Browse Results

Showing 1,101 through 1,125 of 1,529 results

Rajache Dukh

by Sanjiv Jaiswal ‘sanjay’

दात स्वच्छ ठेवणं किती गरजेचं आहे- हा धडा जंगलातल्या राजालापण शिकावा लागला! जंगलाच्या राजाला मदत कोणी केली असेल? हे जाणून घेण्मासाठी ही सुंदर गोष्ट वाचा!

Rajancha Nirnay

by Prashant Gautam

In the kingdom, there was a devotee of God and a farmer. The farmer finds wealth in the field so he hands it over to his owner. The owner in return gives it to the king and the king appreciated the integrity of the two and deposited it to the treasury. Time Changed there was a severe famine in the state! Everyone becomes helpless. Due to this unexpected crisis the grievances of sadness spread to the people. Pradhanji advised the kings to use his wealth in his treasure. The king said that he is not his wealth. Without asking them, you cannot do anything. So the two of them were summoned to the courtroom.

Rajguruchi Chal

by Rajesh Gupta

One day some ministers and the queen wanted Tenali Raman to be replaced with her brother. The king and queen knew that there is no match for Tenali Raman but still she forced the king to do it. Here Tenali Raman proves himself intelligent and saves himself from losing the job.

Rajkiya Patrakarita 2 Paper 2 SYBA Fourth Semester - SPPU: राजकीय पत्रकारिता २ पेपर २ एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ४ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. R. Gh. Varadkar

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने बी.ए. भाग-2 राज्यशास्त्र या विषयासाठी ‘राजकीय पत्रकारिता' हा नवा पेपर सुरू केला आहे. त्या पेपरसाठी असलेल्या अभ्यासक्रमानुसार हे क्रमिक पुस्तक लिहिलेले आहे. प्रसारमाध्यमे आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनलेली आहेत. सर्व प्रकारची माहिती आपल्यापर्यंत पोहोचविण्याचे काम ही माध्यमे करतात. त्यात अर्थातच राजकीय क्षेत्रासंबंधीच्या माहितीचा समावेश होतो. ही माध्यमे जी माहिती पुरवितात त्या आधारे आपण आपले राजकीय मत बनवित असतो. लोकमत घडविण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची आहेच; पण देशातील राजकीय प्रक्रियेवरही या माध्यमांचा प्रभाव पडत असतो. या अर्थाने प्रसारमाध्यमे ही राजकीय प्रक्रियेचा अविभाज्य घटक बनलेली आहेत. त्यामुळेच राज्यशास्त्राचा अभ्यास करताना प्रसारमाध्यमांची राजकारणातील भूमिका समजून घेणे आवश्यक ठरलेले आहे. ती समजून घेतल्याशिवाय देशातील राजकीय प्रक्रिया आपल्याला समजून घेता येणार नाही, एवढे प्रसारमाध्यमांना राजकीय प्रक्रियेत महत्त्व आलेले आहे. त्यामुळेच राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी हा विषय महत्त्वाचा आहे.

Rajkiya Siddhant FYBA First Semester- RTMNU: राजकीय सिद्धांत बी.ए. प्रथम वर्ष प्रथम सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Prof. R. J. Lote

विद्यापीठ अनुदान आयोगाने ठरवून दिलेल्या ध्येय-धोरणानुसार राजकीय सिद्धांत - (Political Theory) हे प्रथम वर्ष प्रथम सेमिस्टर करिता या वर्गासाठी मराठी भाषा अभ्यासमंडळाने संपादित केले आहे. पदवी आणि पदव्युत्तर पातळीवर दर्जेदार, उच्चप्रतीचे, व्यवसायाभिमुख आणि सर्वव्यापी शिक्षण दिले जावे याकरिता केंद्र सरकारच्या मानव संसाधन आणि विकास मंत्रालयाने तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाने जी मार्गदर्शक तत्त्वे आणि धोरण निश्चित केले आहे त्याची मातृभाषेशी आणि वाङ्मयाशी योग्य सांगड घालण्याचे धोरण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अत्यंत विचारपूर्वक आणि दूरगामी स्वरूपात स्वीकारलेले आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनाचे यथार्थ मूल्यमापन करण्याच्या व त्यांच्या ज्ञानकक्षा विस्तारित करण्याच्या उद्देशाने आवश्यक ते बदल करण्याचा योग्य निर्णयही घेतलेला आहे. त्याच दृष्टिकोनातून मराठी भाषा अभ्यासमंडळाच्या मार्गदर्शनाखाली राजकीय सिद्धांत - (Political Theory) या पाठ्यपुस्तकाची निर्मिती पाठ्यपुस्तक समितीने केली आहे. पाठ्यपुस्तकामध्ये युनिट १ - राजकीय सिद्धांत आणि राज्य (Political Theory and State), युनिट २ - सत्ता आणि अधिसत्ता (Power and Authority), युनिट ३ - स्वातंत्र्य आणि समता (Liberty and Equality), आणि युनिट ४ - अधिकार आणि न्याय (Rights and Justice) इत्यादींचा अभ्यासक्रम दिला आहे.

Rajkiya Vicharpranali TYBA Fifth Semester - SPPU: राजकीय विचारप्रणाली टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Vaishali Pawar Nitin Birbal

राज्यशास्त्रातील राजकीय विचारप्रणाली ही अभ्यासशाखा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जगातील सर्वच बदलांचे मूळ विचारप्रणाली असते. विचारप्रणाली व्यक्तीच्या जीवनाला दिशा देते तसेच तिला कार्य करण्यासाठी प्रवृत्त करते. या विचारप्रणालीच्या महत्त्वामुळे हा अभ्यासक्रम राज्यशास्त्र अभ्यासमंडळाने सुरू केलेला आहे. राष्ट्रवाद, लोकशाही समाजवाद, फॅसिझम, फुले-आंबेडकरवाद, गांधीवाद, स्त्रीवाद या महत्त्वपूर्ण विचारप्रणालींचा समावेश अभ्यासक्रमामध्ये केला आहे.

Rajkiya Vicharpranalicha Parichay 2 Paper 2 SYBA Fourth Semester - SPPU

by Pramod Rajendra Tambe Haridas Arjun Jadhav

द्वितीय वर्ष कला राज्यशास्त्र सामान्य (G-2) स्तरावरील शैक्षणिक वर्ष सन 2020-21 च्या CBCS Pattern च्या Core Course साठी 'राजकीय विचारप्रणालीचा परिचय' हा अभ्यासक्रम सत्र-4 साठी अभ्यासला जाणार आहे. 'राजकीय विचारप्रणाली' हा राज्यशास्त्राचा अविभाज्य घटक आहे. राज्यशास्त्र बी.ए.भाग-2 सत्र-4 मध्ये या चार प्रकरणांचा अभ्यास करणार आहोत. प्रकरण 1 'मार्क्सवाद' यामध्ये ऐतिहासिक भौतिकवाद, मार्क्सवादी राज्य व नव मार्क्सवाद' हे उपघटक शिकणार आहोत. प्रकरण 2 'फुले-आंबेडकरवाद' या विचारप्रणालीमध्ये समता, जात आणि धर्म व लोकशाही याविषयी महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर यांचे विचार शिकणार आहे. प्रकरण 3 'गांधीवाद महात्मा गांधींचे सत्य आणि अहिंसा, ग्राम स्वराज्य सिद्धान्त, सभागृह हे उपघटक अभ्यासणार आहोत. प्रकरण 4 'स्त्रीवाद' मध्ये स्त्रीवादाचा अर्थ व स्वरूप, उदारमतवादी स्त्रीवाद, भारतातील स्त्रीवाद, विशेष संदर्भ: जात आणि पितृसत्ता यांच्या संदर्भात हे उपघटक अभ्यासणार आहोत.

Rajkiya Vicharpranalicha Parichay SYBA Third Semester - SPPU: राजकीय विचारप्रणालीचा परिचय एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ३ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Dr. Pradeep Deshpande Prof. Pramod Rajendra Tambe

द्वितीय वर्ष कला राज्यशास्त्र सामान्य स्तरावरील शैक्षणिक वर्ष 2020-21 च्या CBCS Pattern च्या Core Course म्हणून 'राजकीय विचारप्रणालीचा परिचय' हा अभ्यासक्रम सत्र 3 साठी शिकविला जाणार आहे. अभ्यासक्रमातील सत्र तीनमध्ये आपण चार प्रकरणांचा अभ्यास करणार आहोत. यात पहिले प्रकरण 'विचारप्रणाली' असून यात विचारप्रणालीचा उगम, अर्थ, व्याख्या, विचारप्रणालीचे स्वरूप व व्याप्ती या उपघटकांशिवाय 'विचारप्रणालीची भूमिका' आणि 'विचारप्रणालीचा अंत' हे दोन घटक आपण शिकणार आहोत. प्रकरण दुसरे 'राष्ट्रवाद' असून यात आपण राष्ट्रवादाचा अर्थ, निर्मिती व विकास, राष्ट्रवादाच्या व्याख्या व स्वरूप, राष्ट्रवादाचे घटक, पुरोगामी राष्ट्रवाद, प्रतिक्रियात्मक राष्ट्रवाद, आंतरराष्ट्रीय वाद हे उपघटक शिकणार आहोत. प्रकरण तिसरे ‘लोकशाही समाजवाद' या विचारप्रणाली अंतर्गत लोकशाही समाजवादाचा अर्थ, स्वरूप, वैशिष्टये याचप्रमाणे लोकशाही समाजवादाची यशप्राप्ती व मर्यादा, समाजवादी राज्य, समाजवादाचे मुख्य विचारप्रवाह व प्रकार यांचा अभ्यास करणार आहोत. प्रकरण चौथे ‘फॅसिझम' या विचारप्रणाली अंतर्गत आपण फॅसिझमचा अर्थ, व्याख्या, तत्त्वज्ञान, फॅसिझमच्या उदयाची कारणे या संकल्पना शिकणार आहोत.

Rajkiya Vruttankan-1 First Semester FYBA New NEP Syllabus - RTMNU: राजकीय वृत्तांकन-१ पहिले सत्र एफ.वाय.बी.ए. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Prof. Dr. Pravin Shriram Bhagdikar

‘राजकीय वृत्तांकन-१’ या पुस्तकात राजकीय वार्तांकन म्हणजे काय, त्याची व्याप्ती, स्वरूप आणि महत्त्व काय आहे याची माहिती दिली आहे. राजकीय बातमी कशी तयार करायची, त्यासाठी कोणती कौशल्ये आवश्यक आहेत आणि एका राजकीय पत्रकाराची जबाबदारी काय असते, याची माहिती यात आहे. या पुस्तकात पत्रकारितेतील नैतिक मूल्ये, नियम आणि कायदे यांवर जोर देण्यात आला आहे. तसेच, संसद आणि न्यायपालिका यांसारख्या विविध राजकीय संस्थांचे वार्तांकन कसे करायचे, याची माहिती दिली आहे. पुस्तकात वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य, जबाबदारी आणि लोकशाहीमध्ये माध्यमे काय भूमिका निभावतात, याची माहिती दिली आहे.

Rajkiya Vruttankan-2 Second Semester FYBA New NEP Syllabus - RTMNU: राजकीय वृत्तांकन-२ दुसरे सत्र एफ.वाय.बी.ए. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Prof. Dr. Pravin Shriram Bhagdikar

‘राजकीय वृत्तांकन-२’ या पुस्तकात राजकीय पत्रकारितेच्या तत्त्वांवर प्रकाश टाकते आणि राजकीय वृत्तांकन करताना आवश्यक असलेल्या प्रक्रियांवर भर देते. यात अंदाजपत्रक, संसदीय कामकाज, राजकीय सभा, नेत्यांच्या भेटी, मुलाखती आणि निवडणूक प्रचारासारख्या घटनांचे वृत्तांकन कसे करावे याचे मार्गदर्शन दिले आहे. माहिती संकलन, प्रत्यक्ष भेट, साक्षीदारांची मुलाखत, तथ्य तपासणी आणि वृत्त अहवालाचा मांडणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. राजकीय वृत्तांकन करताना वस्तुनिष्ठता, जबाबदारी आणि पारदर्शकता कशी राखावी यावर भर दिला आहे. रेडिओ, टीव्ही आणि प्रिंट माध्यमांमध्ये राजकीय बातम्या संकलित करताना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो आणि योग्य अहवाल तयार करण्यासाठी कोणत्या रणनीती आवश्यक आहेत याचे विश्लेषणही पुस्तकात केले आहे. निवडणूक वार्तांकन आणि प्रसारमाध्यमांच्या जबाबदारीवर विशेष भर दिला आहे​.

Rajkumarichi Savali

by Divakar Bapat

The story of a Princess Vasumati. She was young around 4 to 5 years. She manages to escape from the house and realizes that somebody is playing with her, morning it was lengthy. little later she becomes small. She did not know that it was her shadow. Later her mummy and daddy explain it to her.

Rajputra Dudha Ka Pit Nahi

by Shekhar Shiledar

When the son was born to the king he ordered that all the new born children will be under the care of the kingdom. They were supplied with milk daily. One day the king’s son stopped taking his milk and the king was worried. Later they came to know that he was not taking milk because he realized that there was child who did not get milk that day. So the people go searching for the child and they bring him to the palace. They feed him and the king's son also takes the milk.

Rajputra Munir Shah

by Shekhar Shiledar

This is a story of Prince Munirshah from Sham. He wanted to marry Husnabano but there was a condition of answering seven questions. He meets Hatimtai and Hatimtai promise him to help him solve the Mystery of the seven questions.

Raju Aani Bhajya

by Venkatramana Gowda

शाळेत जाताना राजूला रस्त्यात कोण भेटले ? हिरव्या भाज्या. पण त्या शाळेत का चालल्या होत्या? वाचा राजू आणि भाज्यामध्ये.

Rajuche Swapn

by Dinakar Borikar

There was a skilled worker Raju in a goldsmiths’ shop. He went to sleep while he was given a responsible job of a king. While sleeping, he was in a dream and the same time he was waked up by the king. The king was curious to know the dream. Raju marries the princess and later he tells his dream to the king.

Rajyashasan Ani Rajkaran SYBA Fourth Semester - RTMNU: राज्यशासन आणि राजकारण बी.ए. द्वितीय वर्ष चतुर्थ सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Prof. R.J. Lote

विद्यापीठ अनुदान आयोगाने ठरवून दिलेल्या ध्येय-धोरणानुसार राज्यशासन आणि राजकारण (State Government & Politics) हे बी. ए. द्वितीय वर्षः चतुर्थ सेमिस्टर करिता या वर्गासाठी मराठी भाषा अभ्यासमंडळाने संपादित केले आहे. पदवी आणि पदव्युत्तर पातळीवर दर्जेदार, उच्चप्रतीचे, व्यवसायाभिमुख आणि सर्वव्यापी शिक्षण दिले जावे याकरिता केंद्र सरकारच्या मानव संसाधन आणि विकास मंत्रालयाने तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाने जी मार्गदर्शक तत्त्वे आणि धोरण निश्चित केले आहे त्याची मातृभाषेशी आणि वाङ्मयाशी योग्य सांगड घालण्याचे धोरण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अत्यंत विचारपूर्वक आणि दूरगामी स्वरूपात स्वीकारलेले आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनाचे यथार्थ मूल्यमापन करण्याच्या व त्यांच्या ज्ञानकक्षा विस्तारित करण्याच्या उद्देशाने आवश्यक ते बदल करण्याचा योग्य निर्णयही घेतलेला आहे. त्याच दृष्टिकोनातून मराठी भाषा अभ्यासमंडळाच्या मार्गदर्शनाखाली राज्यशासन आणि राजकारण (State Government & Politics) या पाठ्यपुस्तकाची निर्मिती पाठ्यपुस्तक समितीने केली आहे. पाठ्यपुस्तकामध्ये युनिट १ - केंद्र-राज्य संबंध आणि राज्यपाल (Centre-State Relations and Governor), युनिट २ - राज्य विधिमंडळ (State Legislature), युनिट ३ - मुख्यमंत्री आणि उच्च न्यायालय (Chief Minister and High Court) आणि युनिट ४ - पंचायत राज आणि माहितीचा अधिकार (Panchayat Raj and Right to Informations) इत्यादींचा अभ्यासक्रम दिला आहे.

Rajyashastra class 11 - Maharashtra Board: राज्यशास्त्र इयत्ता अकरावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

राज्यशास्त्र इयत्ता अकरावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. पाठ्यपुस्तकामध्ये चार विभाग केले आहेत - राजकीय संकल्पना, तुलनात्मक शासनसंस्था, लोकप्रशासन आणि आंतरराष्ट्रीय संबंध, या प्रत्येक विभागाची सुरुवात त्या संबंधित विषयाच्या प्रस्तावनेने करण्यात आलेली आहे. या क्षेत्रांतील महत्त्वाच्या संकल्पनांची तोंडओळख करून देणे हा यामागील उद्देश आहे. या सर्व संकल्पना भारताच्या संदर्भात अभ्यासायच्या आहेत. अध्ययन अधिक सुलभ, रंजक व कृतीयुक्त होण्यासाठी तुम्हाला माहितीपर चौकटी, विविध कृती विषयाच्या प्रस्तावनेने स्पष्ट करण्यात आलेली आहे.

Rajyashastra class 12 - Maharashtra Board: राज्यशास्त्र इयत्ता बारावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

राज्यशास्त्र इयत्ता बारावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. बारावीच्या पाठ्यपुस्तकात जगातील इ.स.१९९१ पासूनच्या समकालीन घटनांचा निर्देश आहे. त्यात जगातील १९९१ पासूनच्या विविध घटनांचे स्थान तसेच जागतिकीकरणाच्या संदर्भात ज्या संकल्पना विविध चर्चेतून उदयाला आल्या त्यांचा परिचय करून देण्यात आला आहे. पर्यावरण, शाश्वत विकास, गरिबी आणि लिंगभावासारखे मानवी प्रश्न इत्यादींचा या पाठ्यपुस्तकात समावेश आहे. त्यासोबतच राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने तसेच त्याबाबतची चिंता आणि त्याचे महत्त्व भारताच्या संदर्भात अभ्यास करणार आहोत.

Rajyashastra Digest class 11 - Maharashtra Board Guide: राज्यशास्त्र डाइजेस्ट इयत्ता 11वी - महाराष्ट्र बोर्ड मार्गदर्शन

by Shri Navneet

राज्यशास्त्र इयत्ता 11वी चे पुस्तक नवनीत एज्युकेशन लिमिटेडने मराठी भाषेमध्ये प्रकाशित केलेले आहे, या मार्गदर्शकाची (१) राजकीय संकल्पना, (२) तुलनात्मक शासन आणि राजकारण, (३) लोकप्रशासन आणि (४) आंतरराष्ट्रीय संबंध या चार विभागांत विभागणी करण्यात आली आहे. या मार्गदर्शकातील प्रत्येक प्रकरणात सुरुवातीला महत्त्वाच्या मुद्द्यांचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. प्रस्तुत मार्गदर्शकात वस्तुनिष्ठ, लघूत्तरी व दीर्घोत्तरी अशा सर्व प्रकारच्या प्रश्नांचा समावेश केलेला असून, त्यांची सुबोध भाषेत मुद्देसूद, समर्पक व आदर्श उत्तरे देण्यात आली आहेत. अभ्यासक्रमात आणि पाठ्यपुस्तकात नव्याने समाविष्ट केलेल्या उपयोजनात्मक प्रश्न व त्या प्रश्नांची समर्पक उत्तरे यांचा प्रत्येक प्रकरणात समावेश करण्यात आला आहे.

Rajyashastracha Parichay-1 First Semester FYBA New NEP Syllabus - SPPU: राज्यशास्त्राचा परिचय-१ प्रथम सत्र एफ.वाय.बी.ए. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Prajakta Balwantarao Thube

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 अंतर्गत ‘राज्यशास्त्राचा परिचय-1’ हा प्रथम वर्ष बी.ए. (FYBA) अभ्यासक्रम समाविष्ट आहे. या अभ्यासक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना राज्यशास्त्राची व्याख्या, स्वरूप, व्याप्ती आणि पारंपरिक व आधुनिक दृष्टिकोनांचा परिचय करून देणे हा आहे. राज्य, शासनसंस्था, कायदे आणि राजकीय सिद्धांतांचे सखोल ज्ञान प्रदान करून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी तयार करणे आणि त्यांचे राजकीय विज्ञानाविषयीचे ज्ञान वृद्धिंगत करणे हे त्याचे प्रमुख हेतू आहेत. अभ्यासक्रमामध्ये राज्यशास्त्राची व्याप्ती, राज्याचा विकास, आणि राज्याच्या घटकांचा सविस्तर अभ्यास समाविष्ट आहे.

Rajyashastracha Parichay 2 Paper 2 SYBA Fourth Semester - SPPU: राज्यशास्त्राचा परिचय २ पेपर २ एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ४ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Pramod Rajendra Tambe Omkar Ankush Koravle Shekhar Rajendra Sonar

शैक्षणिक वर्ष 2020-2021 च्या बदललेल्या अभ्यासक्रमानुसार द्वितीय वर्ष कला शाखेसाठी राज्यशास्त्र सामान्य स्तर पेपर - 2 (G2) CC-1D (3) साठी ‘राज्यशास्त्राचा परिचय' या विषयाचे अध्ययन केले जाणार आहे. सत्र 4 साठी राज्यशास्त्राचा परिचय या विषयामध्ये एकूण चार प्रकरणांचा अभ्यास करणार आहोत. यात पहिले प्रकरण हे मूलभूत राजकीय मूल्ये हे असून यामध्ये स्वातंत्र्य संकल्पना, स्वातंत्र्याचे प्रकार, स्वातंत्र्याचे संरक्षक घटक 'समता', समतेचे प्रकार, समतेपुढील आव्हाने, न्याय संकल्पना, व्यायाचे प्रकार हे अभ्यासणार आहोत. प्रकरण दोन हे हक्क/अधिकार हे असून यामध्ये आपण हक्काच्या व्याख्या आणि अर्थ, प्रकार व हक्कांसमोरील आव्हाने अभ्यासणार आहोत. प्रकरण तीनमध्ये आपण राजकीय विचारप्रणालीचा अभ्यास करणार आहोत यात राष्ट्रवाद, समाजवाद, फॅसिस्टवाद या विचारप्रणाली आहेत. प्रकरण चारमध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेची संरचना, कार्ये आणि आव्हाने, प्रादेशिक आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये युरोपियन संघ (EU), सार्क, ओपेक, नाटो यांची ओळख करून घेणार आहोत. तसेच बहुराष्ट्रीय कंपन्या ही राजकीय संकल्पना म्हणून अभ्यासणार आहोत.

Rajyashastracha Parichay Paper 2 SYBA Third Semester - SPPU: राज्यशास्त्राचा परिचय पेपर २ एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ३ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Pramod Rajendra Tambe

शैक्षणिक वर्ष 2020-2021 एस.वाय.बी.ए. सत्र-3 च्या राज्यशास्त्र सामान्य स्तर पेपर-2 CBCS पॅटर्नच्या Core Course (CC-1C (3)) साठी राज्यशास्त्राचा परिचय या विषयाचे अध्ययन केले जाणार आहे. राज्यशास्त्राचा परिचय या अभ्यासक्रमाच्या सत्र तीनमध्ये आपण एकूण चार प्रकरणांचा अभ्यास करणार आहोत. यात पहिले प्रकरण हे 'राज्यशास्त्राचा अभ्यास' हे असून यामध्ये राज्यशास्त्राच्या व्याख्या, स्वरूप आणि व्याप्तीचा अभ्यास करणार आहोत. दुसरे प्रकरण ‘राज्यशास्त्राच्या अभ्यासाचे दृष्टिकोन' हे असून यामध्ये राज्यशास्त्राच्या आदर्शवादी, अनुभववादी आणि स्त्रीवादी दृष्टिकोनासोबत ऐतिहासिक व वर्तनवादी दृष्टिकोनाचा अभ्यास आपण करणार आहोत. तिसरे प्रकरण 'राज्यशास्त्रातील मूलभूत संकल्पना' हे आहे. यामध्ये राज्य, बाजार व नागरी समाज या राज्यशास्त्रातील मूलभूत संकल्पनांचा अभ्यास करणार आहोत. या सत्रातील शेवटचे प्रकरण म्हणजे 'लोकशाही' यामध्ये लोकशाहीच्या व्याख्या, उदय, व्याप्ती याचबरोबर लोकशाहीच्या प्रातिनिधिक, चर्चात्मक आणि सहभागात्मक या सिद्धान्तांचे अध्ययन करणार आहोत.

Rajyashastrachi Olakh-2 Second Semester FYBA New NEP Syllabus - SPPU: राज्यशास्त्राची ओळख-२ दुसरे सत्र एफ.वाय.बी.ए. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. R. D. Varadkar Dr Pramod Rajendra Tambe

‘राज्यशास्त्राची ओळख-2’ हे पुस्तक राज्यशास्त्राच्या विविध संकल्पना आणि त्यांच्या उपयोजनांवर आधारित आहे. यामध्ये राज्य, सार्वभौमत्व, लोकशाही, अधिकार व कर्तव्ये, शासनप्रणाली, आणि संविधान यांसारख्या मूलभूत विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली आहे. भारतीय राज्य घटनेतील महत्त्वाचे मुद्दे, केंद्र-राज्य संबंध, न्यायपालिका आणि विधिमंडळ यांचे कार्य व महत्त्व स्पष्ट केले आहे. याशिवाय, राज्यशास्त्रातील विचारवंतांचे सिद्धांत, जागतिक राजकारणातील बदल, आंतरराष्ट्रीय संबंध आणि राजकीय विचारधारेचे महत्त्व अधोरेखित केले आहे. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमाला पूरक ठरतील अशा प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात माहिती दिलेली आहे. पुस्तकात सादर केलेल्या आकृत्या आणि तक्त्यांद्वारे विषय सुलभ व समजण्यास सोपा करण्यात आला आहे. भारतीय लोकशाहीची वैशिष्ट्ये आणि आंतरराष्ट्रीय राजकीय घटनांचे महत्त्व समजण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरते.

Rakshas Chor Ani Brahman

by B. V. Phatak

There was Brahmin named drone. who was a righteous man and he had two cows. One day a thief and giant man come to brahmin house. The thief wanted to take the cows first and the giant man wanted to kill the Brahmin first, so they started to quarrel and the neighbor wakes up. They ran away and their plan fails.

Rakshas Mitra

by Surakha Panandikar

Suri and her friends wanted to take part in a kite flying competition. Their kite had entangled on a tree in a nearby bungalow. There was a watchman whom they used to call giant. They decided to send Suri to bring the kite from him. Suri manages to convince the watchman and she also presents him one doll for his daughter Kamla. They win the competition and share their sweets with each other.

Refine Search

Showing 1,101 through 1,125 of 1,529 results