- Table View
- List View
Hirocha Rol
by Shekhar ShiledarOne day Shekh Chilli sees a movie and decides to become a hero. He wanted to earn name, fame and a lot of money. A rich man helps him to become a hero but Shekh Chilli runs away because he could not do acting with a heroine.
Hiryacha Akar Kasa
by Ravindra KolheOne day Birbal had a problem in finding out who is right and who is wrong. Birbal was caught by the fact that none of the cheaters had seen the diamond. The person who sees the object can create a shape similar to that. This kind of thought has been used here by Birbal. Birbal gave them the collection of clay soil. The four of them were closed in different rooms and asked to prepare the shape of the diamond. None could do it and they were exposed.
HIS 220 Adhunik Bharatacha Itihas S.Y.B.A - Y.C.M.O.U
by Prof. Dixit Prof. Thakurdesai Arun Bhosale Arun Joshi Prof. N.C. Dixit Prof. Manohar R. KulkarniHIS 220 Adhunik Bharatacha Itihas text book for S.Y.B.A from Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik in Marathi.
HIS 221 Adhunik Jagacha Itihas (1775 Te 1925) S.Y.B.A - Y.C.M.O.U.
by Prabhakar Dev Shanta Kothekar Prof. Nevaskar Prof. Kamble N. G. BhavareHIS 221 Adhunik Jagacha Itihas (1775 Te 1925) text book for S.Y.B.A from Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik in Marathi.
HIS 280 Prachin Bharat (Prarambh Te Yadav Kal) T.Y.B.A - Y.C.M.O.U
by Prof. Dr. R. Shri. Morvandhikar Prof. Dr. Prabhakar Dev Prof. Dr. Sau. Saral DharankarHIS 280 Prachin Bharat (Prarambh Te Yadav Kal) text book for T.Y.B.A from Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik in Marathi.
HIS 281 Madhyayugin Bharat (1206 Te 1857) T.Y.B.A - Y.C.M.O.U
by Prof. Dr. Sau Saral Dharankar Prof. Dr. B. D. KhuneHIS 281 Madhyayugin Bharat (1206 Te 1857) text book for T.Y.B.A from Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik in Marathi.
HIS 282 Bharatiy Stri Jivanachi Vatchal T.Y.B.A - Y.C.M.O.U
by Prof. R. N. Gayadhani Prof. Dr. T. T. Mahajan Prof. Dr. Sau. Saral DharankarHIS 282 Bharatiy Stri Jivanachi Vatchal text book for T.Y.B.A from Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik in Marathi.
HIS 283 Sark Deshancha Itihas HIS 283 T.Y.B.A - Y.C.M.O.U
by Prof. Satbhai Prof. R. P. Bhamare Prof. Dr. B. D. KhaneHIS 283 Sark Deshancha Itihas text book for T.Y.B.A from Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik in Marathi.
HIS 285 Vividhatetil Ekata T.Y.B.A - Y.C.M.O.U
by Prabhakar Dev N. G. Bhavare M. B. Kulkarni Ramkrushna Metkar. M. B. ShahaHIS 285 Vividhatetil Ekata text book for T.Y.B.A from Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik in Marathi.
His 310 Adhunik Maharashtratil Parivartanacha Itihas T.Y.B.A - Y.C.M.O.U
by Prof. Dr. H. M. Ghodake Prof. Dr. Prakashchandra VyasHis 310 Adhunik Maharashtratil Parivartanacha Itihas text book for T.Y.B.A from Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik in Marathi.
His Day: हिज डे
by Swati Chandorkarसमाजातील उपेक्षित घटक असणारे तृतीय पंथीय अर्थात हिजडे यांची ही कहाणी. त्यांचेही निरनिराळे प्रकार असतात. कोणी जन्मत:च स्त्री किंवा पुरुषाऐवजी तृतीय पंथी किंवा हिजडा असतो. देहाची जाण/समज आल्यावर कोणी स्त्री आपण पुरुष व्हावे म्हणून तर कोणी पुरुष आपण स्त्री व्हावे म्हणून निसर्गाविरुद्ध जाऊन वाटेल तो त्रास, वेदना सोसायला तयार होतात. एखाद्या स्त्रीला स्त्रीदेहाचे तर एखाद्या पुरुषाला पुरुषदेहाचेच आकर्षण वाटते; अशांना लेस्बियन म्हणतात. दैनंदिन जीवनासाठी त्यांना भीक मागणे, शुभ प्रसंगी बधाईला जाणे किंवा शरीरविक्रय असे मार्ग पत्करावे लागतात. वेगळे जीवन वाट्याला आल्याने आणि समाजाकडून बहुधा तुच्छता तसेच हेटाळणीची वागणूक मिळाल्यामुळे हे सगळे एका छताखाली म्हणजेच एक वस्ती करून राहतात. यांनाही गुरू असतो/असते. सर्वांना आपली कमाई गुरुकडे जमा करावी लागते; त्या बदल्यात गुरू त्यांचे जेवण-खाण, कपडालत्ता, आजारपण यासाठी खर्च करतो/करते. अर्थात गुरू म्हणेल ती पूर्व दिशा! याच चाकोरीतून चेला पुढे गुरू होतो. यांचीही घराणी असतात आणि प्रत्येक घराण्याचा नायक असतो. हिजडा तरुण असताना जगण्यासाठी त्याला करावी लागणारी धडपड, तडजोड, वेदना यांना अंत नाही. आजार आणि म्हातारपण यांचा सामना करण्यासाठी मानसिक बळ मिळवणं हे मोठं आव्हान त्यांच्यासमोर आहे आणि तरीही हा तृतीय पंथ ताठ आहे. एकूण हे त्यांचं आयुष्य आहे, जे त्यांनी ‘असं आयुष्य हवं’ म्हणून न मागितलेलं आणि तरीही नशिबी आलेलं. त्यांनाही चांगलं आयुष्य हवं आहे आणि या चांगल्या आयुष्यासाठी त्यांचं एकच मागणं आहे – ‘आम्हाला माणूस म्हणून जगू द्या...’
Huckleberry Finnchi Sahasa: हकलबेरी फिनची साहसं
by Mark Twainअर्नेस्ट हेमिंग्वेंपासून अनेक दिग्गजांना भावलेली ही कादंबरी. आई नसलेला, दारुड्या बापापासून पळणारा उनाड पोरगा हक फिनची ही गोष्ट. हक कायम जगाचा अदमास बांधत राहतो. निसर्गाकडे निर्मळपणे बघतो, लोकांकडे बेरक्या नजरेनं पाहातो, त्या-त्या वेळचे सामाजिक पूर्वग्रह त्याच्याही मनात आहेतच, पण या सगळ्यासकट एक गुण-दोष असलेला तरुण पोरगा म्हणून तो वाचकांपुढं उभा राहतो.
HUM 101-1 Manvyavidyancha Adhishthan Abhyaskram F.Y.B.A - Y.C.M.O.U
by Prof. Dr. Siddheshwar Tagawale Prof. Gogate Prof. Dubale Shyamala Vanarase Shree. BahadurHUM 101-1 Manvyavidyancha Adhishthan Abhyaskram text book for F.Y.B.A from Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik in Marathi.
HUM 101-2 Manvyavidyancha Adhishtan Abhyaskram F.Y.B.A. - Y.C.M.O.U
by Prof. Dr. Eknath PagarHUM 101-2 Manvyavidyancha Adhishtan Abhyaskram Karyapustika text book for F.Y.B.A from Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik in Marathi.
Hushar Kokaru
by P. G. SahasrabuddheHere a lamb was attacked by a fox while drinking water but it saves itself from the fox very cleverly.
Hushari Angalat Ali
by Shekhar ShiledarShekh Chilli was with Sultan in the jungle and Sultan gave him some work and advised him that whenever anybody gives you a job you should be able to do a double job. One day the Begum becomes sick and Shekh Chilli was told to call a doctor. Shekh Chilli gets a doctor as well as a coffin. The Sultan asks Shekh Chilli What is the coffin for? Shekh Chilli says you only had told to do a double job so I brought the coffin as well. Sultan did not know what to say.
Hyderabadcha Svatantrya sangrama: हैदराबादचा स्वातंत्र्य संग्राम
by Shankarbhai Patelश्री. शंकरभाई पटेल आज हा ग्रंथ प्रकाशित होत असताना हयात नाहीत याबद्दल हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामातील त्यांच्या सहकाऱ्यांप्रमाणेच मंडळाच्या सदस्यांनाही अत्यंत दुःख होत आहे. शंकरभाईंच्या या आठवणी म्हणजे हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामाचा समग्र विश्वसनीय इतिहास आहे असे समजण्याचे कारण नाही. या लढ्यातील ज्या घटनांशी शंकरभाईंचा प्रत्यक्ष संबंध आला त्यांच्याबद्दल तपशीलवार साक्ष देण्यावर शंकरभाईंचा जास्त भर आहे. ते स्वतः या लढ्यात सहभागी झालेले असल्यामुळे विशेषतः औरंगाबाद जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांनी बजावलेल्या कामगिरीबद्दल त्यांनी विस्ताराने लिहिणे साहजिक होते. स्वातंत्र्यलढ्याविषयी कुतूहल असलेल्या सर्वसामान्य वाचकाला त्याचप्रमाणे इतिहासाच्या अभ्यासकांना एक महत्त्वाचे साधन म्हणून हा ग्रंथ उपयुक्त ठरेले आहे.
I Do What I Do: आय डू व्हॉट आय डू
by Raghuram G. Rajan'माय नेम इज रघुराम राजन, आय डू व्हॅाट आय डू' (म्हणून मला जे करायचे ते मी करतो), असे एकदा भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले होते. या त्यांच्या वाक्याची प्रचिती वेळोवेळी आली. २०१३ मध्ये रघुराम राजन यांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नरपदाची सूत्रे हाती घेतली तेव्हा भारतापुढे विदेशी चलनाचे संकट होते. त्यातून देशाला बाहेर काढत अर्थव्यवस्थेला स्थैर्य आणण्याचे काम त्यांनी प्रथम केले. २०१३ ते २०१६ अशा तीन वर्षाच्या कारकिर्दीत रिझर्व्ह बँक व देशाच्या विकासासाठी घेतलेल्या निर्णयांची, मध्यवर्ती बँकेच्या मुख्य पदावर बसणे म्हणजे काय असते, त्याचे अनुभव कथन रघुराम राजन यांनी 'आय डू व्हॅाट आय डू' मधून केले आहे. डोसानॉमिक्स ते कर्जमुक्ती अशा अनेक अर्थशास्त्रीय संकल्पना, विकासासाठी आवश्यक मुद्दे मांडले आहेत. अगदी नोटाबंदीवरील त्यांचे मतही यात जाणून घेता येते. पुस्तकाचा मराठी अनुवाद अजित ठाकूर यांनी केला आहे.
Icha Pucha
by Kala ShashikumarIcha and Pucha were two friends. They decided to have a party. They prepared nice dessert, called kanhi in Kerala. It is eaten with the help of jackfruit leaf. Icha goes to bring jackfruit leaf. But Pucha in the meantime eats the entire desert and her stomach bulges out. She cannot even walk. She goes around asking for help.
Ikmai: इक्माई
by Narayan Dharapनारायण धारप हे नाव आताच्या वाचन करणाऱ्या पिढीला नवीन असलं, तरीही आपल्या रहस्यमय लेखनाने त्यांनी एक काळ गाजवला होता. नारायण धारपांच्या कथा 'भय' या विकाराची अनेक रूपे घेऊन येतात. कथानकात पुढे काय घडणार याची उत्सुकता कायम ठेवत वाचकाला आपल्या लेखनात गुंतवून ठेवणे, रहस्यमय व गूढ पद्धतीने भयाच्या तावडीत माणसे कशी सापडतात, शारीरिक व मानसिक वेदना कशी भोगतात, भूत-पिशाच्च, कूर पीडा देणाऱ्या जीवसृष्टीच्या काल्पनिक जगाचे अस्तित्व कसे जाणवते आणि दैवी शक्तीने, चमत्काराच्या कृपेने त्यातून ती कशी सुटतात याचे वर्णन अतिशय चित्तवेधक आहे. माणसाला नेहमीच कोणतेही रहस्य जाणून घेण्याची मुळातच उत्कंठा असते. जितके समाधान वाचनातून मिळते तितके दुसऱ्या कोणत्याही माध्यमातून मिळत नसल्यामुळे वाचनाकडे आकर्षित झालेली नवी पिढी रहस्यमय व गूढ कथेच्या शोधात असते. वाचकांची ही भूक भागविण्याचे काम नारायण धारपांचे साहित्य करते. एकूणच मराठी साहित्यात रहस्य व गूढतेचे दालन समृद्ध करणाऱ्या लेखकात नारायण धारपांचे स्थान वरचे आहे. धारपांच्या अद्भुत घटनांचे तर्कातीत मनोव्यापारांचे खेळ वर्णन करणाऱ्या या कथा वाचकांना एका जागेवर खिळवून ठेवतात, हे वेगळे सांगायला नको. नारायण धारप या रहस्यमय कादंबरीकाराचं `इक्माई' हे पुस्तकातील निसर्गात असणारं एक चमत्कारिक, गूढगुंजन व्यक्तीला विचार करायला भाग पाडतं. रहस्यमय व गूढ कथेच्या शोधात असणाऱ्या वाचकाची भूक वाढविणारी कथा म्हणजेच `इक्माई' कथासंग्रह होय.
Ikshavakuche Vanshaj: इक्ष्वाकुचे वंशज
by Amishराम राज्य. सर्वार्थानं संपूर्ण भूमी. अर्थातच याची किंमत मोजावी लागते. त्याने ती किंमत मोजली. भारत, इ. पू. ३४०० फुटीरतेमुळे अयोध्या कमजोर झाली होती. त्या भयंकर लढाईमुळे प्रचंड नुकसान झालं होतं. या नुकसानाचे परिणाम समाजात कोलवर झिरपले होते. लंकेचा राक्षस राजा रावण हारलेल्या राज्यावर आपलं शासन लागू करत नाही, त्याऐवजी तो त्यांच्यावर आपला व्यापार लादतो. हारलेल्या साम्राज्यातून पैसा खेचून नेतो. सप्तसिंधू साम्राज्याची प्रजा गरीबी, हताशा आणि भ्रष्टाचारात लोटली जाते. या दलदलीतून बाहेर काढण्यासाठी त्यांना एका समर्थ नेत्याची गरज असते. असा नेता आपल्यातच आहे याची त्यांना कल्पनाही नसते. आपण त्याला ओळखतो हे त्यांना ठाऊक नसतं. प्रचंड यातनांना तोंड देत असलेला, बहिष्कृत राजपुत्र. एक असा राजपुत्र ज्याचं मनोबल खच्ची करण्याचा सगळ्यांनी प्रयत्न केलेला असतो. तो राम नावाचा राजपुत्र. देशवासियांनी त्याला जरी यातना दिल्या तरी त्याचं आपल्या देशावर खूप प्रेम असतं. तो कायद्याचा पाठीराखा बनतो. त्याचे तीन भाऊ, त्याची पत्नी सीता आणि तो स्वतः त्या कोलाहलमिश्रीत अंधःकाराविरोधात ठामपणे उभे राहतात. इथरांनी ठेवलेल्या ठपक्यातून राम बाहेर निघू शकतो का? सीतेवरील त्याचं प्रेम त्याला प्राप्त संघर्षांतून तारून नेतं का? त्याचं बालपण उद्ध्वस्त करणाऱ्या राक्षसांच्या राजा रावणाचा बीमोड तो करतो का? विष्णूपदाला तो प्राप्त होतो का?
Iliad: इलियद
by Shamrao Nilkanth Oakग्रीक महाकवी होमर लिखित “Iliad” या ग्रीक महाकाव्याचे सँम्युएल बटलर यांनी केलेल्या इंग्रजी अनुवादाचे मराठी भाषान्तर शामराव नीळकंठ ओक यांनी केले आहे. इलियड हे होमरचे जगप्रसिद्ध महाकाव्य आहे. यात ट्रॉय या ग्रीक शहरात झालेल्या युद्धाच्या विजयाचे आणि विध्वंसाचे वर्णन आहे. हे युद्ध ट्रॉजन युद्ध म्हणून ओळखले जाते.
Imaandar
by Purushottam DhakrasThis is a story of a faithful dog. A wealthy man had kept this dog to guard his house against the robbers. Two robbers tried to divert the attention of dog by giving him bread to eat and thought he will not notice another robber entering the house. But this dog was very faithful he did not fall prey to the bread but successfully attacks the robber.
Imagining India: इमॅजिनिंग इंडिया
by Nandan Nilekani Aparna Velankarसमकालीन संदर्भात अत्यंत महत्त्वाच्या अशा या पुस्तकात भारताचा प्रदीर्घ इतिहास, गुंतागुंतीचे वर्तमान आणि अनेक शक्यतांना जन्माला घालणारे भविष्य यांचा एक सुसंगत असा अन्वय लावण्याचा प्रयत्न नंदन निलेकणी यांनी केला आहे. स्वातंत्र्योत्तर काळातल्या समाजवादी धोरणांमागचे तत्कालीन उद्देश कितीही चांगले असले, तरी प्रत्यक्ष व्यवहारात मात्र या धोरणांची परिणती लोकशाही खिळखिळी करणाऱ्या कुचंबल्या वर्तमानात कशी आणि का झाली, याचे सखोल विवेचन निलेकणी यांनी केले आहे. वर्तमान आणि भविष्य यांचा खंबीर आधार म्हणून उदयाला आलेली भारतातील तरुण लोकसंख्येची दमदार शक्ती हा कळीचा मुद्दा का आहे; याचे विश्लेषण हा या पुस्तकाचा महत्त्वाचा भाग. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झपाट्याने होत जाणाऱ्या क्रांतीमुळे केवळ व्यापार, उद्योग आणि सरकारी कारभारातच नव्हे; तर बहुसंख्य भारतीयांच्या आयुष्यात किती रोमांचक परिवर्तन घडते आहे; याचे अत्यंत रोचक वर्णन या पुस्तकात आहे. जातीच्या गणितांवर बेतलेले राजकारण, कामगार क्षेत्रात दीर्घकाळ प्रलंबित राहिलेल्या सुधारणा, पायाभूत सुविधांची उभारणी, उच्च शिक्षणाचे क्षेत्र आणि भारतातला इंग्रजी भाषेचा वाढता प्रभाव यांसारख्या कळीच्या वादग्रस्त मुद्द्यांचे नंदन निलेकणी यांनी विस्ताराने आणि संपूर्णत: नव्या दृष्टिकोनांसह विस्तृत विवेचन केले आहे. जिथे काही बलाढ्य कंपन्यांच्या वार्षिक उलाढालीचे आकडे हे छोट्या देशांच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेपेक्षाही मोठे होत चालले आहेत, अशा जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत शासन संस्थांची नेमकी भूमिका काय; याचाही ऊहापोह निलेकणी यांनी केला आहे. सार्वजनिक आयुष्यातल्या प्रत्येक क्षेत्रात नवविचारांची-नवनिर्मितीची आणि सुधारणांची गरज अधोरेखित करणारे हे पुस्तक भविष्य तोलून धरू शकतील, अशा नव्या संकल्पना समोर ठेवते. खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक असणाऱ्या लोकशाही व्यवस्थेपासून सामाजिक सुरक्षेच्या छत्रापर्यंत आणि सार्वजनिक आरोग्याच्या सक्षम क्षेत्रापासून शाश्वत ऊर्जा-धोरणापर्यंतच्या या नव्या संकल्पना वर्तमान राजकारणाला ओलांडून पुढे येतील आणि त्यातूनच देशाचे भविष्य आकाराला येईल, असा युक्तिवाद नंदन निलेकणी यांनी या पुस्तकात मांडला आहे.
Indrapeksha Badshah Shreshst
by Ravindra KolheKing Akbar is better than the lord Indra. King wanted the people to prove that so he asked everybody. Nobody had the answer. Birbal proves to the king that he is better than the lord Shiva.