- Table View
- List View
POL 290 Pashchimatya Rajkiya Vichar pravah T.Y.B.A - Y.C.M.O.U
by N. Y. Dole Prof. Borgavkar Ramkrushna Metakar Shailendra Devlankar Prof. MusalePOL 290 Pashchimatya Rajkiya Vicharpravah text book for T.Y.B.A from Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik in Marathi.
POL 311 Lokprashasan T.Y.B.A - Y.C.M.O.U.
by Prof. Borgavkar Prof. Musale Nandkumar Naik Prof. Chaudhari Narayan ChaudhariPOL 311 Lokprashasan text book for T.Y.B.A from Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik in Marathi.
Poladi Rakshas
by Dinakar BorikarA king had 40 sons 39 were married and the king wanted to get the last one married. He tells him to go around the world and get himself a wife. The prince travels throughout the world. He comes across a big giant. The prince gains the favour of the giant and dwells with him in giant’s kingdom. The giant was in love with a princess but was not able to get her, so he makes a deal with the prince. The prince gets the princess for him from the king but at the same time he himself marries her and takes her to be his wife. Now the prince and the princess conspire against the giant and find out a way to kill him. They kill the giant and leave for their country.
Poonachi: पूनाची
by Perumal Muruganएक गूढ पाहुणा कुठूनतरी अवतरतो आणि एक नुकतंच जन्मलेले करडू एका म्हाताऱ्या जोडप्याला भेट देऊन जातो. लवकरच, त्या छोट्याशा काळ्या शेळीचा पूनाचीचा - नाजुकपणा आणि बहुप्रसवता या गोष्टी तिच्या अवतीभवतीच्या सगळ्यांच्या नवलाचा विषय बनून जातात. अगदी तिच्यावर झडप घालू पाहणाऱ्या गरुडापासून ते तिला तोंडात धरून पळवून नेऊ पाहणाऱ्या रानमांजरापर्यंत, सगळ्यांपासून वाचवून म्हातारा-म्हातारी छोट्या पूनाचीला जगवण्यासाठी जिवाचे रान करतात, कारण ती त्यांत्त्या छोट्याशा विश्वाचा केंद्रबिंदू बनून गेलीय. शेतकरी, धनगर किंवा शेळ्या यांच्यापैकी कुणाचही जगणं तसं सोपं नसतंच. पाऊस येत नाही, देव आपापल्या वाटचे बळी मागून मोकळे होतात आणि अरण्य या अजाण प्राण्यांना मोहवून फशी पाडायला टपलंय, या सगळ्यांतून, पूनाची कधी तिचं रक्षण करणाऱ्या तर कधी तिला घायाळ करणाऱ्या, मनुष्यप्राण्यांच्या वर्तणुकीची साक्षीदार होते आणि त्यावर मूक प्रश्नचिन्हही उपस्थित करते. प्राण्यांच्या जगाची ही तरल, तरीही गुंतागुंतीची कथा, हे आपल्या काळावरचं, वर्ण-जातीच्या विषम उतरंडीवरचं भाष्य आहे; तसंच ते भाष्य आहे नाकर्त्या शासनाच्या लहरींना शरण जाण्याऐवजी त्यांच्या विरोधात आवाज उठवण पसंत करणाऱ्या महत्त्वाकांक्षी व्यक्तींच्या वाढत्या असमर्थतवरचं, असुरक्षिततेवरचं.
Portuguese Maratha Sambandh: पोर्तुगीज मराठा संबंध
by Sadashiv Shankar Desaiपोर्तुगाल ही हिंदुस्थानच्या जलमार्गाचा शोध लावणारी पहिली युरोपियन सत्ता. तथापि पोर्तुगीजांच्या पूर्वी अरब प्रवासी आणि व्यापारी हिंदुस्थानात जलमार्गाने व खुष्कीच्या मार्गाने येत असत. मध्ययुगीन कालात अरब व्यापाऱ्यानी आणि विचारवंतानी भारतीय माल आणि भारतीय तत्वज्ञान आफ्रिका मार्गे युरोपात पोचविण्याचे उल्लेखनीय कार्य केले आहे. योगायोगाची किंवा दुर्दैवाची गोष्ट ही की, पोर्तुगीज नावाड्याना हिंदी महासागरात आणि पर्यायाने हिंदुस्थानच्या समुद्रात आणून सोडण्यास अरबच कारणीभूत ठरले. असे सांगतात की, पोर्तुगीज लोकानी हिंदुस्थानच्या सुवर्णभूमीच्या अद्भूतरम्य कथा कर्णोपकर्णी ऐकल्या होत्या. त्यामुळे सोन्याचा धूर वाहात असलेल्या ह्या समृद्ध देशात जाऊन तेथील धनसंपत्ती लुटून आणून आपला गरीब देश श्रीमंत करावा, ह्या महत्त्वाकांक्षेने प्रेरित होऊन ते हिंदुस्थानच्या शोधार्थ बाहेर पडले. आता हा मराठे आणि पोर्तुगीज यांच्यामधील संबंधाचा इतिहास प्रकाशात येत आहे.
Poshan Ani Aaharshastra SYBA Fourth Semester - RTMNU: पोषण आणि आहारशास्त्र बी.ए. द्वितीय वर्ष चतुर्थ सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
by Prof. Dr. Meena Kaleleविद्यापीठ अनुदान आयोगाने ठरवून दिलेल्या ध्येय-धोरणानुसार पोषण आणि आहारशास्त्र (Nutrition and Dietetics) हे बी. ए. द्वितीय वर्षः चतुर्थ सेमिस्टर करिता या वर्गासाठी मराठी भाषा अभ्यासमंडळाने संपादित केले आहे. पदवी आणि पदव्युत्तर पातळीवर दर्जेदार, उच्चप्रतीचे, व्यवसायाभिमुख आणि सर्वव्यापी शिक्षण दिले जावे याकरिता केंद्र सरकारच्या मानव संसाधन आणि विकास मंत्रालयाने तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाने जी मार्गदर्शक तत्त्वे आणि धोरण निश्चित केले आहे त्याची मातृभाषेशी आणि वाङ्मयाशी योग्य सांगड घालण्याचे धोरण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अत्यंत विचारपूर्वक आणि दूरगामी स्वरूपात स्वीकारलेले आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनाचे यथार्थ मूल्यमापन करण्याच्या व त्यांच्या ज्ञानकक्षा विस्तारित करण्याच्या उद्देशाने आवश्यक ते बदल करण्याचा योग्य निर्णयही घेतलेला आहे. त्याच दृष्टिकोनातून मराठी भाषा अभ्यासमंडळाच्या मार्गदर्शनाखाली पोषण आणि आहारशास्त्र (Nutrition and Dietetics)' या पाठ्यपुस्तकाची निर्मिती पाठ्यपुस्तक समितीने केली आहे. पाठ्यपुस्तकामध्ये समतोल आहार (Balanced Diet), जीवनचक्रातील पोषण (Nutrition through Life Cycle), आहारोपचाराची तत्त्वे (Principles of Diet Therapy), पोषण शिक्षण (Nutrition Education), अन्नदूषितीकरण, अन्नविषबाधा (Food Spoilage - Food Poisoning), अन्नसंरक्षण (Food Preservation), अन्नभेसळ (Food Adulteration), अन्नाचा पोषणदर्जा सुधारणे (Improving Nutritional Quality of Foods) आणि भारतातील कुपोषण (Malnutrition in India) इत्यादींचा अभ्यासक्रम दिला आहे.
Poshanshastra SYBA Third Semester - RTMNU: पोषणशास्त्र बी.ए. द्वितीय वर्ष तृतीय सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
by Prof. Dr. Meena Kaleleविद्यापीठ अनुदान आयोगाने ठरवून दिलेल्या ध्येय-धोरणानुसार पोषणशास्त्र (Nutrition) हे बी. ए. द्वितीय वर्षः तृतीय सेमिस्टर करिता या वर्गासाठी मराठी भाषा अभ्यासमंडळाने संपादित केले आहे. पदवी आणि पदव्युत्तर पातळीवर दर्जेदार, उच्चप्रतीचे, व्यवसायाभिमुख आणि सर्वव्यापी शिक्षण दिले जावे याकरिता केंद्र सरकारच्या मानव संसाधन आणि विकास मंत्रालयाने तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाने जी मार्गदर्शक तत्त्वे आणि धोरण निश्चित केले आहे त्याची मातृभाषेशी आणि वाङ्मयाशी योग्य सांगड घालण्याचे धोरण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अत्यंत विचारपूर्वक आणि दूरगामी स्वरूपात स्वीकारलेले आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनाचे यथार्थ मूल्यमापन करण्याच्या व त्यांच्या ज्ञानकक्षा विस्तारित करण्याच्या उद्देशाने आवश्यक ते बदल करण्याचा योग्य निर्णयही घेतलेला आहे. त्याच दृष्टिकोनातून मराठी भाषा अभ्यासमंडळाच्या मार्गदर्शनाखाली ' पोषणशास्त्र (Nutrition)' या पाठ्यपुस्तकाची निर्मिती पाठ्यपुस्तक समितीने केली आहे. पाठ्यपुस्तकामध्ये एकूण चार युनिट दिलेले आहेत. पोषण शास्त्राचा परिचय (Introduction of Nutrition), अन्नाचे कार्य (Functions of Food), स्वास्थ्याची परिमाणे (Dimensions of Health), पोषक तत्त्वाचा मुख्य समूह (Macronutrients - Carbohydrates, Fats and Proteins), खनिज पदार्थ (Minerals), जीवनसत्वे (Vitamins), पाणी (Water), रेषाळ पदार्थ (Fibre), ऊर्जा (Energy), प्रतिऑक्सीडीकारक (Antioxidants), अन्न समूह (Food Groups), अन्न शिजवण्याच्या पद्धती (Methods of Cooking Food), खेळांडूचे पोषण (Sports Nutrition) आणि प्रात्यक्षिके – स्नॅक्स, गोड पदार्थ, बेक केलेल पदार्थ, पेये, सलाद त्यादींचा अभ्यासक्रम दिला आहे.
Postat Telachi Batali
by Shekhar ShiledarShekh Chilli’s owner asks him to go and do a money order from the post office. Shekh Chilli sees many parcels in the office and thinks of sending an oil bottle to his wife. He gives a bottle to the postman but does not give any address. He realizes that the bottle did not reach home and he comes and inquires. The postman tells him that while in transit one stick came and hit the bottle and it broke so the bottle did not reach home.
Postmaster
by Ramesh VarkhedeThis is a story of a postmaster. He was staying alone in a house and did all his cooking by himself. Near his house he found one orphan girl her name Ratan. She helped him with his household work. Postmaster taught Ratan to read and write and both were attached to each other. One day the postmaster retired and had to leave Ratan alone. Ratan felt lonely after he went away.
Prabodhankar Thakare Samagra Wangmay Khand 1: प्रबोधनकार ठाकरे समग्र वाङ्मय खंड १
by Prabodhankar Thakareप्रबोधनकार ठाकरे यांनी सत्यशोधक चळवळीच्या विचारांच्या प्रसारासाठी ‘प्रबोधन’ हे नियतकालिका प्रकाशित व संपादित केले. त्यातूनच ‘प्रबोधनकार’ ही पदवी त्यांना मिळाली. प्रबोधनकार ठाकरे यांनी त्यांच्या ८८ वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडातील आठवणी ‘माझी जीवनगाथा’ या पुस्तकातून सांगितल्या आहेत. कुसुमाग्रजांनी म्हटल्याप्रमाणे प्रबोधनकारांच्या रोखठोक, रांगड्या व भडक भाषेचा अनुभव यातून मिळतो. त्या काळच्या सामाजिक पद्धती, रूढींना विरोध करण्याची धमक ते दाखवत असत. त्यांची आजी ‘बय’ ही बेडर अन् बंडखोर समाजसेविका होती. अस्पृश्यता पाळणे तिच्या गावी नव्हते. प्रबोधनकारांचे वर्तनही तसेच असे, याचे दाखले या आठवणींतून मिळतात. वयाच्या सातव्या वर्षापासून वर्तमानपत्रे वाचत असल्याने आपली स्मरणशक्ती तेज झाल्याचेही ते नमूद करतात. प्रबोधनकारांचा जन्म, गाव, आडनाव, कुटुंब, व्यवसाय, आर्थिक स्थिती, त्यांचे स्वतःचे छंद, नोकरी-व्यवसाय, नाट्य कारकीर्द यांची माहिती या पुस्तकातून मिळते. त्या काळच्या सामाजिक, राजकीय स्थितीवरही त्यांनी प्रकाश टाकला आहे व त्यांचा त्यातील सहभाग, भूमिकाही स्पष्ट केली आहे.
Prabodhankar Thakare Samagra Wangmay Khand 3: प्रबोधनकार ठाकरे समग्र वाङ्मय खंड ३
by Prabodhankar Thakareगेल्या पिढीतील एक थोर समाजसुधारक, विचारवंत आणि निर्भिड विचारांचे पत्रकार म्हणून प्रबोधनकार ठाकरे यांचे नाव सर्वपरिचित आहे. पत्रकार म्हणून त्यांनी “प्रबोधन” मधून आपल्या हिंदु समाजातील जुन्या दुष्ट रूढी, अंधश्रद्धा, जातीभेद आणि या सर्वांच्या पाठीमागे असलेल्या वर्णश्रेष्ठत्वाच्या कल्पना यावर अगदी घणाघाती प्रहार केले. म्हणूनच के. सी. ठाकरे या नावापेक्षा “प्रबोधनकार ठाकरे” हेच त्यांचे नाव अधिक परिचित झाले. पण ठाकरे यांच्या व्यक्तिमत्वाला आणखीही काही पैलू होते. ते केवळ समाजसुधारक आणि तेजस्वी विचारांचे पत्रकार नव्हते. ते स्वतः उत्तम लेखकही होते आणि त्यांच्या लेखनाला कवित्वाचाही स्पर्श होता. प्रारंभीच्या काळात त्यांचा “नाटक” आणि प्रत्यक्ष रंगभूमी यांच्याशी निकटचा संबंध आला होता. समाजसुधारणेचा ध्यास घेऊन त्यांनी अनेक नाटके लिहिली. त्या नाटकांचे आजच्या नव्या पिढीला स्मरण नसले तरी अन्यायावर प्रहार करणारा नाटककार या भूमिकेतूनच त्यांनी हे ललित-लेखन केले आहे.
Prabodhankar Thakare Samagra Wangmay Khand 4: प्रबोधनकार ठाकरे समग्र वाङ्मय खंड ४
by Prabodhankar Thakareप्रबोधनकार कै. केशव सीताराम ठाकरे यांचे समग्र साहित्य खंडरूपाने प्रसिद्ध करण्याचे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने ठरविले होते. प्रबोधनकार ठाकरे हे हिंदू संस्कृती आणि हिंदू धर्म यांचे जाज्वल्य अभिमानी होते. प्रस्तुतच्या या चौथ्या खंडात एकूण तीन भाग आहेत. पहिल्या भागात (हिंदु धर्माचे दिव्य आणि संस्कृतीचा संग्राम) आजच्या हिंदू धर्माची अवगत अवस्था आणि त्याची कारणे यांचा त्यांनी ऊहापोह केला आहे. तसेच मुसलमानी आक्रमणानंतरची या देशाची हीनदीन, पौरुषहीन अवस्था कशी प्रकट झाली याचेही विश्लेषण त्यांनी मोठ्या पोटतिडकीने केले आहे. दुसरा भाग “हिंदुजनांचा ऱ्हास आणि अधःपात”या शीर्षकाने प्रसिद्ध झाला आहे.
Pragat Samajik Manasashastra TYBA Fifth Semester - SPPU: प्रगत सामाजिक मानसशास्त्र टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
by Dr C. P. Labhane Dr S. V. Jadhav Dr Jaishree Prafull Sontakke'प्रगत सामाजिक मानसशास्त्र' या विषयाची व्याप्ती आणि दृष्टिकोन यांचा निरंतर विकास होत आहे. मनुष्य हा सामाजिक प्राणी असल्याने त्याच्या प्रत्येक वर्तनावर समाजाचा परिणाम होत असतो. आजच्या जीवनात निर्माण होणारे बरेचसे प्रश्न हे सामाजिक स्वरूपाचे आहेत. आधुनिक काळ हा गतिमान आहे. त्यामध्ये वावरत असताना व्यक्ती आणि समाज यात सतत आंतरक्रिया घडत असतात. ती कशाप्रकारची असते, सामाजिक संबंधांचे महत्त्व, त्याचे वेगवेगळ्या क्षेत्रातील उपयोजन याची माहिती असणे आवश्यक असते. समाजातील वेगवेगळ्या घडामोडींचा सामाजिक दृष्टीने अभ्यास करण्याकरिता या पुस्तकाचा निश्चितच उपयोग होईल.
Prakashacha Sodh
by Sau. Padma MandagavaneOn a huge tree, there was a quarrel all birds and owl. They were talking about sunlight and the owl did not know anything about it. The owl goes searching for the answer but comes back depressed. The owl cannot see light and so does not understand what is light.
Prakrutik Bhugol FYBA First Semester - SPPU: प्राकृतिक भूगोल एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर १ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
by A. B. Savadi P. S. Kolekarयु.जी.सी.च्या सूचनेनुसार जून 2019 पासून सेमिस्टर 1 करिता 'प्राकृतिक भूगोल' (Physical Geography) या भूगोलाच्या मूलभूत शाखेच्या अभ्यासक्रमाचा आराखडा आखलेला आहे. प्राकृतिक भूगोल शाखेचा मुख्य उद्देश असा की, ज्यामुळे विद्यार्थ्यांना प्राकृतिक भूगोलाचा परिचय आणि संलग्नित आव्हानाची ओळख होईल, त्यांना प्राकृतिक भूगोलातील जागतिक स्तरावरील सद्य घडामोडीसंबंधी जाणीव होईल. विशेषतः प्राकृतिक भूगोलामधील शिलावरण, वातावरण व जलावरणासारख्या आवरणावर लक्ष केंद्रित केलेले आहे.
Prakrutik Bhugol Paper 1 FYBA First Semester - SPPU: प्राकृतिक भूगोल पेपर १ एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर १ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
by Dr Jyotiram Chandrakant More Dr Sanjay Dagu Pagar Prof. Ashok Maruti Thoratविद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने श्रेयांक पद्धती व सेमिस्टर पद्धती जून 2019 पासून प्रथम वर्ष कला या वर्गासाठी लागू केल्या आहेत. तसेच प्राकृतिक भूगोल हा पेपर भूगोल विषयाची अत्यंत महत्त्वाची शाखा असून प्राकृतिक भूगोलात भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र व सागरशास्त्र अशा अनेक शाखांचा समावेश केला गेला आहे. पुस्तकातील पहिल्या प्रकरणात प्राकृतिक भूगोल परिभाषा, प्राकृतिक भूगोल स्वरूप आणि व्याप्ती, प्राकृतिक भूगोलाच्या शाखा व पृथ्वीप्रणालीबद्दल परिचय अत्यंत सूत्रबद्ध व नियोजनपूर्वक मांडल्याने अभ्यासकांना विविध संकल्पना समजण्यास त्याचा फायदा होईल. पुस्तकातील दुसऱ्या प्रकरणात मृदावरण अंतर्गत पृथ्वीचे अंतरंग, वेगनरचा भूखंडवहन सिद्धान्त व डेव्हिसची खननचक्र संकल्पना समाविष्ट केली आहे. पुस्तकातील तिसऱ्या वातावरण या प्रकरणात वातावरणाची रचना, उष्णतेचा ताळेबंद, वायुभार पट्टे व वाऱ्याची प्रणाली आणि दृष्टीची रूपे व प्रकार असे घटक घेतले आहेत. पुस्तकातील चौथ्या जलावरण या प्रकरणात जलचक्र, महासागराचे सामान्य स्वरूप, सागरी लाटा व लहरी आणि क्षेत्रभेट (अभ्यास) असे घटक घेतल्याने सागरशास्त्राचा महत्त्वपूर्ण भाग समाविष्ट केलेला दिसून येतो. क्षेत्रभेट (अभ्यास) व क्षेत्रभेटीमुळे विषयाची प्रत्यक्ष माहिती विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
Pralay Janma Pralayacha - Novel: प्रलय जन्म प्रलयाचा - कादंबरी
by Shubham Suresh Rokade"विनाश! मला विनाश दिसत आहे राजन. ज्या वेळी आकाशात चंद्र आणि सूर्य दोन्ही उपस्थित असतील, अर्धे आकाश काळेकुट्ट आणि अर्धे आकाश लाल रंगाचे असेल ; त्यावेळी जी जन्माला येईल ती तुझ्या वंशाचा निर्वंश करेल. राजन तुझा निर्वंश फार दूर नाही___! ती तुझ्या राजघराण्याचा समूळ नाश करण्यासाठी जन्माला येत आहे___! “महर्षी, कोण 'ती'___? तुम्ही कोणाबद्दल बोलत आहात___? आणि हे कधी, कधी होणार आहे? मला फार चिंता वाटत आहे___? “फार दूर नाही राजन. तुझा मृत्यू, लवकरच तुझा मृत्यू होईल. तुझा पुत्र तुझे राज्य जेव्हा चालवायला घेईल त्या वेळी त्याच्या हातून अधम व घोर पापकर्मे घडतील. त्याच कर्माचे फळ म्हणजे तिचा जन्म आणि जेव्हा ती जन्माला येईल त्या क्षणापासूनतुझ्या तुझ्या वंशाचा अंतःकाळ काळ सुरू होईल. तुझा निर्वंश होण्याचा काळ सुरू होईल___ अशी प्रलय-जन्म प्रलयाचा ऐतिहासिक आणि थरारक कथा कादंबरी शुभम रोक़डे यांनी वाचकांच्या हाती घेऊन आले आहेत.
Pramanik Lakudtodya
by Shivkumar BaijalA woodcutter was helped by God when his axe fell into the river. God of the forest comes and gives him a golden axe but the cutter says it is not his axe. Then he is given silver axe again the reply was the same. Then he is given his original axe. The God was happy for his truth and presents him with gold and silver axe as well. Raghu also tried to do the same thing like the woodcutter but he loses his axe and comes home empty-handed because he did not tell the truth.
Prani Apale Mitra Ahet
by Baba BhandThis is a story of a village which was going through a drought situation and they were facing a grave problem. There was a scarcity of water and fodder for the animals. People throughout the village were worried about the condition about the future if the there is no rainfall. More than their lives animal life was equally important.
Prani Gayab Hovu Lagale
by Vishal TayadeOne day all the animals gather together they were worried about animals being taken away by some people for their own benefit. The jungle was being cut down and the animals were about their future. This is a matter of concern and its happening all over the world and we should take care of it.
Pranishahi
by Vishal TayadeOne day fed-up with their king the animals decide to revolt. They gather together against him and drive him away from their jungle. The king of the jungle the lion was influenced by other animals and he was not ruling with justice. The animals had no other way than to get rid of this king. They all decide to stay without a king.
Pranyancha Whats App
by Vishal TayadeIn a large jungle, a lion was ruling. He decided to rule his kingdom like the humans did. He called a man and distributed mobiles to all the animals. They get their training and start chatting on the phone. Animals make their WhatsApp group and chatted every day. One day they get a fake message and a meeting is called immediately. They decide not to misuse the facility they are provided with. This is a strange world where you see animals using mobile phones.
Pranyanchi Sabha Ani Sinhin
by Baba BhandThere was a meeting of all the animals in the jungle. A fox asked a question to know who gives a number of deliveries at a time. Everybody suggested a different name such as rabbit, goat, elephant, pigs, rats. The lioness also comes there so they ask her the same question. Without taking much time she says I give birth to only one cub but says a powerful one instead of a dozen weak.
Prarabdha
by Sau. Padma MandagavaneBhiva and Shiva were two good friends. Bhiva was from a poor family and Shiva was rich he had a business. Bhiva wanted to become rich like Shiva so he decides and goes to the city for earning and become rich. He did not succeed and remains poor. Now he accepts his destiny and returns to the village.
Prarambhik Bharat: प्रारंभिक भारत: प्रागैतिहासिक काळ ते मौर्यकाळ एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर १ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
by Prof. Jyoti Ganesh Rautप्रथम वर्ष कला शाखेच्या सेमिस्टर-1 साठी सदर पुस्तक लिहिण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी या वर्षीपासून ‘प्रारंभिक भारत: प्रागैतिहासिक काळ ते मौर्यकाळ’ हा भाग अभ्यासक्रमात आणला आहे. विद्यार्थ्यांना आपला इतिहास प्रागैतिहासिक काळापासून माहीत असण्याची गरज आहे. ती गरज विद्यापीठाने अधोरेखित केली आणि या पुस्तकाद्वारे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रारंभिक भारत: साधने आणि प्रागैतिहासिक काळ, हडप्पा संस्कृती: कांस्ययुगीन सभ्यता, वैदिक संस्कृती, धार्मिक विद्रोह: जैन आणि बौद्ध धर्म, महाजन पदांचा उदय आणि मौर्यकाळ या चार पाठांद्वारे विद्यार्थ्यांना प्राचीन भारताचा एक समृद्ध कालखंड समजू शकेल असा विश्वास आहे. भारतीय सभ्यता आणि संस्कृती तसेच राजकीय घराणी यांच्या उदय आणि विकासाला कारणीभूत असणाऱ्या घटकांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे.