Browse Results

Showing 851 through 875 of 1,529 results

MAR 254 Prasar Madhyamansathi Lekhan Kaushalye T.Y.B.A - Y.C.M.O.U

by Shree Khore Shree Bhonjal

MAR 254 Prasar Madhyamansathi Lekhan Kaushalye text book for T.Y.B.A from Yashwantrao Chavan Maharashtra Mukta Vidyapith, Nashik in Marathi.

MAR 305 Lokvanmay T.Y.B.A - Y.C.M.O.U

by Eknath Pagar Prof. Patil Shri. Patil Sudhir Kothavade Ramesh Varkhede

MAR 305 Lokvanmay text book for T.Y.B.A from Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik in Marathi.

MAR102-1 Marathi Bhashecha Adhishthan Abhyaskram F.Y.B.A - Y.C.M.O.U.

by Rohini Tukdev Shree. Karnik Eknath Pagar

MAR102-१ Marathi Bhashecha Adhishthan Abhyaskram text book for F.Y.B.A from Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik in Marathi.

MAR102-2 Marathi Bhashecha Adhishthan Abhyaskram F.Y.B.A - Y.C.M.O.U.

by Vidyagauri Tilak Bhaskar Shelke Dilip Dhondge

MAR102-2 Marathi Bhashecha Adhishthan Abhyaskram text book for F.Y.B.A from Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik in Marathi.

Marathi Aksharbharati class 10 - Maharashtra Board: मराठी अक्षरभारती इयत्ता दहावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

इयत्ता दहावीचे ‘अक्षरभारती' मराठी हे पाठ्यपुस्तक आहे. आपले विचार, भावना, कल्पना लेखनातून अभिव्यक्त करता यायला हव्यात. यासाठी मराठी भाषा चांगल्या प्रकारे शिकून उत्तम प्रकारे वापरता यायला हवी, हे विचारात घेऊन या पाठ्यपुस्तकातील पाठांची, स्वाध्यायांची योजना केलेली आहे. पाठ्यपुस्तकाच्या सुरुवातीला क्षमतांची यादी दिलेली आहे. त्यावरून कोणती भाषिक कौशल्ये आत्मसात करायची आहेत याची तुम्हांला कल्पना येऊ शकेल. या पाठ्यपुस्तकाच्या अंतरंगात डोकावल्यावर तुमच्या लक्षात येईल, की त्यामध्ये विविध साहित्यप्रकारांचा समावेश केलेला आहे. गद्य पाठांमध्ये कथा, ललित, विनोदी शैलीतील पाठ, विज्ञान विषयावरील पाठ इत्यादी प्रकारच्या पाठांचा समावेश केला आहे. तसेच पद्य पाठांमध्ये प्रार्थना, संतवाणी, देशभक्तीपर गीत, निसर्गवर्णनपर कविता इत्यादी काव्यप्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. पाठ्यपुस्तकाचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक पाठाखालील स्वाध्यायांचे स्वरूप आणि रचना वैविध्य. हे स्वाध्याय तुम्हांला पाठांचे अंतरंग समजून घेण्यास मदत करतील. तुमची आकलनशक्ती, विचारशक्ती, कल्पनाशक्ती आणि सृजनशीलता विकसित करण्याच्या हेतूने स्वाध्यायांतील कृतींची रचना जाणीवपूर्वक केली आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि तुमचे स्वयंअध्ययन यांमधून भाषा शिकताना तुम्हांला अभ्यासाचे ओझे वाटणार नाही. पाठांतराचे दडपणही राहणार नाही. दैनंदिन व्यवहारात आपणाला पावलोपावली मराठी भाषेचा वापर करावा लागतो. त्या दृष्टीने तुमची उत्तम तयारी व्हावी, यासाठी या पाठ्यपुस्तकातील उपयोजित लेखनाचा सराव उपयुक्त ठरेल. त्याचबरोबर रोजच्या व्यवहारांमध्ये तुम्हांला तंत्रज्ञानाचाही वापर करायचा आहे. त्यासाठी पाठ्यघटकांशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी संकेतस्थळांची यादीही दिलेली आहे. प्रत्येक पाठासंबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी अॅपच्या माध्यमातून क्यू. आर. कोडद्वारे उपयुक्त दृकश्राव्य साहित्य आपणांस उपलब्ध होईल. त्याचा तुम्हांला अभ्यासासाठी निश्चितच उपयोग होईल.

Marathi Aksharbharati Class 9 - Maharashtra Board: मराठी अक्षरभारती इयत्ता नववी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

'अक्षरभारती' मराठी इयत्ता नववीचे पाठ्यपुस्तक आहे, या पाठ्यपुस्तकातून विविध साहित्यप्रकारांची ओळख करून दिलेली आहे, ते वाचून मराठी भाषेचे शब्दवैभव विविधांगी आहे, हे लक्षात येईल. भाषा हे नवनिर्मितीचे साधन आहे. नवनिर्मितीचा आनंद मिळावा, म्हणून या पुस्तकात अनेक भाषिक कृती दिल्या आहेत. पाठ्यपुस्तकात विचारशक्ती, कल्पनाशक्ती व सृजनशीलतेला संधी देण्यासाठी अनेक कृती दिल्या आहेत. भाषाभ्यासाच्या कृतींतून भाषेचे घटक, त्यांचे उपयोग समजावून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर लेखनक्षमता व अभिव्यक्ती विकास यांसाठी विविध कृती व नमुने दिले आहेत, या कृतीतून लेखनकौशल्य व वाङ्मयीन अभिरूची नक्कीच वाढणार आहे. दैनंदिन व्यवहारामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरही करावयाचा आहे व त्याचे फायदेही समजून घ्यायचे आहेत. पाठ्यघटकाशी संबंधित पूरक माहितीसाठी पाठ्यपुस्तकामध्ये दिलेल्या संदर्भग्रंथ सूचीचा व संकेतस्थळांचा अभ्यासासाठी वापर करावा.

Marathi Antarbharti class 10 - Maharashtra Board: मराठी आंतरभारती इयत्ता दहावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

इयत्ता दहावीचे ‘आंतरभारती' मराठी हे पाठ्यपुस्तक आहे., जे मराठी भाषेतील विविध साहित्य प्रकारांचा सखोल अभ्यास व विश्लेषण करते. या पुस्तकात कविता, कथा, निबंध, नाटक, आत्मचरित्र, प्रवासवर्णन, ललितलेखन इत्यादी विविध साहित्यिक प्रकारांचा समावेश आहे. मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेचा आढावा घेऊन, या पुस्तकाने मराठी साहित्याचा सांस्कृतिक, सामाजिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून अभ्यास केला आहे. साहित्यिक अभिव्यक्तीचे विविध पैलू आणि त्यांचे महत्त्व या पुस्तकाद्वारे वाचकांना समजावून सांगितले आहे. साहित्यप्रेमी, विद्यार्थी आणि संशोधकांसाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे.

Marathi Balbharati Class 1 - Maharashtra Board: मराठी बालभारती इयत्ता पहिली - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

मराठी बालभारती इयत्ता पहिली हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकात गाणी आहेत. ती सगळ्यांनी मिळून म्हणताना तुम्हांला खूप मजा येईल. तसेच इथे गोष्टीसुद्धा आहेत. गोष्टी ऐकताना, सांगताना मोठी धमाल वाटेल. चित्रांवरून गोष्टी तयार करून त्या मित्रमैत्रिणींना सांगताना तुम्ही अगदी रमून जाल. चित्रे पाहून गप्पा मारताना, तुमचे अनुभव ऐकताना सर्वांना खूप गंमत वाटेल. भाषेतील शब्द, अक्षरे शिकण्यासाठी तुम्हाला आवडणारी खूप रंगीत चित्रे दिलेली आहेत. चित्रांवरून शब्द आणि अक्षरे शिकताना तुम्हाला नक्कीच गंमत वाटेल. ऐकायचे, पाहायचे आणि म्हणत म्हणत वाचायला शिकायचे, गिरवत गिरवत लिहायला शिकायचे, सरावातून ते पक्के करायचे, सारे काही अगदी मजेत. इथे शब्दांचे काही खेळसुद्धा दिले आहेत. ते खेळत खेळत भाषा शिकायची आहे.

Marathi Balbharati Class 3 - Maharashtra Board: मराठी बालभारती इयत्ता तिसरी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

मराठी बालभारती इयत्ता तिसरी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्पुस्तकात घर व परिसरातून अनौपचारिकपणे मुलांची शब्दसंपत्ती विकसित झालेली आहे. शाळेत आल्यानंतर पहिली व दुसरीमध्ये मूल वाचायला व लिहायला शिकले आहे. इयत्ता तिसरीमध्ये त्याला श्रवण, भाषण-संभाषण, वाचन व लेखन ही भाषिक कौशल्ये अधिक चांगल्या प्रकारे अवगत करता यावीत, अशी अपेक्षा आहे. या अपेक्षेची पूर्तता करण्यासाठी सुलभ व रंजक असे पाठ, कविता आणि पूरक वाचन साहित्याची निवड केलेली आहे. निवड करताना मुलांचे भावविश्व, अनुभव, परिसरातील घटना व प्रसंग यांचा विचार केला आहे. गाभाघटक, मूल्ये, जीवनकौशल्ये यांचा अंतर्भाव पाठांतील आशयात तसेच स्वाध्याय, भाषिक कृती, उपक्रम व प्रकल्पांत केलेला आहे. विविध भाषिक कृतींच्या माध्यमातून शिकताना विद्यार्थी ज्ञानाची निर्मिती सहजतेने करू शकतील व यातूनच त्यांचा भाषिक विकासही साधता येईल.

Marathi Balbharati class 4 - Maharashtra Board: मराठी बालभारती इयत्ता चौथी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

मराठी बालभारती इयत्ता चौथी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकात घर व परिसरातून अनौपचारिकपणे मुलांची शब्दसंपत्ती विकसित झालेली आहे. इयत्ता चौथीमध्ये त्याला श्रवण, भाषण-संभाषण, वाचन व लेखन ही भाषिक कौशल्ये अधिक चांगल्या प्रकारे अवगत करता यावीत, अशी अपेक्षा आहे. या अपेक्षेची पूर्तता करण्यासाठी सुलभ व रंजक असे पाठ, कविता आणि पूरक वाचनासाठी विविध साहित्य प्रकारांची निवड केलेली आहे. निवड करताना मुलांचे भावविश्व, अनुभव, परिसरातील घटना व प्रसंग यांचा विचार केला आहे. गाभाघटक, मूल्ये, जीवनकौशल्ये यांचा अंतर्भाव पाठांतील आशयात तसेच स्वाध्याय, भाषिक कृती, उपक्रम व प्रकल्पांत केलेला आहे. विविध भाषिक कृतींच्या माध्यमातून शिकताना विद्यार्थी ज्ञानाची निर्मिती सहजतेने करू शकतील व यातूनच त्यांचा भाषिक विकासही साधता येईल.

Marathi Balbharati class 5 - Maharashtra Board: मराठी बालभारती इयत्ता पाचवी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

मराठी बालभारती इयत्ता पाचवी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठपुस्तकात पाठ व कविता मिळून संत्तावीस प्रकरण आणि त्याचे स्वाध्याय दिलेले आहेत. या पाठपुस्तकात विद्यार्थ्यांना घर व परिसरातील व्यक्तींशी घटना-प्रसंगानुरूप बोलता यावे, स्वच्छता, पाणीटंचाई यांसारख्या समस्यांवर विचार करायला ते प्रवृत्त व्हावे, यासाठी पाठ्यपुस्तकांत प्रसंगचित्रे दिली आहेत. चित्रांचे निरीक्षण, त्यांवर विचार, चर्चा व त्यासंबंधी स्वतःचे अनुभवकथन यांतून विद्यार्थ्यांमध्ये जाणीव-जागृती निर्माण होईल. भाषिक कौशल्यांच्या विकासासाठी नावीन्यपूर्ण स्वाध्याय, उपक्रम व प्रकल्प दिलेले आहेत. 'शोध घेऊया, खेळ खेळूया, हे करून पाहा, खेळूया शब्दांशी' या शीर्षकाखाली दिलेल्या मजकुरांतून विद्यार्थ्यांच्या कृतिशीलतेला वाव दिला आहे.

Marathi Balbharati Class 8 - Maharashtra Board: मराठी बालभारती इयत्ता आठवी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

मराठी बालभारती इयत्ता आठवी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकातून वेगवेगळ्या साहित्यप्रकारांची ओळख करून दिली आहे. त्याचा अभ्यास केल्याने मराठी भाषेचे शब्दवैभव किती विविधांगी आहे, हे लक्षात येईल. या पुस्तकात अनेक कृती दिल्या आहेत. ‘वाचा’, ‘चर्चा करूया’ ‘गंमत शब्दांची’, ‘खेळूया शब्दांशी’, ‘लिहिते होऊया’, ‘शोध घेऊया’, ‘खेळ खेळूया’, ‘माझे वाचन’, ‘चला संवाद लिहूया’, ‘सारे हसूया’, ‘सुविचार’, ‘भाषासौंदर्य’ यांसारख्या अनेक भाषिक कृती इत्यादी. पाठ्यपुस्तकातील ‘उपक्रम’ व ‘प्रकल्प’ यांमुळे मिळवलेल्या ज्ञानाची सांगड दैनंदिन जीवनाशी घालून ते ज्ञान स्वप्रयत्नाने पक्के करता येणार आहे. त्या दृष्टीने पाठ्यपुस्तकात विविध कृती योजल्या आहेत.

Marathi Balbharti class 2 - Maharashtra Board: मराठी बालभारती इयत्ता दुसरी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

मराठी बालभारती इयत्ता दुसरी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठपुस्तकात पुस्तकातील चित्रे पाहा. चित्रामधील वस्तू, झाडे, प्राणी, पक्षी आणि माणस यांच्याशी बाला. चित्रातील गोष्टी समजावून घ्या आणि वर्गातील मित्र-मैत्रिणींना सागा. सगळ्यांनी मिळून गाणी म्हणा. पाठ वाचा. वाचता-वाचता समजून घ्या, पाठाखाली वगवगळ्या कृता दिल्या आहत. त्या गमतीदार आहेत. पाठ वाचला, की पाठाखालील कृतींची उत्तरे मिळतील आणि पाठहा अधिक चागल्याप्रकारे समजेल. त्यामधून वाचन-लेखन शिकताना खूप मजा यईल.

Marathi Balbharti class 6 - Maharashtra Board: मराठी बालभारती इयत्ता सहावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

मराठी बालभारती इयत्ता सहावी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या वयोगटातील विद्यार्थ्यांच्या भावविश्‍वातील पाठ व कवितांचा समावेश पाठ्यपुस्तकात केलेला आहे. भाषिक कौशल्यांच्या विकासासाठी नावीन्यपूर्ण स्वाध्याय, उपक्रम व प्रकल्प दिलेले आहेत. 'शोध घेऊया, हे करून पाहा, खेळूया शब्दांशी, सारे हसूया, वाचा, ओळखा पाहू, विचार करून सांगूया, भाषेची गंमत पाहूया' या शीर्षकांखाली दिलेल्या मजकुरांतून विद्यार्थ्यांची निरीक्षणक्षमता, विचारक्षमता व कृतिशीलता यांस वाव दिला आहे. 'आपण समजून घेऊया' या शीर्षकाखाली व्याकरण घटकांची सोप्या पद्धतीने मांडणी केली आहे.

Marathi class 7 - Maharashtra Board: मराठी बालभारती इयत्ता सातवी - महाराष्ट्र बोर्ड.

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

मराठी इयत्ता सातवी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या विषयातून तुम्ही पृथ्वीच्या संदर्भाने अनेक मूलभूत संकल्पना शिकणार आहात. तुमच्या रोजच्या जीवनाशी निगडित असणारे मानवी व्यवहारांचे अनेक घटक तुम्हाला या विषयातून समजून घ्यायचे आहेत. हे नीट समजले तर त्याचा तुम्हाला भविष्यात नक्की उपयोग होईल. या विषयातून आपण विविध मानवी समूहांमधील आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आंतरक्रियांचाही अभ्यास करतो.

Marathi Ekankika - SPPU: मराठी एकांकिका - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by P. L. Deshpande Datta Patil

महाराष्ट्राची ओळख नाटकाची परंपरा खोलवर रुजलेले एक राज्य अशी आहे. ही ओळख अधिक ठळक करून देण्याचे काम ‘एकांकिका' या नाटकाच्या उपप्रकाराने लेखन आणि प्रयोगाच्या माध्यमातन केलेले दिसते. प्रयोगाच्या माध्यमातून एकांकिका या हौशी आणि व्यावसायिक रंगभूमीपासून थेट महाविद्यालयीन पातळीपर्यंत रुजलेल्या दिसतात. त्यामागील एक कारण म्हणजे महाराष्टात होणाऱ्या शंभरहून अधिक एकांकिका स्पर्धा होत. या स्पर्धांतून अनेक कलावंत मराठी रंगभूमीला मिळालेले आहेत. अनेक तरुण कलावंत रंगभूमीशी जोडले गेले आहेत. या तरुणांना एकांकिकांच्या माध्यमातून लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, संगीत, अभिनय, प्रकाशयोजना या रंगभूमीच्या घटकांची ओळख झाली. तसेच त्यांनी एकांकिका लेखनातून सामाजिक, कौटुंबिक, राजकीय अभिव्यक्ती साधलेली दिसते. जगण्याकडे बघण्याची आणि त्या संदर्भात विचार करण्याची सवय लावण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम एकांकिकांनी केलेले आहे.

Marathi Kumarbharati Class 10 - Maharashtra Board: मराठी कुमारभारती इयत्ता दहावीं - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

मराठी कुमारभारती दहावीं हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. पाठ्यपुस्तकाच्या सुरुवातीला क्षमतांची यादी दिलेली आहे. त्यावरून कोणती भाषिक कौशल्ये आत्मसात करायची आहेत याची तुम्हांला कल्पना येऊ शकेल. या पाठ्यपुस्तकामध्ये विविध साहित्यप्रकारांचा समावेश केलेला आहे. या सर्व साहित्यप्रकारांतील आशय आणि भाषा यांमधील वैविध्य स्पष्ट केला आहे. या अभ्यासातून तुम्हांला मराठी भाषेचे शब्दवैभव विविधांगी आहे हे लक्षात येईल. या पाठ्यपुस्तकात प्रत्येक पाठाखालील स्वाध्यायांचे स्वरूप आणि रचना वैविध्य, समजून घेण्यास मदत होईल. आकलनशक्ती, विचारशक्ती, कल्पनाशक्ती आणि सृजनशीलता विकसित करण्याच्या हेतूने स्वाध्यायांतील कृतींची रचना जाणीवपूर्वक केली आहे.

Marathi Kumarbharati class 9 - Maharashtra Board: मराठी कुमारभारती इयत्ता नववी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

मराठी कुमारभारती इयत्ता नववी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. पाठ्यपुस्तकात विचारशक्ती, कल्पनाशक्ती व सृजनशीलतेला संधी देण्यासाठी अनेक कृती दिल्या आहेत, भाषाभ्यासाच्या कृतींतून भाषेचे घटक, त्यांचे उपयोग समजावून सांगितले आहेत. त्याचबरोबर लेखनक्षमता व अभिव्यक्ती विकास यांसाठी विविध कृती व नमुने दिले आहेत, या कृतींतून लेखनकौशल्य व वाङ्मयीन अभिरुची नक्कीच वाढणार आहे. दैनंदिन व्यवहारामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरही करावयाचा आहे. व त्याचे फायदेही समजुन दिले आहेत. पाठ्यघटकाशी संबंधित पूरक माहिती पाठ्यपुस्तकामध्ये दिलेल्या संदर्भग्रंथ सूचीचा व संकेतस्थळांचा अभ्यासासाठी वापर करावा असे स्पष्ट करुन सांगितले आहे.

Marathi Kumarbharati Digest class 10 - Maharashtra Board Guide: मराठी कुमारभारती डाइजेस्ट इयत्ता 10वी - महाराष्ट्र बोर्ड मार्गदर्शन

by Shri Navneet

मराठी कुमारभारती इयत्ता 10वी चे पुस्तक नवनीत एज्युकेशन लिमिटेडने मराठी भाषेमध्ये प्रकाशित केलेले आहे, या पुस्तकामध्ये चार भाग दिले आहेत. पाठ्यपुस्तकातील सर्व पाठ, कविता व स्थूलवाचनाचे पाठ यांवर कृतिपत्रिका आराखड्यानुसार विविध कृती या नवनीतमध्ये दिल्या आहेत. कृतिपत्रिकेच्या आराखड्यातील अद्ययावत बदलांनुसार 'कवितेवरील मुद्द्यांच्या आधारे कृती' या प्रश्नप्रकाराचे मार्गदर्शन देऊन, तो सर्व कवितांमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. प्रस्तुत 'नवनीत'मध्ये दिलेल्या अपठित उताऱ्यांच्या स्वतंत्र विभागात पाठ्यपुस्तकात दिलेले दोन अपठित उतारे, तसेच सरावासाठी अन्य उतारे आणि त्यावर आधारित आराखड्यानुसार अपेक्षित कृतींचा समावेश केलेला आहे.

Marathi Sugambharati Class 8 - Maharashtra Board: मराठी सुगमभारती इयत्ता आठवी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

'सुगमभारती' मराठी इयत्ता आठवीचे संयुक्त भाषेचे पाठ्यपुस्तक आहे, या पाठ्यपुस्तकातून वेगवेगळ्या साहित्यप्रकारांची ओळख करून दिली आहे. भाषा हे नवनिर्मितीचे मुख्य साधन आहे. नवनिर्मितीचा आनंद मिळावा यासाठी या पुस्तकात अनेक कृती दिल्या आहेत. उदा., 'वाचा', 'चर्चा करूया', 'खेळूया शब्दांशी', 'लिहिते होऊया', 'शोध घेऊया', 'भाषेची गंमत', 'विचार करा. सांगा.', 'चला संवाद लिहूया', 'भाषासौंदर्य' यांसारख्या अनेक भाषिक कृती इत्यादी. पाठ्यपुस्तकातील ‘उपक्रम' व 'प्रकल्प' यांमुळे मिळवलेल्या ज्ञानाची सांगड दैनंदिन जीवनाशी घालून ते ज्ञान स्वप्रयत्नाने पक्के करता येणार आहे. रोजच्या जीवनात तंत्रज्ञानाचा वापर करतोच, त्याच दृष्टीने पाठ्यपुस्तकात विविध कृती योजल्या आहेत. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने या कृतींचा अभ्यास करायचा आहे. 'मैत्री तंत्रज्ञानाशी' या शीर्षकाखाली दिलेल्या नवीन माहितीचा उपयोगही दैनंदिन व्यवहारात करायचा आहे. त्याचबरोबर आपण समजून घेऊया' या शीर्षकाखाली भाषाभ्यासाच्या दिलेल्या विविध कृती समजून घेऊन त्या सोडवायच्या आहेत.

Marathi Sulabhabharati class 8 - Maharashtra Board: मराठी सुलभभारती इयत्ता आठवी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

'सुलभभारती' मराठी इयत्ता आठवीचे संयुक्त भाषेचे पाठ्यपुस्तक आहे, या पाठ्यपुस्तकातून वेगवेगळ्या साहित्यप्रकारांची ओळख करून दिली आहे. भाषा हे नवनिर्मितीचे मुख्य साधन आहे. नवनिर्मितीचा आनंद मिळावा यासाठी या पुस्तकात अनेक कृती दिल्या आहेत. उदा., 'वाचा', 'चर्चा करूया', 'खेळूया शब्दांशी', 'लिहिते होऊया', 'शोध घेऊया', 'भाषेची गंमत', 'विचार करा. सांगा.', 'चला संवाद लिहूया', 'भाषासौंदर्य' यांसारख्या अनेक भाषिक कृती इत्यादी. पाठ्यपुस्तकातील ‘उपक्रम' व 'प्रकल्प' यांमुळे मिळवलेल्या ज्ञानाची सांगड दैनंदिन जीवनाशी घालून ते ज्ञान स्वप्रयत्नाने पक्के करता येणार आहे. रोजच्या जीवनात तंत्रज्ञानाचा वापर करतोच, त्याच दृष्टीने पाठ्यपुस्तकात विविध कृती योजल्या आहेत. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने या कृतींचा अभ्यास करायचा आहे. 'मैत्री तंत्रज्ञानाशी' या शीर्षकाखाली दिलेल्या नवीन माहितीचा उपयोगही दैनंदिन व्यवहारात करायचा आहे. त्याचबरोबर आपण समजून घेऊया' या शीर्षकाखाली भाषाभ्यासाच्या दिलेल्या विविध कृती समजून घेऊन त्या सोडवायच्या आहेत.

Marathi Sulabhbharti class 6 - Maharashtra Board

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

मराठी सुलभभारती इयत्ता सहावी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकातील अध्ययन-अध्यापन प्रक्रिया बालकेंद्रित असावी, स्वयंअध्ययनावर भर दिला जावा, अध्ययन व अध्यापन प्रक्रिया आनंददायी व्हावी असा व्यापक दृष्टिकोन समोर ठेवून हे पुस्तक तयार केले आहे. प्राथमिक शिक्षणाच्या विविध टप्प्यांवर विद्यार्थ्यांनी नेमक्या कोणत्या क्षमता प्राप्त कराव्यात त्यासाठी पाठ्यपुस्तकात भाषाविषयक अपेक्षित क्षमता विधानांचा समावेश करण्यात आला आहे. पाठ्यपुस्तकात पाठ व कवितांचा समावेश केलेला आहे. भाषिक कौशल्यांच्या विकासासाठी नावीन्यपूर्ण स्वाध्याय, उपक्रम व प्रकल्प दिलेले आहेत. श्रवण, भाषण-संभाषण, वाचन व लेखन ही भाषिक कौशल्ये अधिकाधिक विकसित होण्यासाठी 'सुविचार', 'वाचू आणि हसू', 'वाचा', 'घोषवाक्ये', 'ओळखा पाहू', 'शब्दकोडी' यांचा समावेश केला आहे. विद्यार्थ्यांनी नवीन शब्द, वाक्प्रचार व म्हणी यांचा वापर सहजतेने करावा, तसेच त्यांच्यामध्ये व्याकरणविषयक जाण निर्माण व्हावी, म्हणून हे सर्व मनोरंजक व सोप्या पद्धतीने दिले आहे. विद्यार्थ्यांना स्वतःची कल्पकता वापरून लेखन करता यावे, विचार व्यक्त करता यावे, यांसाठी वैविध्यपूर्ण प्रश्न व कृती पाठ्यपुस्तकात समाविष्ट केल्या आहेत.

Marathi Sulabhbharti class 7 - Maharashtra Board: मराठी सुलभभारती इयत्ता सातवी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

मराठी सुलभभारती इयत्ता सातवी हे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकातील कथा, संवाद, पाठ, कविता, गीते वाचून नवनवीन शब्द शिकायला मिळणार आहेत. या पाठ्यपुस्तकात आवडतील अशी शब्दकोडी आणि 'वाचा', 'चर्चा करा, सांगा', 'खेळ खेळूया' अशा अनेक कृती दिल्या आहेत. तसेच व्याकरण घटकांची सोप्या रीतीने ओळख करून दिली आहे. शिवाय तुमच्या नवनिर्मितीबद्दल बोलण्याची, लिहिण्याची संधीही मिळणार आहे. संगणक, मोबाइल सहजपणे हाताळता येतो. या तंत्रज्ञानाचा अभ्यासासाठी उपयोग व्हावा यादृष्टीनेही काही कृती करण्यासाठी दिल्या आहेत. मराठी भाषा शिकत असताना त्यातून काही मूल्ये शिकणे, सामाजिक समस्या जाणून घेणे, त्या सोडवण्यासाठी तत्पर राहायला शिकणे हेही महत्त्वाचे आहे. या दृष्टीनेही या पाठ्यपुस्तकातील पाठ, कृती, स्वाध्याय यांचा विचार केला आहे. पाठ्यपुस्तकामध्ये विद्यार्थ्यांच्या भावविश्वातील पाठ, कविता, गीते, कृती, संवाद, स्वाध्याय, उपक्रम व प्रकल्प यांसारख्या अनेक घटकांचा समावेश केलेला आहे. तसेच व्याकरण घटकांची मनोरंजक, सोप्या व कार्यात्मक पद्धतीने मांडणी केली आहे. वैविध्यपूर्ण शीर्षकांखाली काही कृती दिलेल्या आहेत या कृतींतून विद्यार्थ्यांमधील निरीक्षणक्षमता, विचारक्षमता व कृतिशीलता यास वाव मिळणार आहे.

Marathi Vinodi Katha FY. BA Pune University

by D. T. Bhosale

Marathi Vinodi Katha Marathi text book for First year from The Pune Universtity in Marathi.

Marathi Vyakaran Va Bhashabhyas class 10 - Maharashtra Board: मराठी व्याकरण व भाषाभ्यास इयत्ता दहावी - महाराष्ट्र बोर्ड

by Prof. Ashok Bagave

इयत्ता दहावी - मराठी (द्वितीय भाषा) या विषयाचे पाठ्यपुस्तक आणि कृतिपत्रिकेचा आराखडा यांवर आधारित 'नवनीत मराठी (LL) व्याकरण व भाषाभ्यास: इयत्ता दहावी' हे पुस्तक प्रकाशित करताना आम्हांला अत्यंत आनंद होत आहे. भाषा विषयाच्या प्रश्नपत्रिकेत व्याकरणाच्या प्रश्नांना महत्त्वाचे स्थान असते आणि व्याकरणाच्या प्रश्नांमध्ये गणितासारखे पैकीच्या पैकी गुणही मिळू शकतात. मराठी (LL) हा विषये अभ्यासणाऱ्या अमराठी माध्यमांच्या शाळांतील विद्यार्थ्यांना मराठी व्याकरण काहीसे कठीण जाते, असे अनुभवास येते. अशा विद्यार्थ्यांना व्याकरण व भाषाभ्यासातील अभ्यासघटक नीटपणे समजून घेण्यासाठी आणि ते पक्के करण्यासाठी प्रस्तुत पुस्तक खूपच उपयुक्त ठरेल. इयत्ता दहावी - मराठी (LL) साठी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाने नेमलेल्या 'व्याकरण व भाषाभ्यासा'च्या नवीन अभ्यासक्रमाचा आणि कृतिपत्रिकेच्या नवीन आराखड्यानुसार सर्व घटकांचा संपूर्णत: समावेश या पुस्तकात केला आहे. कृतिपत्रिकेच्या नवीन आराखड्यात या वर्षापासून [अ] व्याकरण घटकांवर आधारित कृती आणि [आ] भाषिक घटकांवर आधारित कृती अशा दोन भागांत 'व्याकरण व भाषाभ्यास' विभागलेला आहे.

Refine Search

Showing 851 through 875 of 1,529 results