Browse Results

Showing 1,126 through 1,150 of 1,469 results

Saitan: सैतान

by Narayan Dharap

“खिडकीच्या काचेबाहेरून दोन मोठे, काळेभोर डोळे तिच्याकडे रोखून पाहत होते. त्या एकाग्र नजरेत अशी काही शक्ती होती की, लताला आपली नजर त्यांच्यावरून काढताच येत नव्हती. ती नजर एखाद्या गिरमिटासारखी तिच्या मेंदूचा, तिच्या मनाचा छेद घेत घेत पार तिच्या आत्म्यापर्यंत पोहोचत होती आणि लताला दिसत होतं की, बाहेर होतं ते काही कोणी माणूस नव्हतं, एवढंच नाही, ते जिवंतही नव्हतं. भयाच्या कडेवर मेंदू लटपटत असतानाही ते काय आहे हे तिला समजत होतं.- ती एक बाहुली होती. गारगोट्यांसारख्या मोठ्या मोठ्या डोळ्यांची, लाललाल ओठांची, गोबऱ्या गालाची ती बाहुली होती. पण आता चेहऱ्याचा डावीकडचा भाग जळून, होरपळून, वितळून विकृत झाला होता. एक गालही आत बसला होता. पण ते डोळे! ते जिवंत होते! ते तीव्र भावनांनी लवलवत होते! ती नजर तिचा मेंदू जाळत खोलवर पोहोचत होती. पुन्हा एकदा ती कुजबुज आली. भुश्यात पाणी जिरावं तशी ती कुजबुज तिच्या सर्व शरीरात भिनली. पण ते काही शब्द असले तर तिला ते नीट उमगले नाहीत, त्यांचा अर्थही ध्यानात आला नाही.''

Sakaratmak Manasashastra Paper 2 SYBA Fourth Semester - SPPU: सकारात्मक मानसशास्त्र पेपर २ एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ४ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Anuradha Prashant Harkare

द्वितीय वर्ष कला या अभ्यासक्रमांतर्गत सामान्य मानसशास्त्राच्या नवीन अभ्यासक्रमानुसार तयार केलेले हे पाठ्यपुस्तक आहे. केवळ विद्यार्थीच नव्हे तर ज्यांना मानसशास्त्र आवडते त्या सर्वांना जीवनात सकारात्मकतेचे महत्त्व समजेल. आजमितीला सर्वांनाच अनिश्चितता, दहशतवाद, जागतिक स्तरावरील स्पर्धा, चिंता, संताप, शोषण इत्यादी नकारात्मक बाबींचा सामना करावा लागत आहे. त्या अनुषंगाने सकारात्मकता अंगी बाणविणे किती महत्त्वाचे आहे याबाबत जागरूकता निर्माण करणे प्राधान्याचे असल्याने ‘सकारात्मक मानसशास्त्र’ हा विषय अभ्यासण्याची निकड निर्माण झाली आहे. या विषयाचा अंतर्भाव निश्चितच स्वागतार्ह आहे. जागतिक स्तरावरील 'कोविड-19' या महामारीची परिस्थिती पाहता सकारात्मक मानसशास्त्र या विषयावर आधारित हे पुस्तक अगदी योग्य वेळी आले आहे असे म्हणायला हरकत नाही.

Sakaratmak Vicharanche Samarthya: सकारात्मक विचारांचे सामर्थ्य

by Norman Vincent Peale

द सिक्रेट या पुस्तकाच्या अगोदर आलेला द पॉवर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग या पुस्तकामुळे हजारो लोकांना परिपूर्ण जीवन प्राप्त होण्यास मदत झाली आहे. अभूतपूर्व विक्रमी खपाच्या या पुस्तकात डॉ. पील श्रद्धेची शक्ती कशी काम करते ते दाखवून देतात. या पुस्तकातील व्यवहारोपयोगी तंत्रांचा वापर केल्याने तुमचे आयुष्य उत्साहाने भरून जाईल. तुमच्या आशा-आकांक्षांना पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेला पुढाकार तुम्ही घेऊ शकाल. तुम्ही सिकाल की- सर्वोत्तमाची अपेक्षा कशी बाळगावी व ते कसे मिळवावे, तुम्ही हाती घेतलेल्या प्रत्येक गोष्टीवर व स्वतःवर विश्वास करता ठेवावा, तुमच्या ध्येयसिद्धीसाठी शक्ती कशी विकसित करावी, चिंता करण्याची सवय सोडून ताणमुक्त जीवन कसे जगावे, वैयक्तिक आणि व्यावसायिक संबंध कसे सुधारावेत, तुमच्या परिस्थितीवर काबू कसा मिळवावा आणि स्वतःबद्दल दयाळू कसे बनावे.

Samagra Ekankika FYBA - SPPU: समग्र एकांकिका एफ.वाय.बी.ए. - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Premanand Gajvi

या एकांकिकांविषयी कोणतेही भाष्य करणं उचित ठरणार नाही. हा कलावंतांचा, रसिकांचा अधिकार. तरीही एक सांगितलं पाहिजे. "घोटभर पाणी' ही एकच एकांकिका प्रेमानंद गज्वीनी लिहिली असती नि नंतर काहीच लिहिलं नसतं तरी गज्वीचं नाव मराठी नाटयवाङ्मयाच्या इतिहासात सन्मानानं घेतलं गेलं असतं." असं म्हटलं गेलंय. अशा या एकांकिकेचे एकूण ३००० प्रयोग झाले असून ४५७ पारितोषिकं तिला प्राप्त झाले आहेत. या एकांकिकेचा इंग्रजीसह सर्व भारतीय भाषात अनुवाद झालेला आहे. आता पर्यंत लिहिलेल्या सोळा एकांकिका या पुस्तकात समग्र स्वरुपात प्रकाशित होत आहेत.

Samajashastriya Vicharatil Pramukh Pravah Bhag 1: समाजशास्त्रीय विचारातील प्रमुख प्रवाह भाग १

by Hemkant Venkatesh Balakundi

समाजशास्त्रीय विचारांतील प्रमुख प्रवाह हा रेमंड ऑरॉं या फ्रान्समधील विचारवंताच्या ग्रंथाचा श्री. हेमकांत वेंकटेश बलकुंदी यांनी केलेला मराठी अनुवाद आहे. परभाषेतील अभिजात / मौलिक पुस्तकांचा अनुवाद करून तो मराठी वाचकांना उपलब्ध करून देणे हे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या उद्दिष्टांपैकी एक उद्दिष्ट आहे व या उद्दिष्टाला अनुसरून या पुस्तकाचा हा अनुवाद आहे. अलीकडच्या काळात माणसाचे जीवन इतके समस्याग्रस्त झालेले आहे की, माणसाचे जीवन समजून घेण्यासाठी ज्या परिस्थितीत त्याची जडणघडण झालेली आहे ती परिस्थितीदेखील समजून घेणे आवश्यक ठरले आहे. या दृष्टीनेही या ग्रंथाची उपयुक्तता आहे.

Samajik Karar: सामाजिक करार

by Vasant Bhagwant Karnik

झ्यां-झ्याक रूसो लिखित (SOCIAL CONTRACT) या ग्रंथाचा मराठी अनुवाद “सामाजिक करार” हे पुस्तक धार्मिक आणि भौतिक दोन्ही सत्ताधाऱ्यांना अधिक आक्षेपार्ह वाटले. सामाजिक कराराची कल्पना मान्य केली म्हणजे राजांच्या दैवी अधिकाराला स्थानच उरत नाही; राजसत्तेचा नैतिक पाया नष्ट होतो. म्हणून फ्रेंच राज्यकर्त्यांना ते पुस्तक फार भीतीदायक वाटले. पुस्तकाच्या वाचनामुळे लोकांच्या मनात क्रांतीच्या कल्पना स्फुरतील आणि बंडाचा वणवा पेटेल अशी त्यांना धास्ती वाटली. फ्रेंच राज्यकर्त्यांची ही धास्ती खोटी ठरली नाही. १७८९ साली फ्रेंच राज्यक्रांतीचा वडवानल पेटला तेव्हा क्रांतिकारकांच्या तोंडी होते ते रूसाचे नाव आणि त्यांची प्रेरकशक्ती होती ती त्याच्या सामाजिक करार या पुस्तकातील तत्त्वे व घोषणा! फ्रेंच राज्यक्रांतीच पाया जो घातला तो बुद्धिवादी विद्वानांनी घडवून आणलेल्या वैचारिक क्रांतीने; परंतु प्रत्यक्ष क्रांतीच्या दिवसात क्रांतिकारकांच्या मनावर अधिक पगडा होता तो रूसोच्या विचारांचा आणि त्याच्या मनोवृत्तीचा. क्रांतीच्या संगराच्या वेळी विवेकशील शुद्ध बुद्धीपेक्षा लोकांना हवी असते भावनोत्कट क्रियाशीलता. रूसोची मदार होती बुद्धीपेक्षा भावनेवर. त्यामुळे राज्यक्रांतीवर त्याचा अधिक प्रभाव पडला आणि क्रांतीचा अग्रदूत म्हणून त्याची जगभर ख्याती झाली.

Samajik Manasashastra SY BA Pune University

by M. N. Palsane Vidya Talvalkar

Samajik Manasashastra Marathi text book for Second year from The Pune Universtity in Marathi.

Samajik Manasashastra TYBA Fifth Semester - SPPU: सामाजिक मानसशास्त्र टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Mukund Inamdar Prof. Keshav Gadekar Dr Anita Patil

पुणे विद्यापीठाच्या मानसशास्त्र अभ्यासमंडळाने पदवी-द्वितीय वर्षाच्या सामाजिक-मानसशास्त्रच्या अभ्यासक्रमाची पुनर्रचना केलेली आहे. 'सामाजिक मानसशास्त्र' या पुस्तकात अभिवृत्ती, आंतरवैयक्तिक आकर्षण व समाजाभिमुख वर्तन या तीन प्रकरणांचा नव्याने समावेश केला आहे. तसेच ही सुधारित आवृत्ती संबंधित शिक्षक, विद्यार्थी व वाचक यांच्या गरजांची पूर्तता करेल, अशी आशा आहे.

Samajik Manasashastrachi Olakh FYBA Second Semester - SPPU: सामाजिक मानसशास्त्राची ओळख एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर २ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Anuradha Prashant Harkare

प्रथम वर्ष कला मानसशास्त्र या विषयाचा सुधारित अभ्यासक्रम 2019-20 या शैक्षणिक वर्षापासून लागू होत आहे. बदलत्या काळानुसार मानसशास्त्रासारख्या विषयातसुद्धा झपाट्याने बदल होत आहेत. त्यानुसार अभ्यासक्रमात बदल होणे गरजेचे होते. या अभ्यास क्रमावर आधारित सामाजिक मानसशास्त्राची ओळख पाठ्यपुस्तक विद्यार्थ्यांसाठी खुपच उपयोगी ठरणार आहे. भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या (Ministry of Human Resource Development-MHRD, Govt. of India) नव्या शैक्षणिक धोरणानुसार (New Education Policy-NEP) भारतात बदल घडवायचा असेल तर शिक्षण क्षेत्रात बदल करणे हा एक प्रभावी मार्ग आहे. त्याची सुरुवात या अभ्यासक्रमात झालेली दिसते. या बदलांमुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी आणि अधिक समृद्ध होईल याची खात्री वाटते. अभ्यासक्रमात एक महत्त्वाचा बदल केला आहे तो म्हणजे दुसऱ्या सत्रात 'सामाजिक मानसशास्त्राची ओळख' या विषयाचा समावेश. मानसशास्त्राच्या वेगवेगळ्या शाखांमधील सामाजिक मानसशास्त्र हा विषय व्यक्तीचे समाजनिष्ठ वर्तन समजून घेण्यासाठी तितकाच उपयुक्तसुद्धा आहे.

Samajik Sanstha Ani Badal FYBA Second Semester - SPPU: सामाजिक संस्था आणि बदल एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर २ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Dr. Vijay M. Jadhav

सामाजिक संस्था आणि बदल याबाबत अनेक संदर्भ ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. मात्र, हे पुस्तक सामाजिक मानसशास्त्रावर यावर प्रकाश टाकणारे एक उपयुक्त पुस्तक आहे. पुस्तकाच्या सुरूवातीला विविध सामाजिक संस्था जसे की कुटुंब, नातेसंबंध, विवाह, राजतंत्र, अर्थव्यवस्था यांची सम्यक आणि मुद्देसूद चर्चा करण्यात आलेली असून समाज परिवर्तन आणि बदलत्या सामाजिक स्थितीनुसार त्यांच्यात झालेले बदल यांची देखील चर्चा विस्तृत स्वरूपात करण्यात आलेली आहे. पुस्तकाच्या दुसऱ्या प्रकरणात धर्म, शिक्षण आणि प्रसारमाध्यमे या सामाजिक संस्थांचे मानवी जीवनातील आणि सामाजिक जीवनातील स्थान, महत्त्व इत्यादी स्पष्ट करण्यात आलेले आहे. धर्म, शिक्षण आणि प्रसारमाध्यमे ही व्यक्तीच्या सामाजिक जीवनात महत्वाच्या भूमिका बजावून व्यक्तीच्या सामाजिक जीवनात ते मार्गदर्शन करतात, त्याचे सविस्तर स्पष्टीकरण येथे देण्यात आलेले आहे. तर पुस्तकाच्या तिसऱ्या प्रकरणात सामाजिक बदल व या बदलांचे सहाय्यक घटक यांची सविस्तर चर्चा करण्यात आलेली असून या प्रकरणात आधुनिकीकरणाचा विकास व जागतिकीकरण यांची तपशीलवार चर्चा करण्यात आलेली आहे.

Samajik Sanstha Ani Parivartan FYBA Second Semester - SPPU: सामाजिक संस्था आणि परिवर्तन एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर २ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Sudhir Yevale Jyoti Suhas Gagangras

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जून 2019 पासून बदललेल्या नवीन अभ्यासक्रमानुसार श्रेयांक पद्धत व सेमिस्टर लागू केलेली असून एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर (II) करिता समाजशास्त्र विषयासाठी 'सामाजिक संस्था आणि परिवर्तन' हे क्रमिक पाठ्यपुस्तक तयार केलेले आहे. सेमिस्टर (II) करिता या अभ्यासक्रमात समकालीन अनेक मुद्द्यांचा समावेश केला आहे. पुस्तक वाचताना व अभ्यासताना उत्सुकता वाटेल व शंकांचे निरसनही होईल. पुस्तकामध्ये नवीन मुद्दे असल्याने त्यात शक्य होईल तितकी स्पष्टता आणण्याचा प्रयत्न केला आहे.

Samajik Thar: सामाजिक थर

by Sau. Sarla Karkhanis

अमेरिकेतील प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीचे समाजशास्त्रज्ञ मेल्विन एम्‌. ट्युमिन यांच्या ‘सोशल स्ट्रॅटिफिकेशन- द फॉर्म्स अँड फंक्शन्स ऑफ इन्इक्वॉलिटी’ या पुस्तकाचा हा अनुवाद ‘सामाजिक थर: विषमतेचे प्रकार व कार्य’ या नावाने प्रसिद्ध होत आहे. अनेक समाजसंशोधकांनी तयार केलेल्या प्रबंधाच्या आधारावर लेखकाने या पुस्तकात सामाजिक विषमतेचा प्रश्न सविस्तरपणे मांडला आहे. कार्ल मार्क्स व मॅक्स वेबर या दोन मूलग्राही विचारवंतांच्या दृष्टिकोनांचा, कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचा संयोग सामाजिक घडणीच्या आधुनिक अभ्यासकांच्या भूमिकेत आढळतो, असे लेखकाने प्रतिपादन केले आहे. लेखकाची मांडणी सरळ व सुस्पष्ट आहे आणि ती प्रत्यक्षावर-पहाणी व संशोधने यांवर आधारलेली आहे. त्यामुळे भारतीय समाज-अभ्यासकांना आपल्या अनुभवांशी त्यातील प्रतिपादने जोखून पाहणे शक्य होईल. पूर्वापार भारतीय समाजपद्धतीचाही उल्लेख लेखकाने अनेकदा केला आहे. आपल्या आजच्या बदलत्या परिस्थितीत त्यात होणारे फरक का व कसे होत आहेत याचा शोध घेण्यास या पुस्तकाचा मार्गदर्शनपर उपयोग होईल.

Samajik Vaad: सामाजिक वाद

by Vinayak Sitaram Sarwate

आज त्या जगापुढें सर्वांत महत्त्वाचा प्रश्न कामकरीवर्गाचा आहे. तिकडे हा वर्ग अठराव्या शतकांत यांत्रिक कारखान्यांच्या उत्पत्तीनंतर अस्तित्वांत आला. पहिल्यापासूनच त्याची स्थिति परवश, जुलुमानें गांजलेले, दीन, दरिद्री व कष्टमय राहत आली. शिक्षणाच्या व जागृताच्या अभावी त्यानें ती बरीच वर्षे निमूटपणें सहन केली. या पुस्तकांत सामाजिक वादाचा इतिहास देण्याचाच उद्देश असल्यानें, त्या वादांत अगदीं प्रारंभापासून आतांपावतों होत आलेल्या निरनिराळ्या रुपांतरांचें व मतांतराचें केवळ विवेचन मात्र यांत करण्यांत आलें आहे. या मतांवर घेतले जाणाऱ्या आक्षेपांचा किंवा त्यांना देण्यांत येणाऱ्या उत्तरांचा यांत विचार केलेला नाहीं.

Samajpurvak prapt Brahmcharya (Sankshipt): समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य (संक्षिप्त)

by Dada Bhagwan

ब्रह्मचर्य व्रत भगवान महावीरांनी दिलेल्या पाच महाव्रतांपैकी एक व्रत आहे. मोक्ष प्राप्तीसाठी ब्रह्मचर्य व्रत पाळावे लागते. अशी समज खूप लोकांना आहे.परंतु हा विषयभोग कशाप्रकारे चुकीचा आहे? किंवा त्यातून आपली सुटका कशी होऊ शकते? हे सर्व लोकांना माहित नाही. विषय हे आपल्या पाच इंद्रियांपैकी कोणत्याही इंद्रियाला आवडत नाही. डोळ्यांना पाहायला आवडत नाही. नाकाने सुंघायला आवडत नाही. जिभेने चाखायला आवडत नाही. पण तरी खरे ज्ञान नसल्यामुळे लोकं विषय विकारातच निरंतर बुडलेले असतात. कारण त्यांना त्याच्या जोखिमांची जाणीवच नाही. आपल्या हक्काच्या साथीसोबतच्या विषय भोगातही अगणित सूक्ष्म जीवांचा नाश होतो. आणि बिनहक्काच्या विषय भोगाचा परिणाम तर नर्क गतिच आहे. या पुस्तकाद्वारे आपल्याला ब्रह्मचर्य म्हणजे काय? त्याचे फायदे कोणते? ब्रह्मचर्य कसे पाळावे? विकारांपासून मुक्ति कशी मिळवावी? वगैरे सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.

Samajshastra class 11 - Maharashtra Board: समाजशास्त्र इयत्ता अकरावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

समाजशास्त्र इयत्ता अकरावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. पाठ्यपुस्तकामध्ये समाजशास्त्राची ओळख, पाश्चिमात्य आणि भारतीय समाजशास्त्रज्ञांचे योगदान तसेच समाजशास्त्रातील मूलभूत संकल्पना, सामाजिक संस्था, संस्कृती, सामाजीकरण, सामाजिक स्तरीकरण आणि सामाजिक परिवर्तन इत्यादींचा ऊहापोह करण्यात आला आहे. प्रत्येक घटकांअंती, नमुन्यादाखल प्रश्न दिले आहेत आणि संकल्पना चित्रे, स्वअभिव्यक्तीचे प्रश्न, उताऱ्यावरील प्रश्न यांचा समावेश करण्यात आला आहे.

Samajshastra class 12 - Maharashtra Board: समाजशास्त्र इयत्ता बारावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

समाजशास्त्र इयत्ता बारावी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकामध्ये काही माहिती चौकटीत दिली आहे. शिवाय प्रात्यक्षिकासाठी कृती करण्यास सुचवले आहे. तुमचे स्वयंअध्ययन सोपे व्हावे, त्यामध्ये रस निर्माण व्हावा यासाठी क्यूआर कोडचा उपयोग केला आहे आणि यामुळे तुमच्या क्रियाशील सहभागाला चालना मिळेल. या पाठ्यपुस्तकामुळे समाजशास्त्राच्या अभ्यासकास भारतीय समाजाचे अनेक स्तर आणि वैविध्यपूर्ण संस्कृती समजून घेणे सुलभ होईल. या पाठ्यपुस्तकात अधोरेखित भारतीय समाजाचे प्रभावी स्वरूप तुम्हाला आवडेल आणि तुम्ही भारतीय समाजाचे नवीन दृष्टिकोनातून आकलन करून घ्याल, अशी आम्हाला अपेक्षा आहे.

Samajshastra Digest class 11 - Maharashtra Board Guide: समाजशास्त्र डाइजेस्ट इयत्ता 11वी - महाराष्ट्र बोर्ड मार्गदर्शन

by Shri Navneet

समाजशास्त्र इयत्ता 11वी चे पुस्तक नवनीत एज्युकेशन लिमिटेडने मराठी भाषेमध्ये प्रकाशित केलेले आहे, या मार्गदर्शकाची (१) समाजशास्त्राची ओळख, समाजशास्त्रज्ञांचे योगदान आणि मूलभूत संकल्पना, (२) सामाजिक संस्था, (३) संस्कृती आणि सामाजीकरण, (४) सामाजिक स्तरीकरण आणि सामाजिक परिवर्तन या चार विभागांत विभागणी करण्यात आली आहे. या मार्गदर्शकातील प्रत्येक प्रकरणात सुरुवातीला महत्त्वाच्या मुद्द्यांचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. प्रस्तुत मार्गदर्शकात वस्तुनिष्ठ, लघूत्तरी व दीर्घोत्तरी अशा सर्व प्रकारच्या प्रश्नांचा समावेश केलेला असून, त्यांची सुबोध भाषेत मुद्देसूद, समर्पक व आदर्श उत्तरे देण्यात आली आहेत. अभ्यासक्रमात आणि पाठ्यपुस्तकात नव्याने समाविष्ट केलेल्या उपयोजनात्मक प्रश्न व त्या प्रश्नांची समर्पक उत्तरे यांचा प्रत्येक प्रकरणात समावेश करण्यात आला आहे.

Samajshastra Parichay FYBA First Semester- RTMNU: समाजशास्त्र परिचय बी.ए. प्रथम सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Prof. R. J. Lote

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जून २०१६ पासूनच्या सेमिस्टर पॅटर्नच्या नव्या अभ्यासक्रमानुसार बी.ए. प्रथम सेमिस्टरकरिता समाजशास्त्र परिचय हे पुस्तक आहे. ह्या पुस्तकाचे लेखन प्राध्यापक प्रा. रा. ज. लोटे तसेच मनोहर पिंपळापुरे अॅण्ड कं. पब्लिशर्स यांनी प्रकाशित केले आहे. पुस्तकामध्ये युनिट १ - समाजशास्त्राचा अर्थबोध (Understanding Sociology), युनिट २ - समाजशास्त्रातील मूलभूत संकल्पना (Basic Concepts in Sociology), युनिट ३ - सामाजीकरण (Socialization) आणि युनिट ४ - सामाजिक संरचना (Social Structure) इत्यादींचा अभ्यासक्रम पुस्तकामध्ये दिलेला आहे.

Samajshastra Vishay Ani Drushtikon FYBA Second Semester- RTMNU: समाजशास्त्र: विषय आणि दृष्टिकोन बी.ए. प्रथम वर्ष द्वितीय सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Dr Pradeep Aglave

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २०२०-२१ या शैक्षणिक सत्रापासून बी.ए. सत्र-१ आणि बी.ए. सत्र-२ च्या समाजशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमात काही बदल केला आहे. या नवीन अभ्यासक्रमानुसार प्रस्तुत पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बी.ए. सत्र-१ आणि बी.ए. सत्र-२ च्या अभ्यासक्रमानुसार लिहिले असले तरी महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठातील ‘समाजशास्त्र' किंवा 'समाजशास्त्र परिचय' या विषयाकरिता उपयुक्त आहे.

Samajshastracha Parichay Paper 1 FYBA First Semester - SPPU: समाजशास्त्राचा परिचय पेपर १ एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर १ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Jyoti Gagangras Prof. Dr. Sudhir Yevale

समाजशास्त्र अभ्यास मंडळाने प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी या अभ्यासक्रमाची निवड करताना खूप कष्ट व काळजी घेतलेली दिसते. मागील अभ्यासक्रमातील कालबाह्य बाबी काढून टाकून समकालीन सामाजिक बदलांचा विचार करूनच या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. सेठ/नेटसारख्या परीक्षा, स्पर्धा परीक्षा व इतर समाजशास्त्र विषय निवडून ज्या काही व्यावसायिक संधी विद्यार्थ्यांना आहेत त्यासाठी त्यांचा प्रवास सुकर व्हावा हाही या अभ्यासक्रमामागील उद्देश आहे. समाजशास्त्रातील वाढत्या संधी, संशोधन, आर्थिक, शिक्षण, कायदा, पत्रकारिता, औद्योगिक, राजकीय, सामाजिक यांतील समकालीन मुद्द्यांना या अभ्यासक्रमात समाविष्ट केले आहे. कुटुंब, नातेसंबंध याचे बदलते स्वरूप अधोरेखित करण्याचा प्रयत्नही झाला आहे. शिक्षक व विद्यार्थी यांना आकलन होईल अशा सोप्या व सरळ भाषेत हा अभ्यासक्रम मांडण्याचा प्रयत्न केला आहे. वापरले जाणारे पर्यायी शब्दही दिले आहेत.

Samajshastracha Parichaya FY. BA. Pune University

by DR Sudhir Yevle. Jyoti S. Gagangras

Samajshastracha Parichaya Marathi text book for First year from The Pune Universtity in Marathi.

Samajshastrachi Olakh FYBA First Semester - SPPU: समाजशास्त्राची ओळख एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर १ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Vijay M. Jadhav

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एफ.वाय.बी.ए. या शैक्षणिक वर्षासाठीच्या अभ्यासक्रमात या वर्षापासून सुधारणा करण्यात आली आहे. समाजशास्त्र (समाजशास्त्राची ओळख) या पेपरच्या अभ्यासक्रमात सुचविण्यात आलेल्या सुधारणांची जून २०१९ पासून अंमलबजावणी होत आहे. समाजशास्त्राची ओळख या पुस्तकाच्या सुरूवातीला समाजशास्त्र या विषयाची मूलभूत माहिती, समाजशास्त्रांतर्गत येणारे अभ्यासविषय त्याचप्रमाणे समाजशास्त्राचा उदय, समाजशास्त्रातील विविध क्षेत्रे, समाजशास्त्रातील रोजगारविषयक संधी याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. दुसऱ्या प्रकरणात समाज त्याचा अर्थ, व्याख्या, समाजाची वैशिष्ट्ये, समाजाचे स्थल-कालानुसार बदलत गेलेले प्रकार, त्याचप्रमाणे समूह, समूहाची संकल्पना, सामाजिक समूहाची वैशिष्ट्ये, समूहाचे महत्त्व याबाबत माहिती देण्यात आली आहे. तसेच समुदाय आणि सोशल नेटवर्किंग या संकल्पनांची देखील चर्चा प्रस्तुत प्रकरणात केली आहे. पुस्तकाच्या तिसऱ्या प्रकरणात संस्कृती, संस्कृतीचे प्रकार यांची देखील सविस्तर चर्चा करण्यात आलेली आहे. तसेच सामाजिक स्तरीकरण, स्तरीकरणाची वैशिष्ट्ये, स्तरीकरणाचे आधार, सामाजिक अपवर्जन, सामाजिक असमानता यांची देखील विस्तृत आणि तपशीलवार चर्चा प्रस्तुत प्रकरणात करण्यात आली आहे.

Samajshastriy Vicharanche Adhishthan SYBA Third Semester - RTMNU: समाजशास्त्रीय विचारांचे अधिष्ठान बी.ए. द्वितीय वर्ष तृतीय सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Prof. R. J. Lote

विद्यापीठ अनुदान आयोगाने ठरवून दिलेल्या ध्येय-धोरणानुसार समाजशास्त्रीय विचारांचे अधिष्ठान (Foundation of Sociological Thought)हे बी. ए. द्वितीय वर्षः तृतीय सेमिस्टर करिता या वर्गासाठी मराठी भाषा अभ्यासमंडळाने संपादित केले आहे. पदवी आणि पदव्युत्तर पातळीवर दर्जेदार, उच्चप्रतीचे, व्यवसायाभिमुख आणि सर्वव्यापी शिक्षण दिले जावे याकरिता केंद्र सरकारच्या मानव संसाधन आणि विकास मंत्रालयाने तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाने जी मार्गदर्शक तत्त्वे आणि धोरण निश्चित केले आहे त्याची मातृभाषेशी आणि वाङ्मयाशी योग्य सांगड घालण्याचे धोरण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अत्यंत विचारपूर्वक आणि दूरगामी स्वरूपात स्वीकारलेले आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनाचे यथार्थ मूल्यमापन करण्याच्या व त्यांच्या ज्ञानकक्षा विस्तारित करण्याच्या उद्देशाने आवश्यक ते बदल करण्याचा योग्य निर्णयही घेतलेला आहे. त्याच दृष्टिकोनातून मराठी भाषा अभ्यासमंडळाच्या मार्गदर्शनाखाली समाजशास्त्रीय विचारांचे अधिष्ठान (Foundation of Sociological Thought)' या पाठ्यपुस्तकाची निर्मिती पाठ्यपुस्तक समितीने केली आहे.

Samajshastriya Sankalpana Ani Samajik Prakriya FYBA First Semester - RTMNU: समाजशास्त्रीय संकल्पना आणि सामाजिक प्रक्रिया बी.ए. प्रथम सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Dr Rahul Bhagat Pradeep Aglave

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - २०२०' नुसार सत्र २०२२-२३ पासून बी. ए. प्रथम वर्ष सत्र-१ आणि सत्र-२ च्या समाजशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमात आमुलाग्र बदल केलेले आहेत. नवीन शैक्षणिक धोरणानुसार बदललेल्या अभ्यासक्रमावर आधारित 'समाजशास्त्रीय संकल्पना आणि सामाजिक प्रक्रिया' हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आले आहे. सदर पुस्तकात नवीन अभ्यासक्रमाचा पूर्णतः समावेश करण्यात आलेला आहे. प्रस्तुत पुस्तक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बी. ए. प्रथम वर्ष सत्र-१ साठी असले तरी महाराष्ट्रातील इतर विद्यापीठातील समाजशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना निश्चितच उपयोगी पडणारे आहे.

Samajshastriya Sankalpana Ani Samajik Prakriya FYBA Second Semester - RTMNU: समाजशास्त्रीय संकल्पना आणि सामाजिक प्रक्रिया बी.ए. प्रथम वर्ष द्वितीय सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Dr Rahul Bhagat Pradeep Aglave

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - २०२०' नुसार सत्र २०२२-२३ पासून बी. ए. प्रथम वर्ष सत्र-१ आणि सत्र-२ च्या समाजशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमात आमुलाग्र बदल केलेले आहेत. नवीन शैक्षणिक धोरणानुसार बदललेल्या अभ्यासक्रमावर आधारित 'समाजशास्त्रीय संकल्पना आणि सामाजिक प्रक्रिया' हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आले आहे. सदर पुस्तकात नवीन अभ्यासक्रमाचा पूर्णतः समावेश करण्यात आलेला आहे. प्रस्तुत पुस्तक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बी. ए. प्रथम वर्ष सत्र-२ साठी असले तरी महाराष्ट्रातील इतर विद्यापीठातील समाजशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना निश्चितच उपयोगी पडणारे आहे.

Refine Search

Showing 1,126 through 1,150 of 1,469 results