- Table View
- List View
Zoya: झोया
by Anuja Chauhan८३ मध्ये भारतानं वर्ल्ड कप पटकावला नेमका त्याच वेळी मिड लेव्हल ॲडव्हर्टायझिग अधिकारी झोया सिंग सोळंकीचा जन्म झाला, हे कळल्यावर भारतीय क्रिकेट टीममधले सगळे तरुण खेळाडू चक्रावून जातात. तिच्याबरोबर ब्रेकफास्ट केल्यावर मैदानावर विजय मिळतो तेव्हा ते इम्प्रेस होतात आणि तिच्याबरोबर ब्रेकफास्ट न केल्यानं हार होते तेव्हा ती त्यांचा लकी चार्म आहे, याची त्यांना खात्रीच पटते. फॅन्स अक्षरशः तिची पूजा करत असतात, तर स्पर्धक संघ मात्र तिला पाण्यात पाहात असतो. झोया मात्र शूरपणे भारतीय टीमसाठी तिचं छोटसं योगदान देण्याचा प्रयत्न करत असते. झोयासाठी हे फारसं अवघड नव्हतं, पण जर भारतीय टीमचा विक्षिप्त पण हुशार कॅप्टन निखिल खोडानं तिच्याशी वाद घालणं आणि वर्ल्ड कप जिकण्ं यासाठी त्याला तिच्या लकची गरज नाही हे सांगणं थांबवलं असतं तरच...
Zulaa Gelaa Udoon
by Sridala Swamiउडणारा झुला तुम्ही खाली कसा आणाल? या हुशार मुलांबरोबर खेळायला चला आणि याचं उत्तर शोधा.
Zund: झुंड
by Dr Sharankumar Limbaleझुंड कादंबरी मध्ये दलितांच्या जगण्यातली दाहकता प्रकर्षाने व्यक्त झाली आहे. दलितांच्या भयावह समस्यांनी ह्या कादंबरीचे कथानक गुंफले आहे. ही कादंबरी मुळातच जात आणि मानवी संबंध यावर आधारलेली आहे. मानवी संबंधांचे विविध पैलू आणि जातीचे पदर या कादंबरीत प्रकट झाले आहेत.