Browse Results

Showing 876 through 900 of 1,529 results

Marathi Vyakaran Va Bhashabhyas class 9 - Maharashtra Board: मराठी व्याकरण व भाषाभ्यास इयत्ता नववी - महाराष्ट्र बोर्ड

by Prof. Ashok Bagave

इयत्ता नववी - मराठी (द्वितीय भाषा) या विषयाचे नवीन पाठ्यपुस्तक आणि कृतिपत्रिकेचा आराखडा यांवर आधारित 'नवनीत मराठी (LL) व्याकरण व भाषाभ्यास: इयत्ता नववी' हे पुस्तक आहे. मराठी (LL) हा विषय अभ्यासणाऱ्या अमराठी माध्यमांच्या शाळांतील विद्यार्थ्यांना मराठी व्याकरण काहीसे कठीण जाते, अशा विद्यार्थ्यांना व्याकरण व भाषाभ्यासातील अभ्यासघटक नीटपणे समजून घेण्यासाठी आणि ते पक्के करण्यासाठी प्रस्तुत पुस्तक खूपच उपयुक्त ठरले आहे. इयत्ता नववी - मराठी (LL) साठी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाने नेमलेल्या व्याकरण व भाषाभ्यासाच्या नवीन अभ्यासक्रमाचा आणि कृतिपत्रिकेच्या नवीन आराखड्यानुसार सर्व घटकांचा संपूर्णत: समावेश या पुस्तकात केला आहे. कृतिपत्रिकेच्या नवीन आराखड्यात [अ] व्याकरण घटकांवर आधारित कृती आणि [आ] भाषिक घटकांवर आधारित कृती अशा दोन भागांत 'व्याकरण व भाषाभ्यास' विभागलेला आहे.

Marathi Yuvakbharati class 11 - Maharashtra Board: मराठी युवकभारती इयत्ता अकरावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

मराठी युवकभारती इयत्ता अकरावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकात पाच विभाग आहेत. या पाठ्यपुस्तकातून विविध साहित्यप्रकारांची ओळख तर होणार आहेच, शिवाय अनेक जुन्या-नव्या साहित्यिकांची लेखनशैली तुम्हांला अभ्यासता येणार आहे. साहित्यप्रकार म्हणून 'नाटक' या साहित्यप्रकाराचा थोडक्यात परिचय आणि तीन नाट्यउतारे पाठ्यपुस्तकात दिले आहेत. 'दृक्-श्राव्य साहित्यप्रकार' याचा अभ्यास करणार आहात. पुस्तकात व्याकरण घटकांची मांडणी कार्यात्मक पद्धतीने केली आहे. उपयोजित लेखन विभागात अंतर्भूत केलेले घटक हे कालसुसंगत असून, या घटकांच्या अध्ययनातून अनेक व्यावसायिक संधी तुमच्या दृष्टिक्षेपात येऊ शकतील.

Marathi Yuvakbharati class 12 - Maharashtra Board: मराठी युवकभारती इयत्ता बारावी - महाराष्ट्र बोर्ड

by Maharashtra Rajya Pathyapustak Nirmiti Va Abhysakram Sanshodhan Mandal Pune

मराठी युवकभारती इयत्ता बारावी हे पुस्तक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी लेखन केले आहे तसेच श्री. विवेक उत्तम गोसावी यांनी हे पुस्तक मराठी भाषेमध्ये प्रकाशित केले आहे. या पाठ्यपुस्तकात सहा विभाग आहेत. पहिल्या दोन विभागातील गद्य-पद्यपाठांच्या माध्यमातून नामवंत साहित्यिकांच्या साहित्यिक कृतींचा परिचय करून घेता घेता त्या साहित्यांमधील संस्काराने भाषा ही उत्तरोत्तर समृद्ध होत जाईल. हे साहित्य तुमच्या वैचारिक आणि कल्पनाशक्तीच्या विकासासाठी उपयुक्त ठरेल. या साहित्यामधील आशय तुम्हांला आजच्या जीवनातील समस्यांची जाणीव करून देईल तसेच साहित्यिक कृतींमधील सौंदर्याचा आनंद घेत आपले जीवन अनुभवसमृद्ध करण्याचा वस्तुपाठही तुम्हांला मिळेल. चित्रांमुळे पाठ्यपुस्तकाचे स्वरूप अधिक आकर्षक झाले आहे. त्यामुळे आशयाचे आकलन अर्थपूर्ण आणि सुलभ होण्यास मदत होईल.

Marathi Yuvakbharati Digest class 11 - Maharashtra Board Guide: मराठी युवकभारती डाइजेस्ट इयत्ता 11वी - महाराष्ट्र बोर्ड मार्गदर्शन

by Shri Navneet

मराठी युवकभारती इयत्ता 11वी चे पुस्तक नवनीत एज्युकेशन लिमिटेडने मराठी भाषेमध्ये प्रकाशित केलेले आहे, या मार्गदर्शकात एकूण पाच भाग दिलेले आहेत. त्यापैकी गद्य, पद्य, साहित्यप्रकार (नाटक), उपयोजित मराठी व व्याकरण. प्रत्येक गद्यपाठाच्या सुरुवातीला प्रास्ताविकात लेखक/लेखिका व कवी/कवयित्री यांचा परिचय – लेखनवैशिष्ट्ये - ग्रंथसंपदा यांचा उल्लेख करून पुढे पाठाचा परिचय – शब्दार्थ – टिपा – वाक्प्रचार व अर्थ - कृति - स्वाध्याय व त्यांची समर्पक उत्तरे या क्रमाने पाठाचा सुसंगतवार अभ्यास करून दिला आहे. मार्गदर्शकात प्रत्येक नाट्यउताऱ्यावरील कृति-स्वाध्याय अचूक व समर्पक पद्धतीने सोडवून दिले आहेत. मार्गदर्शकात उपरोक्त प्रत्येक कार्यात्मक व्याकरण घटकाचा यथायोग्य परामर्श घेऊन, सुबोध भाषेत समजावून देऊन प्रत्येक घटकासाठी दिलेल्या कृति-स्वाध्यायाची अचूक व समर्पक उत्तरे दिली आहेत.

Marathyancha Itihas (1600-1818) FYBA First Semester - SPPU: मराठ्यांचा इतिहास (१६०० ते १८१८) एफ.वाय.बी.ए. सेमिस्टर १ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Dr S. G. Kolarkar

मराठ्यांचा इतिहास - शिवकाळापासून ते मराठ्यांच्या पाडावापर्यंत म्हणजे इ.स. १६०० पासून ते १८१८ पर्यंत हे पाठ्यपुस्तक आहे. पदवीपूर्व अभ्यासक्रम, पदव्युत्तर अभ्यासक्रम, निरनिराळ्या केन्द्रिय आणि प्रांतीय स्पर्धा परिक्षा ह्यांकरिता वर निर्देशित केलेल्या अभ्यासक्रमातील कोणता ना कोणता कालखंड नेहमीच नेमलेला असतो. मराठ्यांचा इतिहास युद्धाने सुरू झाला आणि युद्धातच संपला. या मराठ्यांचा युध्येतिहास १६००-१८१८ या पुस्तकामध्ये १६०० ते १८१८ पर्यंतच्या मराठ्यांच्या लढायांच्या इतिहासाचा समावेश आहे ज्यात संरक्षण दले, नौदल सेना, रणनीती यांचे वर्णन आहे. अशा विद्यार्थ्यांना हा ग्रंथ निश्चितपणे उपयोगी पडणार आहे.

Marathyancha Itihas (1630-1707) Paper 2 SYBA Third Semester - SPPU: मराठ्यांचा इतिहास (1630-1707) पेपर २ एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ३ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Jyoti Bhosle-Raut

द्वितीय वर्ष कला शाखेच्या सेमिस्टर-3 [Core Course-I (CC- 1C)-3 Credit] साठी मराठ्यांचा इतिहास (1630-1707) पाठ्यपुस्तक लिहिण्यात आले आहे. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी 2020-21 पासून ‘मराठ्यांचा इतिहास (1630-1707)’ हा भाग अभ्यासक्रमात आणलेला आहे. द्वितीय वर्ष कला शाखेत इतिहास हा विषय अभ्यासाला घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्थानिक इतिहास, विशेष संदर्भ महाराष्ट्र समजून घेता यावा म्हणून हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना शिवचरित्राची सांगोपांग माहिती व्हावी असा दृष्टिकोन हे पुस्तक लिहिताना ठेवला आहे. शिवचरित्राच्या जोडीनेच छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या कार्यावर विशेष प्रकाश टाकण्यात आलेला आहे. सहसा क्रमिक पाठ्यपुस्तकांमध्ये न आढळणारी माहिती या पुस्तकात देण्याचा प्रयत्न केला आहे.

Marathyancha Itihas (1707-1818) Paper 2 SYBA Fourth Semester - SPPU: मराठ्यांचा इतिहास (१७०७-१८१८) पेपर २ एस.वाय.बी.ए. सेमिस्टर ४ - सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी

by Prof. Jyoti Bhosle-Raut

द्वितीय वर्ष कला शाखेच्या सेमिस्टर 4 सामान्य स्तर पेपर 2 (G2) साठी मराठ्यांचा इतिहास (१७०७-१८१८) पाठ्यपुस्तक लिहिण्यात आले आहे. द्वितीय वर्ष कला शाखेत इतिहास हा विषय अभ्यासणाऱ्या विद्यार्थ्यांना स्थानिक इतिहास, प्रांतिक इतिहास, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय इतिहास समजून घेता यावा म्हणून हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. छत्रपती शाहू महाराज, बाळाजी विश्वनाथ पेशवे, थोरले बाजीराव पेशवे, नानासाहेब पेशवे, थोरले माधवराव पेशवे, नारायणराव पेशवे, सवाई माधवराव पेशवे आणि दुसरे बाजीराव पेशवे यांच्या संदर्भात इतिहास केंद्रित झाला आहे. व्यक्तिकेंद्रितता टाळून घटनाप्राधान्य इतिहास लिहिण्याचा प्रयत्न करून एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

Marathyanchya Itihasachi Sadhane Portuguese Daptar Khand 3: मराठ्यांच्या इतिहासाची साधने पोर्तुगीज दप्तर खंड ३

by Shri S.S. Desai

महाराष्ट्राच्या इतिहासाशी संबंधित असलेली अशा प्रकारची साधने मराठीत अनुवादून प्रकाशित करण्याचा जो कार्यक्रम मंडळाने आखला आहे त्यातील हे पहिले पुस्तक आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृति मंडळाने ज्या विविध प्रकाशनयोजना हाती घेतल्या आहेत त्यांमध्ये महाराष्ट्राच्या सर्वांगीण इतिहासाच्या साधनांचे प्रकाशनही अंतर्भूत होते. पोर्तुगीज, डच व फ्रेंच यांचे भारताशी दळणवळण १७ व्या शतकापासून मोठ्या प्रमाणात सुरू होते. त्यांच्या तत्कालीन दप्तरांमधील महाराष्ट्राच्या व भारताच्या इतिहासाची पुष्कळ साधने अजून इतिहास–लेखकांना उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्याकरिता, पोर्तुगीज, डच, आणि फ्रेंच उत्तम रीतीने जाणणाऱ्या स्वदेशी व विदेशी इतिहास–संशोधकांच्या प्रयत्नांची गरज आहे. श्री. ए. बी. द. ब्रागांस परेरा, अध्यक्ष, पुराणवस्तु संशोधन विभाग, पोर्तुगीज शासन, गोवा, यांनी परिश्रमपूर्वक केलेले संशोधन अनेक खंडांत पोर्तुगीज भाषेत प्रसिद्ध केले. त्यांतील खंड ३ रा, आशिया विभाग, या ग्रंथातील मराठ्यांच्या इतिहासाशी संबद्ध असलेली प्रकरणे श्री. स. शं. देसाई यांनी आस्थापूर्वक मराठीमध्ये परिश्रमपूर्वक हा अनुवाद केला आहे.

Marsi: मर्सी

by Baba Kadam

“बाबा कदम” द्वारा लिखित “मर्सी” एक अत्यंत प्रभावशाली कादंबरी आहे जी समाजातील विविध समस्यांना आणि मानवी भावनांना गहिरा न्याय देते. या कादंबरीत, लेखकाने सामाजिक आणि मानवी स्थितीवर विचार करत, एकाच पात्राच्या दृष्टिकोनातून जगण्याच्या संघर्षांची आणि आपल्या समाजातील असमानतेची गहन तपासणी केली आहे. “मर्सी” या कादंबरीचा मुख्य नायक एक साधा, पण बुद्धिमान व्यक्ती आहे, जो आपल्या समाजातल्या विषमता, अन्याय, आणि असमानतेच्या समस्यांशी लढा देत आहे. कादंबरीत, नायकाच्या जीवनातील विविध अडचणी, संघर्ष, आणि त्याची समाजातील सुसंगतीसाठी केलेली मेहनत अतिशय प्रभावीपणे दर्शवली आहे. लेखकाने पात्रांच्या मनोवृत्ती आणि सामाजिक परिस्थितीचे अचूक चित्रण केले आहे, ज्यामुळे वाचकांना त्या पात्रांच्या आयुष्याची गोडी लागते. कादंबरीतील घटनांची आणि पात्रांची गहन व अप्रतिम कथा वाचकांना मनोवैज्ञानिक आणि भावनिक दृष्टिकोनातून एक अनोखा अनुभव प्रदान करते. “मर्सी” हे पुस्तक वाचनानंतर वाचक समाजातील विविध समस्यांवर विचार करायला आणि त्यांच्या जीवनातील अडचणींवर उपाय शोधायला प्रवृत्त होते. कादंबरीतील तत्त्वज्ञान आणि कथा वाचन अनुभव अत्यंत समृद्ध करणारा आहे.

Masala Chaha

by Tanya Luther Agarwal

जंगलातल्या त्या अद्भुत विचित्ररूप ठिकाणाविषयी बुलबुलीनं खूप ऐकलं होतं. लोक त्याविषयी सतत बोलत, पण तिथे गेलं मात्र कुणीच नव्हतं. तिथे जाताना, बुलबुलीच्या सोबतीला होता फक्त तोताराम. तिच्या आयुष्यातलं ते सर्वात मोठं साहस ठरणार का?

Masoli Ani Chimukal Pakharu

by Madhuri Purandare

There were a small fish in the river. A bird was her friend and the fish wished to fly like the bird. One day she jumps out of the water and falls on the land. One frog comes and pushes her into the water again. She realizes her mistake and takes a decision not to do such thing again.

Mastanicha Bajirao - Novel: मस्तानीचा बाजीराव - कादंबरी

by Muralidhar Javadekar

महाराष्ट्राचा दुसरा शिवाजी अन्धकारमय स्थितीत अन्तर्धान पावत असल्याचे चित्र मनावर खोल जखम करते. बाजीरावाची कथा व मस्तानीची व्यथा प्रा. मुरलीधर जावडेकर यांनी आपल्या समर्थ लेखणीने एक अमर कलाकृती म्हणून या नाटकाच्या रूपाने मराठी वाचकांसमोर मांडली आहे. नाट्याच्या पानोपानी बाजीरावाची मनोव्यथा त्याच्या हृदय पिळवटून निघालेल्या शब्दांत व्यक्त होते. छत्रपतींच्या दरबारी बाजीरावाबद्दल किल्मिष ओतणारे स्वर्थलंपट मुत्सद्दी, त्यांचे विचार आणि बाजीरावाची धडाडी यांतील भेद उत्कृष्टपणे उकलून दाखविला आहे. मराठ्यांच्या इतिहासातील एक उत्कट भावमधुर पण अंती करुण अशा बाजीराव व मस्तानी यांच्या नितांत सुंदर प्रेमकथेवर आधारलेले पण त्या कथेचे शृंगार, शौर्य, त्यात यांचे पापुद्रे अलगद बाजूस करून आतील करुण, दाहक मनोव्यथेचे असंख्य थर नाजुकपणे उकलून एका शोकांतिकेच्या मुळाशी जाऊन ते कौशल्याने वाचकांसमोर लेखकाने नाटकाच्या रुपाने ठेवले आहे.

Maula Hava Mitra

by Manucheher Kayamaram

There was a kitten in a garden. She saw many birds sitting on the tree. She wanted to become friendly with them. So she wished to have wings like them so that she can approach them. An angel gives this kitten the wings to fly. She learns to fly and then she tries to reach the birds. The birds do not like her and they stay away from her. She encounters many problems because of her wings and gets trapped in a net as well. The angel rescues her. The cat meets one small girl and they both stay very happily together. Kitten forgets about the birds and enjoy the company of the girl.

Mauritius Mathematics Grade 7 (Part-I) - MIE

by Mauritius Institute of Education

Mauritius Mathematics Grade 7 (Part-I) Textbook Mauritius Institute of Education.

Maza Desh, Mazi Manas: माझा देश, माझी माणसं

by Suruchi Pandey

“माझा देश, माझी माणसं” हे सुरुची पांडे लिखित पुस्तक आहे, ज्यामध्ये लेखकाने भारतीय समाजातील विविध पात्रांच्या कथा आणि अनुभवांची मांडणी केली आहे. या पुस्तकात लेखकाने आपल्या देशातील विविध सामाजिक, सांस्कृतिक, आणि भावनिक पैलूंवर प्रकाश टाकला आहे. पुस्तकातील कथा विविध व्यक्तिमत्त्वांवर आधारित आहेत, ज्यांचं आयुष्य वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये रंगलेलं आहे. लेखकाने त्यांच्या दृष्टीकोनातून आपल्या समाजातील प्रश्न, समस्या, आणि त्यांवरील त्यांची विचारधारा व्यक्त केली आहे. पुस्तकात काही कथांमध्ये ग्रामीण जीवनातील साधेपणा आणि समस्यांचा उल्लेख आहे, तर काही कथांमध्ये शहरीकरणाच्या वेगवान जीवनशैलीचे विविध पैलू दिसून येतात. “माझा देश, माझी माणसं” हे पुस्तक वाचकांना विचार करायला लावणारं, प्रेरणादायी आणि भारतीय समाजाचं प्रतिबिंब दाखवणारं आहे. लेखकाने साध्या आणि ओघवत्या भाषेत कथांचं वर्णन केलं आहे, ज्यामुळे वाचक पुस्तकाशी सहजतेने जोडला जातो.

"Mazza Masa!" "Nahi, Mazza Masa!"

by Suraj J. Menon

तीन मित्र आणि तीन हुशार मासे यांची मजेदार गोष्ट.

Me Pan

by V. Suteyev

This is a story of freshly hatched chicken and duck. The chick wanted to do everything what the duck did, but could not swim in water when it entered in water in marahi.

Mehantiche Phal

by Suman Navalkar

Mehantiche phal is the story of orphan boy .he was very hardworking and wanted to study but he didn't have the money to pay the fees. one day a fairy appeared in front of him and she offered help to him by giving money and sweet but he refused to take the money since he wanted to keep up his self-respect.

Mendhiche Vajan

by Shrimati Tara Chaudhari

As the emperor's birthday today, and As a reward for all he gave a sheep. Everyone has to maintain the weight of sheep. Birbal suggested a trick to a guard. read story what happens.

Menu

by Vasumati Dhuru

One day a family invited a celebrity to their house. They panned a menu which consisted of non-vegetarian food. When the lady came she strictly avoided the non-veg food and ate only chappati and palak soup. Everybody were disappointed for they could not give anything to the guest and the menu they had selected was not suitable for the guest. But the father encourages everybody for their hard work and teamwork.

Mhataricha Gela Jiv

by Shekhar Shiledar

One day Shekh Chilli forgets his sickle in the fields. He goes and finds that the sickle was in the sun for a long time and has got the fever. The Hakim tells him to drop it in the well for some time. He does and finds that the fever is gone. He thinks that he knows the medicine for fever. He does this with an old lady but she dies. All the people in the village beat him and take him to the Hakim. There they all declare him a fool and he becomes famous.

Mhatarya Hattichi Vyatha

by Vishal Tayade

This is a story of grown old elephants. A family of elephant was feeling the burden of old elephants because they were not working and were dependent upon the family. There was heavy rain and things were getting difficult to handle. The female was too much bothered about the in-laws and wanted to ask them to leave the house and stay independent. The old elephants were worried how their future would be because they had no strength to gather their own food.

Mi Abhimanyu - Novel: मी अभिमन्यू - कादंबरी

by Satishkumar Patil

डॉ. सतिशकुमार पाटील लिखित मी अभिमन्यू या पुस्तकात मृत्यू समोर उभा असताना मनाची होणारी अवस्था, भावनिक कल्लोळ मांडण्याचा प्रयत्न अगदी समर्पक वाटतो. मृत्यू दारात उभा आहे तेव्हा त्या अभिमन्यूच्या मनात आलेले विचार, त्या विचारातून मृत्यू आणि अर्धवट जगलेल्या जीवनातील चांगल्या वाईट घटनांचा लावलेला व्यापक अर्थ याचे सुंदर मंथन हे सविस्तर कांदबरीमध्ये दाखवले आहे.

Mi Isadora: मी-इझाडोरा!

by Dr Rohini Bhate

“मी-इझाडोरा!” हे पुस्तक इसाडोरा डंकन यांच्या “माय लाईफ” या पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे. इझाडोरा डंकन एक विख्यात अमेरिकन नृत्यांगना. क्लासिकल बॅलेच्या यांत्रिक अन् कृत्रिम नृत्यतंत्राविरुध्द बंडेखारी करणारी मनस्विनी. स्वत:च्या अंतरातून व्यक्त होणारी तिची उन्मुक्त शैली म्हणजे तिच्या आत्म्याचा आविष्कारच! कलेवरची असीम निष्ठा, प्रस्थापित प्रवाहाविरुध्द जाण्याची जिद्द, तीक्ष्ण बुध्दिमत्ता अन् तरल संवेदनशीलता यांच्या बळावर तिनं उभारलं स्वत:चं स्वतंत्र नृत्यविश्व. म्हणूनच या प्रतिभावान नृत्यांगनेचं आयुष्य भावलं रोहिणीताईंसारख्या प्रतिभाशाली कलावतीला. देश, वेष, काळ, शैली सारंच वेगळं असणाऱ्या या दोघींना बांधणाऱ्या सहानुभवाच्या धाग्यातून अनुवादलेले आत्मचरित्र.

Mi Kon Aahe?: मी कोण आहे?

by Dada Bhagwan

केवळ जीवन जगणे हे जीवन नाही. जीवन जगण्याचे काही ध्येय, काही लक्ष्य तर असेल ना ! जीवनात काही उच्य लक्ष्य प्राप्त करायचे ध्येय असायला हवे. जीवनाचे खरे ध्येय "मी कोण आहे" ह्या प्रश्नाचे उत्तर जाणून घेणे हे आहे. मागच्या अनंत जन्मांचा हा अनुत्तरित प्रश्न आहे. ज्ञानीपुरुष परमपूज्य दादाश्रींनी मूळ प्रश्न "मी कोण आहे?" ह्याचे सहज उत्तर सांगितले आहे. ह्या पुस्तकात, मी कोण आहे? मी कोण नाही? स्वतः कोण आहे? माझे काय आहे? माझे काय नाही? बंधन काय आहे? मोक्ष काय आहे? ह्या जगात भगवान आहेत का? ह्या जगताचा 'कर्ता' कोण आहे? भगवान 'कर्ता' आहेत का नाहीत? भागवानांचे खरे स्वरूप काय आहे? 'कर्त्या'चे खरे स्वरूप काय आहे? जग कोण चालवतो? मायेचे स्वरूप काय आहे? जे आपण बघतो आणि जाणतो ते भ्रम आहे की सत्य आहे? व्यावहारिक ज्ञान तुम्हाला मुक्त करू शकते का? ह्या सर्व प्रश्नांची दादाश्रींनी अचूक (अॅाक्युरेट) उत्तरे दिली आहेत.

Refine Search

Showing 876 through 900 of 1,529 results