Browse Results

Showing 1,276 through 1,300 of 1,445 results

Nagasaki: नागासाकी

by Craig Collie

‘नागासाकी’ ही कादंबरी म्हणजे १९४५ मध्ये अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकला, त्याच्या पार्श्वभूमीची, परिणामांची आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या अनेक बाबींची विस्तृत कहाणी आहे. १६ ते २९ जुलै आणि ५ ऑगस्ट १९४५ ते १० ऑगस्ट १९४५ या दिवसांतील राजकीय घडामोडींचं आणि हिरोशिमा, नागासाकीतील लोकांच्या दैनंदिन जीवनाचं चित्रण, असं सर्वसाधारणपणे या कादंबरीचं स्वरूप आहे. क्रेग कोली यांनी संशोधन करून, खूप संदर्भ अभ्यासून, प्रत्यक्षदर्शींच्या मुलाखती घेऊन ही कादंबरी सिद्ध केली आहे. जपानने पर्ल हार्बरवर केलेल्या हल्ल्याचा सूड म्हणून अमेरिकेने हा बॉम्बहल्ला केला. त्या हल्ल्यानंतर या शहरांमध्ये झालेल्या मृत्यूच्या तांडवाचं आणि जखमी लोकांच्या वेदनांचं प्राधान्याने चित्रण करणारी ही कादंबरी जरूर वाचली पाहिजे.

H M S Ulysses: एच एम एस युलिसिस

by Alistair MacLean

ही कहाणी दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील आहे. रशियाचे जर्मनीशी युद्ध सुरू असते, आणि एफआर ७७ या मालवाहू आणि तेलवाहू जहाजांच्या ताफ्यामार्फत रशियाला जर्मनीशी लढण्यासाठी अत्यंत निकड असलेले युद्धसाहित्य पोचवण्याची योजना असते. एचएमएस युलिसिस ही ब्रिटिश आरमारातील एक क्रूझर जातीची युद्धनौका या ताफ्याची फ्लॅगशिप असते. तिच्या साथीला आणखी छत्तीRस जहाजे या ताफ्यात असतात. भयंकर थंडी, बर्फवृष्टी, प्रचंड वादळे, चिडलेले व निराश झालेले नौसैनिक, त्यांची झालेली प्रचंड उपासमार, थकवा, झोपेचा अभाव, आणि ताफ्याने रशियापर्यंत पोचता कामा नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणारी जर्मन बॉम्बर विमाने, युद्धनौका आणि यू-बोटी, अशा पार्श्वभूमीवरील या ताफ्याच्या– आणि पर्यायाने युलिसिसच्या– प्रवासाची ही कहाणी आहे. या सगळ्या विपरीत परिस्थितीला युलिसिसवरील सगळे अधिकारी आणि नौसैनिक ज्या असीम धैर्याने आणि शौर्याने तोंड देतात त्याचे भेदक वर्णन ‘एचएमएस युलिसिस’ या कादंबरीत आहे.

Huckleberry Finnchi Sahasa: हकलबेरी फिनची साहसं

by Mark Twain

अर्नेस्ट हेमिंग्वेंपासून अनेक दिग्गजांना भावलेली ही कादंबरी. आई नसलेला, दारुड्या बापापासून पळणारा उनाड पोरगा हक फिनची ही गोष्ट. हक कायम जगाचा अदमास बांधत राहतो. निसर्गाकडे निर्मळपणे बघतो, लोकांकडे बेरक्या नजरेनं पाहातो, त्या-त्या वेळचे सामाजिक पूर्वग्रह त्याच्याही मनात आहेतच, पण या सगळ्यासकट एक गुण-दोष असलेला तरुण पोरगा म्हणून तो वाचकांपुढं उभा राहतो.

Tom Sawyerchi Sahasa: टॉम सॉयरची साहसं

by Mark Twain

टॉम सॉयरची साहसं ही कादंबरी दीडेकशे वर्षांपूर्वी अमेरिकेत प्रसिद्ध झाली. मिसिसिपी नदीकाठच्या सेंट पीटर्सबर्ग या काल्पनिक गावात राहाणाऱ्या टॉम सॉयर या खोडकर मुलाचं भावविश्व या कादंबरीत उभं राहातं... बालपणीचा निरागसपणा आणि प्रौढ वयातलं वास्तव यांच्यातील तफावत टॉम सॉयरच्या या गोष्टीतून जाणवते. ही तफावत आपणही अनुभवलेली असतेच ना, त्यामुळं भूगोलाचं नि भाषेचं अंतर पार करून ही कादंबरी आपल्याशी संवाद साधते.

A Twist in the Tale: अ ट्विस्ट इन द टेल

by Jeffrey Archer

भांडणाच्या भरात एका प्रियकराकडून त्याच्या प्रेयसीचा खून होतो आणि अटक मात्र भलत्याच माणसाला होते... एकदम वेगळ्याच प्रकारचं वाईन टेस्टिंग... एका अनोळखी पुरुषाबरोबर प्रणयाचा खेळ... गोल्फ क्लबहाउसच्या बारमध्ये जुंपलेलं आगळंवेगळं भांडण... कॉर्नफ्लेक्स खाण्यावरून सुरू झालेलं वैमनस्य आणि त्यातून उद्भवलेली ईर्ष्या... अत्यंत धूर्तपणे रचलेलं कथानक, अत्यंत वेगवान आणि मनोरंजनाने ओतप्रोत भरलेल्या या कथांमधून हाताळण्यात आलेल्या काही विषयांची ही छोटीशी झलक... चित्तथरारक सुरुवात आणि धक्कादायक शेवट असलेल्या... सध्याच्या काळातील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या लेखकाच्या लेखणीतून उत्तरलेल्या रहस्यमय, उत्कंठा वाढविणाऱ्या कथांचा संग्रह.

Bharatatil Aapatti Vyavasthapan va Prashasan

by Priti Diliprao Pohekar

Disaster Management is a critical and integral part of any government’s planning strategy. Indian government has been struggling with it since long. This book discusses the varied threats, risks that the country faces. It talks about the Acts implemented, their advantages/disadvantages and their validity. It also talks about the different stakeholders involved, role players and decision makers in the country. It compare country’s disaster management with international decisive moments and acts and the UN’s ordinance.

Adhunik Jag Bhag 2 Paper 2 SYBA Fourth Semester - SPPU: आधुनिक जग भाग २ पेपर २ एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ४ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Ganesh D. Raut

द्वितीय वर्ष कला शाखेच्या सेमिस्टर-4 [Core Course-I (DSE- 2B)-3 Credit] साठी आधुनिक जग (आधुनिक जगाच्या इतिहासाचे ओझरते दर्शन: भाग-२) पाठ्यपुस्तक लिहिण्यात आले आहे. द्वितीय वर्ष कला शाखेत इतिहास हा विषय अभ्यासाला घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जगाचा इतिहास समजून घेता यावा म्हणून हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जगाची तोंडओळख व्हावी असा दृष्टिकोन हे पुस्तक लिहिताना ठेवला आहे.

Aarthik Bhugol 2 SYBA Fourth Semester - SPPU: आर्थिक भूगोल २ एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ४ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. A. B. Savadi Prof. P. S. Kolekar

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (SPPU) SYBA Geography (G-2) Semester - IV साठी (नोव्हेंबर-डिसेंबर 2020 पासून) 'आर्थिक भूगोल - 2' विषय [Cg 210 (B)] हे क्रमिक पुस्तक विद्यार्थ्यांसाठी सादर केले आहे. मानवी भूगोलाची एक महत्त्वपूर्ण शाखा 'आर्थिक भूगोल' आहे. सेमिस्टर - IV मध्ये या शाखेच्या अभ्यासातून मानवी आर्थिक क्रिया विशेषतः वाहतूक व व्यापार, उद्योगधंदे, प्रादेशिक विकास आणि प्रादेशिक विकासातील असंतुलन, भारतातील ग्रामीण विकासाचे कार्यक्रम यांचा परिचय व्हावा या दृष्टीने विद्यापीठाने 'आर्थिक भूगोल – 2' हा विषय भूगोल अध्ययनासाठी निश्चित केला आहे.

Maharashtracha Bhugol 2 SYBA Fourth Semester - SPPU: महाराष्ट्राचा भूगोल २ एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ४ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. A.B. Savadi

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) SYBA Geography (S1) Semester - IV साठी महाविद्यालयीन 'महाराष्ट्राचा भूगोल 2' हे पाठ्यपुस्तक प्रकाशित कलेले आहे. या नवीन अभ्यासक्रमात एकूण चार प्रकरणे आहेत: १. कृषी, २. लोकसंख्या आणि वसाहत, ३. ग्रामीण विकास आणि ४. पर्यटन. 'महाराष्ट्राचा भूगोल' या विषयाची माहिती संशोधनात्मक दृष्टिकोनातून अद्ययावत देण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केलेला आहे. नवनवीन संकल्पना व संज्ञा अतिशय सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न यशस्वी ठरेल यात शंका नाही. ज्या राज्यात आपण राहतो त्याची अद्ययावत माहिती व्हावी हा एक महत्त्वाचा उद्देश हा विषय सुरू करण्याचा आहे.

Rajkiya Patrakarita 2 Paper 2 SYBA Fourth Semester - SPPU: राजकीय पत्रकारिता २ पेपर २ एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ४ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. R. Gh. Varadkar

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने बी.ए. भाग-2 राज्यशास्त्र या विषयासाठी ‘राजकीय पत्रकारिता' हा नवा पेपर सुरू केला आहे. त्या पेपरसाठी असलेल्या अभ्यासक्रमानुसार हे क्रमिक पुस्तक लिहिलेले आहे. प्रसारमाध्यमे आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनलेली आहेत. सर्व प्रकारची माहिती आपल्यापर्यंत पोहोचविण्याचे काम ही माध्यमे करतात. त्यात अर्थातच राजकीय क्षेत्रासंबंधीच्या माहितीचा समावेश होतो. ही माध्यमे जी माहिती पुरवितात त्या आधारे आपण आपले राजकीय मत बनवित असतो. लोकमत घडविण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची आहेच; पण देशातील राजकीय प्रक्रियेवरही या माध्यमांचा प्रभाव पडत असतो. या अर्थाने प्रसारमाध्यमे ही राजकीय प्रक्रियेचा अविभाज्य घटक बनलेली आहेत. त्यामुळेच राज्यशास्त्राचा अभ्यास करताना प्रसारमाध्यमांची राजकारणातील भूमिका समजून घेणे आवश्यक ठरलेले आहे. ती समजून घेतल्याशिवाय देशातील राजकीय प्रक्रिया आपल्याला समजून घेता येणार नाही, एवढे प्रसारमाध्यमांना राजकीय प्रक्रियेत महत्त्व आलेले आहे. त्यामुळेच राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी हा विषय महत्त्वाचा आहे.

Antararashtriya Sambandh Paper 3 TYBA Fifth Semester - SPPU: आंतरराष्ट्रीय संबंध पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Pramod Rajendra Tambe Prof. Shekhar Rajendra Sonar

राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमामध्ये 'आंतरराष्ट्रीय संबंध' या विषयाचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. या अभ्यासक्रमाचा उद्देश म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध ही एक विद्याशाखा म्हणून विद्यार्थ्यांना ओळख करून देणे, आंतरराष्ट्रीय संबंधातील विविध संघटनांचा परिचय होणे आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचे दृष्टिकोन अभ्यासणे हे आहे. 'आंतरराष्ट्रीय संबंध' या विषयामध्ये एकूण चार प्रकरणांचा समावेश केला आहे. पहिले प्रकरण हे 'आंतरराष्ट्रीय संबंधांचा परिचय' हे असून यामध्ये आंतरराष्ट्रीय संबंधांचे स्वरूप, व्याप्ती, महत्त्व आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचे विकासाचे टप्पे हे अभ्यासणार आहोत. प्रकरण दोन 'आंतरराष्ट्रीय संबंधांचे दृष्टिकोन' हे आहे. यामध्ये आदर्शवाद, वास्तववाद, व्यवस्था दृष्टिकोन आणि मार्क्सवाद या चार घटकांचा अभ्यास करणार आहोत. प्रकरण तीनमध्ये आपण 'दुसरे जागतिक महायुद्ध आणि शीतयुद्ध' पाहणार आहोत. यात दुसऱ्या महायुद्धाची कारणे आणि परिणाम, शीतयुद्धाचा उदय ' आणि स्वरूप, शीतयुद्धाचा अंत आणि उदयोन्मुख जागतिक व्यवस्था यांचा अभ्यास करणार आहोत. प्रकरण चारमध्ये 'आंतरराष्ट्रीय संघटना' यात आंतरराष्ट्रीय संघटनेचे कार्य आणि आव्हाने, आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था यांत जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना तसेच प्रादेशिक संघटना युरोपियन महासंघ आणि सार्क संघटना यांचा अभ्यास करणार आहोत.

Marathyancha Itihas (1707-1818) Paper 2 SYBA Fourth Semester - SPPU: मराठ्यांचा इतिहास (१७०७-१८१८) पेपर २ एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ४ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Jyoti Bhosle-Raut

द्वितीय वर्ष कला शाखेच्या सेमिस्टर 4 सामान्य स्तर पेपर 2 (G2) साठी मराठ्यांचा इतिहास (१७०७-१८१८) पाठ्यपुस्तक लिहिण्यात आले आहे. द्वितीय वर्ष कला शाखेत इतिहास हा विषय अभ्यासणाऱ्या विद्यार्थ्यांना स्थानिक इतिहास, प्रांतिक इतिहास, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय इतिहास समजून घेता यावा म्हणून हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. छत्रपती शाहू महाराज, बाळाजी विश्वनाथ पेशवे, थोरले बाजीराव पेशवे, नानासाहेब पेशवे, थोरले माधवराव पेशवे, नारायणराव पेशवे, सवाई माधवराव पेशवे आणि दुसरे बाजीराव पेशवे यांच्या संदर्भात इतिहास केंद्रित झाला आहे. व्यक्तिकेंद्रितता टाळून घटनाप्राधान्य इतिहास लिहिण्याचा प्रयत्न करून एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

Lokprashasan 1 Paper 3 TYBA Fifth Semester - SPPU: लोकप्रशासन १ पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Haridas Arjun Jadhav Pramod Rajendra Tambe Swati Kurade

शैक्षणिक वर्ष 2021-2022 टी.वाय.बी.ए. सत्र - 5 च्या राज्यशास्त्र विशेष स्तर पेपर - 3, CBCS पॅटर्नच्या Discipline Specific Elective Course (DSE 1 C (3) + 1) साठी 'लोकप्रशासन' या विषयाचे अध्ययन केले जाणार आहे. राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमामध्ये 'लोकप्रशासन' या उपविद्याशाखेचे अध्ययन करणे आवश्यक आहे. लोकप्रशासन या विद्याशाखेची विध्यार्थ्यांना ओळख करून देणे हा या अभ्यासक्रमाचा उद्देश आहे. यातून विध्यार्थ्यांना लोकप्रशासनाचे विविध दृष्टिकोन, लोकप्रशासनातील सिद्धान्त आणि मूलभूत संकल्पना समजून घेता येणार आहेत. लोकप्रशासन या अभ्यासक्रमाच्या सत्र पाचमध्ये आपण एकूण चार प्रकरणांचा अभ्यास करणार आहोत. यात पहिले प्रकरण 'लोकप्रशासन' हे असून यामध्ये आपण लोकप्रशासनाचा अर्थ, स्वरूप, व्याप्ती आणि महत्त्व यांचा अभ्यास करणार आहोत. दुसरे प्रकरण 'नव-लोकप्रशासन' हे असून यामध्ये आपण नव-लोकप्रशासनाचा उदय, नव-लोकप्रशासनाची वैशिष्ट्ये आणि उद्दिष्टे समजून घेणार आहोत. तिसरे प्रकरण आहे 'लोकप्रशासनाचे दृष्टिकोन'. या प्रकरणात आपण लोकप्रशासनाच्या अभ्यासाचे पारंपरिक, वर्तनवादाचा व्यवस्था दृष्टिकोन अभ्यासणार आहोत. या सत्रातील शेवटचे प्रकरण आहे 'शासन'. यामध्ये आपण सुशासनाची संकल्पना, ई-प्रशासन आणि सार्वजनिक - खासगी क्षेत्र भागीदारी समजून घेणार आहोत.

Aadhunik Rajkiya Vishleshan Paper 3 TYBA Fifth Semester - SPPU: आधुनिक राजकीय विश्लेषण पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Pramod Rajendra Tambe Prof. Shekhar Rajendra Sonar

शैक्षणिक वर्ष 2020-2021 च्या बदललेल्या अभ्यासक्रमानुसार तृतीय वर्ष कला शाखेसाठी राज्यशास्त्र सामान्य स्तर पेपर-3 (G-3) CC-1E (3) साठी 'आधुनिक राजकीय विश्लेषण' या विषयाचे अध्ययन केले जाणार आहे. राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमामध्ये 'आधुनिक राजकीय विश्लेषण' या विषयाचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. या अभ्यासक्रमाचा उद्देश आधुनिक राजकीय विश्लेषण ही एक अध्ययन शाखा म्हणून विद्यार्थ्यांना ओळख करून देणे, आधुनिक राजकीय विश्लेषणातील विविध विश्लेषणात्मक सिद्धान्तांचा आणि दृष्टिकोनांचा परिचय होणे आणि आधुनिक राजकीय विश्लेषणाचे दृष्टिकोन अभ्यासणे हे आहे. 'आधुनिक राजकीय विश्लेषण' या विषयामध्ये एकूण चार प्रकरणांचा अभ्यास करणार आहोत. भविष्यात स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी या अभ्यासक्रमाचा निश्चितच उपयोग होईल या उदात्त हेतूने 'राज्यशास्त्र अभ्यास मंडळ' सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांनी या अभ्यासक्रमाची रचना केली आहे.

Bhartiya Rashtriy Chalval (1885-1947) Paper 3 TYBA Fifth Semester - SPPU: भारतीय राष्ट्रीय चळवळ (१८८५-१९४७) पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Ganesh D. Raut

तृतीय वर्ष कला शाखेच्या पाचव्या सेमिस्टरसाठी 'भारतीय स्वातंत्र्य चळवळ (1885-1947)' हे पाठ्यपुस्तक आहे. निराली प्रकाशनच्या वतीने हे पाठ्यपुस्तक प्रकाशित होत आहे. हे पाठ्यपुस्तक नुसतेच पाठ्यपुस्तक म्हणून न वापरता ते संदर्भ ग्रंथ म्हणून कसे वापरता येईल याचा विचार केला आहे. विद्यार्थी, शिक्षक, पत्रकार, स्पर्धा परीक्षांना बसणारे विद्यार्थी या सर्वांचा विचार करून हे पाठ्यपुस्तक तयार करण्यात आले आहे. पाठ्यपुस्तकांना असणारी पृष्ठमर्यादा लक्षात घेऊन सदर पुस्तकाची रचना केली आहे. अधिकाधिक चित्रे, अधिक संदर्भ, नवी माहिती यांच्या आधारे पाठ्यपुस्तक अधिकाधिक उपयुक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.

Gunha Ani Samaj 1 Paper 3 TYBA Fifth Semester - SPPU: गुन्हा आणि समाज १ पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Jyoti Suhas Gagangras Prof. Vinayak Subhash Lashkar Dr Sudhir Ashruba Yeole Prof. Vikramaditya Prabhakar Gaikwad

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तृतीय वर्ष भूगोल या वर्गातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सामान्य स्तरावर 'गुन्हा आणि समाज -1' हा विषय लागू केला आहे. 'गुन्हा आणि समाज-1' ह्या पुस्तकामध्ये गुन्हाविषयक सैद्धान्तिक संकल्पना व विविध गुन्हे या विषयीचे विविध पैलू उलगडण्याचा प्रयत्न केला आहे.

Maharashtratil Sthanik Svarajya Shasan 1 Paper 3 TYBA Fifth Semester - SPPU: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य शासन १ पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Omkar Ankush Korawale Prof. Bhakti Rajendra Patil

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तृतीय वर्ष भूगोल या वर्गातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सामान्य स्तरावर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य शासन-1 हा विषय लागू केला आहे. पुस्तकामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील निर्मिती, वाटचाल व विकास, पंचायतराज प्रणाली राबविताना विविध समित्यांनी केलेल्या शिफारशी तसेच 78 व्या घटनादुरुस्तीचा विस्तृत आढावा इत्यादी घटक विद्यार्थ्यांना नक्कीच उपयुक्त ठरतील.

Apatti Vyavasthapanacha Bhugol 1 Paper 3 TYBA Fifth Semester - SPPU: आपत्ती व्यवस्थापनाचा भूगोल १ पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Jyotiram Chandrakant More Prof. Dr. Arjun Haribhau Musmade

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तृतीय वर्ष भूगोल या वर्गातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सामान्य स्तरावर 'आपत्ती व्यवस्थापनाचा भूगोल-1' हा विषय लागू केला आहे. 'आपत्ती व्यवस्थापनाचा भूगोल-1' या विषयाची माहिती संशोधनात्मक दृष्टिकोनातून अद्ययावत देण्याचा प्रयत्न केले आहे. नवनवीन संकल्पना व संज्ञा अतिशय सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयास यशस्वी ठरेल यात शंका नाही, हा मुख्य हेतू डोळ्यांसमोर ठेवून हा विषय CBCS या पद्धतीत तृतीय वर्ष भूगोल या वर्गातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रम रचनेत समाविष्ट करण्यात आला आहे. प्रस्तुत पुस्तकात आपत्तीची संकल्पना, आपत्तीपूर्व व आपत्तीनंतरचे व्यवस्थापन, आपत्तीत प्रसारमाध्यमांची भूमिका अशा घटकांचा मागोवा घेतानाच आपत्ती व्यवस्थापन संरचनेत पूर्वतयारी, प्रतिसाद, पुनर्प्राप्ती, उपशमन, पुनर्वसन स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पर्यावरणीय आपत्तीत वातावरणीय आपत्ती आणि त्याच्या व्यवस्थापनात गारपीट, ढगफुटी, वादळे, आवर्त, दुष्काळ, पूर व त्या अनुषंगाने निर्माण झालेल्या हवामानस्थितीचा अभ्यास सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न या पुस्तकात केलेला आहे.

Paryatan Bhugol 1 TYBA Fifth Semester - SPPU: पर्यटन भूगोल १ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Dilip Dnyaneshwar Muluk Dr Arjun Baban Doke Dr Arjun Haribhau Musmade Dr Jyotiram Chandrakant More

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तृतीय वर्ष भूगोल या वर्गातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी ‘पर्यटन भूगोल’ विषय सामान्य स्तरावर लागू केला आहे. ‘पर्यटन भूगोल’ या पुस्तकात पर्यटन भूगोलाची ओळख तसेच पर्यटन विकासाचे प्राकृतिक, सामाजिक-सांस्कृतिक व राजकीय घटकांचा विस्तारपूर्वक वर्णन केले आहे. यामध्ये हवामान, अभयारण्ये, धार्मिक-ऐतिहासिक-क्रीडा स्थळे, पर्यटकांची सुरक्षितता या बाबींचा विचार केलेला आहे. पर्यटन वर्गीकरणामध्ये राष्ट्रीयत्व, प्रवास कालावधी, उद्देश तसेच पर्यटन संकल्पनेमध्ये कृषी पर्यटन, इको टुरिझम, वन्यजीव पर्यटन, आरोग्य पर्यटन, क्रीडा पर्यटन यांचा समावेश केलेला आहे. पर्यटनातील पायाभूत सुविधेमध्ये वाहतुकीच्या प्रकारांचे सविस्तर वर्णन केलेले आहे. पर्यटन मार्गदर्शकाची भूमिका, मार्गदर्शकाचे गुण व कर्तव्ये याचे मुद्देसूद वर्णन केलेले आहे. याबरोबरच प्रसारमाध्यमांचाही उल्लेख विस्तृतपणे केलेला आहे. ‘पर्यटन भूगोल' या पुस्तकात जागतिक व आपल्या भारत देशातील सर्व पर्यटन स्थळांचे विस्तृतपणे वर्णन केले असल्यामुळे विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक, पर्यटन मार्गदर्शक तसेच पर्यटन करणाऱ्या सर्व पर्यटकांसाठीही हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

Bharatacha Bhugol 1 Paper 3 TYBA Fifth Semester - SPPU: भारताचा भूगोल १ पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Dr. Arjun Haribhau Musmade Dr Jyotiram Chandrakant More

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तृतीय वर्ष भूगोल या वर्गातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सामान्य स्तरावर भारताचा भूगोल-1 हा विषय लागू केला आहे. प्राकृतिक, सांस्कृतिक व सामाजिक विविधतेतून एकता साधलेल्या भारत देशाच्या भौगोलिक माहितीची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी, हा मुख्य हेतू डोळ्यांसमोर ठेवून भारताचा भूगोल-1 हा विषय CBCS या पद्धतीत तृतीय वर्ष भूगोल या वर्गातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमत समाविष्ट करण्यात आलेला आहे. प्रस्तुत पुस्तकात भारताचे स्थान, भौगोलिक स्थिती व ऐतिहासिक पार्श्वभूमीचा मागोवा घेतानाच भारत व त्याच्या शेजारी असलेल्या देशांचा असलेला संबंध स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. भारताच्या भौगोलिक रचनेच्या अभ्यासात भारताचे वेगवेगळे भौगोलिक विभाग नकाशाच्या मदतीने विस्तृतपणे स्पष्ट केलेले आहेत. भारतातील जलप्रणालीबद्दल विवेचन करताना अभ्यासक्रमात असलेल्या नद्यांशिवाय इतर नद्यांच्या विवेचनाचाही विद्यार्थी व प्राध्यापकांना शैक्षणिक अंगाने अधिक फायदा होईल.

Bharatacha Bhugol 2 Paper 3 TYBA Sixth Semester - SPPU: भारताचा भूगोल २ पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ६ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Dr. Arjun Haribhau Musmade Dr Jyotiram Chandrakant More Dr Nitin Nathuram Mundhe Dr Sunil Dagu Thakare

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तृतीय वर्ष भूगोल या वर्गातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सामान्य स्तरावर भारताचा भूगोल 2 हा विषय लागू केला आहे. आपल्या देशाची सांस्कृतिक, राजकीय तसेच आर्थिक रचना समजावून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. आपला भारत देश विविधतेत एकता साधलेला देश आहे हे आता नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. आपल्या देशातील धार्मिक रचना ही वैविध्यपूर्ण आहे. अनेक धर्माचे लोक आनंदाने एकत्र राहतात. त्यांचे धार्मिक तत्त्वज्ञान, रूढी, परंपरा, धार्मिक श्रद्धास्थाने ही भिन्न-भिन्न आहेत. भारतातील विविध भाषा, वेगवेगळ्या पर्यावरणीय रचनेत राहणारा अदिवासी समाज समजावून घेणे या पुस्तकाच्या माध्यमातून शक्य आहे. प्रत्येक देशाच्या आर्थिकच नव्हे तर सर्वांगीण विकासामध्ये 'वाहतूक' क्षेत्राचे महत्त्व हे अनन्यसाधारण असेच आहे. वाहतूक व्यवस्था हा कोणत्याही देशाच्या सर्वांगीण व शाश्वत विकासाचा कणा आहे. देशाच्या विविध प्रदेशातील शेती उत्पादने, कच्चा माल, पक्का माल व प्रवासी यांची स्वस्त व जलद गतीने वाहतूक करणे अत्यावश्यक ठरते. आपल्या देशातील वाहतूक रचना आणि साधनसंपदा या संदर्भातील सविस्तर विवेचन या पुस्तकात केलेले आहे.

Antararashtriya Arthashastra 1 TYBA Fifth Semester - SPPU: आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र 1 टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr D. G. Ushir Prof. G.J. Lomte Prof. S.A. Gaikwad Dr S. G. Sawant

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जून 2019 पासून कला व वाणिज्य विद्या शाखांसाठी CBCS पद्धती लागू केली आहे. त्यानुसार पदवी व पदव्युत्तर वर्गाचे अभ्यासक्रम बदलण्यात आले. तृतीय वर्ष कला शाखेसाठी अर्थशास्त्र: Special - III अंतर्गत 'आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र' हा विषय निर्धारित करण्यात आला आहे. 'आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र १' हा विषय या पूर्वीच्या अभ्यासक्रमात होताच; परंतु नवीन अभ्यासक्रमामध्ये काही जास्तीचे घटक समाविष्ट करण्यात आलेले आहेत. या पुस्तकात सर्व नवीन सिद्धान्त आणि घटकांचे विश्लेषण सविस्तरपणे मांडण्यात आलेले आहे. नेहमीप्रमाणे पुस्तकाची भाषा अत्यंत ओघवती आणि विद्यार्थ्यांना सहजपणे कळेल अशी ठेवण्यात आलेली आहे. सदर पुस्तक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार लिहिलेले असले तरी महाराष्ट्रामधील सर्व विद्यापीठांच्या अर्थशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक अत्यंत उपयोगी पडेल.

Sarvajanik Ayavyay 1 Paper 4 TYBA Fifth Semester - SPPU: सार्वजनिक आयव्यय १ पेपर ४ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Dr. D.G. Ushir Prof. Dr. S.R. Jawale Dr D. B. Pawar Dr S. B. Syyad

तृतीय वर्ष कला शाखेसाठी अर्थशास्त्र स्पेशल पेपर-4: सार्वजनिक आयव्यय हा विषय निर्धारित करण्यात आला आहे. वास्तविक पाहता हा विषय यापूर्वी विशेष स्तरावर होताच. अभ्यास मंडळातील माननीय सदस्यांनी बदलत्या परिस्थितीनुसार नवीन अभ्यासक्रमांमध्ये काही जास्तीच्या बाबी समाविष्ट केल्या आहेत. नवीन सिद्धान्त आणि घटक यांचे सविस्तरपणे विश्लेषण या पुस्तकामध्ये मांडण्यात आलेले आहे. नेहमीप्रमाणे पुस्तकाची भाषा अत्यंत ओघवती आणि विद्यार्थ्यांना सहजपणे कळेल अशी ठेवण्यात आलेली आहे. आम्हाला खात्री आहे की पूर्वीप्रमाणेच या पुस्तकाचेदेखील विद्यार्थी आणि प्राध्यापक वर्गांकडून स्वागत होईल. सदर पुस्तक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार लिहिलेले असले तरी महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या अर्थशास्त्र विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.

Bhartiya Aarthik Vikas 1 Paper 3 TYBA Fifth Semester - SPPU: भारतीय आर्थिक विकास १ पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr D. G. Ushir Dr S. V. Tile Dr S. R. Jawale Dr S. R. Pagar

तृतीय वर्ष कला शाखेसाठी अर्थशास्त्र जनरल पेपर - 3 साठी 'भारतीय आर्थिक विकास' हा विषय निर्धारित करण्यात आला आहे. सर्वच देशांमधील सरकारांचा आर्थिक विकासाकडे बघण्याचा सध्याचा दृष्टिकोन लक्षात घेऊन अभ्यास मंडळाने अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांना आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धीच्या संकल्पना समजणे आवश्यक आहे हे लक्षात घेऊन नवीन अभ्यासक्रमांमध्ये भारतीय आर्थिक विकास हा स्वतंत्र पेपर सामान्य स्तरावर आणला आहे. आर्थिक वृद्धी व विकास संकल्पनांचा अर्थ, गरज, महत्त्व, त्यांचे निर्देशक, दोघांमधील फरक इत्यादी बाबींचे सविस्तर विवेचन या पुस्तकामध्ये करण्यात आलेले आहे. नेहमीप्रमाणे पुस्तकाची भाषा अत्यंत ओघवती आणि विद्यार्थ्यांना सहजपणे कळेल आहे.

Gramin Vikasacha Bhugol 1 Paper 3 TYBA Fifth Semester - SPPU: ग्रामीण विकासाचा भूगोल १ पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Sanjay Dagu Pagar Prof. Dr. Arjun Haribhau Musmade Prof. Ashok Maruti Thorat Prof. Dr. Jyotiram Chandrakant More

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तृतीय वर्ष भूगोल या वर्गातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सामान्य स्तरावर 'ग्रामीण विकासाचा भूगोल-1' हा विषय लागू केला आहे. 'ग्रामीण विकासाचा भूगोल-1' या विषयाची माहिती संशोधनात्मक दृष्टिकोनातून अद्ययावत देण्याचा प्रयत्न केला आहे. नवनवीन संकल्पना व संज्ञा अतिशय सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयास यशस्वी ठरेल यात शंका नाही. ज्या प्रदेशात आपण राहतो त्या आसपासची अद्ययावत माहिती व्हावी हा एक महत्त्वाचा उद्देश 'ग्रामीण विकासाचा भूगोल-1' हा विषय सुरू करताना आहे. हे पुस्तक विद्यार्थी, शिक्षक, संशोधक, भूगोलप्रेमी, पर्यावरणप्रेमी, अभ्यासक अशा सर्वांनाच उपयोगात येईल यात शंका नाही.

Refine Search

Showing 1,276 through 1,300 of 1,445 results