Browse Results

Showing 801 through 825 of 1,431 results

ECO 218 Anshlakshyi Arthashastra (Aichchik Abhyaskram) S.Y.B.A. - Y.C.M.O.U

by Prof. A. K. Pokale Prof. G. D. Londhe Prof. A. K. Doifode Prof. V. V. Acharya Prof. Dr. L. G. Burange Prof. N. B. Kulkarni Prof. Dastane Prof. Mahajan

ECO 218 Anshlakshyi Arthashastra (Aichchik Abhyaskram) text book for S.Y.B.A from Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik in Marathi.

Shasan Nirnay Va Paripatrake (Viklang Va Apangansambandhi)

by Adv. Abhaya Shelkar

Shasan Nirnay Va Paripatrake text book for Relating to Disabled & Handicapped from Nashik Law House, Aurangabad in Marathi and English.

POL 290 Pashchimatya Rajkiya Vichar pravah T.Y.B.A - Y.C.M.O.U

by N. Y. Dole Prof. Borgavkar Ramkrushna Metakar Shailendra Devlankar Prof. Musale

POL 290 Pashchimatya Rajkiya Vicharpravah text book for T.Y.B.A from Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik in Marathi.

Mauritius Mathematics Grade 7 (Part-I) - MIE

by Mauritius Institute of Education

Mauritius Mathematics Grade 7 (Part-I) Textbook Mauritius Institute of Education.

ECO 219 Samagralakshyi Arthashastra S.Y.B.A - Y.C.M.O.U

by Shri. C. P. Kher Prof. Sau. Anita Gogate Prof. Dr. Sau. Vidya Sohoni Umesh Rajaderkar

Samagralakshyi Arthashastra ECO 219 textbook for S.Y.B.A. from Yashwantrao Chavan Maharashtra Mukta Vidyapith, Nashik in Marathi.

Sunday Dish Book

by Mangesh Madhukar

संडे डिश आजकाल टेन्शन्स,काळजी,स्ट्रेस आणि मोबाईल हे रोजचे सोबती. कोठेही गेलात तरी बरोबर असणारच कोणालाही न चुकणार, रुटीन लाइफ. म्हणजे सततची धावपळ. शाळेत जाणाऱ्या मुलापासून ते सिनियर सिटीझन पर्यंत, कोणालाच ती चुकलेली नाही. त्यामुळे “संडे’ हा सगळ्यांचा अतिशय हवाहवासा वाटणारा,आवडता दिवस. “संडे” म्हणजे निवांतपणा,आराम,घड्याळाकडे न पाहता मस्त मजेत जगण्याचा दिवस. प्रत्येकजण त्याची चातकाप्रमाणे वाट पाहत असतो. या निवांतवारी आपल्यासाठी सादर करीत आहे “संडे डिश” हा कुठला खायचा पदार्थ नाही तर रोजच्या जगण्यातल्या अनुभवांची,घटनांची केलेली खुमासदार मांडणी. “संडे डिश” कधी हसवेल तर कधी डोळ्यात पाणी आणेल तर कधी विचार करायला लावेल तिखट,आंबटगोड,चटकदार अशा पाणीपुरी सारख्या चवीची “संडे डिश” खास तुमच्यासाठी नक्की नक्की वाचा !!!

Maharashtrartil Sthanika Svarajya Sanstha T.Y.B.A - Pune University

by R. G. Waradkar Nanda Rashinkar

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने बी. ए. भाग - 3 च्या राज्यशास्त्र विषयासाठी जो नवीन अभ्यासक्रम सुरू केला आहे त्यात 'महाराष्ट्रातील स्थानिक संस्था' हा एक पेपर आहे. त्याला अनसरून प्रस्तुत पुस्तक लिहिलेले आहे. तृतीय वर्षाच्या राज्यशास्त्र विषयासाठी हे पस्तक उपयुक्त आहेच; तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्याठीसुद्धा हे पुस्तक विशेष उपयुक्त आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेची निर्मिती, आकृतिबंध स्थानिक स्वराज्य संस्थांना येणाऱ्या अडचणी, उदयास येणारे नेतृत्व त्याचे सविस्तर विवेचन विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे.

Samanya Vidyan class 8 - Maharashtra Board: सामान्य विज्ञान इयत्ता आठवी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

सामान्य विज्ञान इयत्ता आठवी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. ‘सामान्य विज्ञान’ या पाठ्यपुस्तकाचा मूळ हेतूहा आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेले विज्ञान आणि तंत्रज्ञान ‘समजून घ्या व इतरांना समजवा’ हा आहे. विज्ञानातील संकल्पना, सिद्धांत व तत्त्वे समजून घेत असताना त्यांची व्यवहाराशी असणारी सांगड समजून सांगितले आहे. या पाठ्यपुस्तकातून अभ्यास करताना ‘थोडे आठवा’, ‘सांगा पाहू’ या कृतींचा उपयोग उजळणीसाठी केला आहे. ‘निरीक्षण व चर्चा करा’,‘करून पहा’ अशा अनेक कृतीतून विज्ञान शिकवले आहे. ‘जरा डोके चालवा’, ‘शोध घ्या’, ‘विचार करा’ अशा कृती तुमच्या विचारप्रक्रियेला चालना देतील.

Tattvadnyan class 11 - Maharashtra Board: तत्त्वज्ञान इयत्ता अकरावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

तत्त्वज्ञान इयत्ता अकरावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पुस्तकात तत्त्वज्ञानाच्या जगभरात असलेल्या वेगवेगळ्या परंपरांपैकी भारतीय आणि पाश्चात्य या दोन परंपरांची ओळख करून दिलेली आहे. यामधून तत्त्वज्ञानाचा संस्कृतीशी, ऐतिहासिक कालखंडांशी कसा संबंध असतो हे स्पष्ट केलेले आहे. पुस्तकामध्ये पाठांतरापेक्षा आकलन आणि उपयोजन यांच्यावर भर देण्याच्या हेतूने स्वाध्याय, आणि उपक्रमांची रचना केली आहे. पुस्तकातील विषयांशी संबंधित माहिती इतर स्रोतांमधून शोधणे, तिची योग्य मांडणी करता येणे, संवाद-चर्चा, लेखन आणि इतर सृजनशील पद्धतींनी आपले विचार व्यक्त करता येणे, त्याचबरोबर केवळ लेखन-वाचन या रूढ पद्धतीच नव्हे, तर प्रत्यक्ष निरीक्षण, चित्रे बघणे, संगीत ऐकणे, वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळणे या प्रकारेही तत्त्वज्ञान शिकवले गेलेले आहे.

Arthashastra class 11 - Maharashtra Board: अर्थशास्त्र इयत्ता अकरावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

अर्थशास्त्र इयत्ता अकरावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. पाठ्यपुस्तकामध्ये दैनंदिन व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या अर्थशास्त्रीय संकल्पना उदाहरणार्थ, पैसा, आर्थिक वृद्धी व विकास, आर्थिक सुधारणा, आर्थिक नियोजन, संख्याशास्त्र इत्यादींचा ऊहापोह करण्यात आला आहे. या पाठ्यपुस्तकाची मांडणी ही अर्थशास्त्रीय भाषेशी कोणतीही तडजोड न करता सोप्या व साध्या भाषाशैलीचा वापर करून केली आहे. अर्थशास्त्राच्या संकल्पना स्पष्ट होण्यासाठी आवश्यक तेथे विविध चित्राकृती, आलेख, तक्ते इत्यादींचा वापर केला आहे. अर्थशास्त्र विषयातील अवघड संकल्पना, शब्द यांसाठी पाठ्यपुस्तकाच्या शेवटी परिशिष्टही देण्यात आले आहे.

Samajshastra class 11 - Maharashtra Board: समाजशास्त्र इयत्ता अकरावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

समाजशास्त्र इयत्ता अकरावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. पाठ्यपुस्तकामध्ये समाजशास्त्राची ओळख, पाश्चिमात्य आणि भारतीय समाजशास्त्रज्ञांचे योगदान तसेच समाजशास्त्रातील मूलभूत संकल्पना, सामाजिक संस्था, संस्कृती, सामाजीकरण, सामाजिक स्तरीकरण आणि सामाजिक परिवर्तन इत्यादींचा ऊहापोह करण्यात आला आहे. प्रत्येक घटकांअंती, नमुन्यादाखल प्रश्न दिले आहेत आणि संकल्पना चित्रे, स्वअभिव्यक्तीचे प्रश्न, उताऱ्यावरील प्रश्न यांचा समावेश करण्यात आला आहे.

Rajyashastra class 11 - Maharashtra Board: राज्यशास्त्र इयत्ता अकरावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

राज्यशास्त्र इयत्ता अकरावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. पाठ्यपुस्तकामध्ये चार विभाग केले आहेत - राजकीय संकल्पना, तुलनात्मक शासनसंस्था, लोकप्रशासन आणि आंतरराष्ट्रीय संबंध, या प्रत्येक विभागाची सुरुवात त्या संबंधित विषयाच्या प्रस्तावनेने करण्यात आलेली आहे. या क्षेत्रांतील महत्त्वाच्या संकल्पनांची तोंडओळख करून देणे हा यामागील उद्देश आहे. या सर्व संकल्पना भारताच्या संदर्भात अभ्यासायच्या आहेत. अध्ययन अधिक सुलभ, रंजक व कृतीयुक्त होण्यासाठी तुम्हाला माहितीपर चौकटी, विविध कृती विषयाच्या प्रस्तावनेने स्पष्ट करण्यात आलेली आहे.

Manasashastra class 11 - Maharashtra Board: मानसशास्त्र इयत्ता अकरावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

मानसशास्त्र इयत्ता अकरावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. पाठ्यपुस्तकामध्ये मानवी मनाचा, मेंदूचा आणि मुख्यतः मानवी वर्तनाचा अभ्यास मानसशास्त्र या विषयात केला जातो. कुठलीही कृती, विचार करताना नक्की मानवी मेंदूत काय घडते? व कोणत्या कारणांच्या आधारे प्रत्येक व्यक्ती ही इतर व्यक्ती पेक्षा भिन्न वर्तन करते? भावना व विचार हे मानवी वर्तनावर कसा परिणाम करतात? मानसिक समस्या व आजार कसे उद्भवतात? त्यामागची कारणे व उपचारपद्धती यांचा समावेश या विषयात होतो. प्रत्येक घटकांअंती, नमुन्यादाखल प्रश्न दिले आहेत आणि संकल्पना चित्रे, स्वअभिव्यक्तीचे प्रश्न, उताऱ्यावरील प्रश्न यांचा समावेश करण्यात आला आहे.

Bhugol class 11 - Maharashtra Board: भूगोल इयत्ता अकरावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

भूगोल इयत्ता अकरावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकात प्राकृतिक भूगोलाचा समावेश केला आहे, पृथ्वीच्या विविध भागात प्राकृतिक घटकांचे वितरण पाहायला मिळते. वैविध्यता व असमानता आढळते, विशिष्ट प्रारूप, त्याचे वर्णन व विश्लेषण करणे त्यावर आधारित भविष्यकालीन घटनांचा अंदाज बांधणे, शास्त्रीय मीमांसा करणे यांचेही ज्ञान या अभ्यासातून मिळते. आधुनिक बदल व त्यांचे महत्त्व जाणून घेणे. प्रात्यक्षिक भूगोलातही कालानुरूप बदल केले आहेत, ते तुम्हाला अद्ययावत तंत्राशी जुळवून घेण्यास उपयुक्त ठरतील. भूगोल हे निरीक्षणावर भर देणारे शास्त्र आहे असे म्हटले जाते. या विषयात निरीक्षण, आकलन, चिकित्सक विचार, विश्लेषण इत्यादी कौशल्ये महत्त्वाची आहेत.

Marathi Yuvakbharati class 11 - Maharashtra Board: मराठी युवकभारती इयत्ता अकरावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

मराठी युवकभारती इयत्ता अकरावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकात पाच विभाग आहेत. या पाठ्यपुस्तकातून विविध साहित्यप्रकारांची ओळख तर होणार आहेच, शिवाय अनेक जुन्या-नव्या साहित्यिकांची लेखनशैली तुम्हांला अभ्यासता येणार आहे. साहित्यप्रकार म्हणून 'नाटक' या साहित्यप्रकाराचा थोडक्यात परिचय आणि तीन नाट्यउतारे पाठ्यपुस्तकात दिले आहेत. 'दृक्-श्राव्य साहित्यप्रकार' याचा अभ्यास करणार आहात. पुस्तकात व्याकरण घटकांची मांडणी कार्यात्मक पद्धतीने केली आहे. उपयोजित लेखन विभागात अंतर्भूत केलेले घटक हे कालसुसंगत असून, या घटकांच्या अध्ययनातून अनेक व्यावसायिक संधी तुमच्या दृष्टिक्षेपात येऊ शकतील.

Itihas class 11 - Maharashtra Board: इतिहास इयत्ता अकरावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

इतिहास इयत्ता अकरावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकामध्ये १०००० वर्षांहूनही अधिक अशा अत्यंत प्रदीर्घ कालखंडाचा इतिहास सामावलेला आहे. इसवी सनपूर्व ८०००-७००० च्या सुमारास भारतीय उपखंडामध्ये विविध ठिकाणी प्राथमिक अवस्थेतील शेतीची सुरुवात झाली. या काळापासून सुरुवात करून मध्ययुगीन इतिहासापर्यंतची सुसूत्र मांडणी या पुस्तकात केलेली आहे. एवढ्या प्रदीर्घ कालखंडातील सामाजिक आणि सांस्कृतिक विकासाच्या वाटचालीची मांडणी भारताच्या संदर्भात करत असताना, प्रत्येक पाठ त्या वाटचालीतील एकेका टप्प्याचा प्रातिनिधिक ठरावा अशा पद्धतीने पाठांची रचना केलेली आहे. अर्थातच या पद्धतीच्या मांडणीमध्ये ऐतिहासिक कालक्रम आधारभूत असला तरी त्यामागील संकल्पनात्मक आणि प्रक्रियात्मक साखळी स्पष्ट करण्यावर अधिक भर देण्यात आला आहे.

Vidnyan Ani Tantradnyan Bhag 2 Digest class 10 - Maharashtra Board Guide: विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 डाइजेस्ट इयत्ता 10वी - महाराष्ट्र बोर्ड मार्गदर्शन

by Shri Navneet

विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 इयत्ता 10वी चे पुस्तक नवनीत एज्युकेशन लिमिटेडने मराठी भाषेमध्ये प्रकाशित केलेले आहे, या पाठपुस्तकामधे दहा पाठ व त्यांची प्रश्नोत्तरे आणि बोर्डाची कृतिपत्रिका दिलेली आहे. प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला दिलेल्या 'महत्त्वाचे मुद्दे' यात, प्रकरणामध्ये असलेल्या सर्व अभ्यासघटकांचा समावेश आहे. काही ठिकाणी मुद्द्यांच्या स्वरूपात, तर काही ठिकाणी तक्त्यांच्या स्वरूपात माहितीची मांडणी करण्यात आली आहे. पाठ्यपुस्तकात आलेले 'सांगा पाहू' किंवा 'थोडे आठवा' या बाबी ‘महत्त्वाचे मुद्दे' यांत समाविष्ट करण्यात आल्या आहेत. यातील प्रश्नांची उत्तरे मिळाल्यावर किंवा कृती केल्यावर, त्यानंतर दिलेल्या मुद्द्यांचे आकलन होणे खूपच सोपे होईल, हा त्याचा मुख्य उद्देश आहे.

Vidnyan Ani Tantradnyan Bhag 1 Digest Class 10th Maharashtra Board - Guide: विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 डाइजेस्ट इयत्ता 10वी महाराष्ट्र बोर्ड - मार्गदर्शन

by Shri Navneet

विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 इयत्ता 10वी चे पुस्तक नवनीत एज्युकेशन लिमिटेडने मराठी भाषेमध्ये प्रकाशित केलेले आहे, या पाठपुस्तकामधे दहा पाठ व त्यांची प्रश्नोत्तरे आणि बोर्डाची कृतिपत्रिका दिलेली आहे. प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला दिलेल्या 'महत्त्वाचे मुद्दे' यात, प्रकरणामध्ये असलेल्या सर्व अभ्यासघटकांचा समावेश आहे. काही ठिकाणी मुद्द्यांच्या स्वरूपात, तर काही ठिकाणी तक्त्यांच्या स्वरूपात माहितीची मांडणी करण्यात आली आहे. पाठ्यपुस्तकात आलेले 'सांगा पाहू' किंवा 'थोडे आठवा' या बाबी ‘महत्त्वाचे मुद्दे' यांत समाविष्ट करण्यात आल्या आहेत. यातील प्रश्नांची उत्तरे मिळाल्यावर किंवा कृती केल्यावर, त्यानंतर दिलेल्या मुद्द्यांचे आकलन होणे खूपच सोपे होईल, हा त्याचा मुख्य उद्देश आहे.

Ganit Bhag 2 Digest class 10 - Maharashtra Board Guide: गणित भाग 2 डाइजेस्ट इयत्ता 10वी - महाराष्ट्र बोर्ड मार्गदर्शन

by Shri Navneet

गणित भाग 2 इयत्ता 10वी चे पुस्तक नवनीत एज्युकेशन लिमिटेडने मराठी भाषेमध्ये प्रकाशित केलेले आहे, या पाठपुस्तकामधे सात पाठ व त्यांची प्रश्नोत्तरे आणि बोर्डाची कृतिपत्रिका दिलेली आहे. प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला दिलेल्या 'महत्त्वाचे मुद्दे' यात, प्रकरणामध्ये असलेल्या सर्व अभ्यासघटकांचा समावेश आहे. काही ठिकाणी मुद्द्यांच्या स्वरूपात, तर काही ठिकाणी तक्त्यांच्या स्वरूपात माहितीची मांडणी करण्यात आली आहे. पाठ्यपुस्तकात आलेले 'सांगा पाहू' किंवा 'थोडे आठवा' या बाबी ‘महत्त्वाचे मुद्दे' यांत समाविष्ट करण्यात आल्या आहेत. यातील प्रश्नांची उत्तरे मिळाल्यावर किंवा कृती केल्यावर, त्यानंतर दिलेल्या मुद्द्यांचे आकलन होणे खूपच सोपे होईल, हा त्याचा मुख्य उद्देश आहे.

Marathi Kumarbharati Digest class 10 - Maharashtra Board Guide: मराठी कुमारभारती डाइजेस्ट इयत्ता 10वी - महाराष्ट्र बोर्ड मार्गदर्शन

by Shri Navneet

मराठी कुमारभारती इयत्ता 10वी चे पुस्तक नवनीत एज्युकेशन लिमिटेडने मराठी भाषेमध्ये प्रकाशित केलेले आहे, या पुस्तकामध्ये चार भाग दिले आहेत. पाठ्यपुस्तकातील सर्व पाठ, कविता व स्थूलवाचनाचे पाठ यांवर कृतिपत्रिका आराखड्यानुसार विविध कृती या नवनीतमध्ये दिल्या आहेत. कृतिपत्रिकेच्या आराखड्यातील अद्ययावत बदलांनुसार 'कवितेवरील मुद्द्यांच्या आधारे कृती' या प्रश्नप्रकाराचे मार्गदर्शन देऊन, तो सर्व कवितांमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. प्रस्तुत 'नवनीत'मध्ये दिलेल्या अपठित उताऱ्यांच्या स्वतंत्र विभागात पाठ्यपुस्तकात दिलेले दोन अपठित उतारे, तसेच सरावासाठी अन्य उतारे आणि त्यावर आधारित आराखड्यानुसार अपेक्षित कृतींचा समावेश केलेला आहे.

Bhugol Digest class 10 - Maharashtra Board Guide: भूगोल डाइजेस्ट इयत्ता 10वी - महाराष्ट्र बोर्ड मार्गदर्शन

by Shri Navneet

भूगोल इयत्ता 10वी चे पुस्तक नवनीत एज्युकेशन लिमिटेडने मराठी भाषेमध्ये प्रकाशित केलेले आहे, या पाठ्यपुस्तकामध्ये एकूण नऊ अध्याय दिलेले आहेत. प्रत्येक पाठाच्या सुरुवातीस पाठाचा मुद्देसूद सारांश दिला आहे. सारांशात बऱ्याच ठिकाणी भारत व ब्राझील या देशांचा तौलनिक अभ्यास समजून घेण्यास सोपे व्हावे, यासाठी सारण्या दिल्या आहेत. प्रत्येक पाठात असणारे स्वाध्यायांतील प्रश्न व इतरत्र असणारे अनेक महत्त्वाचे अधिकचे प्रश्न अचूक उत्तरांसहित दिलेले आहेत. तसेच बोर्डाने प्रसारित केलेल्या सराव प्रश्नपत्रिकांतील बहुतांशी प्रश्न आणि मार्च २०१९ च्या प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न आदर्श उत्तरांसह समाविष्ट करण्यात आलेले आहेत. पाठ्यपुस्तकात प्रत्येक पाठात नकाशाशी मैत्री, चर्चा करा, पाहा बरे जमते का?, सांगा पाहू!, करून पाहा, शोधा पाहू !, जरा विचार करा, जरा डोके चालवा, द्वैताचे रंग असे शीर्षक असलेल्या अनेक चौकटी दिल्या आहेत. या चौकटींतील विषयांवर आधारित विविध प्रश्नांचा अचूक उत्तरांसहित या 'नवनीत'मध्ये यथायोग्य ठिकाणी समावेश करण्यात आला आहे.

Itihas Va Rajyashastra Digest class 10 - Maharashtra Board Guide: इतिहास व राज्यशास्त्र डाइजेस्ट इयत्ता 10वी - महाराष्ट्र बोर्ड मार्गदर्शन

by Shri Navneet

इतिहास व राज्यशास्त्र इयत्ता 10वी चे पुस्तक नवनीत एज्युकेशन लिमिटेडने मराठी भाषेमध्ये प्रकाशित केलेले आहे, मार्गदर्शकाचे दोन भाग इतिहास व राज्यशास्त्र दिलेले आहेत. या 'नवनीत' मार्गदर्शकात पाठाच्या प्रारंभी पाठात आलेले महत्त्वाचे सन व घटना चौकटीत दिलेल्या आहेत. प्रत्येक पाठातील महत्त्वाचे मुद्दे सुरुवातीस दिलेले आहेत, पाठात आलेल्या काही संकल्पना स्पष्ट झाल्या नाहीत तर तो आशय कळणार नाही; म्हणून तेथेच चौकटीत त्यांचे स्पष्टीकरणही दिलेले आहे. प्रत्येक पाठाखाली दिलेल्या स्वाध्यायांतील सर्व प्रश्नांची आदर्श व अचूक उत्तरे दिलेली आहेत. संकल्पनाचित्रे पूर्ण करा, तक्ता पूर्ण करा, कालरेषा पूर्ण करा, ओघतक्ता तयार करा इत्यादी कृतीआधारित नव्याने आलेल्या प्रश्नप्रकारांचा सराव होण्यासाठी स्वाध्यायांखेरीज अनेक कृती या मार्गदर्शकात दिलेल्या आहेत.

Ganit Bhag 1 Digest class 10 - Maharashtra Board Guide: गणित भाग 1 डाइजेस्ट इयत्ता 10वी - महाराष्ट्र बोर्ड मार्गदर्शन

by Shri Navneet

गणित भाग 1 इयत्ता 10वी चे पुस्तक नवनीत एज्युकेशन लिमिटेडने मराठी भाषेमध्ये प्रकाशित केलेले आहे, या पाठपुस्तकामधे सहा पाठ व त्यांची प्रश्नोत्तरे आणि बोर्डाची कृतिपत्रिका दिलेली आहे. प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला दिलेल्या 'महत्त्वाचे मुद्दे' यात, प्रकरणामध्ये असलेल्या सर्व अभ्यासघटकांचा समावेश आहे. काही ठिकाणी मुद्द्यांच्या स्वरूपात, तर काही ठिकाणी तक्त्यांच्या स्वरूपात माहितीची मांडणी करण्यात आली आहे. पाठ्यपुस्तकात आलेले 'सांगा पाहू' किंवा 'थोडे आठवा' या बाबी ‘महत्त्वाचे मुद्दे' यांत समाविष्ट करण्यात आल्या आहेत. यातील प्रश्नांची उत्तरे मिळाल्यावर किंवा कृती केल्यावर, त्यानंतर दिलेल्या मुद्द्यांचे आकलन होणे खूपच सोपे होईल, हा त्याचा मुख्य उद्देश आहे.

Rajyashastra Digest class 11 - Maharashtra Board Guide: राज्यशास्त्र डाइजेस्ट इयत्ता 11वी - महाराष्ट्र बोर्ड मार्गदर्शन

by Shri Navneet

राज्यशास्त्र इयत्ता 11वी चे पुस्तक नवनीत एज्युकेशन लिमिटेडने मराठी भाषेमध्ये प्रकाशित केलेले आहे, या मार्गदर्शकाची (१) राजकीय संकल्पना, (२) तुलनात्मक शासन आणि राजकारण, (३) लोकप्रशासन आणि (४) आंतरराष्ट्रीय संबंध या चार विभागांत विभागणी करण्यात आली आहे. या मार्गदर्शकातील प्रत्येक प्रकरणात सुरुवातीला महत्त्वाच्या मुद्द्यांचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. प्रस्तुत मार्गदर्शकात वस्तुनिष्ठ, लघूत्तरी व दीर्घोत्तरी अशा सर्व प्रकारच्या प्रश्नांचा समावेश केलेला असून, त्यांची सुबोध भाषेत मुद्देसूद, समर्पक व आदर्श उत्तरे देण्यात आली आहेत. अभ्यासक्रमात आणि पाठ्यपुस्तकात नव्याने समाविष्ट केलेल्या उपयोजनात्मक प्रश्न व त्या प्रश्नांची समर्पक उत्तरे यांचा प्रत्येक प्रकरणात समावेश करण्यात आला आहे.

Arthashastra Digest class 11 - Maharashtra Board Guide: अर्थशास्त्र डाइजेस्ट इयत्ता 11वी महाराष्ट्र बोर्ड मार्गदर्शन

by Shri Navneet

अर्थशास्त्र इयत्ता 11वी चे पुस्तक नवनीत एज्युकेशन लिमिटेडने मराठी भाषेमध्ये प्रकाशित केलेले आहे, या मार्गदर्शकातील प्रत्येक प्रकरणात सुरुवातीला महत्त्वाच्या मुद्द्यांचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. प्रस्तुत मार्गदर्शकात दीर्घोत्तरी, लघूत्तरी आणि वस्तुनिष्ठ अशा सर्व प्रकारच्या प्रश्नांचा समावेश केलेला असून, त्यांची सुबोध भाषेत मुद्देसूद, समर्पक व आदर्श उत्तरे देण्यात आली आहेत. अंतर्गत मूल्यमापन चाचणीच्या तयारीसाठी प्रत्येक प्रकरणावर बहुपर्यायी प्रश्न (MCQs) उत्तरांसह देण्यात आले आहेत.या मार्गदर्शकाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी प्रश्नपत्रिकेचा आराखडा देण्यात आला आहे. या पुस्तकाच्या अखेरीस प्रथम व द्वितीय सत्रांसाठी नमुना प्रश्नपत्रिका तसेच प्रथम व द्वितीय सत्र यांसाठी अंतर्गत मूल्यमापन चाचणीच्या नमुना प्रश्नपत्रिकाही देण्यात आल्या आहेत.

Refine Search

Showing 801 through 825 of 1,431 results