Browse Results

Showing 176 through 200 of 1,529 results

Banee

by Herminder Ohri

बनी स्वप्नात तरंगते आणि अतिशय आश्चर्यकारक आणि अद्भुत जागी जाते. तुम्हाला तिच्याबरोबर तरंगायला आवडेल?

Bankech Diwal

by Ramesh Varkhede

Nathu was a sweeper at a bank. He was little depressed for not getting a salary in time. He says this to Sitaram. Sitaram looks for another job for Nathu. All the people in the village come to know about his situation. And people fear that the bank is bankrupt and that is the reason Nathu is not paid salary. All the people stop depositing money in the bank at the same time start withdrawing their money. The real situation was not like that. Because of rumors, the bank faces a crisis.

Bankvyavsayachi Multatve-1 First Semester FYB.COM New NEP Syllabus - SPPU: बँकव्यवसायाची मूलतत्त्वे-१ प्रथम सत्र एफ.वाय.बी.कॉम नवीन एन.इ.पी. अभ्यासक्रम - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr S. R. Javale Dr R. K. Datir Dr D. G. Ushir Dr S. V. Patil

‘बँकव्यवसायाची मूलतत्त्वे-1’ हे पुस्तक बँकिंगच्या संकल्पना, त्याचा इतिहास, कार्ये आणि महत्त्व यावर आधारित आहे. बँकेच्या व्याख्या, प्रकार, भारतीय बँक प्रणालीची रचना, तसेच बँकिंग प्रक्रियेतील नियम आणि तत्त्वे सविस्तर समजावण्यात आली आहेत. पुस्तकात राष्ट्रीयीकृत, सहकारी, खाजगी आणि परकीय बँकांच्या कामकाजावर चर्चा आहे. तसेच ठेवींच्या प्रकार, कर्ज देण्याच्या प्रक्रिया, चलनक्षम दस्तऐवजांचे महत्त्व, वसुलीचे तत्त्व आणि बँक ताळेबंद यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना बँकिंग क्षेत्रातील बदलते तंत्रज्ञान, नव्या संकल्पना व व्यावसायिक दृष्टिकोन समजण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरते. 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020' नुसार तयार करण्यात आलेले अभ्यासक्रम हे आधुनिक काळातील बँकिंग क्षेत्रातील गरजांसाठी विद्यार्थ्यांना तयार करते. बँकिंगमुळे आर्थिक स्थैर्य व राष्ट्रीय विकासाला चालना मिळते, हे पुस्तकाचे मुख्य गृहीत आहे.

Bari: बारी

by Ranjit Desai

स्वामी', 'राधेय' सारख्या विशिष्ट व्यक्तिमत्त्वाभोवतीच्या कादंबर्‍या लिहिण्याआधी रणजित देसाई ह्यांनी लिहिलेली ही वास्तववादी कादंबरी. आपल्या ह्या पहिल्याच कादंबरीबद्दल कादंबरीच्या प्रारंभीच त्यांनी म्हटले आहे. कोल्हापूरहून मोटारीने बेळगावला जाताना वाटेवर सुतगट्टी हे गाव लागते. तेथून काकती गावापर्यंतची पंधरावीस मैलांची, अगदी दाट गहिर्‍या जंगलाने वेढलेली वाट सुतगट्टीची, बारी म्हणून ओळखली जाते. भर दुपारीही अंधारून यावे असा हा भाग. ह्या बारीची, त्या जंगलाच्या आसर्‍याने वाढणार्‍या बेरड जमातीची ही कथा आहे. पोटच्या पोराचे हातपाय दुखावले तरी बेरड हळहळणार नाही, पण जंगलातल्या उभ्या झाडावर कुणी अकारण कुर्‍हाड चालवली तर त्याचे डोळे भरून येत असे बेरडांचे त्या जंगलावर, त्या बारीवर प्रेम. आता ते जंगल तसे घनदाट उठले नाही. बदलत्या काळाच्या सुसाट वार्‍याने बेरडांचे जीवनही तसे राहिले नाही. सारे काही बदलून गेले आहे- रुपाने, गुणाने, बैलगाड्यांनी केलेल्या चाकोर्‍यांचे पट्टे घेऊन आजूबाजूच्या जंगलराईने अंगावरच्या लाल धुळीने धुंद झालेली आणि शिट्या किंकाळ्यांनी रात्री-अपरात्री जागी होणारी ही बारी आता तोंडाला डांबर पासून रात्रंदिवस मोटारींची घरघर ऐकून निपचित पडून राहिली आहे- त्या सुनगट्टीच्या बारीची, तिच्या आसर्‍याने वाढणार्‍या बेरड जमातीची ही कहाणी आहे. आपल्या पुढील लेखकीय वाटचालीत रणजित देसाई ह्यांनी खरे करून दाखविते असे,त्यांच्या ह्या पहिल्याच कादंबरीला प्रस्तावना लिहितांना वि. स. खांडेकर ह्यांनी सांगितलेले सूत्र होते- "स्वत:वर असंतुष्ट असणारा कलावंतच सदैव प्रगती करू शकतो."

Basics Of Academic English 1 Foundation Course - RTMNU

by Deeptha Achar Rajan Barett Santosh Dash Charul Jain Sachin Ketkar Aarati Mujumdar

Basics of Academic English 1 has been written bearing in mind the need for comprehensive textbooks that fulfil the requirements of the Foundation Course in English under the Choice Based Credit System (CBCS) introduced for undergraduate students of arts, commerce and science in Gujarat. This is a skills-based book for students of semester 3, and it aims to build on the knowledge acquired in semesters 1 and 2. The aim is to develop the communication skills required in academic situations through practice exercises and activities done by students rather than only through what is taught by the teacher. Many of the themes, contexts and sample texts in the lessons are drawn from everyday life. This allows students to adapt, consolidate and actively make use of what they learn outside the classroom.

Bayakochya Bangadya

by Ravindra Kolhe

King Akbar asked a difficult question to Birbal. He did not give the answer to his question instead he asked him a counter question. The king also could not answer it. The question was similar to what he had asked Birbal. So the king excuses Birbal. Akbar wanted to know how many bangles Birbal’s wife is wearing.

Bedakachi Unch Udi

by P. G. Sahasrabuddhe

In this story, the frog said to friends I can jump like the monkey. He takes a long jump up and eagle catches him.

Bedakiche Pot Phutale

by Ramkrushna Chaudhari

One frog and there three four tadpoles lived near the lake. kids saw an ox and they were surprised. kids told frog there was a big animal. frog increased her stomach and showing to kids. At the end, frog died.

Beduk Ani Sap

by Damodar Viththal Phape

Beduk Ani Sap is the story of a frog . Black frog makes deal with snake. so what is the deal? read the story.

Bedukarav Darav Darav

by L. G. Paranjape

This is a story of frog and turtle. they enjoying every day in the water. all other friends watch them.

Bedukarav Darav Darav

by L. G. Paranjape

This is a story of frog and turtle. they enjoying every day in the water. all other friends watch them.

Bhagavan Buddha Aani Tyancha Dhamma - Novel: भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म - कादंबरी

by B. R. Ambedkar

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा गौतम बुद्धांच्या जीवनावर आणि बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानावर आधारलेला बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित प्रसिद्ध व अखेरचा ग्रंथ आहे. भारतातील नवयानी बौद्ध अनुयायांचा हा धर्मग्रंथ आहे. या ग्रंथावर आधारित अ जर्नी ऑफ सम्यक बुद्ध हा चित्रपट सुद्धा बनवलेला गेला आहे. इ.स. १९८९ साली महाराष्ट्र सरकारच्या शैक्षणिक विभागाने डॉ. आंबेडकरांचे एकत्रित लेखन व भाषणांची सूत्रे आणि निर्देशांकाची यादी म्हणून हा ग्रंथ पुन्हा प्रकाशित केला. या ग्रंथाला बौद्ध धर्माचे धर्मशास्त्र म्हणता येईल. या विशाल ग्रंथात बौद्ध धर्माची विवेचना विशद केली आहे. आंबेडकर साहित्याचे विद्वान डॉ. डी. आर. जाटव यांच्या मते ‘‘हा ग्रंथ अनेक मौलिक प्रश्नांना प्रस्तुत करतो ज्याचे डॉ. आंबेडकरांनी मोठ्या बुद्धिमत्तेसह उत्तर दिले आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी हे पुस्तक बौद्ध धर्माच्या आधुनिक विद्यार्थ्यांशी संबंधित प्रश्नांचे उत्तर म्हणून लिहिले आहे. पुस्तकाच्या प्रस्तावनामध्ये, लेखकाने चार प्रश्नांची सूची दिली आहे.

Bhagavatiganga

by Mukesh Nadan

This is a story of King Sagar who managed to bring River Ganga for the salvation of people but unfortunately, King Sagar had more than sixty thousand children; but all were evil and had evil tendencies. They always create obstacles in religious activities. They were always full of physical pleasures. Being mischievous, they snatched the lives of many good people. God was also sad. God started looking for solutions for the destruction of Sagar's children. In the end King Sagar release their souls to heaven.

Bhai Madhavraoji Bagal Nivdak Lekhsangrah: भाई माधवरावजी बागल निवडक लेखसंग्रह

by Prof. M.G. Mali Prof. R.K. Kanbarkar Dr Nirmalkumar Fadkule Prof. Ramesh Jadhav Shri. N.D. Mahanor Shri. Arjunrao Dangle Shri. Baburao Dharwade

सर्वव्यापी भ्रष्टाचाराने पोखरलेल्या आजच्या सार्वजनिक जीवनाच्या पार्श्वभूमीवर, स्वतःच्या संसाराची होळी करून समाजसेवेचा एक मानदंड ठरलेल्या भाई माधवराव बागल यांचे जीवन हे केवळ आजच्या नव्हे तर उद्याच्या पिढीलाही प्रेरणादायी ठरेल. म्हणूनच त्यांच्या जीवनकार्याची ओळख करून देणाऱ्या “निवडक माधवराव बागल” या ग्रंथाचे प्रयोजन. माधवरावांच्या जीवनपाटचे पाच कालखंड पडतात. (१) बालपण व १९२५ ते ३० पर्यंतचा कालखंड, (२) १९३० ते १९४९ ला संस्थान विलीन होईपर्यंतचा, प्रजा परिषदेच्या लढ्याचा कालखंड, (३) १९५० ते १९५९ पर्यंतचा संस्थानाबाहेरील राजकारणाचा, शे. का. पक्ष प्रवेश व संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा कालखंड, (४) संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेपासून १९७५ पर्यंतचा काँग्रेसशी सहकार्याचा कालखंड, (५) १९७५ नंतर मृत्यूपर्यंत निवृत्त जीवनाचा कालखंड.

Bhakarichi Gosta

by V. D. Desai

Sharad is with his grandfather in the farm . In lunch time, grandfather tells a story about wheet..in marathi.

Bhaktichi Shakti

by Mukesh Nadan

There was a fight between Dhadich and Shup. Dhadich was a strong believer of Lord Shiva and had gained immortality. One day Shup had injured Dhadich but later when he tried again he was defeated and was disappointed. He wanted to defeat him. One day he finds that it is impossible to defeat him and he sees his real form and bows down before Dhadich.

Bhala Manus

by Shivkumar Baijal

A good businessman had built a temple and was looking for a good caretaker for the temple. He had also provided with some fields and farms for the temple so that all who visited the temple should not go hungry. Many people came for the job but he was not satisfied. He sat on the terrace and observed people and found one man fit for the job. He called him tested him and appointed him to the job.

Bhamabai Bhunbhume

by Pra. G. Sahasrabuddhe

Bhamabai Bhunbhume is the story small girl. every day friends make the joke of her name. she complains to the mother. she wants to change her name. read story what happens.

Bhangarwala

by Sridala Swami

चिनूला आपल्या वडलांना मदत करायला आवडते. कधी कधी त्याला त्याबद्दल बक्षीसही मिळते!

Bharat Bhaugolik Parichay TYBA Sixth Semester - RTMNU: भारत भौगोलिक परिचय बी.ए. तृतीय वर्ष षष्टम सेमिस्टर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

by Prof. Dr. Vitthal Gharpure

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बी.ए. सहाव्या सेमिस्टरचे भूगोल विषयाचे 'भारत : भौगोलिक परिचय' पाठ्यपुस्तक सादर करण्यात आले आहे. 'भारत : भौगोलिक परिचय' या पाठ्यपुस्तकांमध्ये आग्नेय आणि दक्षिण आशियातील भारताचे स्थान, भारताचे प्रमुख प्राकृतिक विभाग, भारताची जलप्रणाली, हवामान, जमिनीचे प्रकार, वनस्पती व जंगले यांचे प्रकार आणि वितरण खनिजे व ऊर्जा साधने, लोकसंख्येचे वितरण व घनता, हरित क्रांती व शेतीचे प्रादेशिकीकरण, उद्योगधंदे, औद्योगिक विभाग, व्यापाराचे स्वरूप, प्रात्यक्षिकांमध्ये आधुनिक तंत्राची ओळख यामध्ये हवाई छायाचित्रे, उपकरणे, प्रकार, प्रमाण विश्लेषण, फायदे/तोटे, भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) आणि दूरसंवेदन, सहसंबंध अर्थ आणि गुणांक कालं पिअरसन आणि स्पिअरमनची पद्धती क्षेत्र अभ्यास व क्षेत्र अहवाल तसेच लहान खेड्याचे सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण इत्यादी महत्त्वाच्या विषयांचा समावेश नवीन अभ्यासक्रमानुसार समाविष्ट केलेला आहे. सदर पाठ्यपुस्तकात प्रत्येक विषयाचे मुद्देसूद विवेचन केले आहे. त्याचबरोबर सरावासाठी दीर्घोत्तरी, टिपा लिहा, फरक स्पष्ट करा, एका वाक्यात उत्तरे (संक्षिप्त), चूक की बरोबर, एका वाक्यात उत्तरे लिहा इत्यादी प्रश्न दिले आहेत.

Bharatacha Bhugol 1 Paper 3 TYBA Fifth Semester - SPPU: भारताचा भूगोल १ पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ५ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Dr. Arjun Haribhau Musmade Dr Jyotiram Chandrakant More

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तृतीय वर्ष भूगोल या वर्गातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सामान्य स्तरावर भारताचा भूगोल-1 हा विषय लागू केला आहे. प्राकृतिक, सांस्कृतिक व सामाजिक विविधतेतून एकता साधलेल्या भारत देशाच्या भौगोलिक माहितीची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी, हा मुख्य हेतू डोळ्यांसमोर ठेवून भारताचा भूगोल-1 हा विषय CBCS या पद्धतीत तृतीय वर्ष भूगोल या वर्गातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमत समाविष्ट करण्यात आलेला आहे. प्रस्तुत पुस्तकात भारताचे स्थान, भौगोलिक स्थिती व ऐतिहासिक पार्श्वभूमीचा मागोवा घेतानाच भारत व त्याच्या शेजारी असलेल्या देशांचा असलेला संबंध स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. भारताच्या भौगोलिक रचनेच्या अभ्यासात भारताचे वेगवेगळे भौगोलिक विभाग नकाशाच्या मदतीने विस्तृतपणे स्पष्ट केलेले आहेत. भारतातील जलप्रणालीबद्दल विवेचन करताना अभ्यासक्रमात असलेल्या नद्यांशिवाय इतर नद्यांच्या विवेचनाचाही विद्यार्थी व प्राध्यापकांना शैक्षणिक अंगाने अधिक फायदा होईल.

Bharatacha Bhugol 2 Paper 3 TYBA Sixth Semester - SPPU: भारताचा भूगोल २ पेपर ३ टी.वाय.बी.ए. सेमिस्टर ६ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Dr. Arjun Haribhau Musmade Dr Jyotiram Chandrakant More Dr Nitin Nathuram Mundhe Dr Sunil Dagu Thakare

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तृतीय वर्ष भूगोल या वर्गातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सामान्य स्तरावर भारताचा भूगोल 2 हा विषय लागू केला आहे. आपल्या देशाची सांस्कृतिक, राजकीय तसेच आर्थिक रचना समजावून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. आपला भारत देश विविधतेत एकता साधलेला देश आहे हे आता नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. आपल्या देशातील धार्मिक रचना ही वैविध्यपूर्ण आहे. अनेक धर्माचे लोक आनंदाने एकत्र राहतात. त्यांचे धार्मिक तत्त्वज्ञान, रूढी, परंपरा, धार्मिक श्रद्धास्थाने ही भिन्न-भिन्न आहेत. भारतातील विविध भाषा, वेगवेगळ्या पर्यावरणीय रचनेत राहणारा अदिवासी समाज समजावून घेणे या पुस्तकाच्या माध्यमातून शक्य आहे. प्रत्येक देशाच्या आर्थिकच नव्हे तर सर्वांगीण विकासामध्ये 'वाहतूक' क्षेत्राचे महत्त्व हे अनन्यसाधारण असेच आहे. वाहतूक व्यवस्था हा कोणत्याही देशाच्या सर्वांगीण व शाश्वत विकासाचा कणा आहे. देशाच्या विविध प्रदेशातील शेती उत्पादने, कच्चा माल, पक्का माल व प्रवासी यांची स्वस्त व जलद गतीने वाहतूक करणे अत्यावश्यक ठरते. आपल्या देशातील वाहतूक रचना आणि साधनसंपदा या संदर्भातील सविस्तर विवेचन या पुस्तकात केलेले आहे.

Bharatacha Itihas (1707-1845) SYBA Third Semester - SPPU: भारताचा इतिहास (१७०७-१८४५) एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ३ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr S. G. Kolarkar

भारताचा इतिहास (छत्रपती शाहूपासून ते ब्रिटीश शाहीच्या अस्तापर्यंत) इ.स. १७०७ ते १८८५ या पाठ्यपुस्तकाची चतुर्थ आवृत्ती प्रकाशित केली आहे. या कालखंडात मराठ्यांचा राजकीय इतिहास, ब्रिटिश कालखंडाचा राजकीय इतिहास आणि ह्याशिवाय १९ व्या शतकातील सामाजिक आणि धार्मिक सुधारणांचा व त्याचप्रमाणे राष्ट्रीयत्वाच्या जागृतीची कारणे आणि मुख्य म्हणजे भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना व राष्ट्रीय सभेच्या नेतृत्वाखाली भारतीयांनी स्वातंत्र्याच्या ज्या चळवळी चालविल्या इत्यादी विषयांचा अंतर्भाव होतो. त्यामुळे लॉर्ड कर्झन, राष्ट्रीय चळवळींचा इतिहास, दहशतवादी चळवळी, मुस्लीम जातीयवादाचा उदय आणि विकास ही प्रकरणे या पुस्तकात आहेत. ह्या शिवाय प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी दीर्घोत्तरी व लघुत्तरी प्रश्न देण्यात आले आहेत. परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा निश्चितच उपयोग होईल याची खात्री आहे. ह्याशिवाय योग्य ते नेमलेले नकाशे, महत्वाच्या घटनांची सुची व त्यांच्या तारखा दिल्याने विषय समजण्याच्या दृष्टीने सोयीचे ठरेल.

Bharatacha Itihas Prarambh Te 650 Paryant FYBA First Semester - SPPU: भारताचा इतिहास प्रारंभ ते ६५० पर्यंत एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर १ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by P. G. Joshi

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (U.G.C.) नूतन अभ्यासक्रमानुसार 'भारताचा इतिहास' (प्राचीन काळ) ह्या ग्रंथाची रचना केलेली आहे. त्यातून U.G.C. च्या नवीन दृष्टिकोनांची व उद्दिष्टांची पूर्तता करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा आठवा ग्रंथ कला प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या हाती देताना विशेष समाधान लाभत आहे. प्राचीन भारतातील धर्म, साहित्य, शास्त्र, कला, समाजजीवन, अर्थव्यवस्था आणि प्रशासन व राजकीय घडामोडींना विवेचनात प्राधान्य दिलेले आहे.

Bharatacha Svatantryaladha 1930-34: भारताचा स्वातंत्र्यलढा: १९३०-३४

by Dr V. N. Kuber

डॉ. वा. ना. कुबेर यांनी या ग्रंथात भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील १९३०-१९३४ पर्यंतचा कालखंड घेतला आहे. १९३०-१९३४ या कालखंडात घडलेल्या घटनांचे ते स्वतः साक्षीदार होते. इतकेच नव्हे तर, यातील काही घटनांत त्यांनी स्वतः भाग घेतलेला होता. त्यामुळे त्यांनी लिहिलेल्या या ग्रंथाची विश्वासार्हता निश्चित वाढलेली आहे. या पुस्तकात भारताचा राष्ट्रवाद हा वंशवादविरोधी, साम्राज्यशाहीविरोधी, धर्मनिरपेक्ष (सेक्युलर), लोकशाहीचा पुरस्कर्ता, आंतरराष्ट्रीय दृष्टी असलेला, मानवतावादी आणि विश्वबंधुत्ववादी असा विकसित झाला आहे असे प्रतिपादन केले आहे. त्यानंतरच्या प्रकरणातून १९१९ ते १९३० या काळातील चळवळीवर परिणाम करणाऱ्या सर्व घटना, विचारप्रवाह यांचा ऊहापोह केला आहे.

Refine Search

Showing 176 through 200 of 1,529 results