- Table View
- List View
The Darker Side: द डार्कर साईड
by Cody McFadyenअमेरिकेच्या भावी राष्ट्राध्यक्षांच्या मुलीचा (...की मुलाचा?) विमानात, तीस हजार फूट उंचीवर झालेला खून म्हणजे; हिंस्र मधमाशांच्या पोळ्यावर मारलेला दगडच ठरतो. एकामागोमाग एक खून उघडकीस येतात. खुनी माणूस जाहीररीत्या पूर्वसूचना देऊन खून करू लागतो. या खुन्याची शिकार करायला निघाली आहे; एफ. बी. आय. ची स्पेशल एजंट स्मोकी बॅरेट. भूतकाळाचं प्रचंड ओझं मनावर असलेली, एका हल्ल्यात पती व मुलीला गमावून बसलेली, बलात्कार झालेली आणि तरीही त्वेषाने खुन्याला पकडण्यासाठी सज्ज झालेली! कोण बाजी मारणार या अघोरी सामन्यात? क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणाऱ्या या कथासूत्रात गुरफटून जाण्यासाठी तयार व्हा! लीसा रीडच्या खुन्याचा तपास एजंट बॅरेटच्या हाताखाली चालू असतो, तोच रोझमेरीच्या खुनाची बातमी येते आणि समोर येते, एक काळीकुट्ट खुनांची मालिका…
Dasharupak Vidhan: दशरूपक-विधान
by Prof. R.P. Kangleभरतमुनींच्या “नाट्यशास्त्र” या अभिजात संस्कृत ग्रंथातील नाटक व नाट्यशास्त्रविषयक अध्याय १८ व १९ चे प्रस्तुत भाषांतर अभिनवगुप्ताच्या “अभिनवभारती” टीकेसह प्रा. र. पं. कंगले, मुंबई यांनी मंडळास करून दिले आहे. नाट्याचे प्रकार, व्याख्या व रचना यासंबंधीचे विवेचन भरतमुनींनी केले आहे. “दशरूपनिरूपणम्” नामक अध्याय १८ मध्ये नाटक, प्रकरण वगैरे रूपकाच्या दहा प्रकारांचे वर्णन केले आहे. “इतिवृत्त नामक अध्याय १९ मध्ये कथानकाचा विचार केला आहे. कथानकाच्या अवस्था, अर्थप्रकृती, सन्धी, संघ्यंगे, संध्यंतरे, पताकास्थान इत्यादींचे विवेचन केले असून शेवटी नाटकात सर्वप्रकारच्या लोकस्वभावाचे दर्शन घडवावे असे सांगून नाटकाच्या रचनेविषयी काही सूचना केल्या आहेत. भरताच्या नाट्यशास्त्रात ज्या अनेक विषयांचे विवेचन आहे त्यांपैकी नाटक, प्रकरण आदी रूपकांचे प्राधान्य निर्विवाद आहे. कारण नटांच्या द्वारा रंगभूमीवर प्रस्तुत केले जाणारे जे नाट्य ते मुख्यत्वेकरून ह्या रूपकांच्या प्रयोगाशीच संबद्ध आहे. इतर बहुतेक विषय ह्या नाट्यप्रयोगाच्या संदर्भात अनुषंगाने आले आहेत. तेव्हा रूपकांच्या विवेचनाला ह्या ग्रंथात महत्त्वाचे स्थान असावे यात आश्चर्य नाही.
Dattak Putra
by Nirmala SaradaKing Vijayendra did not have a son. He was worried about what will happen to the kingdom after his death. He was advised to adopt a son. Many days passed but he could not find a suitable person. One day the king finds a poor man and he adopts him. The king was happy with him and after some days he hands over the kingdom and goes on a pilgrimage.
Daulat
by M. Bha. BhosaleDulat is a story of a person who lived in a village and his name dulat.Dulat stayed at the old house of tatya because of river's flooded water get in the house.Tatya Deshmukh was a rich man in a village. tatya favor on him by providing shelter. he requests him to drop his children till station, but dulat refused to do since that day was the festival of bull that is pola. Tatya gets angry and leaves from there. suddenly he heard a news that Bali Chauhan, a person from village get hurt. He took him till station so he gets medication soon. But outside of the station, he saw tatya and his children coming toward the station and he realized that he can drop them too.
Daulat
by M. Bha. BhosaleDulat is a story of a person who lived in a village and his name dulat.Dulat stayed at the old house of tatya because of river's flooded water get in the house.Tatya Deshmukh was a rich man in a village. tatya favor on him by providing shelter. he requests him to drop his children till station, but dulat refused to do since that day was the festival of bull that is pola. Tatya gets angry and leaves from there. suddenly he heard a news that Bali Chauhan, a person from village get hurt. He took him till station so he gets medication soon. But outside of the station, he saw tatya and his children coming toward the station and he realized that he can drop them too.
Dayalu Mulla
by Kalpana KulkarniMulla had won a lot of money and was passing through a town. He finds many families who had taken a loan from Jaffer. They were all homeless and were about to be sold as slaves in the market. Mulla offers them help by paying off their debts. The people there praise him and were thankful for his gift and generosity.
Deception Point: डिसेप्शन पॉईंट
by Dan Brownआर्क्टिकच्या बर्फमय भूमीत एक उल्का नॅसाला सापडली. विज्ञानातील त्या घटनेने नॅसाला संजीवनी मिळाली. अन् मग सुरू झाली एक घटनाशृंखला. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी गुप्त माहितीचे विश्लेषण करणाऱ्या रॅकेल सेक्स्टनला त्या स्थळी पाठवले आणि सुरू झाली एक स्फोटक मालिका. त्या उल्केबाबत अनेक वावड्या उठू लागल्या. एक वैज्ञानिक फसवणूक. जनतेची व राष्ट्राची. ३०० वर्षांपूर्वी पृथ्वीवर कोसळलेल्या उल्केच्या अधिकृतपणाचा मागोवा घेताना त्यात राजकारण आले, पाणबुडी आली, विमाने आली, हत्यासत्र सुरू झाले. तीन माणसे जीव वाचवण्यासाठी पळू लागली. सत्य उघडकीस आले तर? उघडकीस येऊ नये म्हणून आटोकाट प्रयत्न. दा विंची कोड व एंजल्स ॲण्ड डेमन्स यानंतर डॅन ब्राऊन लेखकाची या दोन्हीवर वरताण करणारी थरारक कादंबरी. अद्ययावत तंत्रज्ञान, राजकारण आणि वैज्ञानिक मागोवा यात ढवळून गेलेली अमेरिका. हा सारा चित्तवेधी प्रकार श्री. अशोक पाध्ये यांनी मराठीत आणला आहे.
Delhichya Shahajahancha Itihas: दिल्लीच्या शहाजहानचा इतिहास
by Shri. B.G. Kunteश्री. ब. प्र. सक्सेना लिखित History of Shahajahan of Delhi चा मराठी अनुवाद आहे. हिंदुस्थानवर राज्य करणाऱ्या सर्व मोगल सम्राटात अतिशय रसिक, रंगेल आणि तितकाच कट्टर धर्माभिमानी म्हणून शहाजहानचा उल्लेख करावा लागेल. आपला बाप जहांगीर याच्या विरुद्ध त्याने अयशस्वी बंड केले. बंडखोरीचे वीष जणुकाही मुसलमान राज्यकर्त्यांच्या अंगी भिनले होते. हीच बंडखोरी औरंगजेबाने केली आणि आपल्या बापाला-शहाजहानला-जीवंतपणी नरकयातना भोगावयास लावल्या. शहाजहानचे चरित्र म्हणजे आनंद आणि शोक यांचा एक आविष्कार आहे. डॉ. सक्सेना यांनी आपल्या ग्रंथात हे चरित्र अष्टपैलूपणे सादर केले आहे.
Denaryache Hat Hajar
by Kanhaiyalal Mishra PrabhakarStory of two different passengers having different nature, one was generous and other was strict but both were good.
Deniyal
by Ramesh VarkhedeDeniyal was staying in a hostel. He had read the stories of Sindbad. Since then he always dreams about the sea. One day Deniyal suddenly disappeared from the hostel. The hostel mates were alarmed and started searching for him. Deniyal traveled a long distance to a beach. During his journey, he had to go through a hard life but he was obsessed to sees the ocean. He reaches there and many days he takes the pleasure with fishes and octopus. The hostel mates were thinking that he might have traveled to a long distance maybe America. Deniyal never returned and where he went was a mystery.
Dev Chhe! Pargrahavaril Antaralveer!: देव? छे! परग्रहावरील अंतराळवीर!
by Bal Bhagavatविसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच मानवाचे हजारो वर्षे उराशी बाळगलेले स्वप्न साकार झाले आणि त्याने स्वच्छंदपणे आकाशात झेप घेतली. विमानोड्डाण ते अंतराळप्रवास या प्रगतीला साठ-पासष्ट वर्षेच पुरली. मधल्या काळात विनाशकारी अणूबॉम्ब आणि हायड्रोजन बॉम्ब यांचेही शोध लागले.आजच्या छोट्या मुलांनासुद्धा अंतराळवीरांचे चमकदार पोशाख, धूर आणि ज्वाळा सोडत उडणारे अग्निबाण आणि अंतराळयाने, प्रलयकारी अस्त्रांच्या वापराचे दुष्परिणाम या गोष्टी माहिती आहेत.पण ही सर्व प्रगती मानवाने जर प्रथमच केली असेल, तर जगातल्या सर्व प्राचीन धर्मग्रंथांमधले देव अशाच गोष्टी करत होते, असा उल्लेख कसा आला? खडकांत कोरलेली चित्रे, कालनिश्चिती करता येऊ न शकणाNया दंतकथा, लोककथा तशीच वर्णने कशी करतात.
Dev Tethechi Janava
by D. V. JoshiClouds in the sky hinder the mountains and the rain falls. Knowing this, Kruplana started the new practice of Govardhan Puja, without worshiping Indra. In order to teach Gokul residents a good lesson, Indra started continuously raining. Krishna helps and rescues all. Indra returns angry and gulps all the water from the clouds and makes everything dry. Now the people again pray to Govardhan and the rain falls. Indra is surprised, how can this happen? He humbles himself.
Devacha Dharma
by Mukesh NadanKing Anandmitra’s wife dies and he gets married to another woman. The king had two very young sons. She took care of them until she bore a son. One day she asks the step sons to leave the kingdom so that she can get her son to the throne. But the son of the queen goes away with the other step-brother and stay away from the kingdom. One day the king dies. They all return and look after the kingdom happily.
Devadnya: देवाज्ञा
by Narayan Dharapदेवाज्ञा या शब्दाला एक लौकिक सांकेतिक अर्थ आहे; पण श्री. धारप त्याचा शब्दश: अर्थ घेतात आणि एक कथा रचतात. वातावरणनिर्मिती, तर्कशुद्धता आणि कार्यकारणभावाची भक्कम शृंखला - श्री. धारपांचे हे लेखनविशेष याही कादंबरीत आहेतच. वाचकाला आपला अविश्वास क्षणभर खुंटीला टांगून ठेवायला लावायची किमया केवळ धारपांनीच करावी. मृत्यूच्या कल्पनेभोवती भीतीचं एक विलक्षण वलय आहे आणि गूढताही आहे. मृत्यूचा दाहक स्पर्श क्षणमात्र झाला तर? ही मध्यवर्ती कल्पना या कादंबरीत आहे. तसेच कादंबरीचा शेवट झाला अशा समजुतीत वाचक असताना श्री. धारप कथानकाला अशी काही विलक्षण कलाटणी देतात की वाचक अवाक व्हावा!
Devghev
by Shankar KarhadeThere was a man named Sonopant. He was poor but in his name, there was a mention of gold. He prayed that he should find gold and he gets one idol of gold. He thinks about making it half. Half gold he will exchange for money and do some business. He gets a lot of money and he enjoys and spends all the money. Again he does the same thing. One day he exchanges the idol for silver and then for earthen. Now he becomes very poor and tells the idol that when you were of gold you gave me gold and when you were of silver you gave me silver. Now what will you give me a stone?
Dhadasi Mukund
by Raja MangalavedhekarMukund shows his bravery and saves the child from ox in marathi.
Dhan Nashibatale
by Shivkumar BaijalThis is the story of Bhola and Chatursena. Bhola was poor but a good man and helped everybody in the village but Chatursena was his opposite nobody in the village liked him. One day Bhola finds a pot of gold coins in the field and he gives it to Chatursena. Chatursena sees snakes inside the pot and becomes angry. He throws it into the house of Bhola thinking that the snakes will bite Bhola and he will die. Bhola gets all the gold coins from the pot. He becomes rich.
Dhanachi Ub
by P. G. SahasrabuddheThere was a sage. He begged food and ate and the remaining food he put in a bag and hung it on a hanger. A rat always tried to eat this food, so the sage hit the rat and broke its limb. The sage decides to look for the hole of this rat. He finds a lot of wealth in this hole.
Dharm
by D. V. JoshiA journey to heaven. In this story, Yudhistir is accompanied by Draupadi, Bhim, Arjun and others, along with the dog. All the others fall down to the ground except Yudhistir and the dog. The dog is denied entry into the heaven, but Yudhistir says he will not enter without his dog. He explains his faithfulness.
Dharma Ani Vidnyan: धर्म आणि विज्ञान
by V. V. Kuwadekar''धर्म आणि विज्ञान'' हे पुस्तक बर्ट्रान्ड रसेल लिखित (RELIGION AND SCIENCE) या पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे. अनुवादक वि. वा. कुवाडेकर यांनी केले आहे तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृति मंडळ यांनी हे पुस्तक प्रकाशीत केले आहे. धर्म आणि विज्ञान ही समाजजीवनाची दोन अंगे आहेत. त्यांतील पहिले अंग म्हणजे धर्म. मानवी मनःप्रवृत्तीच्या इतिहासाची आपणास ज्या काळापासून काहीतरी माहिती आहे त्या कालापासून हे अंग महत्व पावलेले आहे. त्याचे दुसरे अंग म्हणजे विज्ञान. हे ग्रीक व अरब लोकांत काही काळ, आणि तेही अधूनमधून भासमान झाले. पण, सोळाव्या शतकात मात्र ते एकदम महत्पदास चढले आणि तेव्हापासून त्याने आपल्या जीवनातील कल्पनांना, आणि संस्थांना अधिकाधिक प्रमाणात आकार दिला आहे. धर्म आणि विज्ञान यात एक दीर्घकाल संघर्ष चालू असून त्यात काही वर्षापूर्वीपर्यंत विज्ञानच नेहमी विजयी ठरले आहे. परंतु रशिया व जर्मनी या देशांत नव्या धर्माचा उदय झाल्यामुळे, आणि त्या धर्माला मिशनरी कार्याच्या विज्ञाननिर्मित नवसाधनांची जोड मिळाल्यामुळे हा प्रश्न, विज्ञानयुगाच्या प्रारंभी होता तितकाच पुनश्च शंकास्पद ठरला आहे. त्यामुळे, परंपरागत धर्माने शास्त्रीय ज्ञानाशी चालविलेल्या युद्धाची कारणे व त्या लढ्याचा इतिहास तपासून पहाणे हे पुन्हा एकवार महत्त्वाचे कार्य होऊन बसले आहे.
Dharmanirpekshata Navhe Ihvad: धर्मनिरपेक्षता नव्हे, इहवाद
by Mahadev Shankar Dholeमानवेंद्रनाथ रॉय यांच्या विचारसरणीने प्रभावित झालेल्या श्री. महादेव शंकर ढोले यांनी आपल्या पुस्तकास “धर्मनिरपेक्षता नव्हे, इहवाद” असे शीर्षक देऊन या वादातील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सर्वंकष स्वरूपाच्या धर्माचा जबरदस्त पगडा असलेल्या भारतासारख्या देशातील समाजात इहवादी शासनाची निर्मिती करणे हे अत्यंत कठिण असले तरी अशक्य नाही असे घटनेच्या शिल्पकारांना वाटत होते. भारताची घटना अस्तित्वात आली त्यालाही चाळीस वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. तरीही येथील शासन अधिकाअधिक इहवादी होण्याऐवजी सर्वधर्मसमभावाचे कातडे पांघरुन धर्माधिष्ठीत चळवळी धुमाकूळ घालीत असल्याचे विपरीत दृश्य दिसत आहे. अशा परिस्थितीत पाश्चिमात्य देशातील तसेच आधुनिक भारतातील विचारवंतांच्या इहवादाबद्दलच्या चिंतनाचा मागोवा घेत विश्लेषण करण्याचा श्री. ढोले यांनी प्रयत्न केला आहे.
Dharmarahasya: धर्मरहस्य
by Dr K. L. Daptari‘धर्मरहस्य’ हा निबंध हिंदुधर्माचा बुद्धिवादी पद्धतीने काढलेला उत्कृष्ट निष्कर्ष आहे. मानवी बुद्धि स्वतंत्र रीतीने ज्या पारलौकिक अतींद्रिय तत्त्वांचे किंवा सिद्धांतांचे आकलन करू शकत नाही अशा अमरत्व, ईश्वर, पुनर्जन्म, दिव्यदृष्टी इत्यादि तत्त्वांचा वा सिद्धान्तांचा अंगीकार न करता मानवी बुद्धीस समजू शकेल व पटू शकेल अशा हिंदुधर्मीय सिद्धान्तांची सुसंगत तर्कशुद्ध रचना या पुस्तकात केलेली आढळते. वेद, स्मृति व पुराणे या हिंदुधर्मशास्त्राच्या व धर्मेतिहासाच्या ग्रंथांचे दीर्घकालपर्यंत परिशीलन करून त्यांची व्यवस्थित उपपत्ती येथे मांडली आहे. या निबंधात वेद, स्मृती व पुराणे यांची ऐतिहासिक दृष्टीने मीमांसा करून त्यातील निष्कर्ष व्युत्पादिले आहेत. ऐतिहासिक पद्धती व ग्रंथप्रामाण्य पद्धती अशा दोन परस्परविरोधी पद्धती स्वीकारणारे हिंदुधर्म मीमांसकांचे दोन विरोधी संप्रदाय आहेत.
Dharmashastracha Ithihas Purvardha: धर्मशास्त्राचा इतिहास पूर्वार्ध
by Yashwant Abaji Bhatभारतरत्न महामहोपाध्याय डॉ. पांडुरंग वामन काणे ह्यांनी इंग्रजी भाषेत लिहिलेल्या ‘History of Dharmashastra’ ह्या विस्तृत आणि विद्वत्तापूर्ण ग्रंथाच्या मराठीमध्ये केलेल्या सारांश स्वरूपाच्या अनुवादाचा पूर्वार्ध मराठी वाचकांपुढे सादर करण्यात आला आहे. “भारतामधील चालीरीतींमध्ये जे फेरबदल घडून आले आहेत त्यांच्या संबंधी, त्याचप्रमाणे भारतीय समाजरचनेमध्ये झालेल्या स्थित्यंतराविषयी आणि सामान्यतः कालानुक्रमाविषयी शास्त्रीवर्गात चमत्कारिक भावना प्रचलित आहेत आणि शास्त्रीवर्गाचे भारतातील सामान्य जनसमुदायावर फार मोठे वजन आहे ह्याकरिता ह्या ग्रंथाचे संस्कृत भाषेत आणि मराठी भाषेमध्ये भाषांतर केले आहे. “धर्मशास्त्राच्या विशिष्ट विषयांचे विवेचन करणारी उत्कृष्ट पुस्तके प्रख्यात विद्वानांनी जगाला सादर केली आहेत. तथापि, कोणत्याही एका लेखकाने समग्र धर्मशास्त्राची चिकित्सा करण्याचा आतापर्यंत प्रयत्न केलेला नाही. त्या दृष्टीने पाहिल्यास हा ग्रंथ त्या विषयावरील अग्रेसर ग्रंथाच्या स्वरूपाचा आहे.
Dhind FYBA - SPPU: धिंड एफ.वाय.बी.ए. - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी
by Shankar Patil“म्या दारूला शिवलो न्हाई. शप्पत सांगतो, मी घेतल्याली न्हाई. उगा इनाकारणी माज्यावर अदावत घेऊ नका.” राऊ खोतानं साफ झिडकारलं तशी ती सारी चावडी खालवर झाली. लोक खदाखदा हसू लागले आणि राऊ खोतच म्हणाला, “हसून दावू नका. खरं सांगतो. मी घेतल्याली न्हाई.” रामभाऊ हसून म्हणाले – “गड्या, तुझ डोळं सांगत्यात की रं!” “अण्णा, डोळं काय सांगत्यात? गपा, उगच गप्प् बसा.” “उतरंस्तवर गप् बसावं म्हणतोस व्हय राऊ?” “अहो, काय चढलीया काय मला?” “अजून चढली न्हाई म्हणतोस?” “अहो, त्याचं नावसुदिक घेऊ नगा. शिवल्याला न्हाई म्या त्याला!” एक सनदी पुढं झाला आणि मोठ्यानं म्हणाला, “शिवल्यालं न्हाई, तर मग दडून का बसला होतास?” “शेबास! मी काय दडून बसलो होतो काय?” “दडला नव्हतास तर मग माळ्यावर काय करत होतास?” “माळ्यावर काय करतोय! गडद झोपलो होतो?” “मग खाली जागा नव्हती काय?” “ते तुम्हाला काय करायचं? आम्ही खाली झोपू न्हाईतर वर झोपू!” राऊ असं आडवं बोलला आणि सबंध चावडी पोट धरून हसू लागली.