचक कारवायांची. पण या केवळ हेरकथाही नाहीत. तशाही गुप्तचरांच्या कारवाया निर्वात अवकाशात घडत नसतात. त्यांना पार्श्वभूमी असते राष्ट्रिय-आंतरराष्ट्रीय राजकारणाची. प्रत्येक राजकीय घडामोडीमागे एकाच वेळी समान आणि विरोधी अशी विविध बले कार्यरत असतात. विभिन्न प्रतलांवरुन चालत असतात ही बले. त्या प्रतलांचा वेध घेत, त्या राजकारणाला वेगळे वळण लावण्यासाठीच आखल्या जातात गुप्तचरांच्या मोहिमा. तिथे नैतिक-अनैतिकतेचे निकष असतात फोल. तिथे असते ते केवळ स्वराष्ट्राचे हित. भारताचे सार्वभौमत्व, एकात्मता अखंड राखण्याचे एकमेव उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून ‘रॉ’च्या अनेक ज्ञान-अज्ञात अधिकाऱ्यांनी, हेरांनी आखलेल्या, यशस्वी केलेल्या मोहिमांच्या या कथा आपणास दर्शन घडवतात भारताच्या गेल्या अर्धशतकी इतिहासाच्या गुढ अंतरंगाचे.

Sanwad: संवाद

by Achyut Godbole

मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे, म्हणूनच इतिहासात डोकावून बघितलं तर आदिम काळापासून मनुष्य समूहानं किंवा टोळ्यांनी राहत असलेला बघायला मिळतो. अगदी सुरुवातीला माणलानं एकमेकांशी संवाद कसा साधला असेल? या प्रश्‍नाच्या कुतूहलातूनच अच्युत गोडबोले यांचं ‘संवाद’ हे पुस्तक लिहिलं गेलं आहे. ‘संवाद’ या पुस्तकात चित्रलिपीद्वार, खाणाखुणा करून, वेगवेगळे आवाज करुन आदिमानवाच्या परस्परांतल्या संवादाला कशी सुरुवात झाली याचा इतिहास तर आहेच, पण त्याचबरोबर शेतीमुळे स्थैर्य आल्यानंतर माणसाच्या जगण्यात जे बदल झाले, त्यातच त्यानं लावलेला छपाईयंत्राचा शोध असेल किंवा टपालव्यवस्थेचा शोध असेल, या सगळ्या शोधांनी माणसं एकमेकांशी कसा संवाद साधायसा लागली, त्यातून काय गमतीजमती घडत गेल्या, या शोधकर्त्यांना कुठकुठल्या अडचणींना तोंड देत आपल्या ध्येयापर्यंत पोहोचावं लागलं, त्या त्या काळात तंत्रज्ञान कसं बदलत गेलं, तंत्रज्ञानानं माणसाच्या संवादात काय बदल घडवून आणले, या प्रवासात किती तंत्रज्ञांचा मृत्यू अत्यंत हलाखीत झाळा आणि किती जणांचं आयुष्य प्रचंड वैभवात गेलं, हे सगळं या पुस्तकात बाचकांची उत्कंठा वाढवणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक शोधाचा शोधकर्ता, त्या शोधामागचं तंत्रज्ञानदेखील ‘संवाद’मध्ये अतिशय सोप्या भाषेत उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आदिमानवापासून व्हॉट्सअपच्या युगापर्यंत माणसानं एकमेकांशी संवाद कसा साधला याविषयीची एक रंजक आणि चित्तथरारक कहाणी म्हणजे ‘संवाद’! यामध्ये शिंग, तुतारी, आगीपासून ते भाषेचा आणि लिपीचा उगम, कागद आणि छपाई यांचे शोध, टपालव्यवस्था, वर्तमानपत्र, मोबाइल फोन, फेसबुक आणि व्हॉट्सअप या सर्वांच्या जीवघेण्या स्पर्धात्मक जन्मकथा आपल्याला ‘संवाद’मध्ये खिळवून ठेवतील.

Swaha: स्वाहा

by Narayan Dharap

‘‘सकाळच्या वर्तमानपत्रात पहिल्याच पानावर ती बातमी होती. अगदी सोळा पॉइंटमध्ये छापली होती. स्टेशन रोडवरील बंगल्यात स्फोट. मग खाली तपशील होता. गेल्याच आठवड्यात स्टेशन रोडवरील एका बंगल्याला मोठी रहस्यमय आग लागली होती. आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे निष्पन्न झाले होते. त्या रहस्यमय प्रकाराचा पोलीस तपास करीत असतानाच त्याच ठिकाणी काल रात्री बाराच्या सुमारास एक प्रचंड स्फोट झाला. स्फोटाची तीक्रता इतकी भीषण होती की, तिथे जमिनीत सुमारे चाळीस चौरस फूट व्याप्तीचा आणि सुमारे वीस फूट खोल असा खड्डा पडला आहे. दोन्ही बाजूंच्या बंगल्यांच्या दाराखिडक्यांची तावदानं या प्रचंड स्फोटामुळे तडकली आहेत. पोलीस अधिक तपास करीत आहेत.’’ श्रीधर आणि अरुणा यांच्या आयुष्यातलीच ही एक घटना. या घटनेचा नेमका अर्थ काय? ती का घडली असावी? त्याचे नेमके कारण काय? तो बंगला पछाडलेला होता का? तो बंगला त्यांचाच होता का? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आणि नारायण धारपांच्या रहस्यात्मक लेखनाचा थरार अनुभवण्यासाठी प्रस्तुत कादंबरी जरूर वाचा.

Tulnatmak Shasan Ani Rajkaran (England and America) TYBA Fifth Semester - RTMNU: तुलनात्मक शासन आणि राजकारण (इंग्लंड व अमेरिका) बी.ए. तृतीय वर्ष पंचम सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Dr Rashtrapal Ganvir

सत्र २०१८-१९ पासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने बी. ए. तृतीय वर्ष राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्लंड व अमेरिका ह्या देशांच्या राज्यव्यवस्थांची संपूर्ण माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने ‘तुलनात्मक शासन आणि राजकारण’ (Comparative Governments and Politics) हा पेपर सत्र पाचच्या अभ्यासासाठी ठेवला आहे. राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांना या दोन देशाच्या राज्यव्यवस्थांनी सखोल व परिपूर्ण माहिती उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानेच या ग्रंथाचे लेखन कार्य केले आहे. प्रामुख्याने विद्यार्थ्याना समोर ठेवून साध्या व सोप्या भाषेत या ग्रंथाचे लेखन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. तसेच विद्यार्थ्यांना दीर्घोत्तरी आणि लघुत्तरी प्रश्नांची व्यवस्थितपणे तयारी करता यावी या उद्देशाने प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी दीर्घोत्तरी आणि लघुत्तरी प्रश्न दिले आहेत.

Abhyantar - Novel: अभ्यंतर - कादंबरी

by Vinita Deshpande

अभ्यंतर या कादंबरीचे विशेष म्हणजे ती समाजव्यवस्थेवर आधारित असून आजच्या काळात या विषयावर विचार करायला लवणारी आहे. सम्राट अशोकने अखंड भारतावर दीर्घकाळ राज्य केले. तो एक शूरवीर योद्धा तर होताच, एक अनुशासित आणि सुनियोजित शासनव्यवस्थेसाठी त्याने केलेले प्रयत्न या कादंबरीत मांडले आहे. कलिंगयुद्धानंतर सम्राट अशोकच्या जीवनाचा या कथानकात घेतलेला आढावा, त्याची मनस्थिती, समस्त भारतात सर्वधर्मसमभाव साधण्यासाठी त्याने केलेले प्रयत्न आणि ज्ञानकोशाची गुंफण लेखिकेने लीलया गुंफली आहे. कथानकातील भाषाप्रयोग तुम्हाला गतकाळात घेऊन जातो.

Annadata Sukhi Bhav - Novel: अन्नदाता सुखी भव - कादंबरी

by Bhagyashree Patil

भारत हा शेतीप्रधान देश आहे. प्राचीन काळापासून कित्येक लोकांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. त्यामुळे शेती, शेतकरी हा सर्वांचाच खुप जिव्हाळ्याचा विषय आहे. शेतकऱ्याला अन्नदाता, कष्टकरी, पोशिंदा या नावांनी संबोधले जाते. या क्षेत्रात हरितक्रांती, धवलक्रांती, जलक्रांती, यांसारख्या वेगवेगळ्या क्रांती होत आहेत. देश प्रगती करत आहे. या पुस्तकात कोणतेही तत्वज्ञान नाही, कोणताही उपदेश नाही. आहेत ते नवीन विचार आणि नवीन दृष्टिकोन! आज देशाने कितीही प्रगती केली असली तरी शेतकरी हा म्हणावा तितका प्रगती करताना दिसत नाही. दुष्काळ, अवकाळी पाऊस, कर्जबाजारीपणा आणि त्यातुन येणारे नैराश्य यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. काहीही करून हे थांबले पाहिजे. त्यासाठीच या भल्या मोठ्या जगात या अडचणींवर मात करण्यातला खारीचा वाटा म्हणुन लेखकाने त्याचे विचार या पुस्तकाच्या माध्यमातून मांडले आहेत.

Anolakhi Disha Bhag 2: अनोळखी दिशा भाग 2

by Narayan Dharap

गेल्या सहा दशकांहून अधिक काळ सातत्याने भयकथा लिहून वाचकांना विस्मयचकित करणारे नारायण धारप यांचे ‘अनोळखी दिशा’ हे पुस्तक म्हणजे आजवर त्यांनी लिहिलेल्या निवडक भयकथांचा संग्रह आहे. नारायण धारप हे नाव आताच्या वाचन करणाऱ्या पिढीला नवीन असलं, तरीही आपल्या रहस्यमय लेखकाने त्यांनी एक काळ गाजवला होता. गेल्या शतकातील साठच्या दशकात त्यांनी लेखनाला प्रारंभ केला आणि त्यानंतर अखेरपर्यंत ते सातत्याने लिहीत राहिले आहेत. दूरदर्शन आणि इतर प्रसारमाध्यमांची फारशी चलती नव्हती, त्या काळात सामान्य वाचक अतिशय आतुरतेने त्यांच्या लेखनाची वाट पाहत असत. नारायण धारपांच्या कथा ‘कथा’ या विकाराची अनेक रूपे घेऊन येतारत. कथानकात पुढे काय घडणार याची उत्सुकता कायम ठेवत वाचकाला आपल्या लेखनात गुंतवून ठेवणे, रहस्यमय व गूढ पद्धतीने भयाच्या तावडीत माणसे कशी सापडतात, शरीरिक व मानसिक वेदना कशी भोगतात, भूत-पिशाच्च, क्रुर पीडा देणार्या जीवनसृष्टीच्या काल्पनिक जगाचे अस्तित्व कसे जाणवते आणि दैवर शक्तीने, चमत्काराच्या कृपेने त्यातून ती कशी सुटतात याचे वर्णन अतिशय चित्तवेधक आहे. माणसाला नेहमीच कोणतेही रहस्य जाणून घेण्याच मुळातच उत्कंठा असते. जितके समाधान वाचनातून मिळते तितके दुसर्या कोणत्याही माध्यमातून मिळत नसल्यसामुळे वाचनाकडे असकर्षित झालेली नवी पिढी रहस्यमय व गूढ कथेच्या शोधात असते. वाचकांची ही भूक भागविण्याचे काम नारायण धारपांचे साहित्य करते. एकूणच मराठी साहित्यात रहस्य व गूढतेचे दालन समृद्ध करणाऱ्या लेखकात नारायण धारपांचे स्थान वरचे आहे. धारपांच्या अद्भुत घटनांचे तर्कातीत मनोव्यापारांचे खेळ वर्णन करणाऱ्या या कथा वाचकांना एका जागेवर खिळवून ठेवतात, हे वेगळे सांगायला नको.

Anolakhi Disha Bhag 3: अनोळखी दिशा भाग ३

by Narayan Dharap

गेल्या सहा दशकांहून अधिक काळ सातत्याने भयकथा लिहून वाचकांना विस्मयचकित करणारे नारायण धारप यांचे ‘अनोळखी दिशा’ हे पुस्तक म्हणजे आजवर त्यांनी लिहिलेल्या निवडक भयकथांचा संग्रह आहे. नारायण धारप हे नाव आताच्या वाचन करणार्या पिढीला नवीन असलं, तरीही आपल्या रहस्यमय लेखकाने त्यांनी एक काळ गाजवला होता. गेल्या शतकातील साठच्या दशकात त्यांनी लेखनाला प्रारंभ केला आणि त्यानंतर अखेरपर्यंत ते सातत्याने लिहीत राहिले आहेत. दूरदर्शन आणि इतर प्रसारमाध्यमांची फारशी चलती नव्हती, त्या काळात सामान्य वाचक अतिशय आतुरतेने त्यांच्या लेखनाची वाट पाहत असत. नारायण धारपांच्या कथा ‘कथा’ या विकाराची अनेक रूपे घेऊन येतारत. कथानकात पुढे काय घडणार याची उत्सुकता कायम ठेवत वाचकाला आपल्या लेखनात गुंतवून ठेवणे, रहस्यमय व गूढ पद्धतीने भयाच्या तावडीत माणसे कशी सापडतात, शरीरिक व मानसिक वेदना कशी भोगतात, भूत-पिशाच्च, क्रुर पीडा देणार्या जीवनसृष्टीच्या काल्पनिक जगाचे अस्तित्व कसे जाणवते आणि दैवर शक्तीने, चमत्काराच्या कृपेने त्यातून ती कशी सुटतात याचे वर्णन अतिशय चित्तवेधक आहे. माणसाला नेहमीच कोणतेही रहस्य जाणून घेण्याच मुळातच उत्कंठा असते. जितके समाधान वाचनातून मिळते तितके दुसर्या कोणत्याही माध्यमातून मिळत नसल्यसामुळे वाचनाकडे असकर्षित झालेली नवी पिढी रहस्यमय व गूढ कथेच्या शोधात असते. वाचकांची ही भूक भागविण्याचे काम नारायण धारपांचे साहित्य करते. एकूणच मराठी साहित्यात रहस्य व गूढतेचे दालन समृद्ध करणार्या लेखकात नारायण धारपांचे स्थान वरचे आहे. धारपांच्या अद्भुत घटनांचे तर्कातीत मनोव्यापारांचे खेळ वर्णन करणार्या या कथा वाचकांना एका जागेवर खिळवून ठेवतात, हे वेगळे सांगायला नको.

Arthashastra Digest class 11 - Maharashtra Board Guide: अर्थशास्त्र डाइजेस्ट इयत्ता 11वी महाराष्ट्र बोर्ड मार्गदर्शन

by Shri Navneet

अर्थशास्त्र इयत्ता 11वी चे पुस्तक नवनीत एज्युकेशन लिमिटेडने मराठी भाषेमध्ये प्रकाशित केलेले आहे, या मार्गदर्शकातील प्रत्येक प्रकरणात सुरुवातीला महत्त्वाच्या मुद्द्यांचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. प्रस्तुत मार्गदर्शकात दीर्घोत्तरी, लघूत्तरी आणि वस्तुनिष्ठ अशा सर्व प्रकारच्या प्रश्नांचा समावेश केलेला असून, त्यांची सुबोध भाषेत मुद्देसूद, समर्पक व आदर्श उत्तरे देण्यात आली आहेत. अंतर्गत मूल्यमापन चाचणीच्या तयारीसाठी प्रत्येक प्रकरणावर बहुपर्यायी प्रश्न (MCQs) उत्तरांसह देण्यात आले आहेत.या मार्गदर्शकाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी प्रश्नपत्रिकेचा आराखडा देण्यात आला आहे. या पुस्तकाच्या अखेरीस प्रथम व द्वितीय सत्रांसाठी नमुना प्रश्नपत्रिका तसेच प्रथम व द्वितीय सत्र यांसाठी अंतर्गत मूल्यमापन चाचणीच्या नमुना प्रश्नपत्रिकाही देण्यात आल्या आहेत.

Bahurupi: बहुरूपी

by Narayan Dharap

‘मातापित्यांची शिकवण मनात खोलवर रुजली असली पाहिजे. ती आता वर आली. मी हे आव्हान नाकारूच शकत नव्हतो. भले त्यासाठी मला माझा प्राण गमवावा लागला तरी हरकत नाही! आव्हान मिळूनही मी भ्याडासारखा कातडी बचावण्यासाठी चार भिंतीमागे लपून बसलो असतो तर? तर प्राण वाचवला असता; पण बाकी सर्व गमावलं असतं! जगात उजळ माथ्याने वावरणं अशक्य झालं असतं. किड्यामुंगीसारखं सांदीकोपऱ्यात लपून राहावं लागलं असतं. आज माझा सन्मान करणारे तुम्ही तुम्हीच माझी छी: थू! केली असती. ‘मी गेलो आणि आवश्यक ते सर्व केलं. दैवाची साथ मिळाली असं समजा. दैव शूराचीच सोबत करतं. मी माझ्या कार्यात यशस्वी झालो. गायत्रीदेवी सुखरूप परत आल्या आणि म्हणून आपल्या सत्काराचा स्वीकार करण्यासाठी आनंदाने आलो. आपले सर्वांचे आभार.’

Balvikas class 11 - Maharashtra Board: बालविकास इयत्ता अकरावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

इयत्ता ११ वीच्या वर्गात बालविकास या विषयाची व्याप्ती, उद्दिष्टे, विकासाची अंगे, विकासाची तत्त्वे आणि वाढ व विकासावर परिणाम करणारे घटक या सर्वांचे आकलन होईल. बालविकास विषयाचा अभ्यास करताना जाणवेल की भावनिक विकास, सामाजिक विकास आणि शारीरिक विकास याचा बालकाच्या सर्वांगीण विकासावर प्रत्यक्ष परिणाम होतो, तसेच ते बालक प्रौढ म्हणून जसे असेल ते यावरच ठरते. म्हणूनच बालके लहान असतात तेव्हाच त्यांच्या भविष्यातील स्वास्थ्यासाठी त्यांच्यात गुंतवणूक करणे किती महत्त्वाचे आहे आणि गरजेचे आहे. बालविकास विषयावरील संकल्पना, तत्त्वे अभ्यासण्यासाठी काही कृती अशा दिल्या आहेत की त्या सोडवताना तुमच्या दैनदिन जीवनाशी त्याचा संबंध जोडू शकाल, 'दर्पण' (Reflection) ही त्यातील महत्त्वाची कृती आहे. प्रत्येक प्रकरणात त्या त्या प्रकरणाशी निगडित काही तथ्य आणि माहिती चौकटीत दिलेली आहे. ती माहिती वाचून निश्चितच तुमचे विषयज्ञान समृद्ध होण्यास मदत होईल.

Bharatatil Aapatti Vyavasthapan va Prashasan

by Priti Diliprao Pohekar

Disaster Management is a critical and integral part of any government’s planning strategy. Indian government has been struggling with it since long. This book discusses the varied threats, risks that the country faces. It talks about the Acts implemented, their advantages/disadvantages and their validity. It also talks about the different stakeholders involved, role players and decision makers in the country. It compare country’s disaster management with international decisive moments and acts and the UN’s ordinance.

Bharatiya Rajyaghatnechi Olakh FYBA First Semester - SPPU: भारतीय राज्यघटनेची ओळख एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर १ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Eknath Khandve Prof. Dr. Vilas Awari

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एफ.वाय.बी.ए. या शैक्षणिक वर्षासाठीच्या अभ्यासक्रमात या वर्षापासून सुधारणा करण्यात आली आहे. राज्यशास्त्र (भारतीय राज्यघटनेची ओळख) या पेपरच्या अभ्यासक्रमात सुचविण्यात आलेल्या सुधारणांची जून २०१९ पासून अंमलबजावणी होत आहे. भारतीय राज्यघटनेची ओळख या पुस्तकाच्या सुरुवातीला भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीची प्रक्रिया स्पष्ट केली आहे. भारतीय राज्यघटनेचा ऐतिहासिक पार्श्वभूमी, घटनासमिती आणि भारतातील राज्यघटनेची वैशिष्ट्ये याबाबत तपशीलवार माहिती पुरविण्यात आली आहे. भारतीय राज्यघटनेत मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्ये याबाबतच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. या तरतुदींवर प्रकाश टाकण्याचे काम प्रस्तुत पुस्तकाद्वारे पार पाडले आहे. भारतीय संघराज्याची वैशिष्ट्ये, केंद्र-राज्य संबंध आणि केंद्र-राज्य संबंधातील संघर्षाचे मुद्दे याबाबत स्पष्टता देण्यात आली आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम ३६८ अन्वये घटना दुरूस्तीची प्रक्रिया स्पष्ट करण्यात आली आहे. प्रस्तुत पुस्तकाद्वारे भारतीय राज्यघटनेतील दुरूस्तीची प्रक्रिया व प्रमुख घटनादुरुस्त्याबाबत चर्चा करण्यात आली आहे. एकूणच भारतीय राज्यघटनेची मिमांसा करणारे हे एक महत्वपूर्ण पुस्तक आहे.

Bhartacha Itihas Prachin Kal te Isavi San 1525 FYBA First Semester- RTMNU: भारताचा इतिहास प्राचीन काळ ते इ.स. १५२५ बी.ए. प्रथम सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Prof. N. C. Dikshit

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जून २०१६ पासूनच्या सेमिस्टर पॅटर्नच्या नव्या अभ्यासक्रमानुसार बी.ए. प्रथम सेमिस्टरकरिता भारताचा इतिहास - प्राचीन काळ ते इ.स. १५२५ हे पुस्तक आहे. ह्या पुस्तकाचे लेखन प्राध्यापक नी. सी. दीक्षित तसेच मनोहर पिंपळापुरे अॅण्ड कं. पब्लिशर्स यांनी प्रकाशित केले आहे. पुस्तकामध्ये हरप्पा संस्कृती, वैदिक कालखंड, सोळा महाजनपदे, जैन धर्म व बौद्ध धर्म, मौर्य साम्राज्य, गुप्त घराणे, भारतावरील आक्रमणे, अल्तमश व बल्बन, अलाउद्दीन खिलजी, महंमद बीन तुघलक आणि फिरोज तुघलक, भक्ती चळवळ, सुफी पंथ आणि सुल्तानशाहीतील स्थापत्यकला (Architecture) इत्यादी अभ्यासक्रम पुस्तकामध्ये दिलेला आहे.

Bhartiya Aarthik Paryavaran FYBA Second Semester - SPPU: भारतीय आर्थिक पर्यावरण एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर २ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr D. G. Ushir Dr S. R. Javale Dr Vijaykumar Wavale

प्रथम वर्ष कला सत्र-2 या वर्गासाठी अर्थशास्त्र: 'भारतीय आर्थिक पर्यावरण' हा विषय सामान्य स्तरावर ऐच्छिक स्वरूपाचा आहे. सुधारित अभ्यासक्रमानुसार प्रथम वर्ष कला (एफ.वाय.बी.ए.) सत्र-2 या वर्गासाठी लिहिलेले 'भारतीय आर्थिक पर्यावरण' हे क्रमिक पुस्तक व संदर्भ ग्रंथ आहे. सदर पुस्तक पूर्ण करताना अनेक संदर्भ ग्रंथ, नियतकालिके, वेबसाइटस यांचा आधार घेतला आहे. पुस्तकाची भाषा साधी व समजण्यास सोपी आहे. ज्या-ज्या ठिकाणी योग्य मराठी शब्द मिळाले नाहीत तेथे इंग्रजी शब्दांचाच उपयोग करण्यात आला आहे. सदर पुस्तक फक्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम वर्ष कला सत्र-2 या वर्गासाठी लिहिलेले असले तरी इतर विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांना तसेच स्पर्धा परीक्षांना सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही उपयुक्त आहे.

Bhugol Digest class 10 - Maharashtra Board Guide: भूगोल डाइजेस्ट इयत्ता 10वी - महाराष्ट्र बोर्ड मार्गदर्शन

by Shri Navneet

भूगोल इयत्ता 10वी चे पुस्तक नवनीत एज्युकेशन लिमिटेडने मराठी भाषेमध्ये प्रकाशित केलेले आहे, या पाठ्यपुस्तकामध्ये एकूण नऊ अध्याय दिलेले आहेत. प्रत्येक पाठाच्या सुरुवातीस पाठाचा मुद्देसूद सारांश दिला आहे. सारांशात बऱ्याच ठिकाणी भारत व ब्राझील या देशांचा तौलनिक अभ्यास समजून घेण्यास सोपे व्हावे, यासाठी सारण्या दिल्या आहेत. प्रत्येक पाठात असणारे स्वाध्यायांतील प्रश्न व इतरत्र असणारे अनेक महत्त्वाचे अधिकचे प्रश्न अचूक उत्तरांसहित दिलेले आहेत. तसेच बोर्डाने प्रसारित केलेल्या सराव प्रश्नपत्रिकांतील बहुतांशी प्रश्न आणि मार्च २०१९ च्या प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न आदर्श उत्तरांसह समाविष्ट करण्यात आलेले आहेत. पाठ्यपुस्तकात प्रत्येक पाठात नकाशाशी मैत्री, चर्चा करा, पाहा बरे जमते का?, सांगा पाहू!, करून पाहा, शोधा पाहू !, जरा विचार करा, जरा डोके चालवा, द्वैताचे रंग असे शीर्षक असलेल्या अनेक चौकटी दिल्या आहेत. या चौकटींतील विषयांवर आधारित विविध प्रश्नांचा अचूक उत्तरांसहित या 'नवनीत'मध्ये यथायोग्य ठिकाणी समावेश करण्यात आला आहे.

Bhugol Digest class 11 - Maharashtra Board Guide: भूगोल डाइजेस्ट इयत्ता 11वी - महाराष्ट्र बोर्ड मार्गदर्शन

by Shri Navneet

भूगोल इयत्ता 11वी चे पुस्तक नवनीत एज्युकेशन लिमिटेडने मराठी भाषेमध्ये प्रकाशित केलेले आहे, या मार्गदर्शकात प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला त्या त्या प्रकरणाचा सर्वांगीण व सुबोध असा 'गोषवारा' दिला आहे. तो वाचून प्रकरणाचा आशय व त्यातील महत्त्वाच्या भौगोलिक संकल्पना यांचे आकलन होणे विद्यार्थ्यांना सुलभ होईल. प्रस्तुत मार्गदर्शकात दीर्घोत्तरी प्रश्न, लघूत्तरी प्रश्न व वस्तुनिष्ठ प्रश्न आदी सर्व प्रकारच्या अपेक्षित प्रश्नांचा त्यांच्या मुद्देसूद, अचूक आणि आदर्श उत्तरांसह समावेश करण्यात आला आहे. तसेच, उत्तरे लिहिताना आवश्यक तेथे प्रमाणबद्ध, सुबक व सोप्या आकृत्यांचा व नकाशांचा जाणीवपूर्वक समावेश केलेला आहे. या मार्गदर्शकाच्या शेवटी प्रश्नपत्रिकेच्या नवीन आराखड्यानुसार प्रथम व द्वितीय सत्रान्त परीक्षांच्या नमुना प्रश्नपत्रिका देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना सरावासाठी या प्रश्नपत्रिका खचितच उपयुक्त ठरतील.

Ganit Bhag 1 Digest class 10 - Maharashtra Board Guide: गणित भाग 1 डाइजेस्ट इयत्ता 10वी - महाराष्ट्र बोर्ड मार्गदर्शन

by Shri Navneet

गणित भाग 1 इयत्ता 10वी चे पुस्तक नवनीत एज्युकेशन लिमिटेडने मराठी भाषेमध्ये प्रकाशित केलेले आहे, या पाठपुस्तकामधे सहा पाठ व त्यांची प्रश्नोत्तरे आणि बोर्डाची कृतिपत्रिका दिलेली आहे. प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला दिलेल्या 'महत्त्वाचे मुद्दे' यात, प्रकरणामध्ये असलेल्या सर्व अभ्यासघटकांचा समावेश आहे. काही ठिकाणी मुद्द्यांच्या स्वरूपात, तर काही ठिकाणी तक्त्यांच्या स्वरूपात माहितीची मांडणी करण्यात आली आहे. पाठ्यपुस्तकात आलेले 'सांगा पाहू' किंवा 'थोडे आठवा' या बाबी ‘महत्त्वाचे मुद्दे' यांत समाविष्ट करण्यात आल्या आहेत. यातील प्रश्नांची उत्तरे मिळाल्यावर किंवा कृती केल्यावर, त्यानंतर दिलेल्या मुद्द्यांचे आकलन होणे खूपच सोपे होईल, हा त्याचा मुख्य उद्देश आहे.

Ganit Bhag 2 Digest class 10 - Maharashtra Board Guide: गणित भाग 2 डाइजेस्ट इयत्ता 10वी - महाराष्ट्र बोर्ड मार्गदर्शन

by Shri Navneet

गणित भाग 2 इयत्ता 10वी चे पुस्तक नवनीत एज्युकेशन लिमिटेडने मराठी भाषेमध्ये प्रकाशित केलेले आहे, या पाठपुस्तकामधे सात पाठ व त्यांची प्रश्नोत्तरे आणि बोर्डाची कृतिपत्रिका दिलेली आहे. प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला दिलेल्या 'महत्त्वाचे मुद्दे' यात, प्रकरणामध्ये असलेल्या सर्व अभ्यासघटकांचा समावेश आहे. काही ठिकाणी मुद्द्यांच्या स्वरूपात, तर काही ठिकाणी तक्त्यांच्या स्वरूपात माहितीची मांडणी करण्यात आली आहे. पाठ्यपुस्तकात आलेले 'सांगा पाहू' किंवा 'थोडे आठवा' या बाबी ‘महत्त्वाचे मुद्दे' यांत समाविष्ट करण्यात आल्या आहेत. यातील प्रश्नांची उत्तरे मिळाल्यावर किंवा कृती केल्यावर, त्यानंतर दिलेल्या मुद्द्यांचे आकलन होणे खूपच सोपे होईल, हा त्याचा मुख्य उद्देश आहे.

H M S Ulysses: एच एम एस युलिसिस

by Alistair MacLean

ही कहाणी दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील आहे. रशियाचे जर्मनीशी युद्ध सुरू असते, आणि एफआर ७७ या मालवाहू आणि तेलवाहू जहाजांच्या ताफ्यामार्फत रशियाला जर्मनीशी लढण्यासाठी अत्यंत निकड असलेले युद्धसाहित्य पोचवण्याची योजना असते. एचएमएस युलिसिस ही ब्रिटिश आरमारातील एक क्रूझर जातीची युद्धनौका या ताफ्याची फ्लॅगशिप असते. तिच्या साथीला आणखी छत्तीRस जहाजे या ताफ्यात असतात. भयंकर थंडी, बर्फवृष्टी, प्रचंड वादळे, चिडलेले व निराश झालेले नौसैनिक, त्यांची झालेली प्रचंड उपासमार, थकवा, झोपेचा अभाव, आणि ताफ्याने रशियापर्यंत पोचता कामा नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणारी जर्मन बॉम्बर विमाने, युद्धनौका आणि यू-बोटी, अशा पार्श्वभूमीवरील या ताफ्याच्या– आणि पर्यायाने युलिसिसच्या– प्रवासाची ही कहाणी आहे. या सगळ्या विपरीत परिस्थितीला युलिसिसवरील सगळे अधिकारी आणि नौसैनिक ज्या असीम धैर्याने आणि शौर्याने तोंड देतात त्याचे भेदक वर्णन ‘एचएमएस युलिसिस’ या कादंबरीत आहे.

Itihas Digest class 11 - Maharashtra Board Guide: इतिहास डाइजेस्ट इयत्ता 11वी - महाराष्ट्र बोर्ड मार्गदर्शन

by Shri Navneet

इतिहास इयत्ता 11वी चे पुस्तक नवनीत एज्युकेशन लिमिटेडने मराठी भाषेमध्ये प्रकाशित केलेले आहे, या मार्गदर्शकातील प्रत्येक प्रकरणात सुरुवातीला पाठाचा सारांश देण्यात आला आहे. त्यावरून त्त्या प्रकरणात समाविष्ट असलेला पाठाचा आशय विद्यार्थ्यांना सहज आकलन होईल. प्रस्तुत मार्गदर्शकात दीर्घोत्तरी, लघूत्तरी आणि वस्तुनिष्ठ अशा सर्व प्रकारच्या प्रश्नांचा समावेश केलेला असून, त्यांची सुबोध भाषेत मुद्देसूद, समर्पक व आदर्श उत्तरे देण्यात आली आहेत. अंतर्गत मूल्यमापन चाचणीच्या तयारीसाठी प्रत्येक प्रकरणावर बहुपर्यायी प्रश्न (MCQs) उत्तरांसह देण्यात आले आहेत. या मार्गदर्शकात विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी प्रश्नपत्रिकेचा आराखडा देण्यात आला आहे. तसेच या मार्गदर्शकाच्या शेवटी प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यानुसार प्रथम व द्वितीय सत्रान्त परीक्षांच्या नमुना प्रश्नपत्रिका व अंतर्गत मूल्यमापन चाचणीच्या नमुना प्रश्नपत्रिका देण्यात आल्या आहेत.

Itihas Va Rajyashastra Class 9 - Maharashtra Board: इतिहास व राज्यशास्त्र इयत्ता नववी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

इतिहास व राज्यशास्त्र इयत्ता नववी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकात इ.स. १९६१ नंतरच्या काळात भारतात झालेल्या, सामाजिक, सांस्कृतिक आणि अन्य क्षेत्रांतील विकासाचा आढावा घेण्यात आला आहे. उद्योग आणि शेती यांचा समावेश असलेल्या भारताच्या आर्थिक धोरणांची विज्ञान आणि तंत्रज्ञानातील बदलांची, महिलांच्या सक्षमीकरणाची आणि समाजातील शेवटच्या घटकांशी संबंधित अशा विकासाच्या घटनांची नोंद या पुस्तकात आहे. राज्यशास्त्र विषयाच्या अंतर्गत १९४५ पासूनचे जगातील प्रमुख प्रवाह, भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल, भारताची सुरक्षा व्यवस्था व भारतीय सुरक्षा व्यवस्थेपुढील आव्हाने यांचा अभ्यास करायचा आहे. भारत आणि अन्य देशांचे राजकीय संबंध, संयुक्त राष्ट्रे आणि संयुक्त राष्ट्रांच्या शांततारक्षण कार्यात भारताचे योगदान इत्यादी विषयांची चर्चा करण्यात आली आहे.

Itihas Va Rajyashastra Digest class 10 - Maharashtra Board Guide: इतिहास व राज्यशास्त्र डाइजेस्ट इयत्ता 10वी - महाराष्ट्र बोर्ड मार्गदर्शन

by Shri Navneet

इतिहास व राज्यशास्त्र इयत्ता 10वी चे पुस्तक नवनीत एज्युकेशन लिमिटेडने मराठी भाषेमध्ये प्रकाशित केलेले आहे, मार्गदर्शकाचे दोन भाग इतिहास व राज्यशास्त्र दिलेले आहेत. या 'नवनीत' मार्गदर्शकात पाठाच्या प्रारंभी पाठात आलेले महत्त्वाचे सन व घटना चौकटीत दिलेल्या आहेत. प्रत्येक पाठातील महत्त्वाचे मुद्दे सुरुवातीस दिलेले आहेत, पाठात आलेल्या काही संकल्पना स्पष्ट झाल्या नाहीत तर तो आशय कळणार नाही; म्हणून तेथेच चौकटीत त्यांचे स्पष्टीकरणही दिलेले आहे. प्रत्येक पाठाखाली दिलेल्या स्वाध्यायांतील सर्व प्रश्नांची आदर्श व अचूक उत्तरे दिलेली आहेत. संकल्पनाचित्रे पूर्ण करा, तक्ता पूर्ण करा, कालरेषा पूर्ण करा, ओघतक्ता तयार करा इत्यादी कृतीआधारित नव्याने आलेल्या प्रश्नप्रकारांचा सराव होण्यासाठी स्वाध्यायांखेरीज अनेक कृती या मार्गदर्शकात दिलेल्या आहेत.

Jhunj Sangharsh Jivanacha - Novel: झुंज संघर्ष जीवनाचा - कादंबरी

by Govind Gadhari

लेखकाच्या स्वत:च्या जीवनातील सत्य घटीत घटनांवरील हे लिखाण आहे. दुर्गम भागात रानोमाळ भटकंती करणाऱ्या असंघटित समाजातील एका दुर्बल आणि दुबळ्या कुटुंबात जन्मलेल्या एका व्यक्तीच्या जीवनात बालपणापासून ज्या संकटमय घटना घडल्या त्या त्याने अनुभवल्या व त्यांना ते कस कसे सामोरे गेले आणि त्यात त्यांनी अनुभवलेली, झेललेली संकटे व त्यावर कशी मात केली त्याचे त्यांनी गावरान मराठी भाषेत कथन केले आहे. प्रदीर्घ काळापर्यंतची त्यांची सत्य घटनांवर आधारीत अशी ही झुंज आहे.

Refine Search

Showing 1,151 through 1,175 of 1,445 results