Browse Results

Showing 1,176 through 1,200 of 1,445 results

Kale Pani: काळे पाणी

by Swatantryaveer Vinayak Damodar Savarkar

सावरकरांची हि तिसरी कादंबरी. त्यांच्या 'माझी जन्मठेप' या कादंबरीवर इंग्रजांनी १७ एप्रिल १९३४ साली बंदी घाली. ती बंदी उठवावी म्हणून प्रयत्न करत असतानाच सावरकरांनी 'काळे पाणी' हि कादंबरी लिहीण्याचा घाट घातला. यामागचा उद्देश एवढाच होता कि अंदमानातील कष्टकारक, दुःखदायक, क्लेशदायक आणि एकूणच अन्यायकारक जीवन कसे जगावं लागते हे दर्शवण्यासाठी त्यांनी हि कादंबरी लिहिली. प्रेम हि अगदीच कोवळी आणि हळुवार भावना आहे, त्यामुळे सुरुवातीला सावरकरांसारख्या देशासाठी लढताना प्रसंगी कठोर होणाऱ्या आणि इंग्रजांशी कणखरपणे तोंड देणाऱ्या योद्ध्याकडून प्रेमावर कादंबरी म्हटली कि भुवया उंचावतातच. पण सावरकरांनी मात्र या कादंबरीला पुरेपूर न्याय दिला आहे. सावरकरांनी स्वतः अंदमानातील कष्टप्रद जीवन भोगलेले असल्याने त्यांनी त्यांच्या उच्च दर्जाच्या लेखणीतून ते अगदीच अप्रतिम मांडले आहे. ज्यांच्या गाठी असे कटू अनुभव असतात आणि त्यावर अनुसरूनच जर कादंबरी असेल तर शक्यतो कादंबरी रुक्ष होण्याची शक्यता असते. पण सावरकर मात्र आपल्या लिखाणात हा समतोल राखण्यात अगदीच यशस्वी झाले आहेत. त्यांनी कैद्यांना भोगाव्या लागणाऱ्या यातनांचा आरसा मांडला असला तरी काही कैद्यांना हीच शिक्षा कशी बरोबर आहे हेदेखील सांगितले आहे.

Kulvruttant: कुलवृत्तांत

by Narayan Dharap

मानव स्वत:च्या उत्क्रांतीचा कधी विचार तरी करतो का? आपण कोण होतो, कोठून आलो, कोठे चाललो आहोत, या प्रवासाची परिणती कशात होणार आहे याचा माणूस कधी विचार तरी करतो का? मी तरी कोण? येथे या शहरात कसा आलो? प्रत्यक्ष मी नाही; पण माझे पूर्वज... कोठून आले? महत्त्वाकांक्षेने आले की, गरजेपोटी आले? मी अनेक कुलवृत्तांत वाचले होते. चारचार, पाचपाच पिढ्यांचा इतिहास. त्यात एका तक्त्याच्या रूपात मांडला होता. आडव्या उभ्या रेषांनी जोडलेली ती फक्त नावं होत. अमक्याची ती चार-पाच मुलं... त्यांचे विवाह... त्यांची मुलं... हा नावांचा आणि रेषांचा तक्ता त्यांच्या खऱ्या आयुष्याबद्दल काय सांगणार? त्या तर फराट्यांनी ओढलेल्या रेषाकृती होत्या; पण माझ्या विलक्षण अनुभवात या रेषाकृती सजीव झाल्या होत्या. रंग... रूप... सुखं... दु:ख... अशा सगुण त्रिमित स्वरूपात समोर आल्या होत्या... रोजच्या व्यवहाराच्या चौकटीत हा असाधारण अनुभव बसवणं किती कठीण होतं! जवळजवळ अशक्यच! पण इथे धोका होता. त्या कालगर्तेत माझा प्रवेश अगदी सहज होत होता. पण काही कारणाने, अपघाताने, दुर्दैवाने मला परत माझ्या एकवीसाव्या शतकात परत येता आलं नाही तर? मी कालवस्त्राच्या त्या सुरकुतीत अडकून पडलो तर? सर्व शक्यतांचा विचार करायला हवा...

Manavi Bhugol FYBA Second Semester - SPPU: मानवी भूगोल एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर २ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Jyotiram Chandrakant More Dr Sanjay Dagu Pagar Prof. Ashok Maruti Thorat

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जून 2019 पासून बदललेल्या नवीन अभ्यासक्रमानुसार श्रेयांक पद्धत व सेमिस्टर लागू केलेली असून एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर (II) करिता भूगोल विषयासाठी 'मानवी भूगोल' हे क्रमिक पाठ्यपुस्तक तयार केलेले आहे. प्रत्येक संकल्पनेला योग्य न्याय देऊन सुयोग्य माहिती, आकृत्या, नकाशा, रकाणे यांच्या आधारे लिखाण करण्यात आलेले आहे. 'मानवी भूगोलाचा परिचय' या पहिल्या प्रकरणात व्याख्या, स्वरूप, व्याप्ती, शाखा व त्यांचे महत्त्व यांचा आढावा घेतला आहे. 'लोकसंख्या' या दुसऱ्या प्रकरणामध्ये लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक, लोकसंख्या संक्रमण सिद्धान्त व भारतीय लोकसंख्येची रचना अशा महत्त्वपूर्ण घटकांचा समावेश केलेला आहे. तसेच प्रकरण तीनमध्ये मानवी वसाहत, ग्रामीण वसाहतीचे प्रकार, प्रारूप व आकृतिबंध तसेच भारतातील नागरीकरण व महाराष्ट्रातील नागरिकरणाचा समावेश केला आहे. याशिवाय शेवटच्या प्रकरणात कृषी, कृषीचे प्रकार, कृषीवर परिणाम करणारे घटक, भारतीय कृषीच्या समस्या यांचा समावेश केलेला आहे.

Manavi Bhugol (Gg - 110 B) FYBA Second Semester - SPPU: मानवी भूगोल (Gg - 110 B) एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर २ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by A. B. Savadi P. S. Kolekar

यु.जी.सी. च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार नोव्हेंबर 2019 पासून सेमिस्टर-2 करिता 'मानवी भूगोल' (Gg - 110 B) हे क्रमिक पाठ्यपुस्तक आहे. सर्वसामान्यपणे भूगोलाच्या प्रमुख दोन शाखा आहेत. एक, प्राकृतिक भूगोल व दुसरे, मानवी भूगोल. पुणे विद्यापीठाने 'मानवी भूगोल' हा विषय एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर-2 च्या भूगोल विषयाच्या अध्ययनासाठी निश्चित केला आहे. या नवीन अभ्यासक्रमात मानवी भूगोलाच्या एकंदर चार शाखा समावेश आहे. प्रत्येक प्रकरणातील संज्ञा/व्याख्या, संकल्पना, पारिभाषिक शब्द विद्यार्थ्यांनी आत्मसात करावेत. दर्जेदार वैज्ञानिक मांडणी करून मुद्द्यांचे सुलभतेने स्पष्टीकरण केले आहे. यामुळे संकल्पना स्पष्ट होतील.

Marathi Ekankika - SPPU: मराठी एकांकिका - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by P. L. Deshpande Datta Patil

महाराष्ट्राची ओळख नाटकाची परंपरा खोलवर रुजलेले एक राज्य अशी आहे. ही ओळख अधिक ठळक करून देण्याचे काम ‘एकांकिका' या नाटकाच्या उपप्रकाराने लेखन आणि प्रयोगाच्या माध्यमातन केलेले दिसते. प्रयोगाच्या माध्यमातून एकांकिका या हौशी आणि व्यावसायिक रंगभूमीपासून थेट महाविद्यालयीन पातळीपर्यंत रुजलेल्या दिसतात. त्यामागील एक कारण म्हणजे महाराष्टात होणाऱ्या शंभरहून अधिक एकांकिका स्पर्धा होत. या स्पर्धांतून अनेक कलावंत मराठी रंगभूमीला मिळालेले आहेत. अनेक तरुण कलावंत रंगभूमीशी जोडले गेले आहेत. या तरुणांना एकांकिकांच्या माध्यमातून लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, संगीत, अभिनय, प्रकाशयोजना या रंगभूमीच्या घटकांची ओळख झाली. तसेच त्यांनी एकांकिका लेखनातून सामाजिक, कौटुंबिक, राजकीय अभिव्यक्ती साधलेली दिसते. जगण्याकडे बघण्याची आणि त्या संदर्भात विचार करण्याची सवय लावण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम एकांकिकांनी केलेले आहे.

Marathi Kumarbharati Digest class 10 - Maharashtra Board Guide: मराठी कुमारभारती डाइजेस्ट इयत्ता 10वी - महाराष्ट्र बोर्ड मार्गदर्शन

by Shri Navneet

मराठी कुमारभारती इयत्ता 10वी चे पुस्तक नवनीत एज्युकेशन लिमिटेडने मराठी भाषेमध्ये प्रकाशित केलेले आहे, या पुस्तकामध्ये चार भाग दिले आहेत. पाठ्यपुस्तकातील सर्व पाठ, कविता व स्थूलवाचनाचे पाठ यांवर कृतिपत्रिका आराखड्यानुसार विविध कृती या नवनीतमध्ये दिल्या आहेत. कृतिपत्रिकेच्या आराखड्यातील अद्ययावत बदलांनुसार 'कवितेवरील मुद्द्यांच्या आधारे कृती' या प्रश्नप्रकाराचे मार्गदर्शन देऊन, तो सर्व कवितांमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. प्रस्तुत 'नवनीत'मध्ये दिलेल्या अपठित उताऱ्यांच्या स्वतंत्र विभागात पाठ्यपुस्तकात दिलेले दोन अपठित उतारे, तसेच सरावासाठी अन्य उतारे आणि त्यावर आधारित आराखड्यानुसार अपेक्षित कृतींचा समावेश केलेला आहे.

Marathi Vyakaran Va Bhashabhyas class 9 - Maharashtra Board: मराठी व्याकरण व भाषाभ्यास इयत्ता नववी - महाराष्ट्र बोर्ड

by Prof. Ashok Bagave

इयत्ता नववी - मराठी (द्वितीय भाषा) या विषयाचे नवीन पाठ्यपुस्तक आणि कृतिपत्रिकेचा आराखडा यांवर आधारित 'नवनीत मराठी (LL) व्याकरण व भाषाभ्यास: इयत्ता नववी' हे पुस्तक आहे. मराठी (LL) हा विषय अभ्यासणाऱ्या अमराठी माध्यमांच्या शाळांतील विद्यार्थ्यांना मराठी व्याकरण काहीसे कठीण जाते, अशा विद्यार्थ्यांना व्याकरण व भाषाभ्यासातील अभ्यासघटक नीटपणे समजून घेण्यासाठी आणि ते पक्के करण्यासाठी प्रस्तुत पुस्तक खूपच उपयुक्त ठरले आहे. इयत्ता नववी - मराठी (LL) साठी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाने नेमलेल्या व्याकरण व भाषाभ्यासाच्या नवीन अभ्यासक्रमाचा आणि कृतिपत्रिकेच्या नवीन आराखड्यानुसार सर्व घटकांचा संपूर्णत: समावेश या पुस्तकात केला आहे. कृतिपत्रिकेच्या नवीन आराखड्यात [अ] व्याकरण घटकांवर आधारित कृती आणि [आ] भाषिक घटकांवर आधारित कृती अशा दोन भागांत 'व्याकरण व भाषाभ्यास' विभागलेला आहे.

Marathi Yuvakbharati Digest class 11 - Maharashtra Board Guide: मराठी युवकभारती डाइजेस्ट इयत्ता 11वी - महाराष्ट्र बोर्ड मार्गदर्शन

by Shri Navneet

मराठी युवकभारती इयत्ता 11वी चे पुस्तक नवनीत एज्युकेशन लिमिटेडने मराठी भाषेमध्ये प्रकाशित केलेले आहे, या मार्गदर्शकात एकूण पाच भाग दिलेले आहेत. त्यापैकी गद्य, पद्य, साहित्यप्रकार (नाटक), उपयोजित मराठी व व्याकरण. प्रत्येक गद्यपाठाच्या सुरुवातीला प्रास्ताविकात लेखक/लेखिका व कवी/कवयित्री यांचा परिचय – लेखनवैशिष्ट्ये - ग्रंथसंपदा यांचा उल्लेख करून पुढे पाठाचा परिचय – शब्दार्थ – टिपा – वाक्प्रचार व अर्थ - कृति - स्वाध्याय व त्यांची समर्पक उत्तरे या क्रमाने पाठाचा सुसंगतवार अभ्यास करून दिला आहे. मार्गदर्शकात प्रत्येक नाट्यउताऱ्यावरील कृति-स्वाध्याय अचूक व समर्पक पद्धतीने सोडवून दिले आहेत. मार्गदर्शकात उपरोक्त प्रत्येक कार्यात्मक व्याकरण घटकाचा यथायोग्य परामर्श घेऊन, सुबोध भाषेत समजावून देऊन प्रत्येक घटकासाठी दिलेल्या कृति-स्वाध्यायाची अचूक व समर्पक उत्तरे दिली आहेत.

Mrs B Nabad 104 - Novel: मिसेस बी नाबाद १०४ - कादंबरी

by Ulhas Hari Joshi

आपण अशिक्षित आहोत. अनपढ आहोत. गावंढळ आहोत. कधी शाळेची पायरी पण चढलेलो नाही त्यामुळे कुठल्याही प्रकारचे डिग्री, डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट नाही. घरची परिस्थिती अगदी गरीब. दोन वेळचे पोटभर खायला मिळण्याची पण मारामार. खिशात पैसे नाहीत, समाजात इज्जत नाही. इंग्रजी भाषेचा गंध पण नाही. वय वाढलेले. संसाराच्या जबाबदाऱ्या अंगावर येऊन पडलेल्या. निवृत्तीचे वय जवळ येत चाललेले. निवृत्तिनंतर काहीही न करण्याचे दिवस. अनोळखी देशात येऊन पडलेलो. प्रगती न करण्याची हजारो कारणे. सतत रडत बसण्याची, दैवाला दोष देत बसण्याची सवय. अशा हतबल परिस्थितीत आपण काहिही किंवा फारसे काही करू शकत नाही या समजुतीला प्रचंड धक्का देणारी 'मिसेस बी' किंवा रोझ ब्लमकिन हीची सत्यकथा आहे. जे अशिक्षित, अंगुठेछाप, खेडवळ आणि मोडके तोडके इंग्रजी येणाऱ्या रोझसारख्या महिलेला अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये जमले ते आपल्याकडील सुशिक्षीत, उच्च विद्याविभुषी, ग्रॅज्युउट, डबल ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट आणि डॉक्टरेट झालेल्या महिलांना आपल्यासारख्या प्रगतिशील देशात का जमत नाही याचे उत्तर मला काही अजून सापडत नाही. रोझची ही सत्यकथा अत्यंत प्रेरणादायी अशीच आहे. रोझची ही सत्यकथा मी आपल्याबरोबर शेअर करत आहे.

Mugal Va Marathekalin Bharat 1526 Te 1761 FYBA Second Semester- RTMNU: मुगल व मराठेकालीन भारत १५२६ ते १७६१ बी.ए. प्रथम वर्ष द्वितीय सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Prof. N. C. Dikshit

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जून २०१६ पासूनच्या सेमिस्टर पॅटर्नच्या नव्या अभ्यासक्रमानुसार बी.ए. द्वितीय सेमिस्टरकरिता मुगल व मराठेकालीन भारत १५२६ ते १७६१ हे पाठ्यपुस्तक आहे. ह्या पुस्तकाचे लेखन प्राध्यापक नी. सी. दीक्षित तसेच मनोहर पिंपळापुरे अॅण्ड कं. पब्लिशर्स यांनी प्रकाशित केले आहे. पुस्तकामध्ये मुगल सत्तेची संस्थापना बाबर, शेरशहा, अकबर, शहाजहान, औरंगजेब, मुगल काळातील कला व स्थापत्यकला, छत्रपती शिवाजी महाराज यांचा दक्षिणेतील सत्ता व मुगलांशी संबंध, शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कर्नाटक मोहीम, तसेच त्यांचे प्रशासन, छत्रपती संभाजी महाराज, मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध, पानिपतचे तिसरे युद्ध आणि युरोपीय व्यापारी कंपन्यांचे आगमन इत्यादी इतिहासातील प्रमुख अभ्यासक्रम या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला आहे.

Paryavaran Shikshan Va Jalsuraksha class 11 - Maharashtra Board: पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा इयत्ता अकरावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा इयत्ता अकरावी पुस्तकाची रचना अशी केली आहे, की सहअध्ययन आणि सामूहिक कृती सुलभ करण्यासाठी हे पाठ्यपुस्तक प्रोत्साहित करेल. रचनात्मक दृष्टिकोन आणि कृतींवर आधारित अध्यापन-अध्ययनासाठी हे पुस्तक तयार केले गेले आहे. सदर अभ्यासक्रम संबंधित चित्रांसह ज्ञान निर्मिती सुलभ करण्यासाठी वर्गीकृत पद्धतीने सादर केला आहे. पर्यावरणाचे संवर्धन आणि काळजी, जैवविविधता, नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन आणि आपत्ती व्यवस्थापन यांसाठी हे पाठ्यपुस्तक ठळक मुद्दे मांडत आहे. या पुस्तकातील विषय अशा रीतीने मांडले आहेत, की ज्यांमुळे शाश्वत विकासाची संकल्पना विद्यार्थ्यांना कळून येईल. आजच्या जगातील पर्यावरणविषयक सामाजिक व आर्थिक समस्या एकमेकांत गुंतलेल्या आहेत. त्या सोडविण्यासाठीची साधने व निरनिराळे मार्ग यांचाही समावेश या पाठ्यपुस्तकात केला आहे.

Pashchimatya Rajakiy Vichar FYBA Second Semester- RTMNU: पाश्चिमात्य राजकीय विचार बी.ए. द्वितीय सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Prof. R. J. Lote

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जून २०१६ पासूनच्या सेमिस्टर पॅटर्नच्या नव्या अभ्यासक्रमानुसार बी.ए. प्रथम वर्षाच्या दुसऱ्या सेमिस्टरकरिता पाश्चिमात्य राजकीय विचार हे पुस्तक आहे. ह्या पुस्तकाचे लेखन प्राध्यापक प्रा. रा.ज. लोटे तसेच मनोहर पिंपळापुरे अॅण्ड कं. पब्लिशर्स यांनी प्रकाशित केले आहे. राजकीय विचारांच्या विकासात इसवी सन पूर्व काळातील ग्रीक नगरराज्यांना महत्त्वाचे स्थान आहे. राज्य, राज्यसंस्थेचे स्वरूप, न्यायाची कल्पना, आदर्श राज्य, नागरिकत्वाची व्याख्या, शासनाचे प्रकार, प्रत्यक्ष लोकशाही इत्यादी राज्यशास्त्रीय दृष्टीने महत्त्वाच्या घटकांसंबंधीच्या विचारांचा प्रारंभ इसवी सन पूर्व काळातील ग्रीक नगरराज्यांपासून होतो. ऐतिहासिक दृष्टीने इसवी सन पूर्व कालखंडातील चौथे व पाचवे शतक अत्यंत महत्त्वाचे. कारण हाच ग्रीक नगरराज्यांच्या गौरवशाली युगाचा कालखंड होय. या कालखंडात सिकंदरसारखा महान शासक आणि जगज्जेत्ता राजा झाला. प्लेटो, ॲरिस्टॉटलसारखे महान तत्त्वज्ञ वा राजकीय विचारवंत देखील याच कालखंडातले होय. राज्यकारभार कसा चालवावा याबाबतचे विभिन्न नमुने वा प्रकार तत्कालीन ग्रीक नगरराज्यांमध्ये होते. ग्रीक नगरराज्ये ही त्या कालखंडातील राजकीय विचारविनिमयाची आणि चिंतनाची केंद्रे होती असे म्हणणे संयुक्तिक होईल. हॉब्ज, लॉक, रूसो, बेथेम, मिल, मार्क्स, लेनिन हे सर्व पाश्चिमात्य राजकीय विचारवंत. पाश्चिमात्य राजकीय विचारांची सुरुवात ग्रीकांपासून होते. ग्रीक राजकीय विचारांच्या अभ्यासाचा प्रारंभ प्लेटो व अॅरिस्टॉटलच्या राजकीय विचारांपासून पुस्तकांमध्ये करण्यात आला आहे.

Poonachi: पूनाची

by Perumal Murugan

एक गूढ पाहुणा कुठूनतरी अवतरतो आणि एक नुकतंच जन्मलेले करडू एका म्हाताऱ्या जोडप्याला भेट देऊन जातो. लवकरच, त्या छोट्याशा काळ्या शेळीचा पूनाचीचा - नाजुकपणा आणि बहुप्रसवता या गोष्टी तिच्या अवतीभवतीच्या सगळ्यांच्या नवलाचा विषय बनून जातात. अगदी तिच्यावर झडप घालू पाहणाऱ्या गरुडापासून ते तिला तोंडात धरून पळवून नेऊ पाहणाऱ्या रानमांजरापर्यंत, सगळ्यांपासून वाचवून म्हातारा-म्हातारी छोट्या पूनाचीला जगवण्यासाठी जिवाचे रान करतात, कारण ती त्यांत्त्या छोट्याशा विश्वाचा केंद्रबिंदू बनून गेलीय. शेतकरी, धनगर किंवा शेळ्या यांच्यापैकी कुणाचही जगणं तसं सोपं नसतंच. पाऊस येत नाही, देव आपापल्या वाटचे बळी मागून मोकळे होतात आणि अरण्य या अजाण प्राण्यांना मोहवून फशी पाडायला टपलंय, या सगळ्यांतून, पूनाची कधी तिचं रक्षण करणाऱ्या तर कधी तिला घायाळ करणाऱ्या, मनुष्यप्राण्यांच्या वर्तणुकीची साक्षीदार होते आणि त्यावर मूक प्रश्नचिन्हही उपस्थित करते. प्राण्यांच्या जगाची ही तरल, तरीही गुंतागुंतीची कथा, हे आपल्या काळावरचं, वर्ण-जातीच्या विषम उतरंडीवरचं भाष्य आहे; तसंच ते भाष्य आहे नाकर्त्या शासनाच्या लहरींना शरण जाण्याऐवजी त्यांच्या विरोधात आवाज उठवण पसंत करणाऱ्या महत्त्वाकांक्षी व्यक्तींच्या वाढत्या असमर्थतवरचं, असुरक्षिततेवरचं.

Pralay Janma Pralayacha - Novel: प्रलय जन्म प्रलयाचा - कादंबरी

by Shubham Suresh Rokade

"विनाश! मला विनाश दिसत आहे राजन. ज्या वेळी आकाशात चंद्र आणि सूर्य दोन्ही उपस्थित असतील, अर्धे आकाश काळेकुट्ट आणि अर्धे आकाश लाल रंगाचे असेल ; त्यावेळी जी जन्माला येईल ती तुझ्या वंशाचा निर्वंश करेल. राजन तुझा निर्वंश फार दूर नाही___! ती तुझ्या राजघराण्याचा समूळ नाश करण्यासाठी जन्माला येत आहे___! “महर्षी, कोण 'ती'___? तुम्ही कोणाबद्दल बोलत आहात___? आणि हे कधी, कधी होणार आहे? मला फार चिंता वाटत आहे___? “फार दूर नाही राजन. तुझा मृत्यू, लवकरच तुझा मृत्यू होईल. तुझा पुत्र तुझे राज्य जेव्हा चालवायला घेईल त्या वेळी त्याच्या हातून अधम व घोर पापकर्मे घडतील. त्याच कर्माचे फळ म्हणजे तिचा जन्म आणि जेव्हा ती जन्माला येईल त्या क्षणापासूनतुझ्या तुझ्या वंशाचा अंतःकाळ काळ सुरू होईल. तुझा निर्वंश होण्याचा काळ सुरू होईल___ अशी प्रलय-जन्म प्रलयाचा ऐतिहासिक आणि थरारक कथा कादंबरी शुभम रोक़डे यांनी वाचकांच्या हाती घेऊन आले आहेत.

Prarambhik Bharat: प्रारंभिक भारत: उत्तर मौर्यकाळ ते राष्ट्रकूट काळ एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर २ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Jyoti Ganesh Raut

प्रारंभिक भारत: मध्य आशियाशी संबंध आणि शुंग-सातवाहन काळ, दक्षिण भारतातील प्रारंभिक इतिहास, उत्तर भारत: गुप्त साम्राज्य आणि हर्षवर्धन, प्रादेशिक राज्य: संक्षिप्त इतिहास या चार पाठांद्वारे विद्यार्थ्याना प्राचीन भारताचा एक समृद्ध कालखंड समजू शकेल असा विश्वास आहे. हा अभ्यासक्रम नेमण्याचे विद्यापीठाचे उद्दिष्ट म्हणजे प्रारंभिक भारताचा इतिहास हा एकूणच भारतीय इतिहासाचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. कारण तो संपूर्ण भारतीय इतिहासाचे योग्य आकलन करण्यासाठी मूलाधार आहे. हा विषय विद्यार्थ्यांना प्राचीन इतिहासाचे आकलन होण्याच्या उद्देशाने तयार केलेला आहे. भारतीय सभ्यता आणि संस्कृती तसेच राजकीय घराणी यांच्या उदय आणि विकासाला कारणीभूत असणाऱ्या घटकांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे.

Prarambhik Bharat Uttar Mauryakal Te Rashtrakut Kaal FYBA Second Semester - SPPU: प्रारंभिक भारत: उत्तर मौर्यकाळ ते राष्ट्रकूट काळ एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर २ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Jyoti Ganesh Raut

प्रारंभिक भारत: मध्य आशियाशी संबंध आणि शुंग-सातवाहन काळ, दक्षिण भारतातील प्रारंभिक इतिहास, उत्तर भारत: गुप्त साम्राज्य आणि हर्षवर्धन, प्रादेशिक राज्य: संक्षिप्त इतिहास या चार पाठांद्वारे विद्यार्थ्याना प्राचीन भारताचा एक समृद्ध कालखंड समजू शकेल असा विश्वास आहे. हा अभ्यासक्रम नेमण्याचे विद्यापीठाचे उद्दिष्ट म्हणजे प्रारंभिक भारताचा इतिहास हा एकूणच भारतीय इतिहासाचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. कारण तो संपूर्ण भारतीय इतिहासाचे योग्य आकलन करण्यासाठी मूलाधार आहे. हा विषय विद्यार्थ्यांना प्राचीन इतिहासाचे आकलन होण्याच्या उद्देशाने तयार केलेला आहे. भारतीय सभ्यता आणि संस्कृती तसेच राजकीय घराणी यांच्या उदय आणि विकासाला कारणीभूत असणाऱ्या घटकांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे.

Rajyashastra Digest class 11 - Maharashtra Board Guide: राज्यशास्त्र डाइजेस्ट इयत्ता 11वी - महाराष्ट्र बोर्ड मार्गदर्शन

by Shri Navneet

राज्यशास्त्र इयत्ता 11वी चे पुस्तक नवनीत एज्युकेशन लिमिटेडने मराठी भाषेमध्ये प्रकाशित केलेले आहे, या मार्गदर्शकाची (१) राजकीय संकल्पना, (२) तुलनात्मक शासन आणि राजकारण, (३) लोकप्रशासन आणि (४) आंतरराष्ट्रीय संबंध या चार विभागांत विभागणी करण्यात आली आहे. या मार्गदर्शकातील प्रत्येक प्रकरणात सुरुवातीला महत्त्वाच्या मुद्द्यांचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. प्रस्तुत मार्गदर्शकात वस्तुनिष्ठ, लघूत्तरी व दीर्घोत्तरी अशा सर्व प्रकारच्या प्रश्नांचा समावेश केलेला असून, त्यांची सुबोध भाषेत मुद्देसूद, समर्पक व आदर्श उत्तरे देण्यात आली आहेत. अभ्यासक्रमात आणि पाठ्यपुस्तकात नव्याने समाविष्ट केलेल्या उपयोजनात्मक प्रश्न व त्या प्रश्नांची समर्पक उत्तरे यांचा प्रत्येक प्रकरणात समावेश करण्यात आला आहे.

Rarang Dhang SYBA Third Semester - SPPU: रारंग ढांग एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ३ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prabhakar Pendharkar

प्रभाकर पेंढारकर यांचं हे अतिशय गाजलेलं पुस्तक. पेंढारकर यांनी अत्यंत वेगळा विषय रोचक पद्धतीनं हाताळला आहे. हिमालयात रस्ते बांधणारी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन, सैन्यदलातील इंजिनिअरिंग विभाग, बॉर्डर रोडचा प्रमुख, टास्क फोर्स कमांडर्स या वेगळ्याच जगाबरोबर माणसांना आणि यांत्रांनाही थकविणारी हिमालयाची उंची, विरळ ऑक्सिजन, लहरी हवा, विलक्षण थंडी, दरडी कोसळणं, रक्त गोठवणारा बर्फ अशा बेभरवशी निसर्गाचं दर्शन घडतं. दुसरीकडे वेगवेगळ्या स्वभावाची माणसंही भेटतात. माणसं आणि निसर्ग यांचं नातं गुंफणारं, संघर्ष दाखविणारं वेगळं कथानक आकाराला येतं. पेंढारकरांची शैली चित्रमय आहे. त्यामुळे प्रसंग हुबेहूब डोळ्यासमोर उभे राहतात. वाचक त्यात गुंतून पडतो.

Saitan: सैतान

by Narayan Dharap

“खिडकीच्या काचेबाहेरून दोन मोठे, काळेभोर डोळे तिच्याकडे रोखून पाहत होते. त्या एकाग्र नजरेत अशी काही शक्ती होती की, लताला आपली नजर त्यांच्यावरून काढताच येत नव्हती. ती नजर एखाद्या गिरमिटासारखी तिच्या मेंदूचा, तिच्या मनाचा छेद घेत घेत पार तिच्या आत्म्यापर्यंत पोहोचत होती आणि लताला दिसत होतं की, बाहेर होतं ते काही कोणी माणूस नव्हतं, एवढंच नाही, ते जिवंतही नव्हतं. भयाच्या कडेवर मेंदू लटपटत असतानाही ते काय आहे हे तिला समजत होतं.- ती एक बाहुली होती. गारगोट्यांसारख्या मोठ्या मोठ्या डोळ्यांची, लाललाल ओठांची, गोबऱ्या गालाची ती बाहुली होती. पण आता चेहऱ्याचा डावीकडचा भाग जळून, होरपळून, वितळून विकृत झाला होता. एक गालही आत बसला होता. पण ते डोळे! ते जिवंत होते! ते तीव्र भावनांनी लवलवत होते! ती नजर तिचा मेंदू जाळत खोलवर पोहोचत होती. पुन्हा एकदा ती कुजबुज आली. भुश्यात पाणी जिरावं तशी ती कुजबुज तिच्या सर्व शरीरात भिनली. पण ते काही शब्द असले तर तिला ते नीट उमगले नाहीत, त्यांचा अर्थही ध्यानात आला नाही.''

Samajik Manasashastrachi Olakh FYBA Second Semester - SPPU: सामाजिक मानसशास्त्राची ओळख एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर २ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Anuradha Prashant Harkare

प्रथम वर्ष कला मानसशास्त्र या विषयाचा सुधारित अभ्यासक्रम 2019-20 या शैक्षणिक वर्षापासून लागू होत आहे. बदलत्या काळानुसार मानसशास्त्रासारख्या विषयातसुद्धा झपाट्याने बदल होत आहेत. त्यानुसार अभ्यासक्रमात बदल होणे गरजेचे होते. या अभ्यास क्रमावर आधारित सामाजिक मानसशास्त्राची ओळख पाठ्यपुस्तक विद्यार्थ्यांसाठी खुपच उपयोगी ठरणार आहे. भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या (Ministry of Human Resource Development-MHRD, Govt. of India) नव्या शैक्षणिक धोरणानुसार (New Education Policy-NEP) भारतात बदल घडवायचा असेल तर शिक्षण क्षेत्रात बदल करणे हा एक प्रभावी मार्ग आहे. त्याची सुरुवात या अभ्यासक्रमात झालेली दिसते. या बदलांमुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी आणि अधिक समृद्ध होईल याची खात्री वाटते. अभ्यासक्रमात एक महत्त्वाचा बदल केला आहे तो म्हणजे दुसऱ्या सत्रात 'सामाजिक मानसशास्त्राची ओळख' या विषयाचा समावेश. मानसशास्त्राच्या वेगवेगळ्या शाखांमधील सामाजिक मानसशास्त्र हा विषय व्यक्तीचे समाजनिष्ठ वर्तन समजून घेण्यासाठी तितकाच उपयुक्तसुद्धा आहे.

Samajik Sanstha Ani Badal FYBA Second Semester - SPPU: सामाजिक संस्था आणि बदल एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर २ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Dr. Vijay M. Jadhav

सामाजिक संस्था आणि बदल याबाबत अनेक संदर्भ ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. मात्र, हे पुस्तक सामाजिक मानसशास्त्रावर यावर प्रकाश टाकणारे एक उपयुक्त पुस्तक आहे. पुस्तकाच्या सुरूवातीला विविध सामाजिक संस्था जसे की कुटुंब, नातेसंबंध, विवाह, राजतंत्र, अर्थव्यवस्था यांची सम्यक आणि मुद्देसूद चर्चा करण्यात आलेली असून समाज परिवर्तन आणि बदलत्या सामाजिक स्थितीनुसार त्यांच्यात झालेले बदल यांची देखील चर्चा विस्तृत स्वरूपात करण्यात आलेली आहे. पुस्तकाच्या दुसऱ्या प्रकरणात धर्म, शिक्षण आणि प्रसारमाध्यमे या सामाजिक संस्थांचे मानवी जीवनातील आणि सामाजिक जीवनातील स्थान, महत्त्व इत्यादी स्पष्ट करण्यात आलेले आहे. धर्म, शिक्षण आणि प्रसारमाध्यमे ही व्यक्तीच्या सामाजिक जीवनात महत्वाच्या भूमिका बजावून व्यक्तीच्या सामाजिक जीवनात ते मार्गदर्शन करतात, त्याचे सविस्तर स्पष्टीकरण येथे देण्यात आलेले आहे. तर पुस्तकाच्या तिसऱ्या प्रकरणात सामाजिक बदल व या बदलांचे सहाय्यक घटक यांची सविस्तर चर्चा करण्यात आलेली असून या प्रकरणात आधुनिकीकरणाचा विकास व जागतिकीकरण यांची तपशीलवार चर्चा करण्यात आलेली आहे.

Samajik Sanstha Ani Parivartan FYBA Second Semester - SPPU: सामाजिक संस्था आणि परिवर्तन एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर २ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Sudhir Yevale Jyoti Suhas Gagangras

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जून 2019 पासून बदललेल्या नवीन अभ्यासक्रमानुसार श्रेयांक पद्धत व सेमिस्टर लागू केलेली असून एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर (II) करिता समाजशास्त्र विषयासाठी 'सामाजिक संस्था आणि परिवर्तन' हे क्रमिक पाठ्यपुस्तक तयार केलेले आहे. सेमिस्टर (II) करिता या अभ्यासक्रमात समकालीन अनेक मुद्द्यांचा समावेश केला आहे. पुस्तक वाचताना व अभ्यासताना उत्सुकता वाटेल व शंकांचे निरसनही होईल. पुस्तकामध्ये नवीन मुद्दे असल्याने त्यात शक्य होईल तितकी स्पष्टता आणण्याचा प्रयत्न केला आहे.

Samajshastra Digest class 11 - Maharashtra Board Guide: समाजशास्त्र डाइजेस्ट इयत्ता 11वी - महाराष्ट्र बोर्ड मार्गदर्शन

by Shri Navneet

समाजशास्त्र इयत्ता 11वी चे पुस्तक नवनीत एज्युकेशन लिमिटेडने मराठी भाषेमध्ये प्रकाशित केलेले आहे, या मार्गदर्शकाची (१) समाजशास्त्राची ओळख, समाजशास्त्रज्ञांचे योगदान आणि मूलभूत संकल्पना, (२) सामाजिक संस्था, (३) संस्कृती आणि सामाजीकरण, (४) सामाजिक स्तरीकरण आणि सामाजिक परिवर्तन या चार विभागांत विभागणी करण्यात आली आहे. या मार्गदर्शकातील प्रत्येक प्रकरणात सुरुवातीला महत्त्वाच्या मुद्द्यांचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. प्रस्तुत मार्गदर्शकात वस्तुनिष्ठ, लघूत्तरी व दीर्घोत्तरी अशा सर्व प्रकारच्या प्रश्नांचा समावेश केलेला असून, त्यांची सुबोध भाषेत मुद्देसूद, समर्पक व आदर्श उत्तरे देण्यात आली आहेत. अभ्यासक्रमात आणि पाठ्यपुस्तकात नव्याने समाविष्ट केलेल्या उपयोजनात्मक प्रश्न व त्या प्रश्नांची समर्पक उत्तरे यांचा प्रत्येक प्रकरणात समावेश करण्यात आला आहे.

Samajshastracha Parichay Paper 1 FYBA First Semester - SPPU: समाजशास्त्राचा परिचय पेपर १ एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर १ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Jyoti Gagangras Prof. Dr. Sudhir Yevale

समाजशास्त्र अभ्यास मंडळाने प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी या अभ्यासक्रमाची निवड करताना खूप कष्ट व काळजी घेतलेली दिसते. मागील अभ्यासक्रमातील कालबाह्य बाबी काढून टाकून समकालीन सामाजिक बदलांचा विचार करूनच या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. सेठ/नेटसारख्या परीक्षा, स्पर्धा परीक्षा व इतर समाजशास्त्र विषय निवडून ज्या काही व्यावसायिक संधी विद्यार्थ्यांना आहेत त्यासाठी त्यांचा प्रवास सुकर व्हावा हाही या अभ्यासक्रमामागील उद्देश आहे. समाजशास्त्रातील वाढत्या संधी, संशोधन, आर्थिक, शिक्षण, कायदा, पत्रकारिता, औद्योगिक, राजकीय, सामाजिक यांतील समकालीन मुद्द्यांना या अभ्यासक्रमात समाविष्ट केले आहे. कुटुंब, नातेसंबंध याचे बदलते स्वरूप अधोरेखित करण्याचा प्रयत्नही झाला आहे. शिक्षक व विद्यार्थी यांना आकलन होईल अशा सोप्या व सरळ भाषेत हा अभ्यासक्रम मांडण्याचा प्रयत्न केला आहे. वापरले जाणारे पर्यायी शब्दही दिले आहेत.

Samajshastrachi Olakh FYBA First Semester - SPPU: समाजशास्त्राची ओळख एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर १ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Vijay M. Jadhav

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एफ.वाय.बी.ए. या शैक्षणिक वर्षासाठीच्या अभ्यासक्रमात या वर्षापासून सुधारणा करण्यात आली आहे. समाजशास्त्र (समाजशास्त्राची ओळख) या पेपरच्या अभ्यासक्रमात सुचविण्यात आलेल्या सुधारणांची जून २०१९ पासून अंमलबजावणी होत आहे. समाजशास्त्राची ओळख या पुस्तकाच्या सुरूवातीला समाजशास्त्र या विषयाची मूलभूत माहिती, समाजशास्त्रांतर्गत येणारे अभ्यासविषय त्याचप्रमाणे समाजशास्त्राचा उदय, समाजशास्त्रातील विविध क्षेत्रे, समाजशास्त्रातील रोजगारविषयक संधी याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. दुसऱ्या प्रकरणात समाज त्याचा अर्थ, व्याख्या, समाजाची वैशिष्ट्ये, समाजाचे स्थल-कालानुसार बदलत गेलेले प्रकार, त्याचप्रमाणे समूह, समूहाची संकल्पना, सामाजिक समूहाची वैशिष्ट्ये, समूहाचे महत्त्व याबाबत माहिती देण्यात आली आहे. तसेच समुदाय आणि सोशल नेटवर्किंग या संकल्पनांची देखील चर्चा प्रस्तुत प्रकरणात केली आहे. पुस्तकाच्या तिसऱ्या प्रकरणात संस्कृती, संस्कृतीचे प्रकार यांची देखील सविस्तर चर्चा करण्यात आलेली आहे. तसेच सामाजिक स्तरीकरण, स्तरीकरणाची वैशिष्ट्ये, स्तरीकरणाचे आधार, सामाजिक अपवर्जन, सामाजिक असमानता यांची देखील विस्तृत आणि तपशीलवार चर्चा प्रस्तुत प्रकरणात करण्यात आली आहे.

Refine Search

Showing 1,176 through 1,200 of 1,445 results