Browse Results

Showing 1,176 through 1,200 of 1,551 results

Sagali Ghare Devachi

by Shekhar Shiledar

One day Shekh Chilli was in sleep and he heard some boys talking about him and saying this is Shekh Chilli’s house. He thought to himself how much famous I am. But his father was a Kazi and taught everybody to say that all their property belongs to God. So they again said this is Allah’s house and we are his people. Shekh chili becomes angry and threatens these boys and says this is my house my father has built it.

Sahakar class 11 - Maharashtra Board: सहकार इयत्ता अकरावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

सहकार इयत्ता अकरावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. आपल्या सभोवताली सजीव सृष्टीमध्ये सहकार दिसून येतो. उच्च माध्यमिक स्तरावर ‘सहकार' या विषयाची निवड कला व वाणिज्य शाखेतील विद्यार्थी प्रथमत: करतात. सहकार ही एक नैसर्गिक मानवी प्रवृत्ती आहे. त्यामुळे या विषयाचे महत्त्व लक्षात घेऊन यासाठीचे अध्ययन करणे आवश्यक आहे. अभ्यासक्रमात समाविष्ट असलेल्या सर्व बाबींचा योग्य आणि सुसंबंध पद्धतीने या पुस्तकात समावेश केलेला आहे. अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना सहकाराचा इतिहास, सहकारी संस्थेची स्थापना, विविध व्यवसाय संघटना, सहकाराची तत्त्वे, सहकारी संस्थांचे महत्त्वाचे प्रकार इ. बाबत ज्ञान मिळवून त्याचा दैनंदिन जीवनात उपयोग करता यावा, यासाठी 'सहकार' विषयाच्या पाठ्यपुस्तकाची रचना सहज व सोप्या भाषेत करण्यात आली आहे.

Sahakar Class 12 - Maharashtra Board: सहकार इयत्ता बारावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून इयत्ता १२ वी कला व वाणिज्य शाखेसाठी ‘सहकार’ या विषयाच्या पुनर्रचित अभ्यासक्रमावर आधारित पाठ्यपुस्तक आहे. सहकाराचे मानवी समाजजीवनातील महत्त्व लक्षात घेऊन इयत्ता ११ वी मध्ये सहकाराचे प्राथमिक स्वरूपातील ज्ञान अभ्यासले आहे. त्यावरच आधारित इयत्ता १२ वीच्या अभ्यासक्रमात सहकारी संस्थांचे संघटन, सचिवाचा पत्रव्यवहार, सहकार आयुक्त व निबंधक, महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६०, सहकारी बँकांचा अभ्यास, सहकार शिक्षण व प्रशिक्षण आणि सहकार क्षेत्रापुढील आव्हाने हे घटक समाविष्ट करण्यात आले आहेत. या विषयाच्या घटकांची मांडणी महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६० व नियम १९६१ च्या अनुषंगाने करण्यात आली आहे. या कायद्यात वेळोवेळी दुरूस्त्या झाल्या असून ९७ वी सुधारणा व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम २०१३ अन्वये अनेक दुरूस्त्या करण्यात आल्या आहेत. या सुधारणांचा व दुरूस्त्यांचा विचार अभ्यासक्रमात करण्यात आला आहे.

Sahitya Sanvad Bhag 2 SYBA - RTMNU: साहित्य संवाद भाग २ बी.ए. द्वितीय वर्ष - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Dr Pradip Vitalkar Dr Zulfi Shaikh Dr Indrajit Akshay Kumar Kale Dr Pradip Vi Kale

विद्यापीठ अनुदान आयोगाने ठरवून दिलेल्या ध्येय-धोरणानुसार ‘साहित्य संवाद' हे बी. ए. भाग-२ या वर्गासाठी मराठी भाषा अभ्यासमंडळाने संपादित केले आहे. पदवी आणि पदव्युत्तर पातळीवर दर्जेदार, उच्चप्रतीचे, व्यवसायाभिमुख आणि सर्वव्यापी शिक्षण दिले जावे याकरिता केंद्र सरकारच्या मानव संसाधन आणि विकास मंत्रालयाने तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाने जी मार्गदर्शक तत्त्वे आणि धोरण निश्चित केले आहे त्याची मातृभाषेशी आणि वाङ्मयाशी योग्य सांगड घालण्याचे धोरण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अत्यंत विचारपूर्वक आणि दूरगामी स्वरूपात स्वीकारलेले आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनाचे यथार्थ मूल्यमापन करण्याच्या व त्यांच्या ज्ञानकक्षा विस्तारित करण्याच्या उद्देशाने आवश्यक ते बदल करण्याचा योग्य निर्णयही घेतलेला आहे. त्याच दृष्टिकोनातून मराठी भाषा अभ्यासमंडळाच्या मार्गदर्शनाखाली साहित्य संवाद' या पाठ्यपुस्तकाची निर्मिती पाठ्यपुस्तक समितीने केली आहे.

Sahitya Sanvad Bhag 3 TYBA - RTMNU: साहित्य संवाद भाग 3 बी.ए. तृतीय वर्ष - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Dr Pradip Vitalkar Dr Zulfi Shaikh Dr Indrajit Akshay Kumar Kale Dr Pradip Vi Kale

विद्यापीठ अनुदान आयोगाने ठरवून दिलेल्या ध्येय-धोरणानुसार साहित्य संवाद' हे बी. ए. भाग-३ (आवश्यक मराठी) या वर्गासाठी मराठी भाषा अभ्यासमंडळाने संपादित केलेले पाठ्यपुस्तक आपल्या स्वाधीन करताना मनोमन आनंद होत आहे. पदवी आणि पदव्युत्तर पातळीवर दर्जेदार, उच्चप्रतीचे, व्यवसायाभिमुख आणि सर्वव्यापी शिक्षण दिले जावे याकरिता केंद्र सरकारच्या मानव संसाधन आणि विकास मंत्रालयाने तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाने जी मार्गदर्शक तत्त्वे आणि धोरण निश्चित केले आहे त्याची मातृभाषेशी आणि वाङ्मयाशी योग्य सांगड घालण्याचे धोरण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अत्यंत विचारपूर्वक आणि दूरगामी स्वरूपात स्वीकारलेले आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनाचे यथार्थ मूल्यमापन करण्याच्या व त्यांच्या ज्ञानकक्षा विस्तारित करण्याच्या उद्देशाने आवश्यक ते बदल करण्याचा योग्य निर्णयही घेतलेला आहे. तशा प्रकारची पाठ्यपुस्तके यापूर्वीही विद्यापीठाने प्रकाशित केली आहेत. त्याच दृष्टिकोनातून मराठी भाषा अभ्यासमंडळाच्या मार्गदर्शनाखाली साहित्य संवाद: भाग-३' या पाठ्यपुस्तकाची निर्मिती पाठ्यपुस्तक समितीने केली आहे.

Sahitya Siddhant: साहित्य-सिद्धान्त

by Dr S. G. Malshe

रेने वेलेक आणि ऑस्टिन वॉरन लिखित “Theory of Literature” या ग्रंथाचे भाषांतर डॉ. स. गं. मालशे यांनी केलेला मराठी अनुवाद साहित्य संस्कृती मंडळातर्फे तो प्रकाशित केला गेला आहे. साहित्य-सिद्धान्त या पुस्तकात साहित्याची प्रकृती आणि प्रयोजन यांच्या चर्चेने ग्रंथाचा प्रारंभ होतो. साहित्यसिद्धान्त, साहित्येतिहास आणि साहित्यसमीक्षा या परस्परावलंबी प्रक्रियांतील भेद विशद केला आहे. सापेक्षतावाद आणि निरपेक्षतावाद हे दोन्ही समीक्षेच्या संदर्भात चुकीचे असून साहित्येतिहासापासून समीक्षेची फारकत करणे अशक्य आहे, ही गोष्ट आवर्जून मांडण्यात आली आहे. चरित्र, मनोविज्ञान, समाजविज्ञान आणि तत्त्वज्ञान यांचा साहित्याशी असलेला संबंध, तसेच पंचकलांच्या क्षेत्रांतील आंदोलनांचा साम्यसंबंध यांचा विचार बाह्यकेंद्री म्हणून गौण ठरविण्यात आलेला आहे. ‘साहित्यकृतीच्या अस्तित्वाचे स्वरूप’ या समस्येपासून अंतःकेंद्री विचाराला प्रारंभ होतो. श्रुतिसुभगता, लयबद्धता, प्रतिमासृष्टी, शैली, कथात्मक साहित्याचे स्वरूप आणि साहित्यप्रकार यांचे विवेचन झाल्यानंतर या सर्वांचे फलित असे मूल्यमापनविषयक महत्त्वाचे प्रकरण येते. या ग्रंथाचे शेवटचे प्रकरण साहित्येतिहासाच्या खऱ्याखुऱ्या स्वरूपावर प्रकाश टाकण्यासाठी व्यतीत झालेले आहे.

Sahityarang Bhag 1 FYBA First Semester- RTMNU: साहित्यरंग भाग १ बी.ए. प्रथम सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Dr Satyawan Meshram Dr Rajan Jaiswal Dr Zulfi S Pramod Munghate Dr Satyawan Me Munghate

विद्यापीठ अनुदान आयोगाची मार्गदर्शक तत्त्वे आणि बदलत्या काळाची आव्हाने ध्यानात घेऊन बी. ए. भाग-१ (आवश्यक मराठी) या वर्गासाठी मराठी भाषा अभ्यासमंडळाने ‘साहित्यरंग : भाग-१’ हे पाठ्यपुस्तक संपादित केले आहे. अध्ययन-अध्यापन प्रक्रियेचा केंद्रबिंदू असलेला विद्यार्थी, त्याचा सर्वांगीण विकास साधण्याच्या दृष्टीने, विद्यार्थ्यांची ज्ञानार्जन क्षमता आणि मूल्यमापन प्रक्रिया या दोहोंची सांगड घालण्याचा प्रयत्न या पाठ्यपुस्तकात केला आहे. भाषेच्या आकलनाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये समाजातील उच्चकोटीची मानव मूल्ये वृद्धिंगत व्हावी, राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक बांधिलकी, मानुषता, राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती, वैज्ञानिक दृष्टिकोन, पर्यावरण संरक्षण-संवर्धन, भूतदया इत्यादींची पेरणी व्हावी, विद्यार्थ्यांची मातृभाषा आणि वाङ्मयविषयक अभिरुची वाढीला लागावी त्यांना दर्जेदार व व्यवसायाभिमुख शिक्षण मिळावे याकरिता केंद्र सरकारच्या मानव संसाधन आयोगाने जी ध्येयधोरणे निश्चित केली आहेत त्या अनुषंगाने अभ्यासक्रम ठरविण्याचे धोरण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अत्यंत विचारपूर्वक स्वीकारलेले आहे.

Sahityarang Bhag 2 SYBA - RTMNU: साहित्यरंग भाग २ बी.ए. द्वितीय वर्ष - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Dr Rekha Vadikhaye Dr Pramod Munghate Dr Satyawan Meshram Dr Rajan Jaiswal Dr Shailendra Lende Dr Dattatraya Watmode Dr Venkatesh Potphode Dr Rajendra Naikwade Dr Milind Sathe Dr Sopandev Pise Dr Rakesh Kabhe Shri. Sachin Upadhyay

विद्यापीठ अनुदान आयोगाने निर्धारित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार बी. ए. भाग-२ (आवश्यक मराठी) या वर्गासाठी मराठी भाषा मंडळाने संपादित केलेले ‘साहित्यरंग: भाग-२' हे पाठ्यपुस्तक आहे. मराठी भाषेतील महत्त्वाच्या कलाकृतींची, वाङ्मयप्रकारांची, त्यातील प्रवाहांची आणि त्या प्रकाराला संपन्न करणाऱ्या परंपरेची ओळख व्हावी, हा उद्देश समोर ठेवून निवडण्यात आलेले हे घटक प्रातिनिधिक स्वरूपाचे आहेत. महाराष्ट्राला आणि मराठी भाषेला समृद्ध आणि वैभवशाली परंपरा लाभलेली आहे. तिच्या सामर्थ्याचा आणि मोठेपणाचा विद्यार्थ्यांना परिचय होऊन त्यांच्या ज्ञानकक्षांचा विस्तार व्हावा, या दृष्टीने पदवीच्या विद्यार्थ्यांची आकलनक्षमता ध्यानात घेऊन हा अभ्यासक्रम निश्चित करण्यात आला आहे.

Sahityarang Bhag 3 TYBA - RTMNU: साहित्यरंग भाग ३ बी.ए. तृतीय वर्ष - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Dr Rekha Vadikhaye Dr Pramod Munghate Dr Satyawan Meshram Dr Rajan Jaiswal Dr Shailendra Lende Dr Dattatraya Watmode Dr Venkatesh Potphode Dr Rajendra Naikwade Dr Milind Sathe Dr Sopandev Pise Dr Rakesh Kabhe Shri. Sachin Upadhyay

साहित्यसरितेला तिच्या वाटचालीत वेगवेगळ्या वळणांवर विविध प्रवाह येऊन मिळालेत, त्यामुळे आज तिचे स्वरूप व्यापक झाले आहे. या तिच्या विविध कालखंडातील रूपाची, त्यातील विविध वाङ्मयप्रकारांची आणि विविध प्रवाहांची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी, या दृष्टीने मध्ययुगीन कालखंडातील संत-पंत-तंत साहित्यातील काही घटकांबरोबरच आधुनिक मराठी साहित्यातील ललितबंध, एकांकिका, कथा, वैचारिक लेख, कविता, व्यक्तिचित्रे इत्यादींना या अभ्यासक्रमात स्थान देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची भाषिक क्षमता विकसित व्हावी, सामाजिक, सांस्कृतिक, राष्ट्रीय पातळीवरील परिस्थितीची चर्चा, चिकित्सा आणि चिंतन करण्याची क्षमता वाढीला लागावी, विद्यार्थी साहित्याचा आस्वादक व्हावा व त्याने प्राप्त केलेल्या ज्ञानाचे आणि जीवनमूल्यांचे त्याला जीवनव्यवहारात उपयोजन करता यावे, साहित्यातील मूल्यगर्भ विचारांचा परिचय होऊन त्याच्या विचारशक्तीला चालना मिळावी, या उद्देशाने या अभ्यासक्रमात दर्जेदार घटकांची निवड मंडळाने केली आहे. विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने ठरविण्यात आलेले, विद्यार्थिकेंद्रित शिक्षणाचे तसेच अभ्यासक्रमाचे पायाभूत उद्दिष्ट साधले जावे, या मुख्य हेतूने हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.

Saitan: सैतान

by Narayan Dharap

“खिडकीच्या काचेबाहेरून दोन मोठे, काळेभोर डोळे तिच्याकडे रोखून पाहत होते. त्या एकाग्र नजरेत अशी काही शक्ती होती की, लताला आपली नजर त्यांच्यावरून काढताच येत नव्हती. ती नजर एखाद्या गिरमिटासारखी तिच्या मेंदूचा, तिच्या मनाचा छेद घेत घेत पार तिच्या आत्म्यापर्यंत पोहोचत होती आणि लताला दिसत होतं की, बाहेर होतं ते काही कोणी माणूस नव्हतं, एवढंच नाही, ते जिवंतही नव्हतं. भयाच्या कडेवर मेंदू लटपटत असतानाही ते काय आहे हे तिला समजत होतं.- ती एक बाहुली होती. गारगोट्यांसारख्या मोठ्या मोठ्या डोळ्यांची, लाललाल ओठांची, गोबऱ्या गालाची ती बाहुली होती. पण आता चेहऱ्याचा डावीकडचा भाग जळून, होरपळून, वितळून विकृत झाला होता. एक गालही आत बसला होता. पण ते डोळे! ते जिवंत होते! ते तीव्र भावनांनी लवलवत होते! ती नजर तिचा मेंदू जाळत खोलवर पोहोचत होती. पुन्हा एकदा ती कुजबुज आली. भुश्यात पाणी जिरावं तशी ती कुजबुज तिच्या सर्व शरीरात भिनली. पण ते काही शब्द असले तर तिला ते नीट उमगले नाहीत, त्यांचा अर्थही ध्यानात आला नाही.''

Sakaratmak Manasashastra Paper 2 SYBA Fourth Semester - SPPU: सकारात्मक मानसशास्त्र पेपर २ एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ४ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Anuradha Prashant Harkare

द्वितीय वर्ष कला या अभ्यासक्रमांतर्गत सामान्य मानसशास्त्राच्या नवीन अभ्यासक्रमानुसार तयार केलेले हे पाठ्यपुस्तक आहे. केवळ विद्यार्थीच नव्हे तर ज्यांना मानसशास्त्र आवडते त्या सर्वांना जीवनात सकारात्मकतेचे महत्त्व समजेल. आजमितीला सर्वांनाच अनिश्चितता, दहशतवाद, जागतिक स्तरावरील स्पर्धा, चिंता, संताप, शोषण इत्यादी नकारात्मक बाबींचा सामना करावा लागत आहे. त्या अनुषंगाने सकारात्मकता अंगी बाणविणे किती महत्त्वाचे आहे याबाबत जागरूकता निर्माण करणे प्राधान्याचे असल्याने ‘सकारात्मक मानसशास्त्र’ हा विषय अभ्यासण्याची निकड निर्माण झाली आहे. या विषयाचा अंतर्भाव निश्चितच स्वागतार्ह आहे. जागतिक स्तरावरील 'कोविड-19' या महामारीची परिस्थिती पाहता सकारात्मक मानसशास्त्र या विषयावर आधारित हे पुस्तक अगदी योग्य वेळी आले आहे असे म्हणायला हरकत नाही.

Sakaratmak Vicharanche Samarthya: सकारात्मक विचारांचे सामर्थ्य

by Norman Vincent Peale

द सिक्रेट या पुस्तकाच्या अगोदर आलेला द पॉवर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग या पुस्तकामुळे हजारो लोकांना परिपूर्ण जीवन प्राप्त होण्यास मदत झाली आहे. अभूतपूर्व विक्रमी खपाच्या या पुस्तकात डॉ. पील श्रद्धेची शक्ती कशी काम करते ते दाखवून देतात. या पुस्तकातील व्यवहारोपयोगी तंत्रांचा वापर केल्याने तुमचे आयुष्य उत्साहाने भरून जाईल. तुमच्या आशा-आकांक्षांना पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेला पुढाकार तुम्ही घेऊ शकाल. तुम्ही सिकाल की- सर्वोत्तमाची अपेक्षा कशी बाळगावी व ते कसे मिळवावे, तुम्ही हाती घेतलेल्या प्रत्येक गोष्टीवर व स्वतःवर विश्वास करता ठेवावा, तुमच्या ध्येयसिद्धीसाठी शक्ती कशी विकसित करावी, चिंता करण्याची सवय सोडून ताणमुक्त जीवन कसे जगावे, वैयक्तिक आणि व्यावसायिक संबंध कसे सुधारावेत, तुमच्या परिस्थितीवर काबू कसा मिळवावा आणि स्वतःबद्दल दयाळू कसे बनावे.

Samagra Ekankika FYBA - SPPU: समग्र एकांकिका एफ.वाय.बी.ए. - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Premanand Gajvi

या एकांकिकांविषयी कोणतेही भाष्य करणं उचित ठरणार नाही. हा कलावंतांचा, रसिकांचा अधिकार. तरीही एक सांगितलं पाहिजे. "घोटभर पाणी' ही एकच एकांकिका प्रेमानंद गज्वीनी लिहिली असती नि नंतर काहीच लिहिलं नसतं तरी गज्वीचं नाव मराठी नाटयवाङ्मयाच्या इतिहासात सन्मानानं घेतलं गेलं असतं." असं म्हटलं गेलंय. अशा या एकांकिकेचे एकूण ३००० प्रयोग झाले असून ४५७ पारितोषिकं तिला प्राप्त झाले आहेत. या एकांकिकेचा इंग्रजीसह सर्व भारतीय भाषात अनुवाद झालेला आहे. आता पर्यंत लिहिलेल्या सोळा एकांकिका या पुस्तकात समग्र स्वरुपात प्रकाशित होत आहेत.

Samajashastriya Vicharatil Pramukh Pravah Bhag 1: समाजशास्त्रीय विचारातील प्रमुख प्रवाह भाग १

by Hemkant Venkatesh Balakundi

समाजशास्त्रीय विचारांतील प्रमुख प्रवाह हा रेमंड ऑरॉं या फ्रान्समधील विचारवंताच्या ग्रंथाचा श्री. हेमकांत वेंकटेश बलकुंदी यांनी केलेला मराठी अनुवाद आहे. परभाषेतील अभिजात / मौलिक पुस्तकांचा अनुवाद करून तो मराठी वाचकांना उपलब्ध करून देणे हे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या उद्दिष्टांपैकी एक उद्दिष्ट आहे व या उद्दिष्टाला अनुसरून या पुस्तकाचा हा अनुवाद आहे. अलीकडच्या काळात माणसाचे जीवन इतके समस्याग्रस्त झालेले आहे की, माणसाचे जीवन समजून घेण्यासाठी ज्या परिस्थितीत त्याची जडणघडण झालेली आहे ती परिस्थितीदेखील समजून घेणे आवश्यक ठरले आहे. या दृष्टीनेही या ग्रंथाची उपयुक्तता आहे.

Samajik Karar: सामाजिक करार

by Vasant Bhagwant Karnik

झ्यां-झ्याक रूसो लिखित (SOCIAL CONTRACT) या ग्रंथाचा मराठी अनुवाद “सामाजिक करार” हे पुस्तक धार्मिक आणि भौतिक दोन्ही सत्ताधाऱ्यांना अधिक आक्षेपार्ह वाटले. सामाजिक कराराची कल्पना मान्य केली म्हणजे राजांच्या दैवी अधिकाराला स्थानच उरत नाही; राजसत्तेचा नैतिक पाया नष्ट होतो. म्हणून फ्रेंच राज्यकर्त्यांना ते पुस्तक फार भीतीदायक वाटले. पुस्तकाच्या वाचनामुळे लोकांच्या मनात क्रांतीच्या कल्पना स्फुरतील आणि बंडाचा वणवा पेटेल अशी त्यांना धास्ती वाटली. फ्रेंच राज्यकर्त्यांची ही धास्ती खोटी ठरली नाही. १७८९ साली फ्रेंच राज्यक्रांतीचा वडवानल पेटला तेव्हा क्रांतिकारकांच्या तोंडी होते ते रूसाचे नाव आणि त्यांची प्रेरकशक्ती होती ती त्याच्या सामाजिक करार या पुस्तकातील तत्त्वे व घोषणा! फ्रेंच राज्यक्रांतीच पाया जो घातला तो बुद्धिवादी विद्वानांनी घडवून आणलेल्या वैचारिक क्रांतीने; परंतु प्रत्यक्ष क्रांतीच्या दिवसात क्रांतिकारकांच्या मनावर अधिक पगडा होता तो रूसोच्या विचारांचा आणि त्याच्या मनोवृत्तीचा. क्रांतीच्या संगराच्या वेळी विवेकशील शुद्ध बुद्धीपेक्षा लोकांना हवी असते भावनोत्कट क्रियाशीलता. रूसोची मदार होती बुद्धीपेक्षा भावनेवर. त्यामुळे राज्यक्रांतीवर त्याचा अधिक प्रभाव पडला आणि क्रांतीचा अग्रदूत म्हणून त्याची जगभर ख्याती झाली.

Samajik Manasashastra SY BA Pune University

by M. N. Palsane Vidya Talvalkar

Samajik Manasashastra Marathi text book for Second year from The Pune Universtity in Marathi.

Samajik Manasashastra TYBA Fifth Semester - SPPU: सामाजिक मानसशास्त्र टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Mukund Inamdar Prof. Keshav Gadekar Dr Anita Patil

पुणे विद्यापीठाच्या मानसशास्त्र अभ्यासमंडळाने पदवी-द्वितीय वर्षाच्या सामाजिक-मानसशास्त्रच्या अभ्यासक्रमाची पुनर्रचना केलेली आहे. 'सामाजिक मानसशास्त्र' या पुस्तकात अभिवृत्ती, आंतरवैयक्तिक आकर्षण व समाजाभिमुख वर्तन या तीन प्रकरणांचा नव्याने समावेश केला आहे. तसेच ही सुधारित आवृत्ती संबंधित शिक्षक, विद्यार्थी व वाचक यांच्या गरजांची पूर्तता करेल, अशी आशा आहे.

Samajik Manasashastrachi Olakh FYBA Second Semester - SPPU: सामाजिक मानसशास्त्राची ओळख एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर २ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Anuradha Prashant Harkare

प्रथम वर्ष कला मानसशास्त्र या विषयाचा सुधारित अभ्यासक्रम 2019-20 या शैक्षणिक वर्षापासून लागू होत आहे. बदलत्या काळानुसार मानसशास्त्रासारख्या विषयातसुद्धा झपाट्याने बदल होत आहेत. त्यानुसार अभ्यासक्रमात बदल होणे गरजेचे होते. या अभ्यास क्रमावर आधारित सामाजिक मानसशास्त्राची ओळख पाठ्यपुस्तक विद्यार्थ्यांसाठी खुपच उपयोगी ठरणार आहे. भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या (Ministry of Human Resource Development-MHRD, Govt. of India) नव्या शैक्षणिक धोरणानुसार (New Education Policy-NEP) भारतात बदल घडवायचा असेल तर शिक्षण क्षेत्रात बदल करणे हा एक प्रभावी मार्ग आहे. त्याची सुरुवात या अभ्यासक्रमात झालेली दिसते. या बदलांमुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी आणि अधिक समृद्ध होईल याची खात्री वाटते. अभ्यासक्रमात एक महत्त्वाचा बदल केला आहे तो म्हणजे दुसऱ्या सत्रात 'सामाजिक मानसशास्त्राची ओळख' या विषयाचा समावेश. मानसशास्त्राच्या वेगवेगळ्या शाखांमधील सामाजिक मानसशास्त्र हा विषय व्यक्तीचे समाजनिष्ठ वर्तन समजून घेण्यासाठी तितकाच उपयुक्तसुद्धा आहे.

Samajik Sanstha Ani Badal FYBA Second Semester - SPPU: सामाजिक संस्था आणि बदल एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर २ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Dr. Vijay M. Jadhav

सामाजिक संस्था आणि बदल याबाबत अनेक संदर्भ ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. मात्र, हे पुस्तक सामाजिक मानसशास्त्रावर यावर प्रकाश टाकणारे एक उपयुक्त पुस्तक आहे. पुस्तकाच्या सुरूवातीला विविध सामाजिक संस्था जसे की कुटुंब, नातेसंबंध, विवाह, राजतंत्र, अर्थव्यवस्था यांची सम्यक आणि मुद्देसूद चर्चा करण्यात आलेली असून समाज परिवर्तन आणि बदलत्या सामाजिक स्थितीनुसार त्यांच्यात झालेले बदल यांची देखील चर्चा विस्तृत स्वरूपात करण्यात आलेली आहे. पुस्तकाच्या दुसऱ्या प्रकरणात धर्म, शिक्षण आणि प्रसारमाध्यमे या सामाजिक संस्थांचे मानवी जीवनातील आणि सामाजिक जीवनातील स्थान, महत्त्व इत्यादी स्पष्ट करण्यात आलेले आहे. धर्म, शिक्षण आणि प्रसारमाध्यमे ही व्यक्तीच्या सामाजिक जीवनात महत्वाच्या भूमिका बजावून व्यक्तीच्या सामाजिक जीवनात ते मार्गदर्शन करतात, त्याचे सविस्तर स्पष्टीकरण येथे देण्यात आलेले आहे. तर पुस्तकाच्या तिसऱ्या प्रकरणात सामाजिक बदल व या बदलांचे सहाय्यक घटक यांची सविस्तर चर्चा करण्यात आलेली असून या प्रकरणात आधुनिकीकरणाचा विकास व जागतिकीकरण यांची तपशीलवार चर्चा करण्यात आलेली आहे.

Samajik Sanstha Ani Parivartan FYBA Second Semester - SPPU: सामाजिक संस्था आणि परिवर्तन एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर २ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Sudhir Yevale Jyoti Suhas Gagangras

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जून 2019 पासून बदललेल्या नवीन अभ्यासक्रमानुसार श्रेयांक पद्धत व सेमिस्टर लागू केलेली असून एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर (II) करिता समाजशास्त्र विषयासाठी 'सामाजिक संस्था आणि परिवर्तन' हे क्रमिक पाठ्यपुस्तक तयार केलेले आहे. सेमिस्टर (II) करिता या अभ्यासक्रमात समकालीन अनेक मुद्द्यांचा समावेश केला आहे. पुस्तक वाचताना व अभ्यासताना उत्सुकता वाटेल व शंकांचे निरसनही होईल. पुस्तकामध्ये नवीन मुद्दे असल्याने त्यात शक्य होईल तितकी स्पष्टता आणण्याचा प्रयत्न केला आहे.

Samajik Sanstha First Semester Ani Second Semester FYBA New NEP Syllabus - RTMNU: सामाजिक संस्था पहिले सत्र आणि दुसरे सत्र एफ.वाय.बी.ए. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Dr Pradeep Aglave Dr Rahul Bhagat

"सामाजिक संस्था" हे डॉ. प्रदीप आगलावे आणि डॉ. राहुल भगत लिखित पुस्तक बी.ए. (भाग १, सत्र १ व २) साठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार तयार करण्यात आले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) च्या पार्श्वभूमीवर लिहिलेले हे पुस्तक समाजशास्त्रातील प्रमुख सामाजिक संस्था जसे की राज्यसंस्था, आर्थिक संस्था, शिक्षण संस्था आणि धर्मसंस्था यांचा सैद्धांतिक व व्यवहार्य अभ्यास सादर करते. यामध्ये सत्तेचे प्रकार, सामाजिक असमानता, शिक्षणातील भूमिकात्मक परिवर्तन, धर्माचे सामाजिक प्रभाव इत्यादी विषयांचा सखोल विचार केला आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम समजून घेण्यासाठी व परीक्षेची तयारी करण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरते.

Samajik Sanstha Second Semester FYBA New NEP Syllabus - RTMNU: सामाजिक संस्था दुसरे सत्र एफ.वाय.बी.ए. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Dr Rahul Bhagat Dr Nalini Borkar

सामाजिक संस्था हे पुस्तक बी.ए. समाजशास्त्र अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या सत्रासाठी तयार करण्यात आलेले असून, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार साकारले आहे. डॉ. राहुल भगत व डॉ. नलिनी बोरकर (भगत) यांनी लिहिलेल्या या पुस्तकात सामाजिक संस्थांचे स्वरूप, कार्य आणि महत्त्व याचे सविस्तर विश्लेषण केले आहे. ‘काम आणि आर्थिक जीवन’, ‘राजकारण आणि समाज’, ‘धर्म आणि समाज’, आणि ‘नातेसंबंधाची प्रणाली’ ही प्रमुख प्रकरणे पुस्तकात समाविष्ट आहेत. गुलाम समाज, सरंजामशाही समाज व भांडवलशाही समाज यांमधील कामाच्या संघटनांचे विश्लेषण करताना आर्थिक, सामाजिक आणि राजकीय घटकांचे परस्परसंबंध मांडले आहेत. औपचारिक व अनौपचारिक कामाच्या संघटना, श्रम विभागणी, कामाचे सामाजिक महत्त्व, धार्मिक प्रथा, सत्तेचे प्रकार, आणि कुटुंब व्यवस्था यांचे अभ्यासपूर्ण वर्णन या पुस्तकात आहे. सामाजिक चळवळी, आंदोलने व क्रांती यांचेही विवेचन आहे. युपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असा हा अभ्यासपूर्ण स्रोत विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरतो. हे पुस्तक सामाजिक संस्थांचे शास्त्रीय व वास्तववादी विश्लेषण करीत सामाजिक बदलांचे समज सुलभ करते.

Samajik Thar: सामाजिक थर

by Sau. Sarla Karkhanis

अमेरिकेतील प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीचे समाजशास्त्रज्ञ मेल्विन एम्‌. ट्युमिन यांच्या ‘सोशल स्ट्रॅटिफिकेशन- द फॉर्म्स अँड फंक्शन्स ऑफ इन्इक्वॉलिटी’ या पुस्तकाचा हा अनुवाद ‘सामाजिक थर: विषमतेचे प्रकार व कार्य’ या नावाने प्रसिद्ध होत आहे. अनेक समाजसंशोधकांनी तयार केलेल्या प्रबंधाच्या आधारावर लेखकाने या पुस्तकात सामाजिक विषमतेचा प्रश्न सविस्तरपणे मांडला आहे. कार्ल मार्क्स व मॅक्स वेबर या दोन मूलग्राही विचारवंतांच्या दृष्टिकोनांचा, कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचा संयोग सामाजिक घडणीच्या आधुनिक अभ्यासकांच्या भूमिकेत आढळतो, असे लेखकाने प्रतिपादन केले आहे. लेखकाची मांडणी सरळ व सुस्पष्ट आहे आणि ती प्रत्यक्षावर-पहाणी व संशोधने यांवर आधारलेली आहे. त्यामुळे भारतीय समाज-अभ्यासकांना आपल्या अनुभवांशी त्यातील प्रतिपादने जोखून पाहणे शक्य होईल. पूर्वापार भारतीय समाजपद्धतीचाही उल्लेख लेखकाने अनेकदा केला आहे. आपल्या आजच्या बदलत्या परिस्थितीत त्यात होणारे फरक का व कसे होत आहेत याचा शोध घेण्यास या पुस्तकाचा मार्गदर्शनपर उपयोग होईल.

Samajik Vaad: सामाजिक वाद

by Vinayak Sitaram Sarwate

आज त्या जगापुढें सर्वांत महत्त्वाचा प्रश्न कामकरीवर्गाचा आहे. तिकडे हा वर्ग अठराव्या शतकांत यांत्रिक कारखान्यांच्या उत्पत्तीनंतर अस्तित्वांत आला. पहिल्यापासूनच त्याची स्थिति परवश, जुलुमानें गांजलेले, दीन, दरिद्री व कष्टमय राहत आली. शिक्षणाच्या व जागृताच्या अभावी त्यानें ती बरीच वर्षे निमूटपणें सहन केली. या पुस्तकांत सामाजिक वादाचा इतिहास देण्याचाच उद्देश असल्यानें, त्या वादांत अगदीं प्रारंभापासून आतांपावतों होत आलेल्या निरनिराळ्या रुपांतरांचें व मतांतराचें केवळ विवेचन मात्र यांत करण्यांत आलें आहे. या मतांवर घेतले जाणाऱ्या आक्षेपांचा किंवा त्यांना देण्यांत येणाऱ्या उत्तरांचा यांत विचार केलेला नाहीं.

Samajpurvak prapt Brahmcharya (Sankshipt): समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य (संक्षिप्त)

by Dada Bhagwan

ब्रह्मचर्य व्रत भगवान महावीरांनी दिलेल्या पाच महाव्रतांपैकी एक व्रत आहे. मोक्ष प्राप्तीसाठी ब्रह्मचर्य व्रत पाळावे लागते. अशी समज खूप लोकांना आहे.परंतु हा विषयभोग कशाप्रकारे चुकीचा आहे? किंवा त्यातून आपली सुटका कशी होऊ शकते? हे सर्व लोकांना माहित नाही. विषय हे आपल्या पाच इंद्रियांपैकी कोणत्याही इंद्रियाला आवडत नाही. डोळ्यांना पाहायला आवडत नाही. नाकाने सुंघायला आवडत नाही. जिभेने चाखायला आवडत नाही. पण तरी खरे ज्ञान नसल्यामुळे लोकं विषय विकारातच निरंतर बुडलेले असतात. कारण त्यांना त्याच्या जोखिमांची जाणीवच नाही. आपल्या हक्काच्या साथीसोबतच्या विषय भोगातही अगणित सूक्ष्म जीवांचा नाश होतो. आणि बिनहक्काच्या विषय भोगाचा परिणाम तर नर्क गतिच आहे. या पुस्तकाद्वारे आपल्याला ब्रह्मचर्य म्हणजे काय? त्याचे फायदे कोणते? ब्रह्मचर्य कसे पाळावे? विकारांपासून मुक्ति कशी मिळवावी? वगैरे सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.

Refine Search

Showing 1,176 through 1,200 of 1,551 results