Browse Results

Showing 126 through 150 of 1,529 results

Arogya Manasashastra Paper 2 SYBA Third Semester - SPPU: आरोग्य मानसशास्त्र पेपर २ एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ३ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr Anuradha Prashant Harkare

2019-20 शैक्षणिक वर्षांपासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत पदवी परीक्षेसाठी CBCS पद्धती लागू केली आहे. त्यानुसार 2020-21 पासून द्वितीय वर्षाचा नवा अभ्यासक्रम लागू होईल. यावर्षी 'आरोग्य मानसशास्त्र' या विषयाचा नव्याने अंतर्भाव केला आहे. बदलती जीवनशैली, धकाधकीचे जीवन आणि सध्याची गळेकापू स्पर्धा यामुळे काही वर्षांपूर्वी वयस्कांचे समजले जाणारे हृदयविकार, उच्च रक्तदाब किंवा अगदी संधिवातासारखे आजार तरुणांनासुद्धा होत आहेत. वाढणारे ताण, व्यसनांविषयी वाढणारे आकर्षण, अंगवळणी पडत चाललेला चंगळवाद यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य धोक्यात येत आहे. या अभ्यासक्रमाच्या निमित्ताने महाविद्यालयीन वयात विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याचे महत्त्व आणि विविध आजारांविषयी जागरूकता निर्माण करण्याची संधी मिळाली आहे. आरोग्य मानसशास्त्राच्या या पुस्तकातील माहिती केवळ परीक्षेपुरती मर्यादित न राहता विद्यार्थ्यांना तर कायमची उपयोगी पडेलच तसेच आरोग्याविषयी जागृत असणाऱ्यांना सुद्धा हे पुस्तक नक्की आवडेल.

The Art Of War: दी आर्ट ऑफ वॉर

by Sun Tzu Vyanktesh Upadhye

‘दी आर्ट ऑफ वॉर’ हे पुस्तक इ.स पू. 515 मध्ये लौकिकार्थाने फारशा प्रसिद्ध नसलेल्या, सन त्झु नावाच्या एका चिनी पंडिताने लिहिले आहे. या पुस्तकाचे शीर्षक वाचल्यास हे पुस्तक युद्धात वापरायच्या डावपेचांबद्दल आहे, असे वरकरणी वाटते. खरेतर यात संघर्षाबद्दल केलेल्या चर्चेपेक्षा बुद्धिमत्तेबद्दल जास्त ऊहापोह केला आहे. या पुस्तकातील डावपेच, युद्धातील परिस्थितीबरोबरच इतर पार्श्वभूमीवर व युद्धेतर परिस्थितीतदेखील परिणामकारक सिद्ध होतात. इतरांशी असलेल्या संघर्षामुळे वा अंतर्द्वद्वामुळे आपले आयुष्य कसे झाकोळले जाणार नाही याचा मार्ग दाखविणारे, आध्यात्मिक बैठक असलेले असे छोटेखानी तेरा धडे या पुस्तकात आहेत. आध्यात्मिकतेचा कोणताही मार्ग तुम्ही अनुसरत असाल किंवा नसाल तरीही सन त्झु याची ही प्राचीन विचारसरणी प्रत्येकास एकसारखीच लागू आहे. तुमच्या तीव्र स्पर्धात्मक जीवनात संघर्ष हाताळण्याचा परिणामकारक, आध्यात्मिक व सहानुभूतिपूर्ण मार्ग शिकायचा असेल, जीवनातील ध्येयाची स्पष्ट अनुभूती करून घ्यायची असेल व अत्यंत बिकट परिस्थितीतही मनःशांती अनुभवायची असेल तर ‘दी आर्ट ऑफ वॉर’ हे पुस्तक तुमच्यासाठी आहे.

Arthashastra class 11 - Maharashtra Board: अर्थशास्त्र इयत्ता अकरावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

अर्थशास्त्र इयत्ता अकरावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. पाठ्यपुस्तकामध्ये दैनंदिन व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या अर्थशास्त्रीय संकल्पना उदाहरणार्थ, पैसा, आर्थिक वृद्धी व विकास, आर्थिक सुधारणा, आर्थिक नियोजन, संख्याशास्त्र इत्यादींचा ऊहापोह करण्यात आला आहे. या पाठ्यपुस्तकाची मांडणी ही अर्थशास्त्रीय भाषेशी कोणतीही तडजोड न करता सोप्या व साध्या भाषाशैलीचा वापर करून केली आहे. अर्थशास्त्राच्या संकल्पना स्पष्ट होण्यासाठी आवश्यक तेथे विविध चित्राकृती, आलेख, तक्ते इत्यादींचा वापर केला आहे. अर्थशास्त्र विषयातील अवघड संकल्पना, शब्द यांसाठी पाठ्यपुस्तकाच्या शेवटी परिशिष्टही देण्यात आले आहे.

Arthashastra class 12 - Maharashtra Board: अर्थशास्त्र इयत्ता बारावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

अर्थशास्त्र इयत्ता बारावी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठपुस्तकात महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती), पुणे यांची निर्मिती असलेल्या अर्थशास्त्राच्या ह्या पुस्तकात सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र ह्या दोन्हींचा परामर्ष घेण्यात आला आहे. उपयोगिता, मागणी, पुरवठा यांचे सिद्धांत, बाजारांचे प्रकार इत्यादी सूक्ष्म अर्थशास्त्रीय संकल्पनांचे विस्तृत विवेचन केले आहे. सार्वजनिक वित्त व्यवहार, भारतातील नाणेबाजार व भांडवल बाजार, विदेशी व्यापार ह्या स्थूल अर्थशास्त्रीय संकल्पना या अभ्यासक्रमात प्रथमच विद्यार्थ्यांसमोर ठेवत आहोत. महत्त्वपूर्ण बदल म्हणजे संख्याशास्त्रातील निर्देशांक मापकाचा ह्या अभ्यासक्रमात अंतर्भाव केला आहे.

Arthashastra Digest class 11 - Maharashtra Board Guide: अर्थशास्त्र डाइजेस्ट इयत्ता 11वी महाराष्ट्र बोर्ड मार्गदर्शन

by Shri Navneet

अर्थशास्त्र इयत्ता 11वी चे पुस्तक नवनीत एज्युकेशन लिमिटेडने मराठी भाषेमध्ये प्रकाशित केलेले आहे, या मार्गदर्शकातील प्रत्येक प्रकरणात सुरुवातीला महत्त्वाच्या मुद्द्यांचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. प्रस्तुत मार्गदर्शकात दीर्घोत्तरी, लघूत्तरी आणि वस्तुनिष्ठ अशा सर्व प्रकारच्या प्रश्नांचा समावेश केलेला असून, त्यांची सुबोध भाषेत मुद्देसूद, समर्पक व आदर्श उत्तरे देण्यात आली आहेत. अंतर्गत मूल्यमापन चाचणीच्या तयारीसाठी प्रत्येक प्रकरणावर बहुपर्यायी प्रश्न (MCQs) उत्तरांसह देण्यात आले आहेत.या मार्गदर्शकाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी प्रश्नपत्रिकेचा आराखडा देण्यात आला आहे. या पुस्तकाच्या अखेरीस प्रथम व द्वितीय सत्रांसाठी नमुना प्रश्नपत्रिका तसेच प्रथम व द्वितीय सत्र यांसाठी अंतर्गत मूल्यमापन चाचणीच्या नमुना प्रश्नपत्रिकाही देण्यात आल्या आहेत.

Arthat: अर्थात

by Achyut Godbole

अर्थशास्त्राच्या सिध्दांतांचा आणि धोरणांचा अत्युत्कृष्ट, चित्तवेधक इतिहास आणि अर्थशास्त्रज्ञांची रंजक चरित्रं म्हणजेच 'अर्थात'! अतिशय चूकपणे आणि रसाळ शैलीत लिहिलेलं हे पुस्तक विद्यार्थी, शिक्षक आणि सर्वसामान्य वाचकांना अतिशय उपयोगी ठरेल. डॉ. भालचंद्र मुणगेकर माजी कुलगुरू, मुंबई विद्यापीठ माजी सदस्य, प्लॅनिंग कमिशन, भारत सरकार अर्थशास्त्राच्या उगमापासून सद्य:स्थितीपर्यंतचा विषय मांडणारं अर्थात' एक इनसाइटफुल पुस्तक. मराठीत अशा पुस्तकाची अत्यंत गरज असताना हे पुस्तक मराठीत यावं, ही फारच चांगली गोष्ट आहे. खकाची शैली प्रवाही, खिळवून टाकणारी आहे. अवघड कल्पना सोप्या उदाहरणांतून सांगण्याची हातोटी लाभली आहे. विद्यार्थी आणि संशोधक घांनीही जरूर वाचावे. डॉ. डी. एम. नाचणे डायरेक्टर, इंदिरा गांधी इन्स्टिटयूट ऑफ डेव्हलपमेंट ऍण्ड रिसर्च, मुंबइ सर्वसमावेशी, बहुआयामी कलनातून अर्थशास्त्राकडे पाहणारं हे पुस्तक. यात संकल्पना, तात्त्विक भूमिका, प्रत्यक्ष प्रयोग आणि धोरणं या सर्वच बाबींची सखोल मीमांसा हे. अच्युत गोडबोल्यांची जादुई लेखणी एका रुक्ष विषयाचं आणि एका 'कंटाळवाण्या' भकास शास्त्राचं मजेदार आनंदी साहसयात्रेत रूपांतर करून कते! डॉ. अभय पेठे डायरेक्टर आणि चेअर प्रोफेसर, अर्थशास्त्र विभाग, माजी डीन, फॅकल्टी ऑफ आर्ट्स, मुंबई विद्यापीठ अर्थक्षेत्रातील मवंतांनी रवलेली विद्यार्थी, शिक्षक, पत्रकार, व्यावसायिक आणि साऱ्यांसाठीच गुंतागुंतीचे अर्थशास्त्र सोपे करून सांगणारी, अर्थशास्त्रातील इतिहास, सिध्दांत न् चरित्रांचा वेध घेणारी एक रंजक सफर मराठीत प्रथमच.

Arthik Sarvekshan Ani Kendriya Arthasankalpa Second Semester FYBA New NEP Syllabus - RTMNU: आर्थिक सर्वेक्षण आणि केंद्रीय अर्थसंकल्प दुसरे सत्र एफ.वाय.बी.ए. नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Prof. Dr. Rakshit Madan Bagde

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या (RTMNU) नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 अंतर्गत प्रथम वर्ष बी.ए. (FYBA) अर्थशास्त्र अभ्यासक्रमात आर्थिक सर्वेक्षण आणि केंद्रीय अर्थसंकल्प हा महत्त्वाचा विषय समाविष्ट आहे. या पुस्तकात "आर्थिक सर्वेक्षण आणि केंद्रीय अर्थसंकल्प" हा दस्तऐवज भारताच्या आर्थिक परिस्थितीचे मूल्यमापन करून त्यावर आधारित धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी महत्त्वाचा आहे. आर्थिक सर्वेक्षण हा आर्थिक आढावा देतो, ज्यात आर्थिक वाढ, वित्तीय स्थिरता, रोजगाराची परिस्थिती, महागाई, आणि सरकारी उपक्रमांचा समावेश असतो. केंद्रीय अर्थसंकल्प हा सरकारच्या आगामी आर्थिक धोरणांचे आणि निधी वाटपाचे औपचारिक विधान असते. यात महसूल, खर्च, करप्रणाली, विविध क्षेत्रांसाठी अनुदाने, आणि सामाजिक कल्याण योजनांची रूपरेषा दिली जाते. हा दस्तऐवज अर्थव्यवस्थेच्या भविष्यातील दिशा स्पष्ट करत असल्याने विद्यार्थ्यांसाठी तसेच अभ्यासकांसाठी महत्त्वाचा ठरतो.

Arvachin Jagacha History Third Year Fifth Semester - RTMNU: अर्वाचीन जगाचा इतिहास १७८९ ते १९२० बी.ए. तृतीय वर्ष पंचम सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी - महाराज नागपूर विद्यापीठ

by Prof. N. C. Dixit

विद्यापीठ अनुदान आयोगाने ठरवून दिलेल्या ध्येय-धोरणानुसार अर्वाचीन जगाचा इतिहास १७८९ ते १९२० (Modern World 1789-1920) हे बी. ए. तृतीय वर्षः पाचव्या सेमिस्टर करिता या वर्गासाठी मराठी भाषा अभ्यासमंडळाने संपादित केले आहे. पदवी आणि पदव्युत्तर पातळीवर दर्जेदार, उच्चप्रतीचे, व्यवसायाभिमुख आणि सर्वव्यापी शिक्षण दिले जावे याकरिता केंद्र सरकारच्या मानव संसाधन आणि विकास मंत्रालयाने तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाने जी मार्गदर्शक तत्त्वे आणि धोरण निश्चित केले आहे त्याची मातृभाषेशी आणि वाङ्मयाशी योग्य सांगड घालण्याचे धोरण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अत्यंत विचारपूर्वक आणि दूरगामी स्वरूपात स्वीकारलेले आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनाचे यथार्थ मूल्यमापन करण्याच्या व त्यांच्या ज्ञानकक्षा विस्तारित करण्याच्या उद्देशाने आवश्यक ते बदल करण्याचा योग्य निर्णयही घेतलेला आहे. त्याच दृष्टिकोनातून मराठी भाषा अभ्यासमंडळाच्या मार्गदर्शनाखाली 'अर्वाचीन जगाचा इतिहास १७८९ ते १९२० (Modern World 1789-1920)' या पाठ्यपुस्तकाची निर्मिती पाठ्यपुस्तक समितीने केली आहे. पाठ्यपुस्तकामध्ये फ्रेंच क्रांती (French Revolution), युरोपचा आशियातील वसाहतवाद (European Colonialism of Asia), युरोपचा आफ्रिकेतील वसाहतवाद (European Colonialism of Africa), चीन-जपान युद्ध (१८९४-१८९५) (Sino-Japanese War of 1894-1895), रशिया-जपान युद्ध (१९०४-१९०५) (Russo - Japanese War of 1904-1905), चीनमधील क्रांती, १९११ (Chinese Revolution of 1911), पूर्वेकडील प्रश्न (१८७८-१९१३) (Eastern Question, 1878-1913), पहिल्या महायुद्धाची कारणे (Causes of the First World War), व्हर्सायचा तह (Treaty of Versailles), राष्ट्रसंघाची रचना (League of Nations - Structure), राष्ट्रसंघाची कामगिरी व अपयश (Legue of Nations - Achievements and Failures) आणि रशियन क्रांती, १९१७ (Russian Revolution of 1917) इत्यादींचा अभ्यासक्रम दिला आहे.

Arvachin Jagacha Itihas 1789 te 1920 TYBA Fifth Semester - RTMNU: अर्वाचीन जगाचा इतिहास १७८९ ते १९२० बी.ए. तृतीय वर्ष पंचम सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Prof. N. C. Dixit

विद्यापीठ अनुदान आयोगाने ठरवून दिलेल्या ध्येय-धोरणानुसार अर्वाचीन जगाचा इतिहास १७८९ ते १९२० (Modern World 1789-1920) हे बी. ए. तृतीय वर्षः पाचव्या सेमिस्टर करिता या वर्गासाठी मराठी भाषा अभ्यासमंडळाने संपादित केले आहे. पदवी आणि पदव्युत्तर पातळीवर दर्जेदार, उच्चप्रतीचे, व्यवसायाभिमुख आणि सर्वव्यापी शिक्षण दिले जावे याकरिता केंद्र सरकारच्या मानव संसाधन आणि विकास मंत्रालयाने तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाने जी मार्गदर्शक तत्त्वे आणि धोरण निश्चित केले आहे त्याची मातृभाषेशी आणि वाङ्मयाशी योग्य सांगड घालण्याचे धोरण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अत्यंत विचारपूर्वक आणि दूरगामी स्वरूपात स्वीकारलेले आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनाचे यथार्थ मूल्यमापन करण्याच्या व त्यांच्या ज्ञानकक्षा विस्तारित करण्याच्या उद्देशाने आवश्यक ते बदल करण्याचा योग्य निर्णयही घेतलेला आहे. त्याच दृष्टिकोनातून मराठी भाषा अभ्यासमंडळाच्या मार्गदर्शनाखाली 'अर्वाचीन जगाचा इतिहास १७८९ ते १९२० (Modern World 1789-1920)' या पाठ्यपुस्तकाची निर्मिती पाठ्यपुस्तक समितीने केली आहे. पाठ्यपुस्तकामध्ये फ्रेंच क्रांती (French Revolution), युरोपचा आशियातील वसाहतवाद (European Colonialism of Asia), युरोपचा आफ्रिकेतील वसाहतवाद (European Colonialism of Africa), चीन-जपान युद्ध (१८९४-१८९५) (Sino-Japanese War of 1894-1895), रशिया-जपान युद्ध (१९०४-१९०५) (Russo - Japanese War of 1904-1905), चीनमधील क्रांती, १९११ (Chinese Revolution of 1911), पूर्वेकडील प्रश्न (१८७८-१९१३) (Eastern Question, 1878-1913), पहिल्या महायुद्धाची कारणे (Causes of the First World War), व्हर्सायचा तह (Treaty of Versailles), राष्ट्रसंघाची रचना (League of Nations - Structure), राष्ट्रसंघाची कामगिरी व अपयश (Legue of Nations - Achievements and Failures) आणि रशियन क्रांती, १९१७ (Russian Revolution of 1917) इत्यादींचा अभ्यासक्रम दिला आहे.

Aryabhat

by Hundaraj Balvani

Aryabhatta an Indian who discovered zero in mathematics. Also he was the first one to tell about the eclipse.

Asa Mee, Ashi Mee!

by Pankaj Chaturvedi

तुम्ही या पुस्तकातील मुलांना ओळखता? अगदी तुमच्यासारखीच आहेत...

Asach Ek Sachin Tendulkar

by Purushottam Dhakras

This is a story of one boy in Pune. There was a cricket match going on between two societies and on the player was supposed to bat in the fifth position and he was not there and offered to play for the team. Because of this boy, the team wins but since he was from another society the umpire objects. The umpire likes his game and gifted him with a bat and balls and blessed him to become like Legendary Sachin Tendulkar.

Asara: आसरा

by Shree. Vidyadhar Bhaskar Ujgare

सामाजिक प्रश्नावर भारतीय पार्श्‍वभूमीला धरून आणि मराठी भाषेत फार थोडे वाङ्मय उपलब्ध आहे. समाजकल्याण क्षेत्रांत काम करणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याला यापुढे समाजसेवेचे शास्त्र शिकणे आवश्यक होणार आहे. अशा शिक्षणासाठी लागणारी वाङ्‌मय संपदा हेही समाज सेवेंचे नवे क्षेत्र आहे. या क्षेत्रात व विशेष करून या विषयात यापूर्वी माझे स्नेही श्री. शरदचंद्र गोखले यांनी बहुमोल भर घातली आहे. या परंपरेतच वाटचाल करून श्री. विद्याधर उजगरे यांनी “आसरा” हे जे भिकाऱ्यांच्या प्रश्नावर पुस्तक लिहिले त्याबद्दल ते अभिनंदनास पात्र आहेत. ह्या पुस्तकात त्यांनी भिक्षा प्रतिबंधक कायद्याचे सविस्तर विवेचन करून या शिवाय भिकारी पकडल्यापासून त्याच्या पुनर्वसनापर्यंत घडणारी प्रक्रिया तपशीलाने सांगितली आहे. या खेरीज प्रशासन तंत्र आणि व्यक्तिकार्य वगैरे तंत्राचाही उहापोह त्यांनी केला आहे. त्याचप्रमाणे संस्थांची सूचीव आवश्यक ती आकडेवारी त्यांनी या पुस्तकात दिली आहे.

Ashok Ani Mauryancha Rhas: अशोक आणि मौर्यांचा ऱ्हास

by Dr Sharavati Shirgavkar

अशोक अँड डिक्लाइन ऑफ मौर्याज हा डॉ. रोमिला थापर यांचा गाजलेला ग्रंथ. भारतीय इतिहास अनुसंधान परिषदेने उत्कृष्ट ऐतिहासिक ग्रंथांचे विविध भारतीय भाषांमध्ये अनुवाद केलेले आहेत. डॉ. थापर यांच्या या गाजलेल्या ग्रंथाचा मराठी अनुवाद करण्याची संधी डॉ. शरावती शिरगावकर मिळाली. या ग्रंथाचे वाचन करताना ऐतिहासिक कल्पनाशक्ती म्हणजे काय हे अधिक उत्कटतेने अनुभवाला मिळेल. स्थलनामांसाठी शब्दोच्चारांच्या खुणांचा वापर करण्यात सुसंगतेचा काहीसा अभाव वाचकांना जाणवेल. संस्कृत आणि पाली या भाषांमधील कमी परिचित असलेल्या नावांपैकी जी अधिक रुढ आहेत त्यांचे लिप्यंतर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ग्रंथामध्ये संस्कृत व पाली शब्दांच्या बाबतीत या दोनही भाषांमधील शब्द एकाच भाषेत आणण्याचा प्रयत्न न करता शक्यतो प्रामुख्याने मूळची रुपे ठेविली आहेत.

Ashru - Novel: अश्रू - कादंबरी

by Vishnu Sakharam Khandekar

या विसाव्या शतकानं जगाला बर्‍यावाईट अनेक गोष्टी दिल्या असतील; पण त्याची सर्वश्रेष्ठ देणगी म्हणजे त्याने सामान्य मनुष्याला दिलेलं महत्त्व, जे कोणत्या ना कोणत्या दृष्टीने असामान्य आहे. ज्याला आपण जीवन म्हणतो, त्यात अधिक भाग कुणाचा असतो ? मूठभर असामान्यांचा की शेकडो नव्वद किंबहुना शेकडो नव्व्याण्णव असलेल्या सामान्यांचा ? आजपर्यंत राजांनी, वीरांनी, संतांनी, तत्त्वज्ञानींनी, कवींनी आणि शास्त्रज्ञांनी या सामान्य मनुष्याला गोड गोड अशी वचने देऊन त्याची प्रत्येक क्षेत्रात कत्तल केली. पण तरीही माणुसकीचा आधार एकच होता; तो म्हणजे संस्कृतीची सारी मूल्ये सांभाळण्याकरिता धडपडणारा, तडफडणारा सामान्य माणूस. ज्याला विशेष चांगले असे काही करता येत नाही; पण वाईट करताना ज्याचा हात कचरल्याशिवाय राहत नाही. हाच सामान्य माणूस या कादंबरीचा नायक आहे. वि. स. खांडेकर यांच्या असामान्य लेखणीतून उतरलेली ही कादंबरी आजच्या सामान्य माणसाची वेदना बोलकी करणारी आहे. मूल्ये जपणारा सामान्य माणूस , ज्याने आयुष्यात विशेष काही केले नाही आहे पण वाईट करताना आपल्याला झालेला अन्याय लक्षातघेऊन वाईट करण्यास न कतणारा सामान्य माणूस.

Asi Hi Mule

by K. Narakhede

Story about different small children's habbits... in marathi

Asur - Eka Parabhutachi Goshta: असुर - एका पराभूताची गोष्ट

by Anand Nilkanthan

असुर: एका पराभूताची गोष्ट हे प्रसिद्ध भारतीय महाकाव्य, रामायण, खलनायकाच्या दृष्टिकोनातून पुन्हा सांगणे आहे. कथा सामान्य आहे, कारण ऐतिहासिक कथा सांगणे सहसा विजेते सांगतात. असुर ही पराभूत झालेल्यांची कथा आहे आणि असुर लोकांची कथा सांगण्याचे धाडस करतो. असुर समाजाचे वर्णन देव कुळापेक्षा अधिक उदारमतवादी होते. हे रावण आणि भद्राच्या दृष्टीकोनातून महाबली, वामन आणि सीतेच्या अग्नी-परीक्षेची कथा देखील वर्णन करते. हे पुस्तक पौराणिक कथांमागील मानवी भावनांबद्दल बोलते आणि वाचकांना पूर्णपणे नवीन दृष्टीकोन देते.

Ati tethe mati

by Minakshi Sardesai

This is a story of a boy named Pundya. He was very stubborn by nature. One day a science professor came to his school and told them about fasting and its effect. He also told that all the famous scientist fasted and ate only fruit. Pundya did the same thing and fell sick. Doctor advised him to eat only half fruit with total meal. Pundia agreed but became ill again. Doctor scolded him for not following the advice. Pundia said I ate half fruit only but half jackfruit.

Atilobh Kadhihi Vaitach

by Shankar Karhade

A priest robs the temple money and hides it thinking it belongs to him. His wife sees it and takes the money for herself, the same thing her son sees and robs the money, then the robber sees it and runs with the money. The police see the robber and run after him. To save himself he throws it to the road side near a hut and goes away. This money is found by a man who was cursing god for his poverty. He had prayed last night for prosperity and he gets this money.

Atishahana Gus

by Veena Seshadri

फार फार वर्षापूर्वी नॉर्वेमध्ये एक गस नावाचा कटकट्या, चिडचिड्या स्वभावाचा, तिरसट, शेतकरी राहत असे. तो नुसता कटकट्या नव्हता, तर तो अतिशहाणा आणि उद्दामही होता. तो इतरांपेक्षा स्वत:ला फार शहाणा समजत असे, विशेषत: आपल्या बायकोपेक्षा. तो खरंच का एवढा हुशार होता हे जाणण्यासाठी नॉर्वेमधली ही मनोरंजक आणि मजेदार लोककथा वाचा!

Atmasakshatkar: आत्मसाक्षात्कार

by Dada Bhagwan

जीवमात्र क्या ढूंढता है? आनंद ढूंढता है, लेकिन घड़ीभर भी आनंद नहीं मिल पाता | विवाह समारोह में जाएँ या नाटक में जाएँ, लेकिन वापिस फिर दुःख आ जाता है | जिस सुख के बाद दुःख आए, उसे सुख ही कैसे कहेंगे? वह तो मूर्छा का आनंद कहलाता है | सुख तो परमानेन्ट होता है | यह तो टेम्परेरी सुख हैं और बल्कि कल्पित हैं, माना हुआ है | हर एक आत्मा क्या ढूंढता है? हमेशा के लिए सुख, शाश्वत सुख ढूंढता है | वह ‘इसमें से मिलेगा, इसमें से मिलेगा | यह ले लूँ, ऐसा करूँ, बंगला बनाऊ तो सुख आएगा, गाड़ी ले लूँ तो सुख मिलेगा’, ऐसे करता रहता है | लेकिन कुछ भी नहीं मिलता | बल्कि और अधिक जंजालों में फँस जाता है | सुख खुद के अंदर ही है, आत्मा में ही है | अत: जब आत्मा प्राप्त करता है, तब ही सनातन (सुख) ही प्राप्त होगा |

Atta Nahi, Atta Nahi

by Rohini Nilekani

ही मोठी माणसं नेहमीच ‘आत्ता नाही, आत्ता नाही’ असं का म्हणतात? गोष्ट वाचा, म्हणजे कळेल.

Audyogik Ani Sanghatanatmak Manasashastra TYBA Fifth Semester - SPPU: औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्र टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Keshav Gadekar Dr Pundalik Rasal Dr Digambar Darekar Prof. Abhimanyu Dhormare

विद्यापीठ अनुदान मंडळ, नवी दिल्ली (U.G.C.) यांच्या पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या अभ्यासक्रमाच्या नवीन आकृतिबंधानुसार लिहिलेले व मराठी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरू शकेल असे 'औद्योगिक व संघटनात्मक मानसशास्त्र' हा ग्रंथ पाठ्यपुस्तक आणि संदर्भ ग्रंथ म्हणून प्रकाशित केलेले आहे. पुस्तक अधिकाधिक माहितीपूर्ण व अद्ययावत व्हावे म्हणून पुस्तकात विविध आकृत्या, तक्ते व चौकटींचा वापर करण्यात आलेला आहे. प्रकरणांच्या शेवटी उपयोजन कौशल्ये आणि सराव प्रश्नांचा समावेश केलेला आहे. या पुस्तकात औद्योगिक व संघटन क्षेत्रातील व्यक्तीवर्तन हा केंद्रबिंदू ठेवून प्रस्तुत विषयाचे विवेचन करण्यात आलेले आहे. हे पुस्तक औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व वाचकांनाही एक संदर्भ ग्रंथ म्हणून उपयुक्त ठरेल अशी आशा आहे.

Aurangzebacha itihas: औरंगजेबाचा इतिहास

by Sir Jadunath Sarkar

सर जदुनाथ सरकार यांनी औरंगजेबाचे चरित्र प्रथम पाच खंडात प्रसिद्ध केले. त्यानंतर १९३० मध्ये त्यांनी या पाच खंडांचे संकलन करून औरंगजेबाच्या चरित्र-ग्रंथाची एक छोटी आवृत्ती A Short History of Aurangzib या नावाखाली प्रसिद्ध केली. त्या ग्रंथाचा मराठीमध्ये केलेला हा अनुवाद आहे. ग्रंथाच्या मजकुराची मूळ इंग्रजी पाने ४६२ असून ग्रंथाची विभागणी २० प्रकरणात करण्यात आलेली आहे. औरंगजेबाची एकंदर हयात ८९ वर्षांच्या कालखंडावर पसरलेली असून त्याच्या प्रत्यक्ष कारकीर्दीचा कालखंड ४९ वर्षांएवढा आहे. औरंगजेबाचे खासगी जीवन, त्याची राजकीय कारकीर्द, त्याची राज्यकारभाराची पद्धत, तत्कालीन सामाजिक, अर्थिक आणि व्यावहारीक जीवन, त्याचप्रमाणे औरंगजेबाच्या कारकीर्दीचे आणि धोरणाचे हिंदुस्थानच्या इतिहासावर झालेले परिणाम या सर्वांचा अतिशय साकल्याने असा परामर्ष सर जदुनाथ यांनी आपल्या औरंगजेबाच्या या चरित्रग्रंथात घेतला आहे.

Avaghe Jhale Hushar

by Prashant Gautam

This is a story of a 100 literate village. After a busy school schedule and exams are over children are now on a vacation. Some students have decided to organize a library in the village. This library has become the talk of the village. Many people were benefited because of this library.

Refine Search

Showing 126 through 150 of 1,529 results