Browse Results

Showing 1,301 through 1,325 of 1,445 results

Upyojit Itihas Paper 3 TYBA Sixth Semester - SPPU: उपयोजित इतिहास पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ६ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Kalyan Chavan

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळाने सन 2021-22 पासून बी.ए. तृतीय वर्ष इतिहास सेमिस्टर VI करिता उपयोजित इतिहास (Applied History) हा पेपर अभ्यासक्रमात नव्याने समाविष्ट केला आहे. मिळविलेल्या ज्ञानाचे प्रत्यक्ष व्यवहारात योग्य स्वरूपात उपयोजन झाले तर ते ज्ञान सार्थकी लागले असे म्हटले जाते. त्या दृष्टीने प्रस्तुत अभ्यासक्रमात इतिहासविषयक ज्ञानाचे उपयोजित मूल्य अधोरेखित करण्यावर भर दिलेला आहे. या अभ्यासक्रमाच्या पहिल्या प्रकरणात उपयोजित इतिहासाची संकल्पना व इतिहासाचे विविध विषयांशी असलेले उपयोजन तसेच गतकाळ व वर्तमान यांचे सहबंध आणि समकालीन इतिहास इत्यादी घटकांची पायाभूत मांडणी केली आहे. इतिहासाशी संबंधित असणारी पुरातत्त्वशास्त्र, पुराभिलेखागारे, पुराभिलेखीय साधने, वारसा स्थळे व संग्रहालये याचे विवेचन उपयोजनात्मक महत्त्व विचारात घेऊन प्रकरण दोनमध्ये केलेले आहे. आजचे युग ‘माहिती-तंत्रज्ञानाचे युग' आहे. माहितीचा प्रसार करणाऱ्या मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे व समाजमाध्यमे यांनी अवघे विश्व व्यापले आहे. या प्रसारमाध्यमांचे सखोल ज्ञान व इतिहास अभ्यासकांना या क्षेत्रात असणारी सेवेची संधी या सर्वांचा ऊहापोह प्रकरण नंबर तीनमध्ये विस्ताराने केलेला आहे.

Aadhunik Rajkiya Vishleshan 2 Paper 2 TYBA Sixth Semester - SPPU: आधुनिक राजकीय विश्लेषण २ पेपर २ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ६ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. R.G. Varadkar

राज्यशास्त्र विषयाच्या बी.ए.भाग-3 साठी आधुनिक राजकीय विश्लेषण 2' हा पेपर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आहे. त्या अभ्यासक्रमानुसार हे पुस्तक लिहिले आहे. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात राज्यशास्त्राला अधिक शास्त्रीय स्वरूप देण्याच्या उद्देशाने अमेरिका, जर्मनी अशा देशांतील राजकीय विश्लेषकांनी आंतरशास्त्रीय दृष्टिकोनातून राजकीय प्रक्रियेचे शास्त्रशुद्ध विश्लेषण करण्याचा प्रयत्न सुरू केला. यासाठी समाजशास्त्रीय, मानसशास्त्रीय संकल्पनांचा त्यांनी वापर केला. त्यांच्या या प्रयत्नातून आधुनिक राजकीय विश्लेषण पद्धतीचा उदय झाला. राज्यशास्त्राच्या विकासात या विश्लेषणाला महत्त्व प्राप्त झालेले आहे. म्हणूनच या विश्लेषण पद्धतीचा अभ्यास राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा ठरतो.

Itihaslekhanshastracha Parichay Paper 3 TYBA Fifth Semester - SPPU: इतिहासलेखनशास्त्राचा परिचय पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Jyoti Ganesh Raut

तृतीय वर्ष कला शाखा सत्र 5 इतिहास विशेष पेपर-3 साठी इतिहासलेखनशास्त्राचा परिचय हा विषय निर्धारित करण्यात आला आहे. इतिहासलेखनशास्त्राच्या अभ्यासक्रमातील सर्व बाबींचा आढावा या पुस्तकात घेतला आहे. प्रथम सत्रातील अभ्यासक्रमात आलेल्या इतिहास म्हणजे काय, इतिहासाच्या महत्त्वाच्या व्याख्या, इतिहासाचे स्वरूप व व्याप्ती, इतिहासाची साहाय्यकारी शास्त्रे, इतिहासाचा अन्वयार्थ, इतिहास शास्त्र की कला, इतिहासलेखनशास्त्राची प्रक्रिया, परीक्षण यांची समग्र माहिती देऊन इतिहास संशोधनाची प्रक्रिया, इतिहासाचे पुनर्लेखन यांचाही आढावा पुस्तकात घेतला आहे. पुस्तकाची भाषा सुटसुटीत व सोपी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे.

19 Vya Shatakatil Maharashtra Paper 4 TYBA Fifth Semester - SPPU: १९ व्या शतकातील महाराष्ट्र पेपर ४ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Dr. Ganesh D. Raut

तृतीय वर्ष कला शाखेच्या पाचव्या सेमिस्टरसाठी '19 व्या शतकातील महाराष्ट्र' हे पाठ्यपुस्तक आहे. निराली प्रकाशनच्या वतीने हे तिसरे पाठ्यपुस्तक प्रकाशित होत आहे. हे पाठ्यपुस्तक नुसतेच पाठ्यपुस्तक म्हणून न वापरता ते संदर्भ ग्रंथ म्हणून कसे वापरता येईल याचा विचार केला आहे. विद्यार्थी, शिक्षक, पत्रकार, स्पर्धा परीक्षांना बसणारे विद्यार्थी या सर्वांचा विचार करून हे पाठ्यपुस्तक तयार करण्यात आले आहे. पाठ्यपुस्तकांना असणारी पृष्ठमर्यादा लक्षात घेऊन सदर पुस्तकाची रचना केली आहे. चित्रे, अधिक संदर्भ, नवी माहिती यांच्या आधारे पाठ्यपुस्तक अधिकाधिक उपयुक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.

Antararashtriya Arthashastra 2 TYBA Sixth Semester - SPPU: आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र 2 टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ६ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr D. G. Ushir Dr R. K. Datir Dr S. R. Javale Dr S. G. Sawant Dr S. A. Gaikwad

तृतीय वर्ष कला शाखा सत्र - 5 व 6 साठी नेमलेल्या अर्थशास्त्र (विशेष पेपर 3) अंतर्गत ‘आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र’ हा विषय निर्धारित करण्यात आला आहे. सत्र 6 साठी नेमलेल्या अभ्यासक्रमानुसार आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचे पुस्तक सर्व दृष्टिकोनातून परिपूर्ण केले आहे. अभ्यासक्रमामध्ये आलेले नवीन सिद्धान्त आणि घटक यांचे सविस्तरपणे विश्लेषण या पुस्तकात मांडण्यात आलेले आहे. नेहमीप्रमाणे पुस्तकाची भाषा अत्यंत ओघवती आणि विद्यार्थ्यांना सहजपणे कळेल अशी ठेवण्यात आलेली आहे. सदर पुस्तक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार लिहिलेले असले तरी महाराष्ट्रामधील सर्व विद्यापीठांच्या अर्थशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.

Maharashtratil Sthanik Svarajya Shasan 2 Paper 3 TYBA Sixth Semester - SPPU: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य शासन 2 पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ६ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Pramod Rajendra Tambe Omkar Ankush Korawale Sachin Sahadu Ghayatdke

'महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य शासन 2' सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमावर आधारित असलेले राज्यशास्त्र सत्र-6 चे पुस्तक विद्यार्थ्यांसमोर सादर केले आहे. या पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणामध्ये 74 व्या घटनादुरुस्तीपूर्वीच्या नागरी संस्था, कलम 243 मधील संवैधानिक बदल तसेच नगर पंचायत या घटकांविषयी माहिती देण्यात आलेली आहे. दुसऱ्या प्रकरणामध्ये नगरपरिषद, महानगरपालिका व भारतीय संविधानातील 12 वे परिशिष्ट याविषयी विस्तृत माहिती देण्यात आली आहे. प्रकरण तीनमध्ये राज्य निवडणूक आयोग, राज्य वित्त आयोग व आयोगासमोरील आव्हाने विस्तृतपणे लिहिली आहेत. चौथ्या प्रकरणामध्ये स्थानिक स्वराज्य शासनावरील नियंत्रण, स्थानिक स्वराज्य शासनावरील मर्यादा व त्यांच्यासमोरील आव्हाने याविषयी चर्चा करण्यात आली आहे.

Apatti Vyavasthapanacha Bhugol 2 Paper 3 TYBA Sixth Semester - SPPU: आपत्ती व्यवस्थापनाचा भूगोल २ पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ६ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Jyotiram Chandrakant More Prof. Dr. Arjun Haribhau Musmade Dilip Dnyaneshwar Muluk Dr Arjun Baban Doke

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तृतीय वर्ष भूगोल या वर्गातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सामान्य स्तरावर 'आपत्ती व्यवस्थापनाचा भूगोल 2' हा विषय लागू केला आहे. 'आपत्ती व्यवस्थापनाचा भूगोल 2' या विषयाची माहिती संशोधनात्मक दृष्टिकोनातून अद्ययावत देण्याचा प्रयत्न केले आहे. नवनवीन संकल्पना व संज्ञा अतिशय सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयास यशस्वी ठरेल यात शंका नाही, हा मुख्य हेतू डोळ्यांसमोर ठेवून हा विषय CBCS या पद्धतीत तृतीय वर्ष भूगोल या वर्गातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रम रचनेत समाविष्ट करण्यात आला आहे. प्रस्तुत पुस्तकात आपत्तीची संकल्पना, आपत्तीपूर्व व आपत्तीनंतरचे व्यवस्थापन, आपत्तीत प्रसारमाध्यमांची भूमिका अशा घटकांचा मागोवा घेतानाच आपत्ती व्यवस्थापन संरचनेत पूर्वतयारी, प्रतिसाद, पुनर्प्राप्ती, उपशमन, पुनर्वसन स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

Sarvajanik Ayavyay 2 Paper 4 TYBA Sixth Semester - SPPU: सार्वजनिक आयव्यय 2 पेपर ४ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ६ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Dr. D. G. Late Prof. Dr. S. B. Syed Prof. Dr. S. R. Javale Prof. S. P. Adhav

तृतीय वर्ष कला शाखा सत्र 5 व 6 नेमलेल्या अर्थशास्त्र विशेष पेपर-3 साठी सार्वजनिक आयव्यय हा विषय निर्धारित करण्यात आला आहे. वास्तविक पाहता हा विषय यापूर्वी विशेष स्तरावर होताच परंतु नवीन अभ्यासक्रमामध्ये विद्यमान परिस्थिती लक्षात घेऊन काही जास्तीचे मुद्दे समाविष्ट करण्यात आले आहेत. सत्र 6 साठी नेमलेल्या अभासक्रमानुसार आम्ही सार्वजनिक आयव्ययाचे पुस्तक सर्व दृष्टिकोनातून पूर्ण केले आहे. अभ्यासक्रमामध्ये आलेले नवीन सिद्धान्त आणि घटक यांचे सविस्तरपणे विश्लेषण या पुस्तकामध्ये मांडण्यात आलेले आहे. नेहमीप्रमाणे पुस्तकाची भाषा अत्यंत ओघवती आणि विद्यार्थ्यांना सहजपणे कळेल अशी ठेवण्यात आलेली आहे. सदर पुस्तक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार लिहिलेले असले तरी महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या अर्थशास्त्र विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.

Bhartiya Aarthik Vikas 2 Paper 3 TYBA Sixth Semester - SPPU: भारतीय आर्थिक विकास २ पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ६ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr D. G. Ushir Dr S. V. Tile Dr S. R. Jawale Dr S. R. Pagar

तृतीय वर्ष कला शाखेसाठी अर्थशास्त्र सामान्य स्तर-3 (जी-3) सत्र 5 आणि 6 साठी भारतीय आर्थिक विकास हा विषय निर्धारित करण्यात आला आहे. या पाठ्यपुस्तकामध्ये नवीन अभ्यासक्रमांमध्ये अनेक नवीन सिद्धान्त आणि घटक घेण्यात आले आहेत. त्या सर्व घटकांचे सविस्तरपणे विश्लेषण या पुस्तकामध्ये मांडण्यात आलेले आहे. नेहमीप्रमाणे पुस्तकाची भाषा अत्यंत ओघवती आणि विद्यार्थ्यांनी सहजपणे कळेल अशी ठेवण्यात आलेली आहे. सदर पुस्तक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार लिहिलेले असले तरी महाराष्ट्रामधील सर्व विद्यापीठांच्या अर्थशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.

20 Vya Shatakatil Maharashtracha Itihas Paper 4 TYBA Sixth Semester - SPPU: २० व्या शतकातील महाराष्ट्राचा इतिहास पेपर ४ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ६ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Dr. Ganesh D. Raut

तृतीय वर्ष कला शाखेच्या सहाव्या सैमिस्टरसाठी '20 व्या शतकातील महाराष्ट्राचा इतिहास' हे पाठ्यपुस्तक तयार केले आहे. निराली प्रकाशनच्या वतीने हे पाचवे पाठ्यपुस्तक प्रकाशित होत आहे. हे पाठ्यपुस्तक नुसतेच पाठ्यपुस्तक म्हणून न वापरता ते संदर्भ ग्रंथ म्हणून कसे वापरता येईल याचा विचार केला आहे. विद्यार्थी, शिक्षक, पत्रकार, स्पर्धा परीक्षांना बसणारे विद्यार्थी या सर्वांचा विचार करून हे पाठ्यपुस्तक तयार करण्यात आले आहे. पाठ्यपुस्तकांना असणारी पृष्ठमर्यादा लक्षात घेऊन सदर पुस्तकाची रचना केली आहे. चित्रे, अधिक संदर्भ, नवी माहिती यांच्या आधारे पाठ्यपुस्तक अधिकाधिक उपयुक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.

Lokprashasan 2 Paper 3 TYBA Sixth Semester - SPPU: लोकप्रशासन २ पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ६ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Haridas Arjun Jadhav

शैक्षणिक वर्ष 2021-2022, टी. वाय. बी. ए.: सत्र 6 च्या राज्यशास्त्र विशेष स्तर पेपर 3, CBCS पॅटर्नच्या Discipline Specific Elective Course (DSE 1 C(3)+1) साठी 'लोकप्रशासन' या विषयाचे अध्ययन केले जाणार आहे. राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमामध्ये 'लोकप्रशासन' या उपविद्याशाखेचे अध्ययन करणे आवश्यक आहे. लोकप्रशासन या विद्याशाखेची विद्याथ्यांना ओळख करून देणे हा या अभ्यासक्रमाचा उद्देश आहे. यातून विद्याथ्यांना लोकप्रशासनाचे विविध दृष्टिकोन, लोकप्रशासनातील सिद्धान्त आणि मूलभूत संकल्पना समजून घेता येणार आहेत. लोकप्रशासन या अभ्यासक्रमाच्या सत्र सहामध्ये आपण एकूण चार प्रकरणांचा अभ्यास करणार आहोत. यात पहिले प्रकरण 'नोकरशाही' हे असून यामध्ये आपण नोकरशाहीची भूमिका, नियुक्तीकर्ते- सेवक संबंध, प्रशासकीय न्यायाधीकरण आणि प्रशासकीय निवाडा यांचा अभ्यास करणार आहोत. दुसरे प्रकरण 'कर्मचारी प्रशासन' हे असून यामध्ये आपण कर्मचारी प्रशासन, प्रशासकीय भरती, प्रशिक्षण आणि बढती या संकल्पना समजून घेणार आहोत. तिसरे प्रकरण आहे 'अंदाजपत्रकीय प्रक्रिया'. या प्रकरणात आपण वित्त प्रशासन, अंदाजपत्रकाचे प्रकार आणि अंदाजपत्रकीय प्रक्रिया अभ्यासणार आहोत. या सत्रातील शेवटचे प्रकरण आहे 'उत्तरदायित्व आणि नियंत्रण'. यामध्ये आपण उत्तरदायित्व आणि नियंत्रण या संकल्पनांबरोबरच प्रशासनावरील नियंत्रण या बाबी समजून घेणार आहोत.

Gramin Vikasacha Bhugol 2 Paper 3 TYBA Sixth Semester - SPPU: ग्रामीण विकासाचा भूगोल 2 पेपर 3 टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Sanjay Pagaar Ashok Maruti Thorat Dr Jyotiram More

'ग्रामीण विकासाचा भूगोल भाग 2' या विषयाची माहिती संशोधनात्मक दृष्टिकोनातून अद्ययावत देण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केलेला आहे. ज्या प्रदेशात आपण राहतो त्या आसपासची अद्ययावत माहिती व्हावी हा एक महत्त्वाचा उद्देश हा विषय सुरू करताना आहे. हे पुस्तक विद्यार्थी, शिक्षक, संशोधक, भूगोलप्रेमी, पर्यावरणप्रेमी, अभ्यासक अशा सर्वांनाच होईल यात शंका नाही. म्हणूनच दुसऱ्या प्रकरणात समस्याप्रधान क्षेत्रांना डोळ्यांसमोर ठेवून विकासाच्या दिशांवर चर्चा केलेली दिसून येते. आपला देश आपल्या राज्यघटनेनुसार समानता मानणारा आहे. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर आपण 'कल्याणकारी' राज्याची संकल्पना मान्य केलेली आहे. म्हणूनच शासनातर्फे तळागाळातल्या लोकांना वर आणण्यासाठी विशेष प्रयत्न करावा लागतो. तो कशा प्रकारे केला जातो, यासाठी शासनाच्या कोणत्या योजना आहेत इत्यादींची सविस्तर माहिती तिसऱ्या प्रकरणात दिसून येते. चौथ्या प्रकरणात ग्रामीण विकासाबाबत झालेल्या किंवा चालू असलेल्या प्रयत्नांचा चिकित्सात्मक अभ्यास स्पष्ट केलेला आहे. त्यासाठी 'क्षेत्रीय अभ्यास पद्धती' अवलंबलेली आहे. याचाच अर्थ एखाद्या गावाच्या, गटाच्या किंवा समूहाच्या विकासाचे प्रयत्न अभ्यासणे हा होय. यात योग्य उदाहरणे निवडून त्याबाबत साधकबाधक चर्चा केलेली दिसून येते. सर्व प्रकरणांच्या शेवटी प्रश्नसंच दिलेला असल्याने विद्यार्थ्यांना आपल्याला कितपत ज्ञान प्राप्त झाले आहे हेही पडताळून पाहता येईल.

Swatantryottar Bharat (1947-1991) Paper 3 TYBA Sixth Semester - SPPU: स्वातंत्र्योत्तर भारत (1947-1991) पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ६ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Dr. Ganesh D. Raut

तृतीय वर्ष कला शाखेच्या सहाव्या सेमिस्टरसाठी 'स्वातंत्र्योत्तर भारत (1947-1991)' हे पाठ्यपुस्तक आहे. हे पाठ्यपुस्तक नुसतेच पाठ्यपुस्तक म्हणून न वापरता ते संदर्भ ग्रंथ म्हणून कसे वापरता येईल याचा विचार केला आहे. विद्यार्थी, शिक्षक, पत्रकार, स्पर्धा परीक्षांना बसणारे विद्यार्थी या सर्वांचा विचार करून हे पाठ्यपुस्तक तयार करण्यात आले आहे. पाठ्यपुस्तकांना असणारी पृष्ठमर्यादा लक्षात घेऊन सदर पुस्तकाची रचना केली आहे. चित्रे, अधिक संदर्भ, नवी माहिती यांच्या आधारे पाठ्यपुस्तक अधिकाधिक उपयुक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.

Swatantryottar Bharat 1947-1991 Paper 3 TYBA Sixth Semester - SPPU: स्वातंत्र्योत्तर भारत (१९४७-१९९१) पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ६ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Dr. Ganesh D. Raut

तृतीय वर्ष कला शाखेच्या सहाव्या सेमिस्टरसाठी 'स्वातंत्र्योत्तर भारत (1947-1991)' हे पाठ्यपुस्तक विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आले आहे. निराली प्रकाशनच्या वतीने चौथे पाठ्यपुस्तक प्रकाशित होत आहे. हे पाठ्यपुस्तक नुसतेच पाठ्यपुस्तक म्हणून न वापरता ते संदर्भ ग्रंथ म्हणून कसे वापरता येईल याचा विचार केला आहे. विद्यार्थी, शिक्षक, पत्रकार, स्पर्धा परीक्षांना बसणारे विद्यार्थी या सर्वांचा विचार करून हे पाठ्यपुस्तक तयार करण्यात आले आहे. पाठ्यपुस्तकांना असणारी पृष्ठमर्यादा लक्षात घेऊन सदर पुस्तकाची रचना केली आहे. चित्रे, अधिक संदर्भ, नवी माहिती यांच्या आधारे पाठ्यपुस्तक अधिकाधिक उपयुक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.

Antararashtriya Sambandh 2 Paper 4 TYBA Sixth Semester - SPPU: आंतरराष्ट्रीय संबंध 2 पेपर 4 टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ६ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Pramod Rajendra Tambe Shekhar Rajendra Sonar

शैक्षणिक वर्ष 2021-2022 च्या बदललेल्या अभ्यासक्रमानुसार तृतीय वर्ष कला शाखेसाठी राज्यशास्त्र विशेष स्तर पेपर-4, सत्र-6, DSE-2D साठी 'आंतरराष्ट्रीय संबंध-II' या विषयाचे अध्ययन केले जाणार आहे. राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमामध्ये 'आंतरराष्ट्रीय संबंध 2' या विषयाचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. या अभ्यासक्रमाचा उद्देश म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध ही एक विद्याशाखा म्हणून विद्यार्थ्यांना ओळख करून देणे, आंतरराष्ट्रीय संबंधातील विविध संघटनांचा परिचय होणे आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचे दृष्टिकोन अभ्यासणे हे आहे. सत्र-6 'आंतरराष्ट्रीय संबंध 2' या विषयामध्ये एकूण चार प्रकरणांचा समावेश केला आहे.

Paryatan Bhugol 2 TYBA Sixth Semester - SPPU: पर्यटन भूगोल 2 टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ६ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Dilip Dnyaneshwar Muluk Dr Arjun Baban Doke Dr Arjun Haribhau Musmade Dr Jyotiram Chandrakant More

पर्यटन भूगोल 2 या पुस्तकात प्रकरण एकमध्ये पर्यटनातील निवासस्थानाची भूमिका या प्रकरणात निवासस्थानाचे प्रकार यामध्ये हॉटेल, मोटेल, पथिकाश्रम, खाजगी व शासनमान्य निवासस्थाने तसेच निवासव्यवस्थेची भूमिका या बाबींचा समावेश केलेला आहे. प्रकरण दोनमध्ये पर्यटनाचे आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व पर्यावरणीय परिणाम यांचे सखोल स्पष्टीकरण केलेले आहे. तसेच शाश्वत विकासात पर्यटनाची भूमिका व धोरण याचाही अभ्यास केलेला आहे. प्रकरण तीनमध्ये पर्यटन विकासाचे नियोजन आणि धोरणे यामध्ये जागतिक पर्यटन संघटना (UNWTO), भारतीय पर्यटन विकास महामंडळ (ITDC) आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) या सर्वांचे विस्तृत विवेचन केलेले आहे. प्रकरण चारमध्ये पर्यटन स्थळांचे अध्ययन यामध्ये मनाली व महाबळेश्वर ही थंड हवेची ठिकाणे, ताजमहाल व रायगड किल्ला तसेच काझीरंगा व मेळघाट ही राष्ट्रीय उद्याने या सर्व स्थळांचे अध्ययन विस्तृतपणे केलेले आहे. 'पर्यटन भूगोल 2' या पुस्तकात वरील सर्व मुद्द्यांनुसार पर्यटन स्थळांचे वर्णन केले असल्यामुळे विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक, पर्यटन मार्गदर्शक या सर्वांसाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

Manavi Hakk Ani Samajik Nyayacha Parichay Paper 3 TYBA Sixth Semester - SPPU: मानवी हक्क आणि सामाजिक न्यायाचा परिचय पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ६ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Sudhir Ashruba Yewle Vinayak Subhash Lashkar Dr Jyoti Suhas Gagangras Vikramaditya Prabhakar Gaikwad

तृतीय वर्ष बी. ए. जनरलचे ‘मानवी हक्क आणि सामाजिक न्यायाचा परिचय' हे पुस्तक वाचकांच्या हातात सोपविताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. सेमिस्टर-6 चे हे पुस्तक आहे. गुन्हा आणि समाज हे पुस्तक लिहिताना गुन्हाविषयक सैद्धान्तिक संकल्पना व विविध गुन्ह्यांविषयीचे विविध पैलू उलगडण्याचा प्रयत्न केला होता. या क्रमिक पुस्तकात 'मानवी हक्क आणि सामाजिक न्याय' याच्याशी संबंधित विविध पैलूंची मांडणी केली आहे.

Paryavaraniy Abhyas SYBA, B.COM, B.SC Second Semester - SPPU: पर्यावरणीय अभ्यास एस.वाय.बी.ए., बी.कॉम, बी.एस्सी सेमिस्टर २ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Pandurang Patil Dr Sanjay Patil

पर्यावरण संरक्षण, संवर्धन, प्रदूषण प्रतिबंधन यामध्ये उत्साही युवाशक्तीचा वापर करता येईल व युवक मोठा वाटा उचलू शकतील याची जाणीव असल्याने पुणे विद्यापीठाने एक धाडसी प्रगत व आवश्यक पाऊल उचलले आहे. सन 2004-05 या शैक्षणिक वर्षापासून B.A., B.Com. व B.Sc. या विद्याशाखेतील विद्यार्थ्यांना 100 गुणांचा, 'पर्यावरणीय अभ्यास' (Environmental Studies) हा नवा अभ्यासक्रम तयार केला आहे व अनिवार्य (सक्तीचा) ठेवला आहे. तसेच इतर विद्यापीठांनीही अशा अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सुरू केली आहे. हे सदर पुस्तक याच अभ्यासक्रमाची विद्यार्थ्यांची गरज पुरविण्याचा एक अल्प व नम्र प्रयत्न आहे. तसेच या पुस्तकाचा विषयशिक्षक, तज्ज्ञ आणि पर्यावरण-प्रश्नाबद्दल रुची असणारे सामान्य वाचक यांनाही काही उपयोग होईल अशीही आमची आशा आहे.

Hawamanshastra FYBA Second Semester - RTMNU: हवामानशास्त्र बी.ए. प्रथम वर्ष द्वितीय सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Dr Vitthal Gharpure

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूरच्या भूगोल विषयावरील बी. ए. सिमेस्टर २ चे पाठ्यपुस्तक आहे. हवामानशास्त्राचा परिचय, वातावरणाची रचना आणि स्वरूप, सौरशक्ती, तापमान, वायुभार आणि वारे, वातावरणीय जलबाष्प, वृष्टी आणि पर्जन्य, वातावरणातील विक्षोभ, वायुराशी, आघाडी, हवामानाचे वर्गीकरण आणि जागतिक तापमानवाढ, हवादर्शक नकाशे व आकृत्या तयार करणे, हवेच्या उपकरणांचा अभ्यास इत्यादी हवामानशास्त्राचे विविध विषय आहेत. सदर पाठ्यपुस्तकात त्याबाबत मुद्देसूद विवेचन केले आहे. त्याचबरोबर सरावासाठी विद्यार्थ्यांना त्यावर दीर्घोत्तरी, फरक स्पष्ट करा, टिपा लिहा, योग्य पर्याय, रिकाम्या जागा भरा, चूक की बरोबर इत्यादी प्रश्न दिले आहेत.

Kautumbik Sansadhananche Vyavshtanpan 1 FYBA First Semester- RTMNU: कौटुंबिक संसाधनांचे व्यवस्थापन 1 बी.ए. प्रथम सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Dr Vidya Kolhatkar

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठाने वर्ष २०१६ पासून कला शाखेकरिता सेमेस्टर प्रणाली लागू केली आहे, त्या अनुसार बी.ए. प्रथम वर्ष, गृहअर्थशास्त्र या विषयाच्या सेमेस्टर-I च्या नवीन अभ्यासक्रमानुसार या पुस्तकाचे आयोजन करण्यात आले आहे. नवीन अभ्यासक्रमात कौटुंबिक साधनांचे व्यवस्थापन, गृहव्यवस्थापन या विषयातील अनेक आधुनिक तत्त्वे, पद्धती तसेच स्वयंरोजगार विषयक माहितीही संकलित करून देण्यात आलेली आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार तयारी करण्याच्या दृष्टीने हे पुस्तक समजण्यास सोपे जावे म्हणून आकृत्यांचाही भरपूर वापर केलेला आहे. विषय समजण्यास सोपा जावा म्हणून पुस्तकाचे लेखन अत्यंत सुबोध व सरल पद्धतीने केले आहे. या पुस्तकात गृहअर्थशास्त्र व गृहशास्त्र हे दोन्ही शब्द एकाच अर्थाने वापरले आहेत. नवीन अभ्यासक्रमातील सर्वच नवीन भाग समाविष्ट करण्याची पुरेपूर काळजी घेण्यात आलेली आहे.

Bhartiya Samaj Sanrachanatmak Samasya TYBA Fifth Semester - RTMNU: भारतीय समाज संरचनात्मक समस्या बी.ए. तृतीय वर्ष पंचम सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Dr Daya Pandey

प्रस्तुत पुस्तक रा.तु.म. नागपूर विद्यापीठाच्या बी.ए. भाग-३ च्या पाचव्या सत्राच्या विद्यार्थ्यांना भारतीय समाज व त्यांच्या समस्यांची ओळख व्हावी तसेच स्पर्धा परीक्षेसाठी उपयोग व्हावा या उद्देशाने लिहिले आहे. वर्तमानकाळात स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून विद्यापीठीय अभ्यासक्रमात मोठे बदल होत आहेत. या बदलांच्या अनुषंगाने विद्यापीठातील बी.ए. च्या अभ्यासक्रमांची पुनर्रचना झालेली आहे. बी.ए. च्या पदवीसाठी तसेच स्पर्धात्मक परीक्षेसाठी समाजशास्त्र विषयाची निवड करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप जास्त आहे. त्या सर्व विद्यार्थ्यांना प्रस्तुत पुस्तकाची अभ्यासासाठी मोलाची मदत होईल अशी आशा आहे. जागतिकीकरणाच्या युगात भारतीय समाजांमध्ये परस्पर संबंध, प्रक्रिया, संस्था यांच्या रचनेत, कार्यपद्धतीत बदल घडून येत आहेत. भारतीय समाजातील व्यक्ती आणि समाज जीवनावर या बदलांचा प्रभाव पडला आहे. मानवी जीवन तंत्रज्ञान, साहित्य, कला याद्वारे सुसंपन्न झाले आहे. यासोबतच या समाजास विविध समस्यांनीही ग्रासले आहे. समाजात होणाऱ्या परिवर्तनाच्या गतीशी अनुकूलन साधताना अनेक सामाजिक घडामोडींचे, समस्यांचे आकलन महत्त्वाचे ठरते. या दृष्टीने भारतीय समाजाच्या होणाऱ्या अभ्यासाबद्दल आणि त्यातील सामाजिक घडामोडींबद्दल माहिती मिळविण्यासाठी प्रस्तुत पुस्तक उपयोगाचे आहे.

Sahitya Sanvad Bhag 2 SYBA - RTMNU: साहित्य संवाद भाग २ बी.ए. द्वितीय वर्ष - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Dr Pradip Vitalkar Dr Zulfi Shaikh Dr Indrajit Akshay Kumar Kale Dr Pradip Vi Kale

विद्यापीठ अनुदान आयोगाने ठरवून दिलेल्या ध्येय-धोरणानुसार ‘साहित्य संवाद' हे बी. ए. भाग-२ या वर्गासाठी मराठी भाषा अभ्यासमंडळाने संपादित केले आहे. पदवी आणि पदव्युत्तर पातळीवर दर्जेदार, उच्चप्रतीचे, व्यवसायाभिमुख आणि सर्वव्यापी शिक्षण दिले जावे याकरिता केंद्र सरकारच्या मानव संसाधन आणि विकास मंत्रालयाने तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाने जी मार्गदर्शक तत्त्वे आणि धोरण निश्चित केले आहे त्याची मातृभाषेशी आणि वाङ्मयाशी योग्य सांगड घालण्याचे धोरण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अत्यंत विचारपूर्वक आणि दूरगामी स्वरूपात स्वीकारलेले आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनाचे यथार्थ मूल्यमापन करण्याच्या व त्यांच्या ज्ञानकक्षा विस्तारित करण्याच्या उद्देशाने आवश्यक ते बदल करण्याचा योग्य निर्णयही घेतलेला आहे. त्याच दृष्टिकोनातून मराठी भाषा अभ्यासमंडळाच्या मार्गदर्शनाखाली साहित्य संवाद' या पाठ्यपुस्तकाची निर्मिती पाठ्यपुस्तक समितीने केली आहे.

Sahitya Sanvad Bhag 3 TYBA - RTMNU: साहित्य संवाद भाग 3 बी.ए. तृतीय वर्ष - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Dr Pradip Vitalkar Dr Zulfi Shaikh Dr Indrajit Akshay Kumar Kale Dr Pradip Vi Kale

विद्यापीठ अनुदान आयोगाने ठरवून दिलेल्या ध्येय-धोरणानुसार साहित्य संवाद' हे बी. ए. भाग-३ (आवश्यक मराठी) या वर्गासाठी मराठी भाषा अभ्यासमंडळाने संपादित केलेले पाठ्यपुस्तक आपल्या स्वाधीन करताना मनोमन आनंद होत आहे. पदवी आणि पदव्युत्तर पातळीवर दर्जेदार, उच्चप्रतीचे, व्यवसायाभिमुख आणि सर्वव्यापी शिक्षण दिले जावे याकरिता केंद्र सरकारच्या मानव संसाधन आणि विकास मंत्रालयाने तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाने जी मार्गदर्शक तत्त्वे आणि धोरण निश्चित केले आहे त्याची मातृभाषेशी आणि वाङ्मयाशी योग्य सांगड घालण्याचे धोरण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अत्यंत विचारपूर्वक आणि दूरगामी स्वरूपात स्वीकारलेले आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनाचे यथार्थ मूल्यमापन करण्याच्या व त्यांच्या ज्ञानकक्षा विस्तारित करण्याच्या उद्देशाने आवश्यक ते बदल करण्याचा योग्य निर्णयही घेतलेला आहे. तशा प्रकारची पाठ्यपुस्तके यापूर्वीही विद्यापीठाने प्रकाशित केली आहेत. त्याच दृष्टिकोनातून मराठी भाषा अभ्यासमंडळाच्या मार्गदर्शनाखाली साहित्य संवाद: भाग-३' या पाठ्यपुस्तकाची निर्मिती पाठ्यपुस्तक समितीने केली आहे.

Sahityarang Bhag 1 FYBA First Semester- RTMNU: साहित्यरंग भाग १ बी.ए. प्रथम सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Dr Satyawan Meshram Dr Rajan Jaiswal Dr Zulfi S Pramod Munghate Dr Satyawan Me Munghate

विद्यापीठ अनुदान आयोगाची मार्गदर्शक तत्त्वे आणि बदलत्या काळाची आव्हाने ध्यानात घेऊन बी. ए. भाग-१ (आवश्यक मराठी) या वर्गासाठी मराठी भाषा अभ्यासमंडळाने ‘साहित्यरंग : भाग-१’ हे पाठ्यपुस्तक संपादित केले आहे. अध्ययन-अध्यापन प्रक्रियेचा केंद्रबिंदू असलेला विद्यार्थी, त्याचा सर्वांगीण विकास साधण्याच्या दृष्टीने, विद्यार्थ्यांची ज्ञानार्जन क्षमता आणि मूल्यमापन प्रक्रिया या दोहोंची सांगड घालण्याचा प्रयत्न या पाठ्यपुस्तकात केला आहे. भाषेच्या आकलनाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये समाजातील उच्चकोटीची मानव मूल्ये वृद्धिंगत व्हावी, राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक बांधिलकी, मानुषता, राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती, वैज्ञानिक दृष्टिकोन, पर्यावरण संरक्षण-संवर्धन, भूतदया इत्यादींची पेरणी व्हावी, विद्यार्थ्यांची मातृभाषा आणि वाङ्मयविषयक अभिरुची वाढीला लागावी त्यांना दर्जेदार व व्यवसायाभिमुख शिक्षण मिळावे याकरिता केंद्र सरकारच्या मानव संसाधन आयोगाने जी ध्येयधोरणे निश्चित केली आहेत त्या अनुषंगाने अभ्यासक्रम ठरविण्याचे धोरण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अत्यंत विचारपूर्वक स्वीकारलेले आहे.

Rahasya Naganche: रहस्य नागांचे

by Amish Tripathi

आज तो देव आहे. चार हजार वर्षांपूर्वी तो फक्त एक पुरुष होता. शोध सुरूच आहे. अशुभसूचक नाग योद्ध्याने त्याच्या मित्राला; बृहस्पतीला ठार मारले आणि आता त्याच्या पत्नीच्या मागे तो हात धुऊन लागला आहे. तिबेटहून आलेला शिव हा स्थलांतरित सैतानाचा संहार करणार असल्याचे भाकीत आहे. आपल्या राक्षसी शत्रूचा शोध घेतल्याशिवाय तो मुळीच थांबणार नाही. मित्राच्या मृत्यूचा सूड घेण्याची तळमळ आणि सैतानापर्यंत पोहोचण्याच्या मार्गाचा शोध या दोन गोष्टी आपल्याला नागांच्या दारापर्यंत पोहोचवतील, याची त्याला खात्रीच होती. द्वेषी सैतानाच्या उदयाचा पुरावा सर्वत्रच आढळतो. एका जादूई औषधावर अवलंबून असल्यामुळे एक राज्य मृत्युपंथाला लागते. एका अनभिषिक्त राजकुमाराचा खून होतो. शिवाचे तत्त्वज्ञानविषयक मार्गदर्शक असलेल्या वासुदेवांवर शिवाचा गाढ विश्वास असतो. मात्र दुष्टांचे साहाय्य घेऊन ते त्याचा विश्वासघात करतात. अगदी परिपूर्ण साम्राज्य वाटणारे मेलुहासुन्दा जन्मांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मैकामधील भयानक रहस्यामुळे मलिन झालेले असते. शिवाला अज्ञात असलेला मुख्य सूत्रधार एक मोठाच खेळ खेळत असतो. प्राचीन भारताच्या संपूर्ण सीमारेषांपर्यंत नेणारा प्रवास केल्यावर शिवाला प्रचंड गूढ गोष्टींनी भरलेल्या प्रदेशातील सत्याचा शोध लागतो आणि त्याला समजते की, जसे वाटत होते, तसे तिथे काहीच नव्हते. भयानक युद्ध खेळली जातील. आश्चर्यजनक फसव्या युती केल्या जातील. शिवावरील तीन पुस्तकांच्या मालिकेतील 'मेलुहाचे मृत्युंजय' हे पहिले पुस्तक राष्ट्रीय पातळीवरील उत्तम खपाचे पुस्तक ठरले आहे. त्याचाच पुढचा भाग असलेल्या या पुस्तकात अविश्वसनीय वाटणाऱ्या रहस्यांचा भेद होईल.

Refine Search

Showing 1,301 through 1,325 of 1,445 results